कविरत्न माला काव्य
महानुभाव पंथातील महाकविंचा नामोल्लेख काव्य संहिता
(
अनुष्टुप)
समर्पण
महंत श्रीकृष्णराज लखापति महामुनि ।
तयाचा शिष्य चवथा वंश वाघ कवीमुनी ।।१।।
उपाधि पालिमकर तये ग्रंथा लिहुनिया ।
समपिले चक्रधरा परब्रम्हा सुहृदया ।।२।।
कविरत्नमाला थोर गुंफिली ही श्रमुनिया।
महामहात्म पंथीय कविते ज्ञात व्हावया ।।३।।
संशोधूनी महायत्ने आर्या वृतांत लिहीले ।
निर्हेतु प्रेम माझा हा लाभाया गोमटे भले ।।४।।
द्वारावतीकार आणि चक्रधर प्रपूत हे ।
जन्माख्याने बहू यत्ने पूर्ण झालेत रम्य हे ।।५।।
केले अभंग छंदात गाया भक्ता विभूषिता ।
निर्हेतु धर्म सेवाही तुष्टाया इष्ट देवता ।। ६।।
विदर्भ देशस्थ कवी अंचतवाडी सुग्रामते ।
पूर्णातिरी वास सत्य पूर्वजांचा महानते ।।७।।
।। महानुभाव धर्माचे पंच महाप्रमाणे ।।
गीति आर्या
श्रुति श्रीचक्रधरांची, स्मृति श्रीआचार्य नागदेवांची ।।
वृद्धाचार कवीश्वरव्यासांचा रूढी परशुरामव्यासांची ।।१।।
मार्ग रुढी जाणावी गुर्जर श्री थोर शीव व्यासांची ।।
पंच प्रमाणे मह हे परमार्गी असति इतर अन्यथची ।।२।
।। महानुभाव संत महंत कविचे सुप्रसिद्ध सुभाषिते
।।
धवळे महदंबेचे सु श्लोक श्री महिंद्र भट्टांचा ।।
ओवी कवीश्वरांची अभंग तो मुनिमुकुंद लाडांचा ।।१।।
।। महाराष्ट्र भाषेचे महात्म्य ।।
(आर्या छंद)
महराष्ट्र भाषेमध्ये श्रीचक्रधरांचा महोपदेश असे ।।
तोचि आजवर चालत परपंरे प्रभु कृपेण आलासे ।।१।।
महराष्ट्र भाषा पियुष, प्रत्यक्षचि देववाणि जी मध्ये ।।
ती पवित्र अतिवणुं जेणे मह पाप जाति दुःसाध्ये ।।२।।
।। श्रीचक्रधरस्वामिचे श्रेष्ठत्व ।।
विश्ववंद्य विश्वात्मा विश्वगुरु विश्वस्वामि श्रीचक्रधर
।
कलियुगीचा परमेश्वर हाचि असे ओळखा भजा प्रवर ।।३।।
।। दुष्टांचा निषेध ।।
(आर्या छंद )
महानुभाव विश्व गुरु त्याने तुज ज्ञान दीधले सत्य
।
ते उपकार विसरुनि अपकारचि रिसि थोर अनृत्य ।।१।।
धिग् धिग् जिणे तुझेबा गुरु चक्रधरासि सांडुनी धरणी ।।
व्यर्थ जन्म या लोकीपशुवत झाला नरा कृती असुनी ।।२।।
।। दुष्ट दुर्जन मारक आहेत ।।
द्वेषी मत्सरि दुर्जन, ईश्वर धर्मात जन्म पावोनी ।।
गरिबांचा ते स्वार्था करिताची घात करिति जाणूनी ।।३।।
ऐसेचि दुष्ट पापी ईश्वरिचा बुडविती सुधर्म खरा ।।
जाती स्वतः नर्का दुसऱ्यासहि नेति यम दरबारा ।।४।।
।। सज्जन तारक आहेत ।।
म्हणुनीच दुष्ट संगत, करू नका
मरण खात्रिने येते ।
सज्जन संगत तारक, नेते मोक्षासि सौख्यही देते ।।५।।
।। प्रवृत्ति भक्त सज्जनांची लक्षणे ।।
