कोणालाही हिन लेखू नये. आणि कोणाचीही टिंगल-टवाळी करू नये

कोणालाही हिन लेखू नये. आणि कोणाचीही टिंगल-टवाळी करू नये

 कोणालाही हिन लेखू नये, आणि कोणाचीही टिंगल-टवाळी करू नये

मित्रांनो! समाजात वावरताना आपल्याला असे अनेक लोक आढळतात. जे पावलोपावली इतरांची हेटाळणी करतात, इतरांच्या होत्या नव्हत्या चुका बोलून छळतात. काही लोकांना आपल्या श्रीमंतीचा किंवा ज्ञानाच गर्व असल्यामुळे ते इतरांनाही भेटतात पावलापावलावर इतरांचा अपमान करतात अर्थात अशा लोकांना त्यांच्या कर्माची फळे काळ योग्य वेळ आल्यावर देतोच पण आपण कोणालाही कमी लेखू नये. यावर एक कथा सांगितली जाते. 

काशीनगरीत एक पंडीतजी राहत असत. पंडीतजी विव्दान होते. गीता रामायण त्यांना मुखोद्गत होते. वेदांचाही त्यांना दांडगा अभ्यास होता. असंख्य संस्कृत श्लोक त्यांना पाठ होते. त्या भागात ते प्रसिध्द होते. एकदा एक नावाडी त्यांचे भेटीकरीता म्हणून आला होता. नाव चालविण्यात तो तरबेज होता. अतीशय कुशलतेने तो नावेचे संचलन करीत असे. जलपर्यटक त्याचेच नावेत प्रवास करण्यास उत्सुक असत. त्याचे नावेत प्रवास करणे म्हणजे एक विश्वसनीयता होती.

नावाडयाने पंडीतजींना लवून नमस्कार केला व पंडीतजीं समोर खाली बसला थोड्या वेळाने पंडीतजी नावाड्याला विचारते झाले. . काय रे.... तुला श्लोक, मंत्र वगैरे येतात की नाही ? नावाडी म्हणतो, नाही पंडित जी , मला श्लोक, मंत्र वगैरे काहीच येत नाही. मी ते शिकलोही नाही. त्यावर पंडीतजी... काय? तुला श्लोक येत नाही व मंत्र ही तू जाणत नाहीस काय रे तूझे हे जीवन? फुकट आहे तुझे हे जीवन? तुझे ५० टक्के आयुष्य वाया गेले. असा सूर काढून पुढे पुन्हा विचारते झाले.

“बरे तुला लिहिता वाचता तरी येते की नाही ?” नावाडी म्हणतो, “मला लिहिताही येत नाही व वाचताही येत नाही महाराज माझे आईवडील मला शिक्षण देवू शकले नाहीत मी निरीक्षर आहे. काय करावे?” पंडीतजी म्हणतात,   “काय ? तुला लिहिताही येत नाही व वाचताही येत नाही.. हे तर अतीच झाले. तुझे जीवन खरोखर माती मोल आहे. तुझे ७५ टक्के आयुष्य वाया गेले आहे. तुझ्या जगण्यात तरी काय अर्थ आहे? फुकट आहे तुझे हे जीवन.  नावाड्याला खुप वाईट वाटले. पण तो गप्प राहिला. 

पुढे काही दिवसांनंतर अचानक जून जुलैचा महिना असेल तो पंडीतजींची त्याच नावाड्याशी भेट झाली. काशीच्या पंडीतजींना गंगा पार करावयाची होती. गंगाकिनारी त्या नावाड्याची नाव हजर होती. नावाडी परिचित असल्याने पंडीतजी त्या नावाडयाच्या नावेत बसून प्रवासाला निघाले नाव गंगानदीच्या अर्ध्यावर असेल, नसेल एकाएकी वादळास सुरूवात झाली. नाव पाण्यावर हेलकावे देवू लागली. नावेत अजूनही काही पर्यटक बसले होते.

