महानुभाव पंथ कविता
श्रीकृष्ण जन्माष्टमी पाळणा Krishna Janmashtami kavita
जयतु
मंगला मंगल रूपा। श्री कृष्ण राया तू ज्ञान दीपा ॥
अगाध
अनंत तुझी ती कृपा। चुकवी जीवांच्या चौऱ्यांशी खेपा ॥
॥जो जो जो ०॥धृ०॥
संत
भक्ताचे प्रती पाळण । दुर्जन दुष्टांचे निर्दाळन ॥
कराया
दष्कृत्यांचे क्षालण । लावाया ज्ञानाचे सूवळन ॥ ॥ जो जो ॥१॥
सत्य
धर्माचि होतसे हानी । अधर्माची वाढ झाली पाहुनी ॥
द्वापरीच्या
त्या चवथ्या चरणी । आवतरलासी तू जगदानी ॥ जो जो ॥२॥
मथुरानगरी
कंस रायाची । राजधानी उग्रसेन पित्याची ॥
देवकी
कन्या पत्नी वसूदेवाची । त्यांच्या कुशी आले भाक पूर्वीची ॥
॥ जो जो ॥३॥
वद्य
आष्टमी श्रावण मासी । रोहिणी नक्षत्री बुधवार दिवसी ॥
मध्यान
रात्री श्री ऋषीकेशी । आवतरल्याची मात न कळे कोणासी ॥
॥जो
जो॥४॥
यमुनातिरी
त्या मथुरेत । श्रीकृष्ण आवतरले बंदी खान्यात ॥
कंस
मामा करी बाळाचा घात । कळवि हरी पुढची सर्वि मात ॥
॥ जो
जो ॥५॥
पहिल्या
दिवशी पहिला प्रकार। कंस मामाचा दुष्ट विचार ॥
आठव्या
पुत्राचे उडवावे शीर । देवकी बहिणीला संकट फार ॥
॥
जो जो ॥६॥
दुसऱ्या
दिवशी पडली चिंता । देवकी म्हणे धावगा भगवंता ॥
बाळाचे शीर उडविल आता । देवा माझे सत्व किती हो पाहाता ॥
जो जो ॥७॥
तिसऱ्या
दिवशी बाळ घेऊनि शिरा । गेले तया नंद गवळ्याचा घरा ॥
यशोदेस्वाधीन
केले लेकुरा । योग माया ती आणि स्वघरा॥
॥
जो जो ॥८॥
चवथ्या
दिवशी कंस हो आला। बालक कोठे पुसे देवकीला॥
देवकी
बहिण सांगे कंसाला । मुलगीच जहाली आहे मजला॥
॥जो
जो॥९॥
कंस
मामाने मुलगी घेतली । पाय धरूनि उपराटी केली॥
मुलगी
वीजेवानी आकाशी गेली। दुष्ट कंसाची मौत वाढली॥
॥जो
जो॥१०॥
पाचव्या
दिवशी पाचवीचा थाट । जमल्या गवळणी तीनशेसाठ ॥
सटवीची
पूजा केली हो नीट । यशोदा घरी जेवणाचा थाट ॥
॥जो
जो ॥११॥
सहाव्या
दिवशी सर्व गवळनी । घेती बाळाला सर्व मिळूनि ॥
स्नान
घालीती दया दुधानी । काजळ घातले त्या यशोदेने ॥
॥जो
जो ॥१२॥
सातव्या
दिवशी गोकुळनगरी । आनीली शोभाच ती नाना परी॥
हळदकुंकू
देती त्या नारी । देवकीचा बाळ यशोदे घरी॥
॥जो जो ॥१३॥
आठव्या
दिवशी आठवी केली । गोकुळनगरी सुवर्ण झाली ॥
तान्ह्या
बाळाची द्रिष्ट काढीली । राधा मनात हसू लागली ॥
जो जो ॥१४॥
नवव्या
दिवशी भाजनाचा रंग । हाती घेऊनी टाळ मृदुंग ॥
संतमंडळी
गाती अभंग । गोप गोपिका बाळाच्या संग ॥
॥जो जो ॥१५॥
दहाव्या
दिवशी पताका लागती । गावोगावीच्या दिंड्या ही येती ॥
गोप - गोपिका
फुगड्या खेळती । नारद तुंबर कीर्तन गाती ॥
॥जो जो ॥१६॥
आकराव्या
दिवशी यशोदा घरी । नाव ठेविले श्रीकृष्ण हरी ॥
हालवि
पाळणा राधा ती गोरी । मोहित झाल्या गवळ्यांच्या नारी ॥
॥ जो
जो ॥१७॥
बाराव्या दिवशी बारसे केले । बाळपनी सर्व दैत्य
मारिले ॥
कंस
चानूर ठारची केले । उग्रसेनासी राज्य स्थापीले
॥ जो जो॥१८॥
भानु
कविश्वर गातो पाळणा । माझी विनंती तुम्हा सर्वांना ॥
अखंड
श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणा । टळतील विघ्ने संकट नाना
॥ जो
जो ॥१८॥
यदा
यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतीभारत ॥
अभ्युत्थामधर्मस्य
तदात्मानंसृजाम्यहम् ॥७॥