परमेश भक्ति आहे हिंसा नाही अपेय पान नसे ।।
मेषादी गृही नाही तो गृह धनि भाग्यवंत थोर असें ।।१।।
दैवत भुतांची ती क्रूर भक्ती ना जया गृहात पहा ।।
अतीत साधूचि प्रिती जया गृही सदन धन्य ते आहा ।।२।।
कविरत्नमाला स्तोत्र प्रारंभ
वंदुनि श्रीचक्रधरा गुरु कूळाशी नमुनि सद्भावे ।।
महात्म पंथीय कवि वर्णन करितो पृथक् भावे ।।१।।
द्वादश शतकापासुनि एकोणिस शतक पूर्ण पर्यंत ।।
झालेले सांप्रत कवि, महंत मुनि वदतसे महाभक्त ।।२।।
पूर्वेतिहास बहु परि संशोधुनिया परोपकारार्थ ।।
लिहिली ही कविरत्नमाला परिसावे शांत करुनिया चित्त ।।३।।
।। बाराव्या शतकामधले मराठीचे
महान् आद्य कवि ।।
अकराशे त्रेचाळिस मध्ये
आद्य कवि मराठीचे झाले ।।
स्वामी श्रीचक्रधर, अनंत ज्यांनी जिवासि उद्धरिले ।।४।।
निळ भट भांडारेकार, जाणा त्यांचेच शिष्य कवि सुमणी ।।
महदंबा सत्पात्र, माहिमभट लक्ष्मींधरभट ज्ञानी ।।५।।
तेराव्या शतकांतील कवि
तेराव्यांत तैसेची अग्रगण्य महाकवी प्रसिद्ध जणी ।।
केशवराज राघो श्रीपंडितव्यास श्रीनरेंद्र मुनी ।।६।।
आनेराजव्यास
श्री व्यास कवीश्वर महंत आचार्य ।
रवळोव्यास चतुर ते हयग्रिव व्यासादि थोर
कविवर्य ।।७।।
दाईभट्ट वाकुडे विनायकव्यास थोर मतिवंत ।।
दायंबास महेश्वर, पंडित श्री मान्य थोर कविसंत ।।८।।
श्रीपंडित व्यासांचे शिष्य प्रवर प्रथित भक्त श्रेष्ट कवी
हरिसुत नामा असती किर्ती ज्यांची वणिती सुथोर कवी ।।९।।
चौदाव्या शतकातील कवि
चौदाव्या शतकांतही, रविशशिवत् सुप्रभावि तपवंत ।।
नारायण व्यास कवी बहाळिये विश्वनाथ सुमहंत ।।१०।।
बिडकर मुधोपंत श्रीपारिमांडल्य विश्वनाथ मुनी ।।
मालोबास श्रेष्ठ कवि, पारिमांडल्य वंश मुगुटमणी ।।११।।
चाल्हनव्यास
कवीश्वर, नरसिंह
श्री प्रसिद्ध कवि पूर्ण ।।
नरहरि गिजरे महकवि, यक्षदेव कुळि सुशोभि करिरत्न ।। १२ ।।
पंधराव्या शतकातील कवि
तैसेचि पंधराव्या शतकातिल परियसा कवी भावे ।
ज्यांनी तन-मन अर्पुनि, तुष्टविले थोर ईश्वरा सुखे ।।१३।।
व्यास संतराज श्रीपारीमांडल्य कवि महंत मुनी ।।
लाड लखेराजांचे मुनिकवि सन्मान्य लाड मुकुंद मुनी ।।१४।।
दामोदर शेवलिकर, शारंगधर भोजने महान कवी ।।
एकेश्वर भक्तिचा प्रसार केला असे महानुभावी ।।१५।।
गोविंदराज मुनि श्रीकारंजेकर महंत भक्त कवि ।।
नागराज व्यासश्री कपाटिये थोर ज्ञात भक्त कवि ।।१६।।
वायंदेशकर
एल्हण, मुनिकवि
सन्मान्य ज्ञानी अग्रमणी ।।
असतीपरि अचरुनी काटितळी थोर ग्रंथ लीहुनी ।।१७।।
गोपाळव्यास कविश्री वायदेशी नरहरी मुनीसंत ।।
कृष्णमुनी पंजाबी शर्मा विधीचंद्र थोर कवि भगत ।।१८।।
