कर्मांचे चित्र-विचित्र भयंकर भोग

कर्मांचे चित्र-विचित्र भयंकर भोग

 कर्मांचे चित्र-विचित्र भयंकर भोग



        एका ७० वर्ष वयाच्या विदेशी भक्ताचे वजन फक्त ३५ किलो आहे.

केवळ ३५ किलो

        हे वजन १८ वर्षापासून ३५ किलोच आहे असे त्यांनी आम्हाला पत्रात लिहून पाठवले. ‘‘मी वजन वाढविण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले. पण त्यात मला मी डॉक्टर असुनही यश आले नाही. यामुळे यापायी मला माझे मित्रही कायम चिडवत असत, ‘तु काही खातो की नाही?’ वगैरे वगैरे.

        वजन वाढीसाठी मी अनेक प्रकारचा व्यायाम केला, अनेक प्रकारचे टॉनिक घेतले, ताकद येण्याच्या भारीभारी औषधांचाही प्रयोग केला. परंतु माझे वजन ३५ चे ३६ किलो सुद्धा झाले नाही. दररोज मी सकाळी उठुन व्यायाम व चालणेचा (Running) व्यायामही नित्य नियमाने करत आहे. तरीही काही वजनात बदल नाही.

        असे अनेक पत्र आम्हांस मिळाले आहे की आम्ही सकाळीच उठुन (Running) चा व्यायाम करत असतो. बन्धु भगीनींनो ही आपण फार मोठी चुक करत अहात.

        सकाळची ६ च्या अगोदरची वेळ ही प्रभु नामाची स्मरण करण्याची वेळ असते या ३ पासूनच्या ६ वाजेपर्यंतच्या वेळात परमेश्वर प्रत्येक जीवाबाबत चिंतन करत असतात. म्हणून त्यावेळी नामस्मरण करणे जीवाच्या हितावह असते. आपल्या भाग्यात जर चांगल्या प्रकारची शरीर स्वस्थता नसेल तर आपण व्यायाम करा नाहीतर रनिंग(Running) करा. त्यात सुधारणा होणे शक्य नाही. त्याऐवजी जर आपण भगवंतांचे स्मरण केले तर चांगले. आपल्या पाप कर्माचा नाश करण्यास ४०-५० दण्डवत घालून प्रायश्चित केले तर ते कधीही फायदेशीर होय. श्रीचक्रधर स्वामींनी सकाळच्या ६ पूर्वीचा वेळ ईश्वरीय चिंतनास अतिशय मोलाचा सांगितला आहे. हे स्वामींनी आपल्या भक्तास वचनात सांगितले आहे. आम्ही आमच्या स्वार्थासाठी आपणांस सांगत नसुन ते भक्तजनाच्या जीवाच्या कल्याणासाठी लिहत आहोत. आपण यास समजुन घ्यावे व त्यापासून लाभ घ्यावा आपण सुखीच व्हाल, यात शंका नाही. म्हणून ६ वाजेपर्यंत देवधर्म करून आपण व्यायाम इत्यादि करू शकतो.

 एक अत्यावश्यक नियम

        मुसलमान मसजिदमध्ये जाताना डोक्यावर रुमाल टाकून जातात, गुरुद्वारात सरदार बीगर पगडीचे जात नाही. चर्चमध्ये जाणारे प्रार्थनेच्या वेळी डोक्यावर कपडा घेतात परंतु आमची हिन्दू बांधवांची बुध्दी इतकी निस्तेज झाली की जणु त्यावर मळाचा थरच साठला आहे. आम्ही मंदीरात जाताना देवपुजा, प्रसादवंदन करताना डोक्यात टोपी न घालता तसेच जातो. हे पाहुन आम्हास दुःख वाटते. बीगर टोपी घालता आपण मंदीरात व देवपुजा प्रसाद वंदनास जाणे म्हणजे भगवंताचा एकप्रकारे अपमान करणे होय. ही गोष्टी आपण विचारात घेऊन आपल्या मनात प्रेमपूर्वक विचार आणुन आपण डोक्यात टोपी घालुनच देवपूजा-प्रसाद वंदन करुन ईश्वराकडून प्रसन्नता मिळवा. आता हे वाचुन सतत ही गोष्ट लक्षात ठेवा व आपण एक आदर्श नियमच घालुन घ्या. डोक्यात टोपी घालायचे विसरु नका.

