रवरव नरक म्हणजे काय?
रवरव हे नर्क कशाने होतात याची सविस्तर जाणीव असेल तर ते होणार नाही. याविषयी आपण सावधगिरी बाळगू शकतो. अज्ञान दशेमध्ये हे दोष घडले असतील व नासण्याचा उपाय आपल्याला माहित असेल तर ते चुकविण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. म्हणून या नर्काविषयी आपल्याला सविस्तर माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. महादाईसांनी पुराणामध्ये ८४ नर्क ऐकले, मग स्वामींना विचारले “जी जी पुराणामध्ये ८४ नर्क सांगितले हे सत्य आहे का ?
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी म्हणतात, खरे आहे बाई आम्ही जर नर्क निरोपण करायला लागलो तर ते ऐकून जिवंत राहील असा कोणी आहे का ? हे नरकाचे वर्णन ऐकून कोणी जिवंतच राहणार नाही. मग महादाईसांनी म्हटले हे नरक कशाने चुकतील? यावर देवाने उत्तर दिले “एका देवाचे झाले नाही तर
असे दुःख भोगावे लागतात. असिपत्र तलवारीच्या धारेसारखी वृक्षाची पाने देवता हातपाय धरून तयावरी घालते. चार-चार भाग होवून खाली पडतात, पुन्हा वरून टाकतात, असे असिपत्र मग एक घडी युगाप्रमाणे जाते असे युग जातात बाई, जी जी तरी तयाचे देह जात कसे नाही. स्वामी म्हणाले ते यातना भोगविण्या करता दिलेले देह असते.
रवरव - अनिती मार्गाने भोग भोगला असता, रवरवचे नर्क होता. प्रमाणापेक्षा अधिक सुख सुविधेचा भोग घेतला असता हे रवरवाचे नर्क भोगवे लागतात. रवरवच्या नर्काचे बारा प्रकार आहेत. एका रवरवच्या नर्काची काळ मर्यादा बारा वर्षाची आहे. असे बारा मिळून १४४ वर्षाची काळगणना आहे. बाराही प्रकार सर्वांना होतीलच असे नाही. ज्या ज्या प्रकारे अनितीचा भोग भोगला त्या त्या प्रकारचे रवरवाचे नर्क जीवाला होतात.
१) असिपत्र २) तांब्रपत्र ३) कुंभी पाक ४) तैल्यपाक ५) खैराईगळ ६) करकोचा ७) श्वान ८) गिधाड ९) कोल्हे १०) लोहपुतळी ११) सांडसी १२) तप्त सळ्या
१) असिपत्र तलवारीच्या पात्यासारखे अति तीक्ष्ण व धारदार झाडाची पाने असतात. वरी चार पाने त्या खाली सोळा, त्या खाली चौसष्ट असे चार-चार पटीने खाली पाने वाढतात. अशी त्या झाडाची रचना असते. सैंगलोकीची यम देवता (चित्रगुप्त ) जीवाला हातीपायी धरनी त्या झाडाच्या टोकावर टाकते. त्या देहाचे आधी चार तुकडे होतात, त्या खालील पानावर पडले की सोळा तुकडे होतात, असे करता करता खाली येईपर्यंत त्या देहाचे असंख्य तुकडे होतात. देवता सामर्थ्याने ते देह पुन्हा जोडतात. असे पुन्हा पुन्हा त्या देहाला त्या झाडावरून टाकले जाते असे नर्क देवता जीवाला बारा वर्षे पर्यंत भोगविते
धर्म बंधुंनो ! लक्षात घ्या, या माणसाला साधी जिव्हाळी लागली असता सहन होत नाही, मग असे भयंकर नरक भोगतांना किती यातना होत असतील याची कल्पनाही आपण करू शकत नाही. स्वामींनी तर हे 'देशवळ नर्क सांगितले. याहीपेक्षा आणखी आहेत, जे मनुष्य ऐकूही शकत नाही.
