निर्भेळ यश मिळवण्याची २७ सुत्रे 14-10-2021

निर्भेळ यश मिळवण्याची २७ सुत्रे 14-10-2021

 14-10-2021 

निर्भेळ  मिळवण्याची २७ सुत्रे 



१) निर्भेळ यश पुर्व तयारीवर अवलंबून असते. 

 आणि पुर्व तयारीशिवाय अपयश निश्चित आहे.


२) चिकाटी आणि मेहनतीने प्रत्येक अशक्य कार्य शक्य होऊ शकते. 


३) कधीही हार मानू नका, काय माहित! कदाचित यश तुमच्या आणखी एका प्रयत्नाची वाट पाहत असेल!


४) हा विचार कधीच करू नका की एका वर्षात किंवा एका महिन्यात काय होऊ शकते!!

 फक्त हा विचार करा की २४ तासात काय होऊ शकते !!


५) कोणतेही काम करताना आधी स्वतःवर विश्वास ठेवा.


६) आपल्या विचारांची स्पष्टता ठेवा. 


७) प्रत्येक कामात संयम फार महत्वाचा असतो. पि हळद आणि हो गोरी असं कधीच होत नसते. 


८) निंदकांकडे दुर्लक्ष करण्याची क्षमता ठेवा. कारण तुम्ही यशस्वी झाल्यावर हेच निंदक तुमची तोंड सुकेपर्यंत स्तुती करतील. 


९) कोणतेही काम करताना आधी त्याचा आराखडा तयार करा. मग कामाला सुरुवात करा कारण कोणतेही काम करताना सुसंगतपणा खूप महत्वाची असतो. 


 १०) अपयश सहन करण्याची शक्ती असावी. आपण अपयशी झालो हा विचार न करता काहीतरी नवीन शिकण्यास मिळाले हा विचार करून पुन्हा प्रयत्न सुरू करा. 


११) जर आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपण आपली कमतरता शोधली पाहिजे आणि तीच आपली ताकद बनवली पाहिजे. आजपासूनच आपल्यातली कमतरता शोधा आणि त्याला तुमची ताकद बनवा.



१२) आयुष्याच्या या लढाईत तुम्हालाच स्वतः श्रीकृष्ण आणि स्वतःच अर्जुन व्हायचे आहे, आणि रोज स्वतःचाच सारथी बनून जीवनाचे महाभारतात युद्ध करायचे आहे.


 १३) जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता

 विचार करा की माझी ही अभ्यासाची शेवटची वेळ आहे, उद्याच माझी परीक्षा आहे, आणि हा लास्ट चान्स आहे. या विचाराने केलेली तयारी निश्चितपणे वेगळ्या स्तराची असेल आणि तुम्ही मोठ्यातली मोठी परीक्षा सहजपणे उत्तीर्ण व्हाल. मग ती आयुष्याची परिक्षा तरी!!


१४) नकारात्मक विचारसरणीच्या लोकांना तुमच्या आयुष्यातून बाद करा. तुम्ही ज्या लोकांसोबत वेळ घालवता ते तुमच्या वृत्तीवर, विचारांवर आणि तुमच्या यशावर जास्त प्रभाव टाकतात. 


 १५) जेव्हा तुमची स्वप्ने तुमच्या सबबीपेक्षा मोठी होतात तेव्हाच तुम्ही यशवंत होता. 


 १६) जर तुमच्या मर्यादा तुमच्या यशाच्या आड येत असतील किंवा तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखत असतील, तर त्या लंघणे, मर्यादा ओलांडणे कधीही चांगले आहे आणि तुमचे नियम जर तुमच्या यशामध्ये अडथळा असतील तर ते आजच बदला.


 १७) स्वतःची तुलना या जगात कोणाशीही करू नका. या संपुर्ण ब्रम्हांडात तुम्ही एकमेव आहात. जर तुम्ही स्वतःची तुलना इतरांसोबत करत असाल तर तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात. 


१८) या जगात नि:स्वार्थपणे कोणीही कोणाला आदर देत नाही, म्हणूनच स्वतःला इतके सक्षम बनवा की प्रत्येकाने कामाशिवायही तुमचा आदर करावा!


१९) नशिबाची एक सवय असते की ते निश्चितपणे उदयाला येते. आणि जेव्हा भाग्य उजळते तेव्हा ते सर्वकाही पालटून टाकते. म्हणून आपल्या चांगल्या काळात गर्विष्ठ होऊ नका आणि वाईट काळात थोडे धैर्य धरा ...... !!


२०) स्वतःवर विश्वास ठेवा की तुम्ही तुमच्या कल्पनांपेक्षा कितीतरी पटीने कणखर आहात, आणि तुमच्या ज्ञानापेक्षा अधिक हुशार आहात आणि कोणतेही काम करण्यासाठी तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक सक्षम आहात.


२१) इतरांच्या पाया पडून, इतरांची दारे ठोठावून यश मिळवणे चांगले आहे, पण स्वतःच्या पायावर उभे राहून काहीतरी नवीन करून दाखवण्याचा निर्धार करा !!


२२) जेव्हा शिकणे संपते, जिंकणे संपते ...!

 कारण 

थांबला तो संपला!! 

म्हणून शिकायला सुरुवात करा, तुम्ही आपोआप जिंकू लागाल ....!


२३) शिकण्याची सवय जोपासा, चिकाटीची सवय लावा.. जिद्दीने काम करा!! 

विजय मागून मिळत नाही, संघर्ष करून हिसकावून घेतला जातो.


२४) प्रत्येक दिवस तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठीच काहीतरी करण्यात घालवावा.


 २५) लोक तुमच्यावर गैरसमजाने खोटे तथ्यहिन आरोप करत असतील तर खोट्या आरोपांची काळजी करू नका; उलट त्यांचा जिद्दीने सामना करा, लक्षात ठेवा की चंद्र आणि सूर्य देखील ग्रहणाला सामोरे जातात. कुठलेही ग्रहण जास्त काळ राहत नाही. 


२६) विचारशक्तीत फरक आहे, अन्यथा समस्या, संकट तुम्हाला बळकट ताकदवान करण्यासाठी येतात, तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही !!


 २७) जगातील सर्वात मोठा आजार

        लोक काय म्हणतील? 

लोक काय म्हणतील या मानसिकतेतून बाहेर या. लोक तुमच्याविषयी काय विचार करता यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्वाचे आहे. 


 



Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post