परीत्राणाय
साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ॥
धर्मसंस्था
पनार्थाय संभवामि युगे युगे ॥अ.४ श्लो.॥८॥
॥ श्रीकृष्णार्पणनमस्तू ॥
कवि :- कै. श्रीभास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर अंबड
महानुभाव पंथ कविता रसग्रहण
==============
श्रीकृष्ण जन्माष्टमीची
(चाल :- ब्रह्मगिरी
दुसरी)
नमो नमो द्वारकानाथ श्री बाळकृष्ण मूर्ती ॥
पंचप्राण जीव जोती लाउनि ओवाळू पंचारती ॥धृ०॥
धन्य धन्यसू पुण्य वसुदेव देवकीचे भारी ।
यासाठी परब्रह्म जन्मले देवकीचे उदरी ॥
श्रावणमासी वद्य आष्टमी रात्री दोन प्रहरी ।
बुधवासरी नक्षत्र रोहिणी जन्मले श्रीहरी ।
वसुदेव देवकी दोहीचा कंस क्रुर वैरी ।
करी घेउनि खडग जन्मता क्षणी बाळ मारी ॥
कंसधाक वसुदेवा पेटला चिन्ताग्नी भारी ।
धावपाव श्री धरा वाचवी बाळकृष्ण शौरी ॥
तत् समई रूप थोर घेउनी वदले कंसारी ।
चला गोकुळी घेउनि मजसी भय ना तिळभरी ॥
आज करूया गवळी गणांच्या भाग्याची पुरती ।
पंचप्राण जीव जोती लाउनी ओवाळू पंचारती ॥ नमो नमो ॥१॥
उसंगळी घेउनी वसुदेव त्वरे गमण सारी ।
बंदीशाळेचे कुलपे गळाली निघाले बाहेरी ॥
झूम झूम पाऊस पडे शेष फणी धरी हरीवरी ।
हरी पद स्पर्शे वाट दे तसे यमुना सुंदरी ॥
यमुना उतरून गेले गोकुळी नन्दाचे घरी ।
वासूदेव ठेऊनी आणिली योगमाया कुमरी ॥
नन्दराणी ती जागृत होउनी पाहे न्याहाळूनिया ।
सुलक्षणी बहुतेज आगळे दिसे सुंदर काया ॥
मधुबिंदू घालुनी पुत्रमुख पाहे नन्दराया ।
न माये गगनी तेज पाहुनी हर्षान्वीत हृदया ।
संचालक हा सर्व सृष्टीचा देई परम शांती ।
पंचप्राण जीवजोती लाउनी ओवाळू पंचारती ॥नमो नमो ॥२॥
गोकुळच्या गवळणी हरीचा मुखचंद्र पहाया ।
यती धावुनी सर्व मिळुनी घेती उचलूनिया ॥
क्षणोक्षणी मुख चुंबन घेती नित लागती पाया ।
दिगमोहीत जहाल्या पाहुनी गेल्या लुब्धुनिया ।
प्रेमभरे हालविती पाळणा गाती सर्व स्त्रिया ।
वासूदेव हरी नाव ठेविली जोतिष पाहूनिया ॥
मंजुळ स्वर मंगल वाद्याचा सूर गण गुण गाया ।
नारद तुंबर वर्णन करीती तन्मय होउनिया ।
सुंठवडा आणि पानशर्करा वाटीताती लाया ।
सदानंद दाटला घरोघरी पाहूनी यदूराया ।
ब्रह्मदेव करी पूजा आरती भाव धरूनी चित्ती ।
पंचप्राण जीव जोती लाउनी ओवाळू पंचारती नमो नमो ॥३॥
गवळी गणांचे अपार सुकृत केली तपश्चर्या ।
आनंदाचा कंदलाभला गोकुळवासिया ॥
शेष नारायण माथा तुकवी निरखून सौंदर्या ।
याच गुणे वेधली क्षीराब्धी विष्णूची भार्या ॥
मोक्षाचे माहेर निरंतर धरी निजसुख छाया ।
पराप्तर निज वस्तू लाधली गोकुळ गवळीया ॥
प्रेमदान गोपिकासी दिधले कणवा पाहुनिया ।
गोकुळनगरी क्रिडा करी बहू जीव उद्धराया ॥
चहुवेदाचे बीज सकळ शास्त्राचा मूळ पय्या ।
विनम्र भावे रवी कवी हा लागतसे पाया ॥
सोळा सहस्त्र भोगुनी नारी ब्रह्मचारी म्हणती ।
पंचप्राण जीव जोती लाउनि ओवाळू पंचारती ॥ नमो नमो ॥४॥
॥ समाप्त ॥
कवि :- कै. श्रीभास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर अंबड
पाळणा
पहिल्या दिवशी कृष्ण जन्मला ॥
बंदीखाण्यामधे प्रकाश झाला ॥
माय पित्याला सुख देण्याला ॥
बंद मुक्त देव गोकुळी आला॥
जो बाळा जो जो रे जो ......
