प्रेरणादायी लेख
मनाला शांतीच्या नंदनवनात नांदवावे
ज्या वेळी आपण एखादया व्यक्तीविषयी किंवा अनेक व्यक्तींविषयी आपल्या मनात राग धरून बसतो किंवा त्या व्यक्तींचा तिरस्कार करतो अशा वेळी आपण विनाकारणच स्वतःला त्रास करून घेत असतो. असे व्यक्ती नुसते आपल्या समोर जरी आले तरी आपली विनाकारणच चिडचिड होते.
आपल्या आयुष्यातील आनंद, उत्साह वाढवायचा असेल तर आपल्याला आपण जिथे राहतो ते घर असेल, आपला मित्रपरिवार असेल, आपले नातेवाईक असतील असं होऊ शकतं की, त्यांच्यापैकी आपल्याला कोणाचा स्वभाव आवडत नसेल, कोणाचं वागणं आवडत नसेल, किंवा कधीतरी कोणी तुमच्या मनाला दुःकर होईल असं मुद्दामहून बोललं असेल या सर्व गोष्टी घडल्या असतील या गोष्टी आपण मनात धरून ठेवू नये त्याचा आपल्याला विनाकारण खूप जास्त त्रास होत असतो. कधी तुम्हाला कोणी फसवलं असेल, तुमचा विश्वासघात केला असेल तरीही स्वतःला या गोष्टींचा जा- स करून घेऊ नका, विनाकारण चिडचिड सुध्दा करू नका, का- रण याचा त्रास तुम्हालाच होईल.
दुसऱ्यांविषयी मनात राग धरणे, द्वेष करणे, तिरस्कार करणे म्हणजे, एखादा गरम झालेला जळत असलेला कोळसा आपल्या हातात धरणे होय. तो सगळ्यात आधी आपल्यालाच पोळणार आहे, त्याचा चटका आधी आपल्यालाच बसणार आहे. म्हणून काहीही झाले तरी रागराग करू नका, चिडचिड करू नका याचा त्रास तुम्हालाच होईल.
मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती ज्याचा त्याचा रोल प्ले करत असतो. आपण आपला 'रोल' व्यवस्थित 'प्ले' करायचा. कोणी आपल्या मनाविरुद्ध वागलं तर किंवा आपल्याला फसवलं तर त्याचा 'रोल त्याने प्ले' केला आहे आपण व्यामुळे दुःखी न होता स्वतःला आणखी मजबूत करायचं आहे. अशा घटना आपल्याला भावनिकरित्या, मानसिकरित्या आणखी मजबूत बनवत असतात. म्हणून कोणत्याही व्यक्तीच्या वागण्यामुळे आपल्या मनातील आनंद, उत्साह हा कमी होऊ देऊ नका; त्याउलट स्वतःला आणखी जास्त स्थिर, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करूया.
नमस्कार,मी आपल्याला पाठवत असलेले लेख नक्की आपला अमूल्य असा वेळ देऊन नक्की वाचा. आपल्या आयुष्यात नक्की यामुळे बदल होत राहील तसेच हे लेख जर आपल्याला आवडले असतील तर मला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवत जा,आपल्या प्रतिक्रिया वाचून मला आनंद होईल. तसेच, हे लेख आपल्या मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईक यांना सुधा नक्की शेअर करायला विसरू का . कारण हे लेख लिहिण्या मागचा हेतू हाच आहे की, प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंद वाढावा आणि जर थोडा फार ताण तणाव असेल तर तो कमी व्हावा आणि आपलं आयुष्य आणि इतरांच आयुष्य आनंदी व्हावं.
आपलाच लेखक - गोविंद सुभाषराव रोडगे