सोळाव्या शतकातील कवि
सोळाव्यात तसेची परोपकारार्थ श्रमुनी कवि ज्ञात ।।
त्यांनी परभक्तिचा थोर मळा पिकविला सुराष्ट्रात ।।१९।।
अनंत कारंजेकर, लक्षधीर विदुष थोर कवि साचे ।।
सारंगधर पुजदेकर,
पंडित मुनि कवि विशाल बुद्धीचे ।।२०।।
कृष्ण मुनी डिंभ कवी वायंदेशकर महाकवी प्रथित ।।
श्रीचक्रधराज्ञा पाळुनि,
परमार्था हेतु लीहिले ग्रंथ ।।२१।।
कवि डिंभ कृष्ण सुमुनी धाराशिवकर दिवाकराचार्य ।
कपाटिये थोर कवी दुसरे तैसेचि भिष्म आचार्य ।।२२।।
आचार्य चक्रपाणी पंडित बिडकर महाकवी ज्ञानी ।।
आचार्य मुरारी श्रीबिडकर शोधक कवी महा जाणी ।। २३ ।।
बिडकर आचार्य श्रीविश्वनाथ कवि महान पंडित ते ।।
ज्ञान सुर्य तपस्वी
आनी महोपदेशक स्वधर्म पालक ते ।।२४।।
विद्वांस
गोपिभास्कर, मेघचंद्र कवी महंत ज्ञानाचे ।।
ओंकारव्यास मुनि श्री पारंडेकर महाकवि प्रभुचे ।। २५ ।।
चक्रपाणि एळंबकर, थोरकवी सुप्रसिद्ध पंथात ।।
त्रीदंडी युक्त पुरुष, प्रतिभा संपन्न मान्य गुणणंत ।।२६।।
संत तुकाराम श्री थोर कवी जाहले महाभक्त ।
श्रीचक्रधरा अनुसरुनी तथा गुणी जाहले अनूरक्त
।। २७।।
।। सतराव्या शतकातील कवी ।।
सतराव्यात तसेची थोर कवी ज्ञात भक्त विरक्त ।।
झाले जगउद्धारा ईश्वरीच्या शक्ती ह्या महा संत ।। २८।।
ओंकार चोर मांगे राजेंद्र श्रीतडोपनाम असे ।।
विद्वांस शीवराज मुनि राघो विदुष थोर ज्ञानि असे ।।२९।।
कुमरमुनी राघो श्री कृष्णमुनी ख्याली श्री बहाद्दर ते ।।
महात्म धर्म प्रचारक, महोपदेशक महाकवी पुरते ।।३०।।
कवीश्वराचार्य महा कारंजेकर महंत कवि वक्ते ।।
मुकुंदराज मुनी श्री या नामे प्रथित गाजले ज्ञाते ।।३१।।
पायराज कारंजेकर, कवि श्री रेल्कर मुरारी महकवि ते ।।
शुकदेव मुनि कविधी ज्ञानी सुविचारी सुधर्म मुर्तीते ।। ३२।।
ओंकारव्यास धारा शिवकर शहामुनी महाकवि हे ।।
एल्हन
विद्वांस कवी ग्रंथ लिहीले परोपकारा हे ।।३३।।
वाकू ओंकार मुनी बिडकर श्रीऋद्धपूरचे वासी ।।
प्रतिभा संपन्न कवी ऐसेंची पुढील असति गुणरासी ।।३४।।
शारंगधर मुनि बिडकर, विराट श्रीदत्तराज कवि थोर ।।
अर्जुन सुनि जयदेव अवधुत मुनीथोर थोरकवि रुचिर ।।३५।।
लासूरकर वाल्हन मुनि, संतराज विदुष थोर घनःश्याम ।।
कमलाकर दर्यापूर, कर राघव लाड हे कवि परम ।।३६।।
लाड संतराज श्री गोविंद मुनी विदुष कवी चंद्र ।।
डोळस मुरारीमल्ल श्रीबिडकर श्रीदत्तराज योगींद्र ।।३७।।
माधवराज भोजने मुनि कवि नित्तांत भक्त देवाचे ।।
रंगूबाई मेहकर, चांदुरकर मुनि महान भाग्याचे ।।३८।।
तुकोव्यास गुर्जर सुत, हरीदास तुलसीदास थोर कवी ।।