नावाडी पंडीतजींना म्हणतो की, “पंडित जी , आपण नावेचे वल्हे वल्हवू शकता काय? वादळ जोर पकडू लागले आहे.” पंडीतजी म्हणतात, “हे क्षुल्लक काम, मी कधी शिकलो आहे का ! मला वल्हे-बिल्हे काही चालवता येत नाहीत.” नावाडी पंडीतजीना पुन्हा प्रश्न करतो. “पंडीतजी, आपणांस पोहता तरी येते का? पंडीतजी पोहणेही येत नसल्याचे सांगतात. 

आता तर वादळाने भयंकर रूप धारण केले होते. नाव जास्तच हेलकावे देवू लागली होती. नावाड्याच्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडले. “पंडीतजी, मग आता तर तुमचे १००% आयुष्य वाया जाणार आहे, तुमच्या जीवनाचे काय सांगावे बरे? कांहीच खरे नाही. असे म्हणून नावाड्याने पाण्यात उडी टाकली, पंडित जी आ वासून पाहत राहिले. पाहता पाहाता वादळाने नावेला उलटी केली. 

पंडीतजी पाण्यात बुडाले. “वाचवा वाचवा” आवाज होवू लागला. परंतु तिथे ऐकायला कोणी नव्हते. पंडीतजी गंगामातेला समर्पित झाले होते. त्यांना जलसमांधी मिळाली होती. बाकी सर्व पर्यटक पोहणे जाणत असल्याने कसे बसे गंगातीरी लागले होते. नावाडीही गंगातीरी लागला होता. पंडीतजी मात्र जलसमाधीस्त झालेत.  म्हणून कोणालाही त्याच्या परिस्थितीवरून हिन लेखू नये. प्रत्येक मनुष्य आपल्या क्षेत्रातला तेंडुलकर असतो. 

संत कबीर म्हणतात .. 

तिनका कबहु ना निंदिये, जो पाँव तले होय । 

कबहुॅ उड़ आखों पडे, पीर घनेरी होय ।।

 पायाखाली असलेला धूळीचा कण क्षुल्लक समजून त्याची अवहेलना करता कामा नये. हाच धुळीचा कण डोळ्यात गेल्यास डोळ्यांना काय पीडा होतात, याचा आम्हा सर्वाना चांगला अनुभव आहे. 

आणि ईश्वर निर्मित कुठलीही वस्तू ही टाकावू नसते. गरजेपोटीच वस्तूंची निर्मिती होत असते. सुई दिसायला लहान असली तरी ती मोठे मोठे वस्त्र विणित असते एका अर्थाने ती नेहमी सहयोगाचे काम करीत असते. सहयोग हा यशाचा गुरुमंत्र आहे. सहयोगा शिवाय सुखी जीवन अशक्यच म्हणता येईल.

अमन्त्रम् अक्षरं नास्ति: नानौषधीर्वनस्पती । 

अयोग्य: पुरुषो नास्ति: योजकस्तत्र दुर्लभ ।।

देवनागरी वर्णमालेत असे एकही अक्षर नाही, की ज्याचा मंत्र बनू शकत नाही. या पृथ्वीवर कोणतीही वनस्पती अशी नाही ज्यात औषधी गुणधर्म नाही. असा एकही मनुष्य नाही जो अयोग्य आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी काहीना काही गुण असतोच. फक्त ते गुण ओळखणारा आणि त्या मनुष्याकडून योग्य कार्य करून घेणारा पुरुष दुर्लभ आहे.  म्हणतात ना कोणतीही व्यक्ती कुरूप नाही. ती फक्त गरीब असते. एकदा श्रीमंती आली की त्या गरिबाचाही वर्ण पालटतो, तोरा येतो. 