पर्णकुटी तथा भव्य बंगला

        एका लहान बालकाचा जन्म मोठ्या बंगल्यात की जेथे प्रत्येक सुख भोगाच्या वस्तू असतात. झोपण्यास पलंग, गादी, सोफा, टीव्ही. एअर कंडीशनर, फ्रीज या पेक्षा अधिक गोष्टी असतात आणि खाण्यापिण्याची तर काळजीच नाही प्रत्येक गोष्ट मनमुरादपणे खाण्यास मिळतात. जन्म होताच मुलाला फिरण्यास छोटी छोटी घोडा-गाडी, चांगले रंगबिरंगी कपडे, तंदुरुस्त रहाण्यास टॉनिक सारखे औषधे अशा अनेक सुखावह गोष्टी तर दुसरीकडे एखादा रस्त्यावर उघड्यावर फुटपाथवर, नंग्यापायाने भटकणाऱ्या आईवडलांच्या पोटी जन्म घेतो.

        जून जुलैमध्ये उन्हाळ्यामध्ये एकीकडे पंखे, कुलर, एअरकंडीशनयुक्त वातानुकूलित खोल्यात तर दुसरीकडे एकही पंखासुद्धा लावण्याचे भाग्य नाही. याप्रकारे थंडीच्या दिवसात अंगात एक फाटका शर्ट घालुन कुड-कुड कापत रहावे लागते. ज्यांना कोणी विचारतही नाही. दोघांमध्ये एवढा मोठा फरक असण्याचे कारण काय?

        माझ्या आदरणीय बन्धु भगिनींनो जर आपण या गोष्टीस व्यवस्थित समजुन घेताल तर आपल्या जीवनात सफल व्हाल म्हणजे सर्व प्रकारच्या दुःखापासून, चिंतेतुन आणि नरकातील पापकर्मातुन मुक्त होताल आणि ईश्वरीय सुखशांतीचा आनंद प्राप्त कराल.

आता थोडे लक्ष दया :- एखाद्या मातेस तीन-चार मुले असतील तर तीची सर्वांना रहाण्यास बंगला, फिरण्यासाठी मोटार गाडी असावी अशी इच्छा असती. ती अशी आशा मात्र करत नाही की एकास या सर्व गोष्टी असाव्यात व एखाद्यास यागोष्टी नसाव्यात म्हणजे एक बंगल्यात ऐश आरामात तर दुसरा वाटेत फिरुन फिरुन झोपडीत असावा असे तिला वाटत नाही.

        परंतु आपण जिला त्वमेव माता, त्वमेव पिता म्हणतो अशी आपली सर्वशक्तीयुक्त माता (परमेश्वर) आपल्या भक्तांवर ज्याच्या त्याच्या कर्मावर फळ प्रदान करत असते. ती कधी एखाद्यास लखोपती स्वतःहुन करेल व दुसऱ्यांस भिकारी करेल. अशाप्रकारे करुन ती कोणावर जाणीवपूर्वक कधी अन्याय करत नाही.

        असे असतानाही आपणासमोर एक प्रश्न उभा रहातो की एक मोठ्या बंगल्यात जन्म घेतो तर दुसरा उघड्यावर फुटपाथवर त्यांना या-त्या ठिकाणी कोणी पाठविले?

        आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार तर कोणी फुटपाथवर जन्म घेऊ इच्छित नाही. कोणती तरी अशी शक्ती आहे तीने या प्रकारे जन्म दिला. मग दोघांत इतका फरक का? त्याचे कारण काय? हे आपणच सांगा.

        कोणत्या फाईलमधून असा विचार केला गेला किंवा कोणत्या पुस्तकांमधुन असा विचार करुन त्या त्या ठिकाणी जन्म दिला.

        ज्या फाईलमध्ये पाहुन ठरवले की, त्या जीवास झोपडीत किंवा फुटपाथवर जन्म देऊन सर्व जन्म त्याच्या त्यास उघड्यावर जगावा लागेल.

        कर्म तर आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत करत असतो. आपल्यापैकी कोणी बेकार उगीचच बसत नाही. मग कोणते असे कर्म आहे की एकास झोपडीत जन्म तर एकास अलिशान बंगल्यामध्ये जन्म?