शिवराम किंकर श्रीभक्त थोर जाहले महंत कवी ।।३९।।
शोभा सिंग रामजी ठाकूर जयराम देवनाथ कवी ।।
जोमा गोविंद कदम थोर भक्त हे महात्म धर्म कवी ।।४०।।
काशीराज कवी श्री भारमकर कृष्णभक्त थोर पहा ।।
मराठ कूळ जन्मुनी मराठि भाषेत ग्रंथ लिहीला हा ।।४१।।
।। अठराव्या शतकातील कवी ।।
अठराव्या शतकातही, असेची महकवि सुविद्य ज्ञात महा ।।
त्यांनी परधर्माच्या सेवे संतुष्ट करुनी देव महा ।।४२।।
दामोदर धाराशीवकर मुनी कविवर्य थोर सुविचारी ।।
शाहिर राघो विदुष, शीव मुनी प्रेमराज कवि भारी ।।४३।।
आचार्य रामचंद्र, बिडकर अविराज कोटी सु महंत ।।
हरिश्चंद्र संन्यासी कृष्णराज केशराज मुनी संत ।।४४।।
वर्धन गोविंद मुनी उदरभरी भीमराज शिवराज ।।
परांडेकर
मुनी श्री जनार्दन श्री महंत कवि कंज ।।४५।।
संतुदास कुमर श्री गोपाल मुनी गणेश भक्त कवी ।।
शिवनेकर
राजधर, दास
पुणेकर महंत थोर कवी ।।४६।।
श्री गोविंदराज मुनी, सुकेणकर थोर मान्य कवि हंस ।।
दत्तात्मज ओंकार, मल्हारी शाहबा चतुर शेष ।।४७।।
कवि सोमा जिंतुरकर, नानुदास रामसुत कवी भक्त ।।
बाळकृष्ण
कविसत्तम, श्री मंगल दास थोर सभ्दवत ।।४८।।
।। एकोणीसाव्या शतकातील कवी ।।
एकोणीसाव्यांतील, महंत कवी परियसा प्रभू भक्त ।।
प्रातःस्मरणीय ज्ञाते पवित्र मुनिवर्य थोर गुणवंत ।।४९।।
बृहस्पती सम पंडित,
ऋद्धपुरीचे महाकवी प्रसिद्ध ।।
आचार्य यक्षदेव, मुरारि श्रीमल्लज्ञानी सूर्यवत ।।५०।।
त्रिविध गुणांनी सुशोभित त्रीदंडी युक्त थोर आचार्य ।
महंत कवि मुरलीधर, शेवलीकर आरव्य पुज्य मुनीवर्यं ।।५१।।
बिडकर जयत्कर्ण श्री महंत कवि ज्ञानरत्न धर्मधुर ।।
मुनी गोविंदराज श्रीयानासे कीर्ती स्फारली भुवर ।।५२।।
मुनिवर्य दत्तराज, पारंडेकर प्रसिद्ध कवी वयं ।।
थोर ज्ञात त्रीदंडी युक्त श्री शांत दांत ऋषीवर्य ।।५३।।
गुरुवर्य कृष्णराज, महत लक्षापति महा विदुष ।।
श्रेष्ठ कवीश्वर मान्य, परधर्मीरत सदा बहु विशेष ।।५४।।
महंत भालोदकर, मुनी अमृतराज थोर कवी ज्ञानी ।।
माधवराज कवी श्रीबेलुरकर श्रेष्ट ज्ञात थोर मुनी ।।५५।।
अर्जुनराज मुनी श्रीपुजदेकर नांमवंत थोर कवी ।।
पातुरकर भिद सुकवी महंत श्री केशराज ज्ञान रवी ।।५६।।
महंत श्री साळकर, दिगांबर कवि प्रभाव महा ।।
विद्वंस गोपीराज, इजलीकर कवि सुधर्म रत्न पहा ।।५७।।
शेवलीकर वेलीचे कवी शास्त्री श्री प्रभाकर ज्ञानी ।।
चांदुरवासी प्रसिद्ध, थोर पुरुष रत सदा सदा चरणी ।।५८।।
महंत श्री गुंफेकर, प्रभाकर इगत पंच सरिताख्य ।।
श्रेष्ठ कवी परमार्गी ऋद्धपुरासी अखंड वास्तव्य ।।५९।।
