भाग ००१ कवीरत्नमाला काव्य पूर्वकथन

भाग ००१ कवीरत्नमाला काव्य पूर्वकथन

 भाग ००१ कवीरत्नमाला काव्य



कवीरत्नमाला काव्य पूर्वकथन

आर्या वृत्त

सद्गुणी अनेक महाकवी, या परधर्मात जाहले प्रवर ।।

त्यांनी महाराष्ट्रावर, करुनि ठेविले अनंत उपकार ।।।।

प्रस्तुत ही थोर कवी ज्ञात विदूष असती श्रेष्ठ पंथात।।

ते शक्ती अनुसारे स्वधर्म सेवा करीती पर संत ।।।।

श्रीचक्रेश प्रसन्न करावया करुनी थोर हा यत्न, ।।

त्याचे गुणान्मोदन, परमार्गाचे करुनिया स्तवन ।।।।

देव भक्त पोवाडे, वर्णन केल्या प्रसन्न होई प्रभू

दुरचा जवळ येवूनी शांतवि स्वकृपे स्वभक्त तारी विभू ॥४॥

        कवि रत्नमाला हे काव्य महानुभाव वाङमय संशोधन करुन बाराव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत जेवढे महानुभाव संत महंत भक्तकवी झालेत तेवढे कवींनी आर्याछंदात वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. व त्याच प्रमाणे एकोणीसाव्या, विसाव्या शतकातील सुद्धा कवी निर्भेळ शुद्ध अन्तःकरणाने व निर्हेतूक अच्यूत गोत्रीयु या नात्याने वर्णिले असून ही कवीरत्नमाला रचून पूर्ण केली आहे.

        आपल्या परमेश्वर श्रीचक्रधर देवाला जे अन्यन्यभावे शरणागत होऊन त्या जीवोद्धारक प्रभुला तन-मन-धन अर्पण करुन अहोरात्र त्या प्रभूच्याच स्मरण मनन चिंतन व जिन ध्यासन या मध्येच जे गढून गेले व अत्यंत आर्त प्रेमस्वराने त्या परमपित्या परमेश्वरावतार पंच कृष्णाचे नानाविध स्तवन करुन त्यांच्या अनेक लीला चरित्रावर अनेक अपूर्व ग्रंथ रचून त्या परमेश्वरास वाकपुष्पद्वारें मोठ्या भक्तीभावाने ज्या महा कबी महात्म्यांनी सहर्ष पूजीले ते धन्य होत. आणि त्या परम मंगल प्रभूस ज्यांनी रिझवून अभिमुख केले व प्रसन्न केले व त्या प्रभूने ही ज्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करुन त्यांचे कायमचे समाधान केले.

        अशा वंदनीय तथा प्रातःस्मरणीय त्या महानुभावाचे म्हणजेच आमच्या ऋषी पूर्वजांचें सद्गुण तथा किर्ती वर्णन करणे व त्यांनी घालून दिलेले आचार-विचारांचें धडे गिरवने व त्यांचे अनुकरण करणे हे आपले आद्य कर्तव्य नव्हे काय? म्हणूनच मी मोठ्या स्वाभिमानाने नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याने व विशुध्द प्रेमाने अल्पांशाने का होईना त्या गुरुजनांच्या महान उपकारांची फेड व त्यांचे स्मरण व्हावे व त्या जगन्नीयंत्या प्रभूस प्रसन्न करावे याच केवळ उद्देशाने प्रेरित होऊन ही कवीरत्नमाला जनहितार्थ रचून तयार केली आहे. या कवीर नमालेत बरेचसे कविरत्न सुटलेले आहेत. जेवढे संशोधनात सांपडले तेवढे मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे वाचकांच्या लक्षात येईलच.

