काटाळवेढा महानुभाव श्रीदत्तमंदिर इतिहास

काटाळवेढा महानुभाव श्रीदत्तमंदिर इतिहास

  काटाळवेढा महानुभाव श्रीदत्तमंदिर इतिहास

काटाळवेढा महानुभाव श्रीदत्तमंदिर इतिहास

       काटाळवेढा मंदिर इतिहास आळेफाटा नगर रस्त्यावर असलेल्या णे’ गावापासून डोंगराच्या पठारावर काटाळवेढा नावाचे छोटेसे खेडे आहे. तेथे आपल्या महानुभाव पंथाचे श्रीदत्तमंदिर नावाने विख्यात असे ‘मांडलिक स्थान आहे ती मंदिर शके १८२६ साली बांधण्यात आले. ते मंदिर सव्वाशे वर्षे जुने असले तरी त्या स्थानाचा इतिहास मात्र त्याहीपेक्षा पुरातन आहे तो इतिहास पुढे उद्धृत करीत आहोत.

      पूर्वी काटाळवेढा गावाच्या पश्चिमेला गाजरवाडी नावाची दहा-वीस घरांची वस्ती होतीत्या वस्तीत गाजरे आडनावाचे उपदेशी सद्भक्त वास्तव्यास असत. अरण्यग्राम स्थानाची यात्रा भरे. त्यावेळी घोडा शिरावर घेऊन चालण्याचा पहिला मान याच गाजरे मंडळींचा असे. एके वर्षी गाजरवाडीतून ‘स.भ.गोविंदा भाऊ गाजरे आणि इतर दोन उपदेशी सद्भक्त अरण्य ग्रामचा यात्रेला निघाले. यावर्षी घोड्याचा मान गोविंदा भाऊंनी घ्यावा असे सर्वानुमते ठरवण्यात आले होते

अरण्यग्रामला पोचल्यावर यांच्या कानावर धक्कादायक वृत्त आले, कीतेथील एका धनिकाने अशी अट घातली होती की, जो बारा म डाळ स्थानाला अर्पण करी त्यानेच घोड्याचा मा घ्यावा. ती बातमी ऐकल्यावर ते ओशाळले. कारण त्यांच्याजवळ फक्त पोटापुरती शिदोरी होती. आणि परिस्थितीमुळे १२ मन डाळ अर्पण करणे शक्यच नव्हते. त्या सावकाराने स्वत:च डाळ अर्पण करून घोडा शिरावर घेतला आणि वर्षानुवर्षे गाजरे मंडळींना मिळणाऱ्या मानाची परंपरा खंडित झाली.

       गोविंदा भाऊ मनातून खूप दुःखी झाले यात्रा पूर्ण झाली पण त्यांना गावी परत यायची इच्छा नव्हती. इतर दोघे गावी आले. त्यांनी घडलेली घटना गावकऱ्यांना सांगितली. गोविंदा भाऊ स्थानावर राहिले. ते तीन दिवस अन्नपाण्याचा त्याग करून देवळाच्या गाभाऱ्यात बसून होते. तिसऱ्या दिवशी पहाटे त्यांना स्वप्न पडले, (दृष्टांत झाला) ‘‘तू दु:ख करू नकोस, अंगारा घे मी तुझ्या सोबत येतो.’’ आणि त्यांना जाग आली. देवाने दृष्टांत दाखविल्यामुळे त्यांना आनंद झाला होता. दिवस उजाळल्यावर ते देवळातील अंगारा घेऊन निघालेपण दोन तीन दिवस काही न खाल्ल्यामुळे त्यांच्या अंगी त्राण नव्हते. ते कसेबसे  काटाळवेढ्याला पोहोचले. 

गाजरे वस्तीकडे जाताना रस्त्यात एके ठिकाणी त्यांना भोवळ आली आणि ते बेशुद्ध होऊन पडले. आणि अंगाराही सांडला साव झाल्यावर ते घरी आले आणि आपला नित्यक्रम सुरू केला. अंगारा आणला या गोष्टीचा त्यांना विसर पडला. दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा स्वप्न पडले, कोणीतरी व्यक्ती स्वप्नात येऊन म्हणते की, ‘‘मी तुझ्याबरोबर तिथून येथे आलो, आणि तू माझ्याकडे पाहिले देखील नाही.’’ त्यांनी ते स्वप्न गावऱ्यांना सांगितले आणि अंगारा आणला ती घटनाही सांगितली. पण गावकऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. अति दुःखामुळे त्यांना तसेच स्वप्न पडले असा गावकऱ्यांचा गैरसमज झाला. गोविंदा भाऊंनाही वाटले की, तसेच असेल.

       पण दुसऱ्या दिवशीही तेच स्वप्न पडले जागा दिसते आणि तेच शब्द कानी पडत आहेत. मग मात्र गोविंदा भा गावकऱ्यांना समजावण्याच्या सुरात म्हणाले, ‘‘मला दोन दिवसापासून दृष्टांत होतो आहे, मी तुम्हाला ती जागाही दाखवतो, हे स्वप्न निरर्थक नाही, यात काहीतरी तथ्य आहे.’’ आता मात्र गावकऱ्यांना त्यांची गोष्ट मान्य करावी लागली. त्यातील दोघे तिघे म्हणाले, ‘‘चला, आपण ती जागा पाहू, आणि या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लावू.’’

