मोक्षमार्गाचे प्रवासी - अध्यात्मिक कथा क्र. 02

मोक्षमार्गाचे प्रवासी - अध्यात्मिक कथा क्र. 02

प्रेरणादायी बोधकथा 

मोक्षमार्गाचे प्रवासी - अध्यात्मिक कथा क्र. 02

आपण आपल्याच पुण्यकर्मानी मिळालेल्या विषयभोगांमध्ये संतुष्ट होऊन परमेश्वराचा मार्ग अवलंबत नाही. विषय सुखालाच अल्पसुखालाच थोर सुख मानून त्यात रममान होत असतो. आणि यापेक्षा थोर सुख असू शकते अशी कल्पनाही आपल्या मनात डोकावत नाही. 

संन्यास मार्ग अवलंबण्याविषयी कोणी धाडस करत नाही. अनेकांचा गैरसमज म्हणा की संन्यासाविषयी वाटणारी भीती म्हणा संन्यास आपल्याकडून होणारच नाही असा न्युनगंड अनेकांमध्ये दिसतो.

चार मित्र गिर्यारोहण करण्यासाठी पर्वतरांगांवर गेले. प्रयत्नांनी त्यांनी एक टेकडी सर केली. तिथे ते निवांत विश्रांती करत बसले. निसर्ग सौंदर्याचा अनुभव करत असताना एक मित्र म्हणाला यापेक्षा ती टेकडी उंच आणि सुंदर भासत आहे. आपण त्या टेकडीवर जाऊया. 

दुसरा म्हणाला वेडा आहेस का त्या टेकडीवर जाण्यासाठी कुणीही धाडस करत नाही. रस्ता खूप भयंकर आहे दरीत कोसळण्याची भीती आहे.

दुसऱ्या मित्रानेही समजावले तिथे जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. पण पहिल्या मित्राने मनाशी पूर्ण निश्चय केला त्या टेकडीवर गेलेच पाहिजे आणि तो निघाला. थोड्याच वेळात त्याने थोडासा प्रयत्न वाढवून ती टेकडी सर केली आणि वर गेल्यावर तो खूप आनंदित झाला. कारण एवढे नैसर्गिक सौंदर्य त्याने याआधी कधीच पाहिले नव्हते. 

तिथे थोडा वेळ बसून तो विचार करू लागला ही टेकडी सर करणे इतकेही अवघड नव्हते मग इथे येणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे असा गैरसमज कोणी पसरवला असेल देव जाणे. बरं झालं आपण मित्रांचे ऐकले नाही. नाहीतर इतके नयनरम्य दृश्य कधीच पाहायला मिळाले नसते.

तात्पर्य :- बहुतेक लोक ज्या गोष्टी सहज मिळतात त्यातच खूश असतात… त्यांना असे वाटत नाही की यापेक्षा जास्त सुख मिळावे असा सृष्टी रचनेमागचा देवाचा हेतू आहे. परमेश्वराच्या त्या मनोधर्मा अनुरूप वर्तन करून ते अनेक जन्मात भटकत असतात. 

ही गोष्ट खरी आहे की संन्यास घेणे म्हणजे खूप मोठे तप आहे. पण केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. आपल्याकडून होणार नाही म्हणून सोडून देणे हे भित्रेपणाचे लक्षण आहे. आणि परमेश्वर पुरुषार्थाशिवाय मिळत नाही. 

म्हणून धर्मबंधूनो! आजपर्यंत तुम्ही पुढचे धाडसी पाऊल उचलण्यापासून स्वतःला रोखून धरत असाल, तर असे करू नको. देवाची प्रवृत्ती नभंगून देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा. 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post