उदा. असिपत्र हे नर्क कशाने होतात हिंसेमुळे. असिपत्र हे नर्क जिवाला भोगावे लागतात. माणसाचा आहार हा शाकाहार असताना तो जेव्हा मांसाहार भक्षण करायला लागतो, केवळ जीभेचे चोचले पुरविण्याकरीता मुक्या प्राण्यांची हिंसा करतो, त्यांच्या मांसाचे तुकडे तुकडे कसतो. त्यामुळे देवताही आपल्याला एक यातना देह देवून असेच त्या देहाचे तुकडे तुकडे करून दुःख भोगविते.
२) तांब्र पत्र :- बारा योजन लांब अग्नीने तापलेली तांब्याच्या पत्र्याची भूमी असते. त्यावर या जीवाला यातना देह देऊन चालवले जाते. नाही चालले तर यमदूत मुद्गलाने हातात.
3) लोहाची पुतळी - कामवासनेने व्यवस्थेवेगळा स्त्रीचा उपभोग घेतला असता. देहाभिमानीनी देवता त्या जीवाला एक यातना देह देते. व एका लालबुंद तापलेल्या लोहाच्या पुतळीला अलिंगन द्यायला लावते. देत नसेल तर बळजबरीने लोटून घालते असे पुन्हा पुन्हा त्या धगधगीत तापलेल्या लोहाच्या पुतळीला अलिंगन दिल्यामुळे त्याला भयंकर यातना होतात. असे भयानक दुःख त्या जीवाला १२ वर्षपर्यंत भोगावे लागतात. यालाच लोहपुतळी असे म्हणतात.
हे नर्क परस्त्रीला जबरदस्तीने अलिंगन दिले किंवा स्त्रीने पुरुषाला अलिंगन दिले तर त्या जीवाला लोहाच्या तप्त मुर्तीला अलिंगन द्यायला लावतात. याचे आयुष्य १२ वर्ष असते. व्यवस्थेवेगळा उपभोग घेवू नये.
4) करकोचाची चोच :- अती तिक्ष्ण व अनुकुचीदार चोच असलेला पक्षी असतो. ज्या जीवाने नेत्राचा वाईट उपयोग घेतला, नको ते दृष्य पाहीले अशा व्यक्तीचे डोळे अशा भयानक पक्षाच्याद्वारे फोडले जातात. याचेही आयुष्य १२ वर्ष असते. हे नर्क यातना देहीच भोगविली जातात. एक डोळा फोडला की दुसरा फोडेपर्यंत पहिला डोळा पुर्ववत होतो. असे छळुन छळुन देवता जीवाला यातना भोगवते. म्हणुन सुज्ञ व्यक्तीने दृष्टीचा वापर चांगले पाहण्याकरता करावा. स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक, शास्त्र अध्ययन याकरीता केले तर झालेल्या पापाचेही भाळन होते.
5) खैराइंगळ : अनिती मार्गाने भोग भोगला किंवा आपल्याच मालकीचा परंतु अलिशान प्रकारे मऊ ने मखमली गालीचे पायामध्ये घाल्यासाठी पादत्राणे (चपला) अर्थात पायाच्याद्वारे या इंद्रियाच्याद्वारे जेवढा अलिशान भोग भोगला असता. यम देवता त्याला - खैराइंगळ हे नर्क भोगवितात. खैराच्या झाडाचा अग्नी हा ने अतिशय तीव्र असतो. अशा तीव्र धगधगीत निखाऱ्यावरुन चालवितात. त्यावर पाय ठेवला असता. ते पाय चटकन जळतो. पाय वर उचलला की पुर्ववत सामर्थ्याने तो जशाच्या तसा होतो. पुन्हा पाय खाली ठेवतांना चांगला असतो आणि उचलतांना जळुन निघतो. त्याच्या पाठीमागे यमदेवता मुद्गल घेवून असतात. तो जर चालला नाही तर देवता त्याला मुद्गलाने हाणतात. असे अतिभयंकर दुःख त्याला बारा वर्षांपर्यंत भोगावे लागते.