असती विद्वन्मान्य, महंत आराध्य मुरलिधर शास्त्री ।।
महकवी प्रसिद्ध जगती काव्य परिक्षक महंत उपकारी ।।६०।।
विनम्र परमार्गी सदा नागांश महंत गोपीराज कवी ।।
गीता भवत विशारद, विद्वत् मान्य थोर तप सुखी ।।६१।।
लीलामृत सिंधूचे संशोधन करुनी लिहीला शुद्ध ।।
ते विद्वद्वर्य कवीश्वर, लखापति भीमराज सुप्रसिद्ध ।।६२।।
श्रीधर संतराज श्री महंत कविरत्न ज्ञानिये थोर ।
चांदुर बाजारासी असती विख्यात प्रीय मान्यवर ।।६३।।
लेखक संशोधक कवि, विद्वन्मणि वर त्रिदंडी भुषित जे ।।
श्री बाबूराज मनने महंत बिडकर कुळी विराजीत जे ।।६४।।
गौरंव्यास
महंत, अनंत
कवी प्रथित मान्य शास्त्रज्ञ ।।
गोपीराज लखापति, महंत कवी सूर्य थोर तत्वज्ञ ।।६५।।
निराभिमान सुमुर्ती भजनारती सर्व काव्यि कविराज ।
महात्म धर्म प्रचारक, काव्य जयांचे प्रिये जणु कंज ।।६७।।
ते श्रीदामोदर मुनी, शेवलीकर प्राज्ञ ज्ञान आदित्य ।
या शतकांतील बरवे प्रतिभा संपन्न थोर कवि सत्य ।।६७।।
वाल्हेराज महात्मे पुजावसर शीघ्र काव्य करणारे ।।
हिवरळीचे शीघ्र कवि गाती भजनासी गोपी राज बरे ।।६८।।
बामेराज मुनीचे शिष्य थोर ते मराठवाड्याचे ।।
रंगेराज कपाटे पंडित श्री कवि कुशाग्र बुद्धीचे ।।६९।।
जयतिराज शेवलीकर, तोंडोळीचे प्रसिद्ध कवी ज्ञानी ।।
गोपीराज पंजाबी गोंदीयाचे कवी प्रसिद्ध गुणी ।।७०।।
स्वतः धर्मिजागृत आणि परधर्म जीव लावीती ।।
विद्वांस
जनार्दन श्री मुनी कवि बेलाड वासी प्रिय मुर्ती ।।७१।।
दादा बाळकृष्ण श्री कालेकर कवि प्रसिद्ध पंथात ।।
वसमतनगर पुण्य भूमि, जन्म पावले सुपुण्य वंशात ।।७२।।
भास्कर जामोदेकर, मुनी कवी शास्त्रोक्त गाती ते शुद्ध ।।
कान्हेराज मुनी श्री लखापति कवि विशेष समृद्ध ।।७३।।
कवि गोविंदराज श्री लखापति प्रेमी धार्मि जागृत ते ।।
अमरावति बडनेरा रोडावर वास मार्ग सेवक ते ।।७४।।
मुनि कवि हरीपाल श्री जयत्कर्ण प्राज्ञ ज्ञानि गुण युक्त ।।
ज्ञात कवी पुरुषोत्तम मयंक मुनि थोर पंच राऊत ।।७५।।
बालेराज पुणेकर पंजाबी कवि सुपात्र विदुष मणी ।।
गोपाल मुनी आराध्ये अमृतसर वासि थोर कवि सुमणी ।।७६।।
शकदेव राज कवि श्री शेवलीकर प्राज्ञ धर्म पाळक ते ।।
कृष्णराज लासूरकर, धर्म परायण कवी प्रभावी ते ।।७७।।
धर्म प्रचारक गायक प्रसिद्ध सुपुण्यांत राहती संत ।।
महात्म धर्म उपासक, ब्रिजेश उपाध्य
चांग कवि भक्त ।।७८।।
वाइंदेशी
कवयीत्री ताणूबाई महा तपोनिष्ट ।
तानुबाई फलटणकर बेजर कवि चक्रधारी कवि श्रेष्ठ ।।७९।।
कवि ठाकुर द्विज श्री परमार्ग प्रिय अतीव चक्रधरा ।
