प्रेमाची ताकद एक सत्य घटना २०१३
ही सत्य घटना अजमेर येथील निवासी विजेंद्र सिंग राठोड आणि त्यांच्या धर्मपत्नी लिलाबाई यांची आहे. हे एक मध्यम वयस्क जोडपे.
2013 साली लीला बाईंनी विजेंद्र सिंग यांना आग्रह केला की आपण चार धाम यात्रा करून येऊ माझी इच्छा आहे एकदा चारधाम यात्रा करायलाच पाहिजे तेव्हा विजेंद्रसिंग एका ट्रॅव्हल्स एजन्सी मध्ये कार्यरत होते त्यावेळेला त्या ट्रॅव्हल एजन्सीने केदारनाथ यात्रेला जाण्यासाठी टूर निश्चित झाला. विजेंद्रसिंग आणि लिलाबाई यांचेही जायचे ठरले. दोघेही पती-पत्नी आपले जवळचे सामान खाण्यापिण्याच्या वस्तू अंथरून पांघरून स्वेटर इत्यादी प्रवासाची सामग्री बॅग्स मध्ये केदारनाथला पोहोचले.
त्या दोघांनीही एका लॉजवर रूम घेतली दोघेही तिथे थांबले होते दुसऱ्या दिवशी विजेंद्रसिंग एकटेच फिरायला गेले.
आणि लिहिला बाईंना त्यांनी लॉजवर ठेवले काही किलोमीटर गेल्यानंतर सगळीकडे हाहाकार झाला उत्तराखंड मधून खूप मोठा पूर आला आणि तो पूर केदारनाथ ला पोहोचला विजेंद्र सिंग यांनी मोठ्या मुश्किलीने आपला जीव वाचवला सगळीकडे मृत्यूचे तांडव सुरू होते जणू काही मृत्यूच वाटणार्या त्या पाण्याचा ओघ गावाच्या गाव आपल्यासोबत घेऊन जात होता. गावाच्या गाव वाहून गेले होते. सर्व काही संपले होते. दोन-चार दिवसात पूर ओसरला आणि मृत्यूचे तांडव थांबले सहारा नंतरची शांतता सगळीकडे झाली तेव्हा विजेंद्रसिंग यांना आठवले की आपण लिला बाईंना लॉजवरच ठेवून आलो होतो. आणि ते घाबरले तात्काळ चिखलातून प्रयत्नांमधून रस्ता काढत लॉजवर पोहोचले पण तिथले दृश्य पाहून त्यांचा देह जणुकाही थंडगार पडलं पुरा मध्ये पूर्ण चा पूर्ण लॉज वाहून गेला होता सगळीकडे प्रेतांचे ढीग लागला होता आणि तिथे असलेले जिवंत माणसे असहाय्य होऊन इकडे तिकडे वावरत होती.
लगेच त्यांच्या मनात आले
“लीलाही गेली की काय....! नाही असं होऊ शकत नाही ती मला सोडून जाऊ शकत नाही” विजेंद्र सिंग यांनी आपल्या मनाला समजावले आणि “ती जिवंत आहे, ती जीवनसंगिनी आहे इतक्या वर्षांचा सांगात असा एकाएकी तुटू शकत नाही, लीला मला सोडून जाऊ शकत नाही” असे म्हणून तिचा शोध सुरू केला.
आसपास त्यांनी बरेच दिवस शोधाशोध केली पण त्यांना काहीही हाती लागले नाही त्यांच्या वॉलेटमध्ये लीला बाईंचा एक फोटो होता. तो फोटो नेहमी वॉलेट मध्येच असायचा. तू फोटो त्यांनी बऱ्याच लोकांना दाखवून विचारले की, “या बाईंना कुठे पाहिले का?” सगळीकडे नकारच मिळत होता पण ते निराश झाले नाहीत त्यांनी लिलाबाईचा शोध सुरूच ठेवला.
त्यांना विश्वास होता की लीना अजून जिवंत आहे त्यामुळे त्यांचे मन “ती गेली” हे स्वीकारण्यास तयारच नव्हते.
शोध घेता घेता दोन आठवडे उलटले पण काहीही यश आले नाही. सगळ्यांचे मत हेच होती की लिलाबाई पुरात वाहून गेलेल्या आहेत.
यादरम्यान त्यांनी या दुर्घटनेबाबत घरी फोन करून कळवले. आधीच मुलं या भयंकर निसर्ग आपत्तीमुळे घाबरले होते आणि ही वार्ता कळल्यावर मुलांना रडूच कोसळले फोनवर रडत रडत त्यांच्या मुलीने विचारले “आई आता राहिली नाही का?”
यावर विजेंद्र सिंग यांनी तिला फटकारले आणि म्हटले “काहीही अभद्र बोलू नकोस तुझी आई जिवंत आहे आणि मी तिला शोधून काढीनच.”
