आद्य मराठी कवयित्री महादाइसा - First Marathi poetess

आद्य मराठी कवयित्री महादाइसा - First Marathi poetess

 


आद्य मराठी कवयित्री महदंबा उपाख्य महदाइसा


महदंबा स्तुती 

महदंबे तू नागदेयाची प्राणज्योत चेतना । 

परमार्गाच्या वृद्धे तुजला शतकोटी वंदना ॥धृ.॥

यश धवल अन् कीर्ती धवल ही तुझ्याच धवळ्याची ।

गीत गाऊनी माळ गुंफिली आद्य कवितेची ।

कवन कोवळे करीत होता प्रभू आरोगणा ||१||

महाराष्ट्राचा महदंबे मंगल तू केले । 

तू काव्य सुमने सारस्वता तूचि गुडारिले । 

तुझ्या बळाने स्त्री जगताने केली गे अर्चना ||२||


महंत राष्ट्री काव्य भाग तू सुफलित केली । 

सन्मानाची जागा अंबे अबलेला दिली । 

कशी सुचली सांग रूपाई तुला ही कल्पना ॥३॥


तू काव्याची धरती झाली नारी मुक्त केली 

तव्यावरच्या हाताने गे देवपूजा झाली । 

खणखणले ते चुडे हाताचे केले तू भजना ||४||


वेड काढण्या वेड्या जिवाचे देवची झाला वेडा । 

त्या देवाने तुला धाडिले जाय भानखेडा ॥ 

वेडाचे ते मोल कळाले तुझ्या अंतःकरणा ||५||


उजाडरानी होता पडला एक धुरंधर । 

पाठीवरती घेऊनी गाठी परमेश्वरपूर। 

जीव लावूनी या पंथाला दिले जीवदाना ॥ ६ ॥

तुझ्याच प्रश्ने जन्मा आले लीळाचरित्र । 

तू नसती तर नसते दिसले स्वामींचे सूत्र । 

अक्षरधारामधून बोधा बोधविले तू जना ॥७॥

भास्कराच्या हाती ग्रंथ काळ  । 

हिराइसाच्या कंठामधुनी पुन्हा अवतरतो । 

अबलेनेही बल दाविले तुझीच ही प्रेरणा ॥ ८ ॥

केशिराज जागल्या तरी ही त्याला जागविते । 

पंथामधल्या ज्ञान्याला ही ज्ञान शिकविते । 

चराचराला मार्ग दाविला करूनी आचरण ॥ ९ ॥

तू गार्गी तू मैत्रेयी झाली माय मराठीची । 

वत्सल माते वात्सल्याची प्रभा तू प्राची ।

काव्यप्रतिभेमध्ये मिसळले ज्ञानाच्या किरणा ॥ १० ॥ 

नवगावाला देह ठेविले यात सर्व आले । 

नव थोव्यांच्या पैलतीरावर प्रयाण तू केले । 

अनुतापाच्या दुःखामधूनी भेट दिली चित्घना ॥ ११॥

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post