परमेश्वर पोवाडे वर्णुनि ते धन्य जाहले भुवरा ।।८०।।
निष्णांत कुशलतेत, चित्रकला प्रविण थोर गुण युक्त ।।
कवि श्री बाबूराज मुनी, पुजदेकर सुप्रसिद्ध मार्गात ।।८१।।
अमरावती निवासी गायककवी सुप्रसिद्ध जगतीत ।।
थोर मनोहरराव, कविश्वराख्ये उपाधी नृप प्रणित ।।८२।।
श्याम मंडल खर्द्याचे प्रसिद्ध काव्यात थोर भजनात ।।
ते राम सगुण थोर,
टेकाळीचे कवी महा भक्त ।।८३।।
गोपाळराव कविधी पवार उपनाम भक्त कृष्णाचे ।।
वाठोडा शुक्लेश्वर, विदर्भवासी सुवासनिक साचे ।।८४।।
कविविभूषण
ब्रीद, गुलाबहर्यक्ष
भक्त सद्रत्न ।।
वाठोड विदर्भासी प्रसिद्ध आहे कवीच सुस्थान ।।८५।।
महकवि प्रेमदास श्री भक्त लोणकर प्रसिद्ध पंथांत ।।
विदर्भवासी प्रवर, धर्मध्वज वासनीक ते पुणित ।।८६।।
पुण्यश्लोक सद्भक्त, नारायणराव तडस कविश्रेष्ठ ।
शिरजगांव बंडाचे विदर्भ देशातवासि हे अविट ।।८७।।
विद्वद्भूषण
कविवर, प्रेम
सिधूजे निराभिमान मनी ।।
गीता टीका लेखक पर अवर ज्ञानी श्रेष्ठ सत्व गुणी ।।८८।।
पै नारायणराव,
मडघे हे नांव किर्ती सर्वत्र ।।
विखुरलि विदर्भदेशी या साम्य नाही वासनिक थोर ।।८९ ।।
।। विसाव्या शतकातील कवि ।।
विसाव्या शतकांतील, कवि मुनि सद्भवत परियसाभूला ।।
ज्यांनी अनन्य भक्तिप्रेमे परमेश बोलता केला ।।९०।।
बाभूळगांवकर श्री शास्त्रीमह महंत सद्वाचा ।।
कीर्तन करिती मान्यवर, प्रचार करिती महत्मधर्माचा ।।९१।।
अमरावतीचे आश्रमि, शेवलीकर शिवराज कवि सुमती ।।
वीनयमुनी कवीश्री औरंगाबाद आश्रमी असती ।।९२।।
मुरलीधर पोखीकर, गायक कविथोर प्रेमी सद्भक्त ।।
अनंत मुनि रसिक कवी लोणारकर श्रीस्वधर्म श्रीमंत ।।९३।।
अमरावतीचे कविश्री लखापती गुणवंतराव गुणी ।।
मानी गोपीचंद श्री टेकाळीचे सुभक्त विमळमनी ।।९४।।
ऐसे अनेक महकवि या परधर्मात जाहले प्रवर ।।
त्यांनी महराष्ट्रावर, करुनि ठेविले अनंत उपकार ।।९५।।
प्रस्तुत ही थोर कवि ज्ञात विदुष असति श्रेष्ठ पंथात ।।
ते शक्तिअनुसारे स्वधर्म सेवा करिती पर संत ।।१६।।
।। कवीची वंशावळी ।।
कविश्वराचार्य श्री कारंजेकर कुळांत तप तरणी ।।
ज्ञानश्चंद्र मुनिंद्र, उभय राहाटी प्रमान्य विविध गुणी ।।१७।।
ते दत्तराज महगुरु, श्रेष्ठ लखापति तयासि अभिवंदी ।।
ज्यांनी पुर्णायूष्य, श्रीचक्रधराशी अपिले सुहृदी ।।९८।।
त्यांनी अमुचे स्वगृही, येऊनि परमार्थ ज्ञान बोधिले ।।
वाघ असें उपनाम, मराठा
क्षत्रिय कुळासि उद्धरिले ।।९९।।
जाणूजी प्रपिता श्रीमह पिता श्रेष्ठ कृष्णराव असें ।।
त्यांचा पूत्र बंसीधर, तो अमुचा पित्रु थोर ज्ञानी असे ।।१००।।