एक महिना उलटून गेला होता विजेंद्रसिंग आपल्या पत्नीला शोधत गावोगावी घरोघरी भटकत होते. त्यांच्या जवळ असलेला पत्नीचा फोटो हाच त्यांच्या आशेची किरण होता. त्यामुळे त्यांना सतत वाटत होते की लीला अजून जिवंत आहे. काही दिवसांनी ते घरी परतले मुलांना समजावले
एक दिवस विजेंद्रसिंग यांच्या घरी सरकारी विभागातून फोन आला एका कर्मचाऱ्याने सांगितले की लिलाबाईना मृत घोषित केलेले आहे आणि या आपत्तीत ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्यासाठी सरकार भरपाई देत आहे, तुम्ही सरकारी ऑफिसमध्ये येऊन याचा लाभ घेऊ शकता. पण विजेंद्र सिंग यांनी त्या गोष्टीला सपशेल नकार दिला व ठासून सांगितले की “माझी पत्नी जिवंत आहे ती सापडत नाही एवढेच”
नातेवाईकांनीही विजेंद्र सिंग यांना समजावले की आता लिलाबाई वापस येऊ शकत नाही. आता तर सरकारनेही मान्य केले आहे की लीला बाईंचा मृत्यू झालेला आहे म्हणून तुम्ही भरपाई घ्यायला पाहिजे. पण ते आपल्या नकारावर ठाम राहिले.
आणि पुन्हा विजेंद्रसिंग लिलाबाई च्या शोधात निघाले उत्तराखंड राज्यातील एक शहर फिरले हातात पत्नीचा फोटो घेऊन आणि ओठांवर एकच प्रश्न “भाऊ या बाईंना कुठे पाहिले का?”
आणि लोकांचे उत्तरही एकच “नाही यांना आम्ही कुठेही पाहिले नाही.”
एकोणवीस महिने उलटून गेले होते या दरम्यान एक हजार पेक्षा जास्त गावांमध्ये विजेंद्र सिंग यांनी लिलाबाईचा शोध घेतला होता.
अखेर 27 जानेवारी 2015 उत्तराखंड राज्यातले गंगोली नावाचे गाव तेथील एका प्रवाशाला विजेंद्रसिंग राठोड यांनी फोटो दाखवून विचारले “भाईसाब इस औरत को कही देखा है क्या?”
त्या प्रवाशाने फोटो निरखून पाहत म्हटले “हो या बाईंना मी पाहिले आहे”
विजेंद्र सिंग यांनी अधीर होत विचारले “कुठे, कुठे पाहिले आहे?”
तो म्हणाला, “ही बाई वेडी आहे व आमच्या गावात चौकात फिरत असते समोर जा तुम्हाला दिसेल”
विजेंद्रसिंग अक्षरशहा त्या माणसाच्या पाया पडले. व त्या माणसासोबत धावतच समोरच्या चौकात आले. तिथे एक चबुतरा होता आणि सडकेच्या दुसऱ्या कोणावर एक स्त्री बसलेली होती.”
त्यांनी अशी हाक मारली. “लीला”
आणि त्या बाईंनी वळून पाहिले.
ती लीलाच होती.
तोच चेहरा,
तोच कटाक्ष,
जिच्यासाठी आपण जमीन आसमान एक केले एकोणवीस महिन्यापासून वेड्यासारखा जीचा शोध घेतला ती हीच म्हणून त्यांना रडू कोसळले.
विजेंद्रसिंग लहान मुलासारखे रडत होते या शोध मोहिमेमुळे ते अक्षरशः आतून तुटले होते.
त्यांच्या इतक्या दिवसांपासून पाषाण हृदयातून प्रेमाची सरिता वहायला लागली होती. निर्जल झालेल्या डोळ्यातून भावना संवेदना अश्रुधाराच्या रूपाने वाहत होत्या.
त्यांनी लीला बाईंना हात धरून उठवले. पण लिलाबाई नि त्यांना अजिबात ओळखले नाही कारण त्यांना आपल्या भूतकाळाची पूर्ण विस्मृती झाली होती व त्यांची मानसिकता ही पूर्णपणे ढासळली होती. जो मनुष्य त्यांच्यावर जगात सर्वात जास्त प्रेम करतो, लिलाबाई त्या माणसालाही ओळखू शकला नाहीत.
विजेंद्र सिंग यांनी लिलाव यांना घरी आणले एकोणीस महिन्याच्या दीर्घ काळानंतर मुले आपल्या आईला पाहत होते व घरामध्ये अश्रूधारांचा जणू काही पूरच वाहत होता भेटायला येणारे नातेवाईकही अक्षरशः रडत होते व विजेंद्रसिंग यांची स्तुती करत होते.
ते एकोणवीस महिने म्हणजे विजेंद्र सिंग यांच्या जीवनातला सगळ्यात कठीण काळ होता पण अशा कठीण प्रसंगी देखील त्यांनी आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही आणि त्यांच्या आत्मविश्वासाला एका धाग्याने बांधून ठेवले तो धागा म्हणजे “प्रेमाचा धागा”
पती-पत्नीतील प्रेमाने आणि समर्पणाने निसर्गाच्या आदेशाचे देखील उल्लंघन केले आणि नियतीला माघार घेण्यास भाग पाडले.
खऱ्या प्रेमाचे हे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणावे लागेल.