मृत्यूसमयी होणारे दुःख व मृत्यूनंतरचा प्रवास
Grief at death
मित्रांनो!! आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये मनुष्याच्या जीवनातील एकूण एक बाबी वर्णन केलेल्या आहेत. हिंदू धर्मात होऊन गेलेले ऋषीमुनी सिद्ध पुरुष होते. मरताना माणसाला कसा त्रास होतो याचे वर्णन व्यासांनी गरुड पुराणात केलेले आहे. त्यातल्या त्यात ज्याने आपल्या आयुष्यात पापच जास्त केले आहे अशा माणसाला मरतांना खूपच अधिक त्रास होतो हे पुराणात सांगितलेले आहे. ते आपण आजच्या लेखात पहाणार आहोत.
जो प्राणी सतत पाप परायण आहे ज्याच्या ठिकाणी दया आणि धर्म नाही, जो नेहमी दुष्टांच्या संगतीत राहतो, जो शास्त्रांच्या आणि सत्संगाच्या नेहमी विभागात राहतो. जो कधीही सत्संग करत नाही, जो स्वतःला प्रतिष्ठित मानतो, जो अहंकारी आहे, जो धन आणि मान्यता आणि मदाने व्यापलेला आहे.
ज्याचे वर्तन गीतेच सांगितलेल्या दैवी संपत्ती प्रमाणे नाही जो असुरी संपत्तीचे आचरण करतो, ज्याचे चित्त अनेक विषयांमध्ये आसक्त आहे, जो काम भोगामध्ये फसलेला आहे, मोहाच्या जाळ्यात गुंतलेला आहे असा अपवित्र मनुष्य मरणानंतर नरकात पडतो. आणि शुद्ध आचरण असलेले सदाचरण करणारे सद्गृहस्थ चांगल्या गतीला प्राप्त होतात पापी मनुष्य नरकात पडून अनंत यातना भोगत असतो. त्या यातनांचे वर्णन गरुड पुराणात केलेले आहे.
जन्मभरात दुष्कृत्य केलेला पापी मनुष्य जिवंत असताना शेवटी शेवटी त्याला असाध्य आजार होतात. ते आजार कोणत्याही औषधाने बरे होत नाहीत. शेवटी शेवटी पापी मनुष्य मानसिक रोगाने ग्रस्त होतो. कोणालाही त्याच्याविषयी कीव वाटत नाही. अशा मनुष्याला. जेवणापेक्षा औषधच जास्त खावे लागतात. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही सुखद भाव दिसत नाहीत. पाहणाऱ्याला त्याचा चेहरा उग्र आणि भयानक वाटतो.
असा मनुष्य आपल्या घरातच उपेक्षित जीवन जगत एका कोपऱ्यात पडून असतो घरातले त्याचे पुत्र पत्नीही त्याच्याकडे जायला कंटाळा करतात. नाना प्रकारच्या विकारांनी ग्रस्त असे त्याचे शरीर हळूहळू भयानक अवस्थेकडे जाते. मंदाग्नीमुळे अन्न पचत नाही. सतत खोकला, ताप, दस्त, अशासारखे आजार त्याला रात्रंदिवस झोपू देत नाहीत.
अशा मनुष्याला आयुष्यात केलेली सर्व कृत्य करणे मरतांना आठवतात. प्राण वायू मुळे आत्मा बाहेर येताना डोळ्यातील बुबूळ बाहेर येतात. श्वास घेताना भयानक त्रास होतो घशातून घुर् घुर् असा आवाज येतो. आजूबाजूला त्याचे नातेवाईक बसलेले असतात पण तो त्यांच्याशी बोलू शकत नाही. आयुष्यात केलेल्या कृत कर्मांचा चित्रपट डोळ्यासमोर फिरत असतो. आणि हजार विंचू चावल्याने जे दुःख होते ते दुःख आत्मा शरीरातून निघतांना होत असते.
अशा भयानक दुःखामुळे मृत्यूसमयी होणाऱ्या यातनांमुळे तोंडातून लाळ निघत असते नाकातून शेंबूड आणि मलमूत्र ही होऊन जाते. आणि आत्मा यमदूत घेऊन जातात. आणि त्याला पुढे प्रेत योनी प्राप्त होते. पुढे प्रेत योनी भोगल्यानंतर नाना प्रकारचे नरक कुंभीपाक, लोहपुतली आदी नरक त्याला भोगवले जातात.
म्हणून आयुष्यात कधीही पापकर्म करण्यासाठी उद्युक्त होऊ नये. कितीही कठीण प्रसंग आला तरी पाप कर्मापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न करावा. कारण धन संपत्ती जमीन स्त्री पुत्र गाडी बंगला हे काहीच आपल्या सोबत येणार नाहीये. आपल्या सोबत फक्त आपलीच असणार आहेत.
आजकाल बरेच लोक “कुठे आहे नरक? आम्ही तर काही पाहिले नाही, परलोक, नरक, स्वर्ग हे सर्व खोटे आहे, असे सहजपणे नास्तिकतेच्या दृष्टिकोनातून म्हणून जातात. पण नरक पाहण्यासाठी तुम्हाला फार लांब जावे लागत नाही, नरक पाहण्यासाठी लांब जायची गरजही नाही. नालीतल्या किड्या, अळ्यांकडे पहा तुम्हाला नरकाचे दर्शन घडेल.
एखाद्या खरुज झालेल्या, आणि आपल्या पायांनी अंग खाजवणाऱ्या कुत्र्याकडे निरीक्षण करून पहा. तुम्हाला नरकाचे दर्शन घडेल. गाई म्हशी शेळ्या-मेंढ्या हे सर्व नरकच तर आहेत. एखाद्या गवत नसलेल्या डोंगरावर जाऊन तिथे असलेल्या एकमेव सुकलेल्या वृक्षाकडे पहा ऊन वारा पाऊस सहन करतो, तो तुमच्या आमच्यासारखा जिवच आहे. त्याचे ते दुःख पाहून तुम्हाला नरकाचे दर्शन घडेल.
मनुष्य सोडून इतर काही जीव जंतू पशू प्राणी पक्षी झाडे माशा जे काही दिसते आहे हे सर्व नरकच तर आहेत. इत्यादी योनींमध्ये गेलेले जीव काही आपल्या स्वेच्छेने स्वतःहून गेलेले नाहीत. नरक भोगविणाऱ्या देवतांनी त्यांना त्या योनींमध्ये टाकले आहे. म्हणून नरक वगैरे हे खोटे आहे हे म्हणताना हजार वेळा विचार करावा.
केलेल्या कर्माचे फळ भोगावेच लागते हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे ते कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून सगळे संत सगळे धर्मशास्त्र हेच म्हणतात कि सत्कर्म करा, वाईट कर्म कधीही करू नका, कुणालाही दुखवू नका, कुणाचेही वाईट चिंतू नका.
जीवंतपणी नरक कसे भोगवले जातात यावर खालिल लेख वाचा. ही सत्य घटना आहे. 👇
दुष्कर्मांचा फेरा - इदी आमीनचा मृत्यू
https://knowledgepanditji.blogspot.com/2021/11/blog-post_24.html