मित्रांनो, काम हे क्षुल्लक आहे. ते काम मोठे आहे असा विचार अजिबात करू नये. सर्वच लहान मोठ्या कामाचा आदर असावा कामात श्रध्दा असावी. “कोई भी काम छोटा या बडा नहीं होता.” पंडीतजी नावाड्याच्या जीवनाला अर्थहीन समजत होते. त्याचे काम ते क्षुल्लक समजत होते. पंडीतजीची विद्वत्ता तर श्रेष्ठ होतीच, बहुमोल होती, परंतु नावाड्याचे कामही काही हलके नव्हते. गंगापार करवून देणे हेही नावाड्याचे श्रेष्ठच काम होते.

एकदा सम्राट फ्रेडरिक द ग्रेट त्याच्या राज्याच्या बाहेरील भागात फिरत होता. मी एवढा मोठा सम्राट आहे असा फ्रेडरिकला खूप अभिमान होता.  फिरता फिरता त्याला एक वृद्ध साधु दिसला,साधुचे वय खूप असूनही तो व्यवस्थित चालत होता.  बादशहाने त्या वृद्ध साधूला थांबवले व विचारले, "तू कोण आहेस?"   म्हातारा साधु फ्रेडरिकला ओळखू शकला नाही, की हा विचारणारा दुसरा कोणी नसून या राज्याचा सम्राट आहे. तो साधु हसला आणि म्हणाला, "मी सम्राट आहे." 

 हे उत्तर ऐकून फ्रेडरिक चकित झाला. त्याच्या अहंकाराला कोणीतरी आव्हान दिले होते तरीही स्वतःला सावरून तो हसला आणि म्हणाला, "बरं, तुम्ही सम्राट कुठले आहेस? कोणत्या राज्यावर राज्य करता?" म्हातार्‍याने अभिमानाने होकार देऊन उत्तर दिले, "मी स्वतःवर राज्य करतो. माझ्या मना इंद्रियांवर माझे राज्य आहे त्यांना मी निर्माण करीत असतो" हे उत्तर ऐकून फ्रेडरिक निरुत्तर झाला.

 फ्रेडरिककडे भौतिक राज्य होते, त्याच्याकडे सैन्य शक्ती होती पण दुसरीकडे साधुकडे आध्यात्मिक शक्ती होती. फ्रेडरिकच्या लक्षात आले की हे उच्चकोटीचे साधू आहेत यांच्याकडे अध्यात्मिक शक्ती आहे आणि आध्यात्मिक शक्ती ही भौतिक शक्तीपेक्षा अगणित पटीने मोठी आहे. कारण पृथ्वीवरील सर्व राज्ये येथेच राहणार आहेत. 

आणि काळाच्या ओघात नष्ट ही होणार आहेत म्हणून माणसाची खरी प्रगती म्हणजे आध्यात्मिक प्रगती. ज्याची आपल्या मनावर सत्ता आहे, तोच खरा सम्राट. ज्याने आपल्या इंद्रियांवर विजय मिळवला तोच खरा जगज्जेता आहे. ज्याने स्वतःचे अवगुण दूर करून सद्गुण वाढवले ​​आहेत, ज्याला "मी कोण आहे? या रहस्यमय प्रश्नाचे उत्तर मिळाले तोच खरा शासक आहे. आणि तोच खरा ज्ञानी आहे बाकी भौतिक शास्त्रांमध्ये गुरफटलेले व स्वतःला पंडीत समजणारे ते मूर्तिमंत अज्ञानाचे पुतळेच होत.

फ्रेडरिकने त्या साधूला हीन समजले व स्वतःला सम्राट मानून साधूची टिंगल-टवाळी करण्याचा प्रयत्न केला पण साधी होण्याचे मार्मिक उत्तर दिले त्यात फ्रेडरिकचा सर्व अहंकार गळून पडला.  म्हणून कोणालाही त्याच्या बाह्य वेषावरून हिन लेखू नये. त्याची टिंगल टवाळी करु नये. 

मित्रांनो आमच्या संकेतस्थळाचे लेख आपल्याला आवडत असल्यास लाईक करा आणि लिंक शेअर करा



Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post