        याचे मुख्य उत्तर म्हणजे सर्व संत महात्मे, ऋषी, मुनी, भगवान श्रीकृष्णमहाराज आणि स्वयं श्रीचक्रधर स्वामींनी आपल्या वचनात सर्वांना सांगितले आहे की, ‘सकाळपासुन तर सायंकाळपर्यंत जो वेळ ईश्वरासाठी खर्च करतात त्याचाच हिशोब पुण्यकर्मात घेतला जातो. इतर वेळेचा विचारच केला जात नाही. गेलेला वेळ वायफळच गेला. त्याचा योग्य विचार आपण का केला नाही? याचा विचार करा. समजा आपणांस ६० वर्ष आयुष्य मिळेल तर त्यापैकी किती वेळ आपण नामस्मरणात घालवला व किती वेळ आपण विषय भोगांमध्ये वायफळ घालविला. यावर आपले पुढील जीवन अवलंबुन आहे.

        दुसरे असे की, आपणांस जी धन दौलत मिळाली त्यापैकी आपण धर्मासाठी, साधुसंतासाठी किती खर्च केला की, सर्व आपण खान्यापिण्यातच वाया घालविले. बस याच दोन सेवांचा विचार पुढील जन्म देण्यासाठी विचारात घेतले जातात. या फाईलमध्ये सर्वात जास्त नोंदी ज्या जीवाच्या नांवे सापडतील तो अलिशान बंगल्यात जन्म घेण्यास पात्र ठरु शकतो म्हणुन अशा प्रकारे जन्म प्राप्त करण्यासाठी नामस्मरण, साधुसंताची सेवा, धर्मकार्यास उचित दान, यात्रासाठी खर्च करणे व इ. सर्व बाबींचा विचार उचित ठरतो.

 सुचना :- आपण चांगल्या धनवान व धर्मात्म्याच्या घरी जन्म घेऊ शकता किंवा अगदी खालच्या थरातील म्हणजे, नालीतील किड्याप्रमाणे ही जन्म प्राप्त करु शकता हे सर्व आपल्या कर्मावर अवलंबून आहे. हे करण्यास आपणावर कोणतेही बंधन घातलेले नाही. आपण आपला योग्य मार्ग निवडावयाचा व त्याप्रमाणे फळभोगही मिळवावयाचे आहेत. कारण भगवान श्रीचक्रधर स्वामींनी एका वचनात म्हटले आहे की, ‘जीव तो सर्वाधिकारी आहे.

        आणि म्हणुनच आपण आपल्या पूर्व पुण्याईच्या आधारेच जे काही मिळवले आहे ते प्राप्त केले आहे. पुढील जन्माची चांगली कॅसेट आपणास सदाचरण करुन तयार करावी लागेल. ती तयार करत असताना आमच्याकडे दिवसाचे २४ तास आहेत. सर्व २४ तास माझ्यासाठी खर्च करा असे भगवान आपणास म्हणत नाहीत. तर आपण आपले मुलांचे पालन पोषण, टी.व्ही.सारखे मनोरंजन संभाळुनही माझी सेवा करु शकता. परंतु मला पूर्णपणे विसरता कामा नये. भगवंतांनी त्यासाठी २४ तासापैकी २ ॥ ते ३ तास वेळ न चुकता खर्च करण्यास सांगितले आहे. माझ्या काही भगिनी आम्हांस म्हणतात की, ३ तास तर खुप जास्त वेळ होतो. एवढा वेळ आम्हांस मिळत नाही.

        माझ्या प्रिय बंधुन-भगिनींनो, आपण तीन-तीन, चार-चार तास गप्पा मारण्यात, टी.व्ही. पहाण्यात, एकमेकांची निंदा करण्यास, एकमेकांच्या चुगल्या करण्यास घालवतो. तो आपण परमेश्वर चिंतनात का वापरत नाही. फक्त आमच्यावर कोणाचे बंधन नाही, कोणाची आपणास भिती नाही म्हणुन! म्हणतात ना, दंड्याशिवाय जीव वठणीवर येत नाही. शेवटी तेच खरे. आणि मग जीव जेंव्हा एखाद्या अपघातात सापडतो,

        एखाद्या मोठ्या संकटात अडकतो तेंव्हा मात्र आम्हांस भगवंताची आठवण येते आणि मग साधु-संतांना पारायण करण्यास भाडे करु पद्धतीने दान दक्षणा घेऊन आणतो. मग मिठाई वगैरे घेऊन आम्ही मंदीरात जातो. परंतु अशी मतलबी गोष्ट परमेश्वर काय जाणत नाही किंवा जाणणार नाहीत. मग सांगा अशा मतलबाच्या भक्तीवर परमेश्वरांस आनंद वाटेल? आपली भक्ती परमेश्वर आदराने मंजुर करतील? मुळीच नाही !