        गुरुजन चतुर्विध साधन माझे उध्दारक साधन आहेच ते स्वामी श्रीचक्रधरास अत्यंत प्रिय व मान्य आहे व ते अत्यंत ते पवित्र वंदनिय ही आहे आणि त्या द्वारेच महाराज श्रीचक्रर मिळून सर्व दुःखे नष्ट होऊन चीरशांती व शाश्वत आनंद प्राप्ती होणार आहे हे निश्चीत म्हणूनच ही अल्पशी धर्म सेवा केली आहे तरी त्याच प्रमाणे श्रीचक्रपाणि जन्माख्यान व श्रीचक्रधरजन्माख्यान पण अपूर्व अभंग छंदात त्या जगच्चालक प्रभू कृपेनेच पूर्ण झालेत मी फक्त निमित्त आहे.

        या ग्रंथाच्या अगोदर छंदीक श्रीकृष्ण जन्माध्याय व श्रीदत्तात्रय महात्म्य शिंगवे हे दोन ग्रंथ अनुक्रमे १९५४ साली व १९५७ साली प. श्री महंत लखापती गोपाल मुनि महानुभाव यांनी अमरावती विदर्भ येथे प्रकाशित केलेत व नंतर १९६६ साली भाऊसाहेब (नारायणराव गं. मडघे) यांनी श्री गोविंदप्रभूचा जन्माध्याय ओवीबध्द प्रकाशित केला या तिन्ही ग्रंथ पुष्पांचा सुज्ञ वाचकांनीही पण यथोचित गौरव केला व मीही पण त्या महाभागांचे मनपूर्वक आभार मानतो.

        अशाच प्रकारे द्वारावतीकार श्रीचक्रपाणी जन्माध्याय व श्रीचक्रधर जन्माध्याय आणि श्रीचक्रधर जीवोध्दरणाध्याय ओवी बध्द हेहि १९६६ सालापासून रचून तयार आहेत पण त्या ग्रंथाचे प्रकाशन अजून देखील झाले नाही, ते हि पण आता लवकरच प्रसिध्द होतील ग्रंथ प्रकाशनास विलंब लागण्याचे कारण काही शारीरीक मानसीक व आर्थिक आपत्तीमुळे सुमारे १८ व्या वर्षी हा ग्रंथ प्रकाशनाचा सुयोग परमेश्वर कृपेनें घडून येत आहे त्यामुळे मनाला अत्यंत हर्षानंद होत आहे प्रस्तुत ग्रंथ वाई ता. काटोल जि. नागपूर येथील श्रीदत्त भजन मंडळाच्या आग्रहावरुन ग्रंथित केला आहे, याहि ग्रंथ पुष्पांचा सुजजन परामर्ष घेऊन गुण ग्रहण करतील अशी उमेद आहे.

        सृष्टी आरंभापासून तो यावत्कालपर्यंत त्या चैतन्यमायेच्या पलीकडे व सर्व श्रेष्ठ असणाऱ्या महान परमेश्वराचे तसेच त्यांच्या साकार रूप झालेल्या श्रीपंचकृष्णांचे ज्ञानपूर्वक स्तवन अनेक द्वैत सिद्धांताला अनुसरलेल्या महान ज्ञानी भक्तांनी करुन त्या परमपित्या श्रीचक्रधराला प्रसन्न करून त्यांच्या महान कृपेला पाग झालेत ते धन्य होत.

        तसेच आपणही पण आपल्या बुद्धी शक्तीनुसार त्या परमपित्या महान प्रभूचे गोडवे गीत गाऊन त्या प्रभूला करावे. व आपले देह, वाचा, मन त्या परमेश्वराच्या सेवेत अल्पांशाने का होईना ते झीजवून पवित्र करावे, याच केवळ उद्देशाने प्रेरीत होवून ग्रंथ निर्मिती केली व त्या प्रभूलाच पण ग्रंथ समर्पण ही केला कारण त्याच्याच महान कृपेने काव्यशक्ती प्राप्त झाली व ग्रंथ सिद्धी पण झाली म्हणून पहिला मान त्याला दिला.

        तत्वज्ञान दृष्ट्या पाहिलेतर सर्वाचे महान गुरु महाराज श्रीचक्रधर पंचावतारच होत. म्हणून त्यांनाच सर्वश्रेष्ठ मानून त्यांचेच भक्तीभावपूर्वक प्रारंभी वाक्पुष्पार्चन करुन ग्रंथाला गती दिली.