दुस-या दिवशी करूनी दंग ॥
माय पित्याचे फेडीले पांग ॥
माया गर्जुनी कंसाला सांग॥
वैरी नांदतो देव अभंग ॥
जो बाळा.........
तिसऱ्या दिवशी यशोदा नंद ॥
गर्ग भविष्य ऐकूनी दंग ॥
माबळ भटाचे दुखविले अंग ॥
पुतणा मावशी केली दुभंग ॥
जो बाळा ........
चवथ्या दिवशी आनंद भारी
एकमेकींना सांगती नारी ॥
वाणे घेऊन आल्या यशोदा घरी ॥
सुंठवडा वाटती आनंद भरी ॥
जो बाळा.........
पाचव्या दिवशी वेढिला वाडा ॥
आल्या गोपीका रांगोळी काढा ॥
निंब नारळ वाहती विडा ॥
तान्ह्या बाळाची दृष्ट ही काढा ॥
जो बाळा ......
सहाव्या दिवशी वर्णीती थोरी ॥
वेद ब्राह्मण पढताती घरी ॥
ऋषी पुराण गर्जती भेरी ॥
सावळे रूप वेढिला हरी ॥
जो बाळा .......
सातव्या दिवशी रत्न अमोल ॥
मंडप घातला करवेना मोल ॥
कृष्ण बाळाला शोभती बाल ॥
यशोदा मांडीवर घेवुनी डोल ॥
जो बाळा ......
आठव्या दिवशी करीतो लीला ॥
गोपगोपीका आनंद झाला ॥
जागृती शुसुप्ती आठवी देवाला ॥
धन्य जन्म त्याचा सफल झाला ॥
जो बाळा......
नवव्या दिवशी घेतला छंद ॥
फुंद फुंदोनी रडे मुकुंद ॥
राज मंदिरी होतो आनंद ॥
अनंत रूपे दावे गोविंद ॥
जो बाळा......
दहाव्या दिवशी दाही दिशाला ॥
मात कळली सर्व जगाला ॥
धाक पडला कंस राजाला ॥
आनंद झाला भक्त जनाला ॥
जो बाळा.....
अकराव्या दिवशी नारद आला ॥
म्हणे पृथ्वीवर बहु भार झाला ॥
दैत्य मर्दाया ईश्वर आला ॥
गुढया तोरणे उभारू चला ॥
जो बाळा......
बाराव्या दिवशी मोठा सोहळा ॥
बारा सोळा नारी होवूनी गोळा ॥
चौदा चौसष्ट केला गलबला ॥
रेशमाची दोरी हलवा कान्हाला ॥
जो बाळा......
तेराव्या दिवशी गाताती नारी ॥
कृष्ण दामोदर शाम मुरारी ॥
दोन तीन चार वर्णीती थोरी ॥
हलवा सयांनो नंदाचा हरी ॥
जो बाळा........
चौदाव्या दिवशी मोठी गर्जना ॥
कंस कुळाचा करील घाना ॥
साधु संतांच्या आला रक्षणा ॥
हलवा सयांनो कैवल्य राणा ॥
जो बाळा .......
पंधराव्या दिवशी नौबत वाजे ॥
कृष्ण वासुदेव नाम हे साजे ॥
देव अवतरले भक्तांचे काजे ॥
घ्या गे बायांनो बाळ हे माझे ॥
जो बाळा.....
सोळावे दिवशी सोहळा केला ॥
गर्ग भविष्य अनुभवाला ॥
चकोर दासाने पाळणा गाईला ॥
वाक् पुष्प हे अर्पु देवाला ॥
जो बाळा जो जो रे जो
महानुभाव पंथ कविता रसग्रहण