सुखोपभोगांच्या अधीन असलेल्या माणसा थोडा तरी विचार कर मृत्यू जवळ आहे

सुखोपभोगांच्या अधीन असलेल्या माणसा थोडा तरी विचार कर मृत्यू जवळ आहे

 सुखोपभोगांच्या अधीन असलेल्या माणसा थोडा तरी विचार कर मृत्यू जवळ आहे



दोन गरुड एका झाडावर प्रेमाने राहत होते. दोघेही भक्ष्याच्या शोधात निघायचे आणि संध्याकाळी जी काही शिकार मिळेल ते आणायचे आणि मोठ्या प्रेमाने एकत्र बसून खायचे. हे बरेच दिवस चालले होते.

 एके दिवशी शिकार करून दोघेही परत आले तेव्हा एकाच्या चोचीत उंदीर होता आणि दुसऱ्याच्या चोचीत साप होता. आणि साप आणि उंदीर दोघेही जिवंत होते. झाडावर बसून गरुडांनी भक्ष्यावरची आपली पकड सैल केली. तेव्हा सापाला उंदीर दिसला आणि उंदराला साप दिसला.

सापाला उंदराचे मांस अतिप्रिय असते. उंदराचे स्वादिष्ट मांस मिळविण्यासाठी साप आपली जीभ चाटू लागला आणि उंदरावर झडप घालण्याचा प्रयत्न करु लागला. आणि सापाचे प्रयत्न पाहून उंदीर अत्यंत घाबरला आणि त्या गरुडाच्या पंखात लपून बसू लागला.

 ते दृश्य पाहून एक गरुड गंभीर झाला आणि विचारात मग्न होऊन पाहू लागला. दुसर्‍याने त्याला विचारले- "मित्रा, तू एखाद्या तत्त्ववेत्तांप्रमाणे कोणत्या चिंतनात बुडून गेलास?"

 गरुडाने धरलेल्या सापाकडे बोट दाखवत म्हणाला, "हे बघ, हा किती मूर्ख प्राणी आहे." जिभेच्या लालसेपुढे मृत्यूलाही एक प्रकारे विसरतो आहे. 

 दुसऱ्या गरुडाने त्याने पकडलेल्या उंदराकडे पाहिले आणि म्हणाला - आणि या निर्बुद्धाकडे देखील पहा, याच्या समोर साक्षात मृत्यू उभा आहे आणि मृत्यूपेक्षा या मूर्खाला भीती भयंकर वाटते.

 एक प्रवासी त्या झाडाखाली आराम करत होता. त्या दोघांचे म्हणणे ऐकून त्याने एक दीर्घ श्वास सोडत म्हटले - आणि आम्ही माणसे सुद्धा सापांसारखेच आहोत, सन्मार्ग विसरून देवधर्म विसरून जीभेचे चोचले पुरविण्यासाठी नाना प्रकारचे पाप कर्म करतो मरण कधी येईल हे सांगता येत नाही तरीही मी अमर आहे असे अज्ञानामुळे मानून चालतो .आणि उंदराप्रमाणे भीतीला श्रेष्ठ मानतो, त्यामुळे मृत्यूही आम्हाला गाफील ठेवतो.

 जे मिळाले ते पुरेसे आहे. माणसाने अहंकारी का नसावे?

एकदा अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर एका वृद्धाला लघुशंका करताना पाहून पोलिसांनी त्याला पकडून त्याच्या घरी आणले.

 आणि त्यांना त्यांच्या गावाला पत्नीच्या स्वाधीन केले. व सांगितले की यांची चांगली काळजी घ्यावी आणि हे घरातच राहतील करा. बाहेर पडू देऊ नका असे निर्देश देऊन पोलीस निघून गेले. 

 ते वृद्ध महोदय न सांगता कुठेही आणि केव्हाही घराबाहेर पडायचे. आजारामुळे त्यांना आपल्या संपूर्ण आयुष्याचा विसर पडला होता ते स्वतःलाही विसरले होते. 