        आणि पैशाच्या माध्यमाने केलेल्या पारायणामधुनही फारसा लाभ होणार नाही. ज्याला पिडा लागली तोच ती जाणतो, दुसऱ्यास त्या पिडेचे माहित असण्याचे कारण काय?

        जो आजारी असतो त्यालाच औषधे खावी लागतात तसेच आपण स्वतः १ तास स्मरण केलेले दुसऱ्याच्या १० तासाच्या स्मरणापेक्षाही श्रेष्ठ ठरते. आपल्या संसारात काय चालले याकडे लक्ष द्या. आपण सर्व पाहुन सुद्धा काही वेळा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. आम्ही नियमितपणे पहातो बिना चप्पल घातलेला रिक्षा चालवणारा आपणा, तीन-चार जणांना आपल्या सर्व सामानासह भर तळपणाऱ्या उन्हात पैंडल मारत घाम गाळत नेतो. थंडी असताना थंडीतही थरथर कापत सायकल रिक्षा चालवतो. २/३ मैल आम्ही आपल्या ठिकाणी पोहचल्यावर दोन-तीन रुपये त्याच्या हातावर टेकवतो. व हसत खेळत गप्पा मारत-मारत चालले जातो. परंतु आम्ही हा विचार करत नाही. आपल्या प्रमाणेच तोही एक जीव आहे. या विचाऱ्याने काय पाप केले व आपण काय पुण्य केले?

कधीही अशा प्रकारे रिक्षात बसताना ही गोष्ट आठवणीत ठेवा की, याने काय कुणाचे बिघडले आहे?

        आतापर्यंत काहीच बिघडले नाही आतातरी सावध व्हा व भगवंताचे २४ तासातुन ३ तास काढुन स्मरण करा. व बाकी २१ तास आपण आपल्या संसारात घालवा. जर २१ तास संसारातील व्यवहारास पुरत नसतील तर आपणांस २४ ताससुद्धा पुरणार नाही. त्यातुनच जास्तीत

जास्त वेळ मिळवण्याचा प्रयत्न करा.

        आपण विश्वास ठेवा अथवा ठेवू नका. आम्ही आमचा कोणताही स्वार्थ यातुन साधत नाही किंवा आम्ही आपणांस काही लालच म्हणुनही हे लिहीत नाही. आम्ही फक्त आपल्या जीवनाचे कल्याणासाठीच सांगत आहोत. आम्ही जीवास समजावे या कर्तव्य भावनेतुनच हे लिहत आहोत. आपण यातुन जागृत व्हावे व आपला जीवन मोक्ष मार्गाकडे घालुन परमेश्वरीय पूर्ण आनंद मिळवावा व पुढील जन्म सुख समृद्धीत जावा. झोपडीत किंवा फुटपाथावर पुढील जन्मास जावु नये आपणासाठीच लिहीत आहोत. म्हणून खा-प्या-मौज करा असे पुढील जन्मासाठी म्हणणे आपण आपणांसच फसवणे असा प्रकार आहे.

        जन्म मरणाच्या चक्रास (फेऱ्यास) मोठ मोठ्या ऋषीमुनींनी व मोठ मोठ्या श्रीमंतांनी सुध्दा मान्य केलेले आहे. म्हणुन पुढील येणारा जन्म आपले स्वागत करत आहे. त्याचे तुम्हीही स्वागत भगवंताची आठवण करुनच करा नाहीतर आपणांस पश्चातापाशिवाय पर्याय नाही. एका कवीने म्हटले आहे "याद है तो आबाद है, भूल गया तो बर्बाद है।"

 

‘‘भगवंताची आठवण ठेवाल तर मौज-मजा,

विसरुन जाल तर सर्वनाश हीच सजा’’

        असे म्हणावे लागेल. आणखी आपले खुप आयुष्य शिल्लक आहे. मोठे झाल्यावर (म्हातारे) भक्ती मार्ग करु. म्हातारपणी त्याशिवाय दुसरे काय काम? असे अनेक तरुण आज स्वतः ठरविताना दिसतात. वरुन म्हणतात आमचे आता खाण्या-पिण्याचे वय आहे उगीच त्यापासून दूर का जावे. माझ्या प्रिय बंधु भगिनींनो, आपण मोठे होऊ याची आपल्याजवळ काय गॅरंटी आहे. आपले जीवन तर पाण्याच्या बुडबुड्यासारखे त्याचा आज आहे तर उद्या काय भरोसा असे आहे मग आपण पुढे भक्ती मार्ग स्वीकारु असे म्हणता ते योग्य नाही. उद्या करावयाचे काम आज नव्हे

        आत्ताच सुरु करा. म्हणजे आपणांस योग्य मार्ग मिळेल.