        अभंग करण्याची तथा गाण्याची परंपरा आपल्या परमार्गात फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पंधराव्या शतकांत लाड लखेराजांचे शिष्य मुनि मुकुंदराज लाड यांनी श्रीचक्रधर लीळा चरित्रावर अडीचशे अभंग केलेले आहेत. त्याचप्रमाणे सतराव्या शतकांत श्री.आवेराज कोठी महानुभाव यांनी ही तीर्थस्थानावर प्रकाशझोत आपल्या अभंग वाणीतून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे

        ठराव्या शतकात देखील श्रीराजधर जीवनेकर महानुभाव यांनी एकेश्वरी भक्तीचे बरेच अभंग करुन या परमेश्वर धर्माचा सपाटून प्रचार केला. त्याप्रमाणे एकोणीसाव्या शतकात देखील श्रीगोविंद जयत्कर्ण महानुभाव व आमचे गुरुवर्य श्री.कृष्णराज लखपती बाबा यांनी हीं अभंगातून बरेच ईशस्तवन करुन जनतेस अध्यात्माचा व परमार्थाचा उपदेश केला नंतर प्रेमदास लोणकर वगैरे बऱ्याच सद्भक्तांनी अभंग छंदात गाऊन धर्मसेवा केली हे प्रसिद्धच आहे.

        सुमारे पन्नास साठ वर्षापूर्वी परमार्गात देवगीरीकर .भ.जनार्दनपंत यांचे श्रीदत्तात्रेय प्रभूवर केलेले अभंग सतत म्हणत असत अशाप्रकारे अभंग छंदाची उज्वल परंपरा आपल्या धर्मात चालत आलेली आहे ही महत्वाची बाब होय. व मीहीपण महा नुभाव धर्माच्या उज्वल परंपरेचा एक अल्पज्ञ उपासक जिज्ञासु स्वाभिमानी आहे म्हणून आपल्या ऋषी पूर्वजांनी अनुकरण करून हा ग्रंथ ग्रथतः करुन सूज्ञ जनापुढे ठेविला आहे. आता सूज्ञजन याचा रस घेणारे आहेत मी नव्हे

कवित्व केले कविराजयाने । परंतु घ्यावा रस पंडिताने

पित्यासूनी जन्मली राजबाळा । परंतु भोगी नर तो निराळा ।।

असे सुभाषित आहे.

        श्रीचक्रपाणी जन्माख्यान हे नांव ग्रंथाला असल्यामुळे श्रीद्वारावतीकार महाराजांच्या संपूर्ण लींळा अभंगातून वर्णन करता आल्या नाहीत. तरीहि पण जिज्ञासु वाचकांना महत्वपूर्ण लीळेची माहिती व्हावी म्हणून बऱ्याच लोळा अभंग छंदातून वर्णन केल्या आहेत. तरीही राहिलेल्या लीळेपासून भक्त जनता वंचित राहिली म्हणून (वाचकांनी आपला ओवीबद्ध श्रीचक्रपाणी जन्माध्याय पहावा.) त्याचप्रमाणे श्रीचक्रधर जन्माख्यानाचाहि स्वतंत्र विभाग पाडून त्यामध्ये हि भरवसाचा संपूर्ण इतिहास व परमेश्वराने कसा अवतार घेतला या लीळेपासून तो सालबर्डीपर्यंत लीळा अभंगात वर्णन करुन ग्रंथ ख्यान समाप्त केले आहे अभंग छंदाने ग्रंथ करण्याचा उद्देश प्रगट प्रचार कार्य करणाऱ्या हरीदासादी भजनी मंडळाला प्रचार कार्य सुकर व्हावे व सर्वांना परमेश्वराचें गुणानुमोदन करता यावे म्हणून अभंग यां साध्या सोप्या सुलभ छंदाचा अवलं केला आहे.

