15-10-2021
मेंदुला(Brain) कुशाग्र तल्लख करण्यासाठी काय करता येईल?
मेंदू हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे, मेंदू संपूर्ण शरीरातल्या अवयवांवर नियंत्रण ठेवतो, जर तुमची बुद्धी तीक्ष्ण(Sharp) असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीत कधीही मागे असू शकत नाही. परंतु काही लोकांची बुद्धी इतकी तीक्ष्ण नसते, त्यांची स्मरणशक्तीही खूप कमी असते , यामागचे कारण काय आहे? म्हणून आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही तुमची स्मरणशक्ती कशी वाढवाल? आणि मेंदु तीक्ष्ण कसा बनवू शकता?
संतुलित आहार(Healthy Food) घ्या आणि योग्य ते अन्न सेवन करा.
तुम्हाला कदाचित माहित नसेल की तुम्ही जे काही खाता ते तुमच्या स्मरणशक्तीला किंवा मेंदूला तीक्ष्ण करण्यात खूप महत्वाची भूमिका बजावते, जर तुम्ही शरीराला उपयुक्त असेच अन्न खाल तर तुमचे शरीर निरोगी राहील आणि जर तुमचे शरीर निरोगी असेल असेल तरच तुमचे मन बुद्धी समयोचित योग्य कार्य करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी सक्षम राहील.
अक्रोड खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो. असं वैद्यकीय संशोधनात सिद्ध झाले आहे. कारण अक्रोड या फळाची रचना गर मेंदूसारखी आहे.
पुरेशी झोप घ्या - किमान ७ ते ८ तास झोप घेतलीच पाहिजे.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी बरेच लोक दिवस -रात्र मेहनत करतात, पण काही लोक खूप कमी झोपतात, म्हणजेच त्यांना पुरेशी झोप मिळत नाही, तुम्हाला पुरेशी झोप न मिळाल्यास ही मोठी समस्या बनू शकते. या मुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो आणि निद्रानाश हा आजार होऊ शकतो, म्हणून दररोज ८ तास विश्रांती घ्यावीच.
ब्रेन गेम्स (Brain Games) खेळा -
जर तुम्हाला मोकळ्या वेळेत गेम खेळायला आवडत असेल किंवा तुमच्या मुलाला गेम खेळायला आवडत असेल, तर तुम्ही बुद्धिबळ, कोडे,सुडोकु(Puzzle) किंवा अशा प्रकारचे ब्रेन गेम्स खेळू शकता. ज्या गेम्समध्ये मेंदूचा जास्त वापर केला जातो, असे गेम खेळून, तुमची बुद्धी विकसीत होऊन व्यवस्थित काम करण्यास सुरवात करेल आणि तीक्ष्ण होत जाईल.
रोज पुस्तके वाचत रहा -
तुम्ही जितकी जास्त पुस्तके वाचाल, तितके तुमचे ज्ञान(knowledge) वाढेल, पुस्तके वाचल्यामुळे तुमचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि तुम्हाला नवीन नवीन गोष्टींची जाणीव (knowledge) होत जाईल. मग अध्यात्मिक पुस्तके वाचणे केव्हाही चांगले अध्यात्मविषयक पुस्तक वाचल्याने मनाला शांती मिळते जसे की श्रीमद्भगवद्गीता वाचल्याने मनाला असीम शांतीचा अनुभव येतो जीवनाला योग्य दिशा मिळते. बुद्धी कुशाग्र करण्यासाठी चाणक्य नीती, विदुर नीती, पंचतंत्र अशी नीती शास्त्राची पुस्तके वाचणे अधिक श्रेयस्कर ठरते.
प्राणायाम करा -
रोज सकाळी उठून प्राणायाम केला पाहिजे. प्राणायाम ही एक योग्य पक्रिया आहे शरीर संस्था सुरळीत चालण्यासाठी आणि बुद्धी सुदृढ राहण्यासाठी ऋषी-मुनींनी लावलेला एक महत्वाचा शोध आहे. त्यात शीर्षासन करणे हे मेंदू साठी उपयुक्त ठरते. शीर्षासनामुळे रक्तप्रवाह मेंदूत उतरतो आणि मेंदू सुदृढ राहून तल्लख बनतो.
तुम्ही चांगल्या सात्विक लोकांशी मैत्री केली पाहिजे -
तुम्ही नेहमी सकारात्मक विचारसरणीच्या लोकांशी बोलले पाहिजे. त्यांचे विचार ऐकून त्यावर चिंतन केले पाहिजे. आणि नकारात्मक विचारसरणीच्या लोकांपासून दूर राहावे, यामुळे तुमचे मन चांगल्या गोष्टींवर केंद्रित होईल. जेणेकरून तुमच्या मनाला ताण (stress), नैराश्य(depression), डोकेदुखी(headache) येणार नाही आणि तुमचे आरोग्य चांगले असेल!