६. तांब्रपत्र : तांब्याच्या एकशे चौरेचाळीस किलोमिटरचा चौरस हा तांब्याचा तापलेला तवा त्यावर सैंगलोकीची यमदेवता जीवाला हातापायावर चालायला लावते. तो जर चालत नसेल तर देवता त्याला मुद्गलाने ढकलुन त्या अतिशय लालबुंद तव्यावर मुद्गलाने दाबुन धरते. त्याचे एक अंग कसकस करी जळते (ज्याप्रमाणे आपण निखाऱ्यावर वांगे भाजतो) देवता त्याला दुसऱ्या बाजुने पालटते तोपर्यंत जळालेली बाजु चांगली होते. असे तडपु तडपु देवता जीवाला बारा वर्षांपर्यंत दुःख भोगवते.
धर्म बंधुंनो हे दोन्ही प्रकारचे नर्क आपल्याला लिसीपुसी केल्याने होतात. आपण व्यवहारात पाहतो. चारशे पाचशे रुपयाच्या क्रीम पायासाठी वापरतात. आपण सुंदर दिसलो पाहीजे म्हणुन नव्हत्या नव्हत्या प्रकारच्या क्रिम, पावडर, साबण यांचा वापर करतात. इत्यादी विविध प्रकारच्या वस्तुंचा वापर करतात. मऊ मखमली गालीचे, डनलपच्या गाद्या, सोपासेट इत्यादीचा अनिती मार्गाने किंवा अतिप्रमाणात उपभोग घेतला असता. हे नर्क यमदेवता जीवाला भोगवतात.
७) कुंभीपाक :- हे डेगीच्या आकाराचे भांडे असते. बारा गावाच्या मापाचे म्हणजे १४४ किलोमीटरचे मोठे रुंद असे भांडे असते. या भांड्यामध्ये दुनियाभरची घाण भरलेली असते. उदा. पु. लघुशंका, दीर्घशंका, सडलेले रक्त इत्यादी बऱ्याच प्रकारची घाण भरलेली असते. यामध्ये त्या देहियाला टाकतात वर पर्वताप्रमाणे मोठे झाकण ठेवतात.
त्या दुर्गंधीने गुदमरुन तो देहधारी जीव वरी डोके ने काढण्याचा प्रयत्न केला तर यम देवता त्याला मुदगलाने हाणतात हे नर्क कशाने होतात? तर अधिकाधिक उत्तम ते प्रकारचे सुगंधी द्रव्य, सुगंधी तेल, अत्तर, स्प्रे इत्यादींचा प्रमाणापेक्षा अधिक उपभोग घेतल्याने हे नर्क देवता. ग जिवाला १२ वर्ष भोगविते.
८) तैल्यपाक :- १४४ किलोमीटर अशी भली मोठी कढई र असते. त्यामध्ये तेल टाकल्या जाते आणि खाली जाळ लावतात. अशा उकळत्या तेलामध्ये यम देवता त्या देहधारी जीवाला टाकते. तो कसकसकरी जळतो देवता त्याला चिमट्याने बाहेर काढते बाहेर काढल्यावर त्याचे अंग पूर्ववत जसेच्या तसे होते. पुन्हा यम देवता त्याला कढईत टाकते. पुन्हा मागच्याच प्रमाणे भाजून निघतो. अशा भयंकर यातना देवता त्याला बारा वर्षापर्यंत भोगवते.
९) श्वान - हिंसक कुत्री या देहाच्या पाठीमागे सोडतात ते श्वान त्या देहाचे लोचके तोडतात. मासाचे लोचके तोडून तोडून देहाची बोटी-बोटी करतात पुन्हा ते देह पुर्ववत जसेच्या तसे होते, हेही नर्क देवता जिवाला १२ वर्षे भोगविते.
१०) गिधाड - गिधाड ही यातना देहाचे तुकडे तुकडे करून त्याला यातना भोगविते. पुनश्च ते मासाचे लोचके एकत्र होवून त्याचे पूर्ववत देह तयार होते. पुन्हा ती गिधाड त्या देहाचे लोचके तोडून देह विस्कळीत करते. असे पुन्हा-पुन्हा मारून देवता जिवाला नर्क भोगविते. अशाप्रकारे प्रत्येक वाईट कृत्याचे नर्क ठरलेले असतात. रौरव नर्क संपूर्ण.