        श्रीद्वारावतीकरांचा जन्मशक निश्चित कोण्याच पंथीय पोथीवर दिला नाही मात्र पुरत्याग शक निश्चित केला आहे. त्या आधारेच मी जन्म शक निश्चित केला आहे. तो असा श्रीद्वारावतीकरांनी फलटण येथे अवतार घेवून तेथे २५ वर्ष राज्य करुन मातापूरी सह्याद्रीला गमन केले व तेथे व्याघ्रवेशे श्रीदत्तात्रेय प्रभूनी त्यांना भेट देऊन ज्ञानशक्तीप्रदान केली व नंतर श्रीद्वारावतीकार महाराज देवदेवेश्वर येथे श्रीदत्तात्रेयप्रभुच्या सान्निध्यात ६ महिने राहून नंतर श्रीदत्तात्रेयप्रभूंची आज्ञा घेऊन द्वारावतीला निघून गेलेत तेथे सुर्पमार्जनी क्रिडा करुन ६३ वर्ष राज्य केले असे एकूण ८८॥ वर्ष झालेत. व फलटण ते मातापूर व तेथन द्वारावती या पदयात्रेने ६ महिने असे एकूण ८९ वर्ष श्री. द्वारावतीकार महाराजानी राज्य केले.

        कामाख्या ज्यावेळेस स्वामिचें नैष्टिक ब्रम्हचर्य वृत्त भंग करण्यास प्रवृत्त झाली तेव्हा स्वामींच वय ९० वर्षांचे होते. असं निश्चित लीळा चरित्रावरुन दिसते. व ते सत्य आहे म्हणून याचा मनपूर्वक सांगोपांग विचार करुन व तत्त्वाला धरून श्रीद्वारावतीकार स्वामिचा जन्मशक निश्चित १५३ हा दिला आहे. अशाच प्रकारे श्रीगोविंद प्रभू जन्माचाही जन्म शकाचा मी श्रीगोविंप्रभू जन्माध्यायामध्ये उहापोह करुन १०८३ हा श्री गोविंदप्रभूचा जन्मशक निश्चित करून माझ्या धर्म बांधवापुढे मांडला तर त्यांनाहि ते सत्य पटून त्यांनीही या शकाला मान दिला त्याचप्रमाणे आताहि हा अल्प प्रयत्न केला आहे विषेश सुचना श्रीवाइंदेशकर पाठावरुन व पीढी पाठावरुन या ग्रंथांची मांडणी केली आहे. आणि या ग्रंथाच्या सूरुवातीलाच अद्वैतवादाचे खंडन करुन शुद्ध द्वैतवादाचे मंडन केले आहे. व मिश्रभक्तीचेही खंडन करुन अन्यन्य भक्तीचे मंडन केले आहे. व परब्रम्ह परमेश्वराचे पंचावतार दशोपनिषादावरुन पण पंथीय तत्त्वज्ञान मंतव्यानुसार लिहिले आहेत व सुविचार सन्मार्ग कोणता? यांचे निर्भेळ शुद्धान्तकरणाने प तळमळ पूर्वक आत्मियतेने महानुभावीय पंथीय साधकांना व पंथीयेतरांना देखील दिग्दर्शित केले आहे हा उपदेश परभाग निहंकार व निद्वेश पण भगवत उक्तीनुसारच अनुद्वेग करं वाक्यं सत्यंप्रीय हितं च यत् असा आहे. व चरित्र विभागातील अभंगात दोन्ही अवतारांचे (श्री द्वारावतीकार चक्रपाणी महाराज व चक्रधर स्वामी ) यांचे सर्व प्रकारे वैशिष्ठ्य आत्मीयतेने वर्णन करुन दाखविले आहे.

        आणि श्रीमद्भगवतगीता तेच महानुभाव तत्त्वज्ञान व श्रीकृष्णचक्रवर्ती महाराज तेच साक्षात श्रीचक्रध स्वामी होत असे साधारण विवेचन करुन हे दोन्ही सिद्धांत शास्त्रोक्त पद्धतीने प्रतिपादन केले.