     ते त्या जागेवर आले त्यावेळी तिथे जाचा कोंब निघालेला होता. त्यांनी तेथे उत्खनन केले. तिथे एक पाषाण निघाला सगळ्यांचा एकमताने निश्चय झाला की हा विशेषच आहेपूर्वि अनेक वैरागी साधु संत त्या भागात असतिपरी आचरत देह क्षेपत असत, देह शुष्क करून अनुष्ठान करीत ईश्वरप्राप्तीला जायचे. त्यापैकीच कोण्या एका महानुभावांचा तो विशेष असावा. असे वाटते. सगळ्यांनी जयजयकार केला ‘‘श्रीदत्तात्रेय महाराज की जय’’ : तिथे विशेषाला स्नान घालून पूजा-अर्चा करण्यात आली. आता हा विशेष गावात नेऊन मंदिरात स्थापना करावी असे सर्वांनी ठरवले. 

बैलगाडीवर विशेषाची मिरवणूक काढण्यात आली. वाजत गाजत गावात येत असताना आता जिथे देऊळ आहे त्या ठिकाणी बैल गाडी आली. आणि चमत्कार झाला, बैल गाडी तिथेच थांबली. बैल पुढे चालेना गावकऱ्यांना आश्चर्य वाटले की, असे का होते आहे. त्यांनी अजून दोन बैल जोडले, तरी बैलगाडी पुढे सरकत नव्हती. अजून दोन बैल जोडण्यात आले. असे एकूण सहा बैल जोडूनही काही उपयोग झाला नाही. मग त्यातील काही सुज्ञ वृद्ध मंडळींनी सर्वांना समजावले की, विशेषाची प्रतिष्ठा इथेच करावी अशी देवाची प्रवृत्ती आहे म्हणून तुम्ही विशेष गावात नेण्याचा आग्रह सोडा. 

सर्वांनी एकमुखाने ते मान्य केले. आणि तिथेच ओटा बांधुन विशेषाची प्रतिष्ठा करण्यात आलीओट्यात माहूरचे ‘श्रीदत्तात्रेंप्रभु चरणांकित ‘सर्वतीर्थाचे’ विशेष बसविण्यात आले. आणि सावलीसाठी छोटेसे लाकडाची मंदिर उभारण्यात आले. गावातील लोक प्रगाढ श्रद्धेने नियमितपणे देवळात येऊन देवाची पूजा अर्चा करू लागले. आरती उटी उपहार इत्यादी भक्तीच्या अंगांना उधाण आले. नवसही पूर्ण होऊ लागले. देवाचा मंगल असा किर्तीसुगंध पंचक्रोशीत पसरला. लांबून लोक दर्शनाला येऊ लागले. असा तिथल्या स्थानाचा पवित्र इतिहास परंपरेने सांगण्यात येतो.

आता तिथे पाषाणाचे भव्य मंदिर आहे ते मंदिर कसे बांधले? याचाही इतिहास चमत्कारिकच आहे. तो पुढीलप्रमाणे

काटाळवेढा पासून उत्तरेला डोंगररांगा आहेत. त्याच्या पलीकडे दरीत आभाळवाडी नावाची छोटीसी वस्ती आहे. तेथील मनीराम मारवाडी ब्राह्मण नावाचे व्यापारी सावकार, मारवाडी समाजाचे एकदा काही व्यापारासाठी रस्त्याने राजुरीला जात होते. त्यांनी घोड्यावर द्रव्य लाले आणि निघाले. चोरांचा त्यांच्या संपत्तीवर आधीच डोळा होता . त्यादिवशी त्यांना समजले की, आज सावकार द्रव्य घेऊन एकटाच राजुरी ला जात आहेत्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. सावकार आणि घोडा  दोन्ही डोंगर चढून वर आले आणि वाटणाऱ्यांनी डाव साधलाआणि सावकाराचा पाठलाग सुरू केला
त्या मारवाड्याच्या लक्षात आली की, आपल्यामागे चोर लागले आहेत. त्याने घोडा वेगाने पळवायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडेही वेगवान घोडे होते, त्यामुळे दोघांतील अंतर कमी होऊ लागले. सावकार खूप घाबरला. त्याची पक्की समजूत झाली की, आज आपली काही खैर नाही, आपला मृत्यू जवळ जवळच आहे. हे दरोडेखोर द्रव्य तर नेतीलच आणि आपले प्राणही घेती. विचार त्याच्या मनात घोड्याप्रमाणे धावत होते. पण त्या चोरांनी त्या सावकाराच्या घा करावा हे देवाला मान्य नव्हते. वेगाने पुढे जात असतांना त्या व्यापाऱ्याला काटाळवेढे येथील ते लाकडाचे देऊळ दिसले आणी त्याने घोडा तिकडे वळवला. चोर पाठलाग करत होते
मंदिर जवळ येताच सावकाराने घोडे थांबवले, द्रव्याची गाठोडी सहित घोड्याखाली उडी घेतली आणि वेगाने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला ‘‘देवा! आता तूच माझे रक्षण कर, मला वाचव.’’ म्हणून देवाचा धावा केला आणि काय आश्चर्य त्या चोरांना बाहेर उभा असलेला घोडाही दिसला नाही आणि मंदिरातला व्यापारीही दिसला नाहीसावकाराने देवाचे खुप आभार मानले. त्याची देवावरची श्रद्धा प्रगाढ झाली आणि तिथे पाषणाचे भव्य देऊळ उभारण्याचे ठरले. गावकऱ्यांनी त्या गोष्टीला होकार दिला आणि शके १८२६ साली या मंदिराचे काम पूर्ण झाले. पुढे सावकाराने उपदेश घेतला त्याचे वंशज आजही आहेत ते घारगाव येथे राहतात. उपदेशी आहेत.

 

 

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post