अद्यैव अधुनैव

       उद्या करावयाचे ते आज नव्हे आताच काम केले पाहिजे, नाही केले तर वेळ आपणांसाठी थांबत नाही.

        आता पहा थोड्याच दिवसापूर्वी २६ जानेवारी रोजी गुजरातमध्ये झेंडावंदन चालु असताना भुकंप झाला व ४०० मुले ढिगाऱ्याखाली दबुन मरण पावले व यासंसारातुन जीवानिशी गेले. तसेच आम्ही घरातुन विचार करुन काही महत्वाच्या गोष्टी करण्यास निघालो तर जर आपले प्रारब्ध फिरले तर एका मिनिटात सर्वनाश होऊन जातो.

        आपल्या प्रतिदिवसातील २४ तासापैकी ३ तास भगवंताच्या नामस्मरणासाठी वेळ काढणे फार अवघड नाही. आपणांस जेंव्हा थोडा थोडा वेळ मिळेल. तेवढा सकाळी, दुपारी सायंकाळी, रात्री, पहाटे, यातुन जमा करा. एकाचवेळेस ३ तास एकत्र काढा असेही भगवंत आपणांस म्हणत नाहीत. आपल्या मुलाबाळामुळे वेळ मिळत नसेल तर २ ते २॥ घण्टे (तास) वेळ काढा. परंतु २।५ मिनिटांनी काही साध्य होत नाही. जसे खुप खराब झालेल्या म्हणजे मळालेल्या कपड्यास अगदी मामुली साबण लावली तर तो स्वच्छ होणार नाही. त्यासाठी भरपुर साबण लावुन चांगले भिजुन द्यावे लागेल तसेच अशा या जीवाचे अनंत पाप धुवुन टाकण्यासाठी आपणांस जास्त वेळ म्हणजे कमीत कमी ३ तास तरी नामस्मरणात घालावा लागेल.

        बंधु भगीनींनो मला आशा वाटते की, आपण मी सांगितलेल्या गोष्टी लवकरात लवकर आमलात आणताल. भगीनींनो आपणांपासुन तर अपेक्षा जास्त करने अपेक्षितच आहे. कारण पुरुषांना कामास जाण्यामुळे फारसावेळ मिळेल असे नाही. आणि जर मिळत असला तरी त्यांनी गप्पा टप्पा मारण्यांचे टाळले पाहिजे मंदीरामध्ये जर आपण निरीक्षण केले तर जेंव्हा ७०-८० स्त्रीया दर्शनास येतील तेंव्हा १०-२०पुरुष दर्शनासाठी येतात.

        पुजा-पाठ न करणे, ईश्वर नामस्मरण न करणे व मंदीरामध्ये पुजा-पाठास न जाणे यासंबंधी हजार वेळा समजावुन सांगुनही ज्यांच्या ध्यानी येत नाही असे पुरुष जादा दिसतात. यातुन काही विशिष्ट पुरुषच असे असतात की ज्यांच्या मनांत ईश्वराबद्दल प्रेम भावना असते काही उपदेशी भगीनींच्या घरी गेल्यावर त्या आम्हांस रडुन सांगतात. आमचे घरमालक मांसाहार करतात, मद्यपान (दारु) करतात. अशा या नराधमांना कोन समजावुन सांगेल, एवढे सांगुन जर यांचे डोळे उघडत नसतील तर ही आमच्या आख्त्यारीतील गोष्ट नाही. यांना आता जे काय करायचे असेल ते भगवंतच ठरविल.

मी आपणापासुन अशी अपेक्षा करते की, माझ्या बंधु-भंगिनी स्पष्टवक्तव्यावर नाराज रहाणार नाहीत.

पू. तपोनिधी रूपाबाई जी, गीताबाईजी पंजाबी (श्रीरामपूर)

1 Comments

Thank you

Post a Comment
Previous Post Next Post