अनुसरले परमार्गा त्यांचे गुरु दत्तराज मुनीवर्य ।।
त्यांचे पासुनि आम्हा प्राप्त जाहला महान् पथ अभय ।।१०१।।
त्यांचा शिष्य वेणू भिद, पालिमकर मुनी विनम्र परमार्गी ।।
कवि रत्न हार तेणे गुंफुनिया विभूसी अपिला रागी ।।१०२।।
श्रीचक्रेश प्रसन्न करावया करुनि थोर हा यत्न ।।
त्याचे गुणान्मोदन, परमार्गाचे करुनिया स्तवन ।।१०३।।
देव भक्त पोवाडे वर्ण केल्या प्रसन्न होई प्रभू ।।
दुरचा जवळ येऊनी शांतवी स्वकृपे स्वभक्त तारि विभू ।।१०४।।
।। कविच्या मातेचे वर्णन ।।
माता मैनाईसा कुंती समभक्त पात्र अद्रोही ।
परमार्गा अनुसरुनी सार्थक केलेत येऊनि देही ।।
१०५।।
।। कविच्या पंच बांधवाचे व भगिणीचे वर्णन ।।
वडील बांधव ज्ञानी मुनी केशवराज थोर सत्व गुणी ।।
उपाधि पैठणकर ही तयांसी जाणा सुकिर्ती सर्व जनी ।।१०६।।
महोपदेशक पंडित, सुकिर्ती पंथांत भरलिसे धरणी ।।
ते प्रिय बंधु दुसरे भिमराज मुनी लखापति ज्ञानी ।।१०७।।
श्रीधर संतराज श्रीमहंत मुनी तीसरे सुबंधू गुणी ।।
चतुर्थ वेणू वाघ, कवि जाणावा परार्थ लुटि स्वगुणी ।। १०८।।
पंचम गोविंद मुनी लखापती तेही असती कवि भक्त ।।
षट् श्रीगोपाल मुनी महंत लक्षापती कवि संत ।।१०९।।
गार्गी मैत्रोयी सम, सुकिर्ती सर्वत्र स्फारली भवनि ।।
ती सप्तम भगिनीमह, भागिरथीबाई ज्ञान योगीनी ।।११०।।
माता बंधू भगिणी ईश्वरचे तत्परायणचि सांरे ।
म्हणूनि सद्गुण त्यांचे ग्रंथी स्तविले स्वथोर सुविचारे ।।
१११।।
ऐसे भाग्यवंत ते श्रीचक्रधरासि प्रीय होवुनी ।।
उद्धरिले स्वयं आणी परमार्थहि साधिला बहु त्यांनी ।। ११२।।
।। परमेश्वर
श्रीचक्रधरास प्रार्थना ।।
हे प्रभू वरा तुझेविण, नाही रक्षक मला कृपा सिंधो ।।
करि करि कृपा घना हे सत्वरी वर्षाव मजवरी बंधो ।। ११३।।
पतित पावन देवा श्रीचक्रधरा करी कृपा छाया ।।
सकल नरक चूकवूनी सन्निधान प्रेम देई करी माया ।।११४।।
शरणागत तवपाया अव्हेरु नको दयार्णवा स्वामी ।।
अपराध सकळ उदरि घालुनी उद्धरी करी असंसा मी ।। ११५।।
मति मंद अल्प बुद्धी वर्णन केली धरुनी हर्ष मना ।।
कवि रत्न माळ कृती ही मान्य होवो सुजान सुज्ञजना ।।११६।।
बुधवार दोन शुभ हा मास भाद्रपद सुवद्य षष्टीस ।
एकोणिशे शकवर, पंचम जाणा सुवर्ष जगतास ।।११७।।
चतुर्थ प्रहरी लेखन,
झाले संपूर्ण या सुग्रंथाचे ।।
वाई बुद्रुक कांती चातुर्मास्यांत फळ प्रयत्नांच ।।११८।।
इति श्री परधर्मे महामोक्ष साधने नागार्जुनोपदेशक कवीश्वराम्नाय दीक्षित
मुनी मुरलीधर महंत पालिमकर महानुभाव विरचित कविरत्न माला ग्रंथ आर्या छंदातील
समाप्त.
श्रीचक्रधरार्पण नमोस्तुः