त्या वृद्धाची पत्नी जाणार्‍या पोलिसांना

 थँक्स म्हणाली आणि पतीला प्रेमाने हाताळत, आधार देत खोलीत घेऊन गेली.

 त्यांची पत्नी त्यांना पुन्हा पुन्हा समजावत राहिली

 “तुम्ही स्वतःची काळजी घेतली पाहिजे.

 असं कोणालाही न सांगता घरा बाहेर जाऊ नका आता तुम्ही म्हातारे झाला आहात,

 तसेच तुम्ही तुमचा गौरवशाली इतिहास तुमचे प्रेरणादायी आयुष्य आठवायला पाहिजे. आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही असे कोणतेही कृत्य करू नका जेणेकरून तुम्हाला स्वतः स्वतःची लाज वाटेल.”

 तर मित्रांनो! ज्या वृद्धाला पोलिसांनी रस्त्याच्या मधोमध पकडून त्याच्या घरी नेले,

 ते एके काळी अमेरिकेतील प्रसिद्ध शक्तीशाली व्यक्तिमत्त्व होते. लोक त्यांची एक झलक पाहण्यासाठी तळमळत होते. इतकी त्यांची लोकप्रियता होती. त्यांनी स्वबळावर राजकारणात प्रवेश केला आणि जगातील सर्वात शक्तिशाली माणूस उदयास आला आणि एके दिवशी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांचे नाव होते रोनाल्ड रेगन.

रोनाल्ड रेगन 1980 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. आणि संपूर्ण आठ वर्षे ते जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती होते. राष्ट्राध्यक्ष असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहून जेव्हा ते व्हाईट हाऊसमध्ये परतले तेव्हा त्यांची लोकप्रियता दुप्पट झाली होती.

 रेगन हे त्यांच्या काळातील अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय नावांपैकी एक होते. जेव्हा ते अध्यक्षपदावरून पायउतार झाले त्याच्या वैयक्तिक आयुष्यात परत आले. व सामान्य जीवन जगू लागले. काही दिवस सगळे ठीक होते.

 पण काही दिवसांनी त्यांना अल्झायमर नावाचा आजार झाल्याचे निदान झाले. त्यामुळे दैनंदिन जीवनात अनेक तक्रारी उद्भवू लागल्या आणि हळू त्याची स्मरणशक्ती हरवली.

 शरीर होते. पण  आठवणी नव्हत्या.

 त्यांचा एक काळ होता हे देखिल ते विसरले. 

 त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक अक्षरशः वेडे होत.  त्याकाळी आपली सुरक्षितता संपूर्ण जगाची सर्वात मोठी चिंता होती हेही ते विसरले. निवृत्तीनंतर ते सर्व विसरून गेले. अमेरिकेची घटना होती म्हणून सर्वांसमोर आली. या घटनेवर खूप चर्चा केली गेली. 

 एकेकाळी जगावर राज्य करणारा हा माणूस आठवणी सोडून गेल्यावर तो काहीच उरला राहिला नव्हता, जिवंत असूनही सगळे संपल्यासारखेच होते. 

म्हणून मित्रांनो! सर्वात शक्तिशाली वस्तूची देखील एक्सपायरी डेट असते. म्हणून आपल्या जीवनात अहंकाराला अजिबात थारा देऊ नका कधी काय होईल ते सांगता येत नाही एखाद्या वेळेस अहंकार उत्पन्न झालाच तर स्मशानात एक चक्कर मारून या.

 तिथं एकापेक्षा एक सरस व्यक्तिमत्त्वांची, शक्तिशाली मनुष्यांची राख झालेली आहे. 

 अहंकार इगो ही अतिशय निरुपयोगी वस्तू आहे मग तो अहंकार 

सत्तेचा असो 

बळाचा असो 

का पैशांचा असो.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post