        आताचा काळ धर्माचरणाला व सत्त्याचरणाला कीती प्रतिकूल आहे? हे समजून उमजूनच सत्य वर व धर्मावर प्रकाश झोत टाकण्याचा प्रयत्न करुन जे सत्य धर्मानुकूल आहे असेच लिहीण्याचा व सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. या ग्रंथात माझ्या मनाचे विधान कोणतेच व कुठेच आढळणार नाही त्या विषयी काटेकोरपणाने वागण्याचा मी प्रयत्न केला आहे. व या परमेश्वर मार्गाचे जे खरे संत महंत व भक्त आहेत त्यांचे आदरपूर्वक श्रेष्ठत्व किंबहुना पंच श्रीमुर्तीचें तथा चतुर्विध साधनांचे सूद्धा महत्व गायीले आहे.

        कोण्या विषयावर कोणता अभंग आहे व कोण्या अभंगात काय वर्णन केले आहे हे सुद्धा विषयाचे नांव देऊन अगोदर सुचित केले आहे. त्यामुळे वाचकांना सुद्धा जो अभंग हवा आहे तोच नेमका काढून वाचता येईल आणि विशेष सुचनाकी साधक भवतांना हे अभंग देवपूजेत आरतीत किंवा केव्हाही म्हणण्या च्या पात्रतेचे ठरलेले आहेत कारण परमेश्वरावताराच्याच लीला चरीत्रांनी हे अभंग ओतप्रोत भरलेले आहे म्हणून प्रेम भाव पूर्वक म्हणणारांना विशेष निर्गुण सत्व गुण प्राप्त होऊन परमेश्वर भक्ती गंगेत डुंबत राहण्याचा अपूर्व आनंद प्राप्त होईल व त्यामुळे परमेश्वर साक्षात्कार होऊन त्रिविधताप संकष्टे व नानाविध दुःखे दूर होऊन ईश्वरी कृपा संपादन करिता येईल असे महात्म या अभंगात खच्चून भरलेले आहे. या अभंगाचे वाचन तथा श्रवण करणेच महान गोमटेदायक आहे व हे एक श्रेष्ठ प्रकारचे दिव्य मन्त्रच आहेत. सर्व भक्त जनाला हे एक शास्त्रोक्त साधनच परमेश्वराला प्रसन्न कर ण्याचे परमेश्वर कृपेनेच उपलब्ध झाले आहे.

        याचा भक्तजनांनी सदुपयोग करावा असे अनुभवावरून सांगतो आणि सर्व जणा हिताय सर्वजणा सुखाय याच उद्येशाने हे ग्रंथ लिहीले आहेत म्हणून सर्वांनी हे ग्रंथ आपूलेच समजून संग्रही ठेवावें व यथेच्छ परमार्थ साधनाचा लाभ घेऊन आणि कालाही याचा वाटा द्यावा असे उदार धोरण स्विकारावे. ‘‘एकमेका साह्य करु, अवघे धरू सुपंथ’’ या उक्तीनुसार घडून तरच माझ्या श्रमाचा परिहार होईल व ग्रंथ केल्याचे सार्थक होईल. कारण परोपकार परमार्थ हे लोकोद्धाराचे एक श्रेष्ठ साधन आहे ते परमेश्वर सुद्धा आचरतात कशाकरिता तर जीवांना सन्मार्ग दर्शन करण्या करिता व त्यांच्या भल्या करिता तर आपणही सर्व त्याचे प्रियपुत्रच आहोत तर आपण ही आपल्या प्रियपित्याचे अनुकरण करायला पाहिजे तरच आपण त्याचे पुत्र आहोत असे म्हणण्यास लायक होऊ व त्या प्रभुंच्या अनंत उपकाराची अल्पाशांने का होईना पण फेड होईल असे करावे तेव्हा आपण ईश्वरी कृपेला पात्र होऊ.

 

        - कवि :- पालिमकर मुरलीधर महानुभाव कवीश्वर

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post