मोक्षमार्गाचे प्रवासी - अध्यात्मिक कथामाला भाग 01

मोक्षमार्गाचे प्रवासी - अध्यात्मिक कथामाला भाग 01

 प्रेरणादायी बोधकथा

मोक्षमार्गाचे प्रवासी - कथामाला भाग 01

परमेश्वर निर्मित परधर्मामध्ये मोक्षमार्गामध्ये वरवरची इच्छा, वरवडे त्याग किंवा किर्तीपर दांभिक वैराग्य उपयोगी पडत नाही. आम्ही संसारही करू, विषयही उपभोगू आणि हे सर्व करता करता जमेल तशी, वेळ मिळेल तशी साधनाही करू, असा सर्वसामान्यतेने सर्वांचा विचार दिसतो. 

पण अशा विचार करणाऱ्या नामधारकांची अवस्था दुविधा में दोनो गये माया मिली न श्याम। अशी होऊन जाते. म्हणूनच या मार्गामध्ये अनेक साधक अनेक वर्षे काहीतरी करीत राहतात.  वर्षानुवर्षे करूनही हाताशी काहीही येत नाही. 

 मग गुरूंना, शास्त्राला, परंपरेला, अन्य व्यक्तींना, समाजाला, परिस्थितीला किंवा भगवंतालाही ते दोष देतात.  परंतु दोष हा बाहेर नसून आपल्या अंतरंगामध्येच आहे.  अजूनही आपल्या मनामध्ये त्या प्रतीची तळमळ नाही.

एक शिष्य रोज गुरुंच्याकडे येतो. ज्ञान मागतो, मुक्तिचा उपाय विचारतो. तत्वदर्शी गुरु रोज उपदेश देत राहतात. उपायही सांगतात परंतु शिष्याला अपेक्षा असते की, गुरूंनी काहीतरी चमत्कार करावा आणि मला एका क्षणात आत्मसाक्षात्कार किंवा मुक्ति द्यावी. 

शिष्याला शॉर्टकट पाहिजे असतो. पण शिष्याला हे कळत नाही की संसाराची गाडी ओढण्यासाठी देखील शॉर्टकट रस्ता उपयोगी पडत नाही मग हा तर अध्यात्म मार्ग आहे इथे शॉर्टकट नाही. 

एक दिवस गुरु त्याला जवळच्याच नदीकाठी घेऊन जातात. त्याला पाण्यामध्ये नेतात. आत जेथे गळ्यापर्यंत  पाणी आलेले असते, तेथे नेऊन त्याच्या मानेला धरून त्याचे डोके आत दाबतात. आणि पाण्यात बुडवतात. 

तो डोके प्रयत्नाने पाण्याच्या बाहेर काढतो. एक सेकंदानंतर गुरुजी पुन्हा जोराने खाली दाबतात.  तो पुन्हा अथक प्रयत्नाने डोके बाहेर काढतो. पुन्हा तिसऱ्यांदा डोके दाबतात, तो पुन्हा डोके बाहेर काढतो. आता त्याच्या नाका तोंडात पाणी गेलेले असते. 

नंतर त्याला ते काठावर घेऊन येतात व विचारतात ‘तुला मी बुडवत होते तेव्हा तुला काय वाटले ?’ त्यावेळी तो क्रोधीत झालेला शिष्य उत्तर देतो ‘गुरुजी !  हे तुम्ही काय केलेत? तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केला मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, मी जगतो की मरतो असे झाले होते. माझा जीव वाचविण्यासाठी मी अत्यंत कासावीस झालो, गुदमरलो आणि म्हणून वेगाने डोके बाहेर काढले.  बस्स !  त्याक्षणी दुसरे काहीही आठवले नाही.’ 

 यांवर गुरु उत्तर देतात ‘बाळा ! ही गोष्ट तू लक्षात घे विचार कर, ज्यावेळी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी इतकीच तीव्र तळमळ, व्याकुळता निर्माण होईल, मुक्तीसाठी तुझा जीव तळमळेल, त्याचवेळी तुला आत्मसाक्षात्कार होईल.’ हा मुक्ती पाठ शिकवण्यासाठी मी तुझ्याशी असा वागलो. शिष्याचे डोळे उघडले त्याने गुरूंना नमस्कार केला.

अजून अशा छान छान प्रेरणा देणाऱ्या गोष्टी वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 

मोक्षमार्गाचे प्रवासी - अध्यात्मिक कथा क्र. 02

वाचनिय लेख :- मनाला शांतीच्या नंदनवनात नांदवावे


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post