कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani marathi lyrics

कृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani marathi lyrics

 श्रीकृष्णाच्या गवळणी मराठी लिरिक्स - Krishanachya Gavlani marathi lyrics

1) गौळण पहिली

श्रीकृष्ण जीवाचा सखा ग । मला दुरून मारतोय हाका ॥धृ०॥

श्री हरी मोठा बालट। वेणु वाजवी धीमकीट कीट।

करी खोड्या बहू वाईट । बहू विचित्र मोठा धीट ॥

गेली भुलून ती राधिका ग। तिच्या मनात बसलाय पक्का ॥१॥

आम्ही गौळणी तीनशे साठ । दया दुधाचे घेउनि माट।

जाताना अडवितो वाट। बंदोबस्त केला कडेकोट ।।

मथुरेला जाऊ नका ग। माझ्या पासून घ्या सोनटक्का ॥२॥

मथुरेचे दैत्य चावट । दहिदूध खाउनि बळकट।

करि तुमचा ते नायनाट। हे लक्षात ठेवा निट।

असी त्याची आहे भूमी का ग।

खेड्यापाड्याने दही दूध विका॥३॥

मी आहे ग तुमचा सखा । मला बिलकूल विसरू नका।

मी पर मोक्षादायका। मी आहे भक्त तिल्लका।

शत्रूच्या फोडी मस्तका ग। सांगे भानुबाळ हा नीका ॥४॥

 2)

गौळण दुसरी

(चाल - झारी हातात, पानी माटात)

मधुबनात वेणु वाजत, राधाकृष्ण खेळ खेळे नादात ॥धृ०॥

वेणी फणी बाळी बुगड़ी कानाला।

हाती फुल सुगंध घेण्याला॥

झुला झुलतो मोर डुलतो।

मुरलीच्या सुंदर तालात ॥१॥

राघो मैना आंब्याच्या डाहाळीला।

कृष्णाचे गुण गाती कोकीळा॥

हात गळ्यात, सोळा कळ्यात।

राधेला कृष्ण दिसे डोळ्यात ॥२॥

सर्व गुण कृष्णाच्या आंगात।

रंगली राधा त्या रंगात ।

तनामनात कृष्णनाथ।

आरखंड राधेच्या ध्यानात॥३॥

चंद्राविणे जसी चंद्रीका।

कृष्णाविणे तसी राधीका॥

नाही रहात जीव देहात।

मासोळी खेळे जसी पाण्यातं ॥४॥

राधाकृष्ण दोहीचा आनंद।

भानु करी गुण गान मतीमंद ।।

कृष्ण पक्षात राधा साक्षात ।

मिसळूनी गेली हरि स्वरूपात ॥५॥

 3)

गौळण तिसरी

 (चाल सखी बाजे पग पैंजणी)

छुम छन ननननननननन वाजे पुंगरू ॥धृ०॥

वाजवी बासरी कुंजबी हरी।

राधा गोरी झाली बावरी॥

छुम छन ननननननननन वाजे धुंगरू ॥१॥

हरीच्या नादा लागली राधा ।

हासूनि गदगदा डोळे मुकुंदा॥

छुम छन ननननननननन वाजे धुंगरू ॥३॥

राधेच्या मनी भरली मुरली।

भानु कवीच शुद्धबुद्ध हरली॥

छुम छन ननननननननन वाजे धुंगरू ॥४॥

4)

गवळण

चाल - गवळ्या घरचि मी गौळण

हाय राधेचे लोणी निर्मळ हाय ।

हरी वाचुनि कोनाला द्यायचे नाय ॥धृ०॥

जन्मो जन्मी केले तप भारी ।

ध्यानी मनी वासुदेव हरी ॥

भोगुनी ब्रह्मचारी राहणार हाय । हरि वांचुनी ॥१॥

भाव भक्तीचे दही दुध लोणी ।

हरी वाचुनी नखाय कोणी ।

वासनेच्या दुधावरची गोड गोड साय । हरि वांचुनी ॥२॥

पुर्वसुकृत बळकट म्हणूनी ।

प्रभू खातो या राधेचे लोणी ॥

पातक सगळे नासुनी जाय । हरि वांचुनी ॥३॥

श्रीकृष्णाला देवूनी लोणी ।

राधा स्वरुपात गेली मिळूनी ॥

भानुकविश्वर हरिगुणा गाय । हरि वांचुनी ॥४॥

 कवि :- कै. श्री. भास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर अंबड

महानुभाव पंथ कविता रसग्रहण


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post