श्रीकृष्ण भजन लिरिक्स मराठी - shreekrishna bhajan lyrics marathi

श्रीकृष्ण भजन लिरिक्स मराठी - shreekrishna bhajan lyrics marathi

श्रीकृष्ण भजन लिरिक्स मराठी - bhajan lyrics marathi

महानुभाव पंथ कविता रसग्रहण

1)

आदी गणराया

(चाल :- ॐ परब्रह्मा श्री परेशा)

धावत यावे आदी गणराया।

साह्य करावे प्रचार कार्या॥धृ०॥

तव पदी माझे मानस रमले।

म्हणुनि करीतो स्वागत आपुले॥

मन सुमने ही आप्नी काया

वन्दन करीतो श्री प्रभुराया॥१॥

ऋषीमुनि गाती तव गुण महिमा।

भुल पडली त्या हरिहर ब्रह्मा।

तुझे रूप ते गेली पहावया।

नेत्र तरळले आंधळी माया॥२॥

भक्त मीराची ऐकुनि गानि।

ऐकाया तू येसी धाऊनी॥

मजवरी दुर का केली माया।

येऊनि जन्मा गेलो वाया॥३॥

आम्ही लेकुरे सेवक तुमचे।

मान्य करावे निवेदन आमुचे ॥

भानु कवि वरी धरी सुख छाया।

भवसागर हा पार कराया।

धावत यावे आदी गणराया।

भवसागर हा पार कराया॥४॥

कवि :- कै. श्री. भास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर (अंबड)

 2)

नाटकारंभीचे नमनगीत

(चाल : हे शिवशंकरा गिरजा तनया)

जय जय जय श्री जयगोपाला।

करीतो आम्ही आज नमन तुला ॥धृ०॥

आज्ञ जनासी सुज्ञ कराया।

गरुडावरती बैसुनी राया।

मधूर स्वरांच्या त्या मुरलीला।

वाजुनी शांतवी तू सर्वाला॥१॥

जन गण दिग्मोहीत कराया।

नटखटभव संसारी तराया॥

सुयश द्यावे शुभ कार्याला।

हीच विनंती तव पद कमला ॥२॥

खटपट करूनी पैशासाठी।

होय जीवाची माती मोठी।

या विषयावर नाट्यकला।

सादर करीतो मी आजला॥३॥

प्रेक्षक बंधु आले पहावया।

शांत करावे त्यांच्या हृदया।

वरमती देउनी या आम्हाला।

विजयी करावी नाट्यकला॥४॥

आम्हा बालकापोटी धरावे।

भानुकविचे ब्रीद राखावे॥

ध्वज फडफडतो क्षेत्राला।

प्रती वर्षी त्या चैत्राला ॥५॥

कवि :- कै. श्री. भास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर (अंबड)

 3)

धावा श्रीकृष्णाचा

(चाल : उठा रे गड्या काळ बिकट पातला)

लवकरी धावत येई मुकुंदा ॥धृ०॥

आनंदकंदा परमानंदा ।

निजसुख देई छेदूनी बंधा ॥

आवड मला ही सदा ॥१॥

नम्र विनंती तुज गोविंदा ।

दर्शन द्यावे देवकीनंदा ॥

करूनि कृपा एकदा ॥२॥

तव गुण महिमा न कळे वेदा ।

भव हरूनि देसी मकरंदा ॥

अर्पनी त्या निजपदा ॥३॥

भानुकविच्या पुरवी छंदा ।

सुमती द्यावी अतीमती मंदा ॥

नमन तुला सर्वदा ॥४॥

कवि :- कै. श्री. भास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर (अंबड)

 4)

 द्रौपदी लज्जारक्षण

(चाल : माहेरची साडी)

 गिरीधर माधव, द्रौपदी बांधव, सभेसी भूल पाडी।

नेसवि बहिणीला साडी॥धृ०॥

करीती वलगणा कौरव नृपती।

वस्त्र सतीचे फेडा म्हणती॥

कठोर भाषण, करी दुशाषण, द्रौपदीला ओढी ॥१॥

धरूनि अहंता भक्ता वरीती।

दुर्जन बहुतचि खोड्या करीती॥

भ्रष्टमतीचे, द्रौपदी सतीचे, वस्त्र बळे फेडी ॥२॥

पडती ढीगावर ढीग वस्त्रांचे।

गात्र गळाले आंधसुताचे॥

पाहुनि थकले, तेथच रुकले लाज नसे थोडी ॥३॥

स्मरण करावे श्रीकृष्णाचे।

निरसन होईल मूळ प्रश्नांचे॥

दुष्कृत्याचे, भानुकविचे, भवबंधन तोडी।

नेसवी बहीणीला साडी ॥४॥..

कवि :- कै. श्री. भास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर (अंबड)

 5)

दयाळु ईश्वर

(चाल :- सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव)

देवाधी देवाची अघटीत माव।

करी प्रिय भक्तासी रंकाचा राव ॥धृ०॥

श्रीकृष्णरायाच्या भेटी सुदामा।

आलासे आठवित श्रीकृष्ण नामा॥

पोहे पसाभरी भक्षूनि प्रेमा।

राज्याधिकारी केला सुदामा॥

सोन्याच्या नगरीला द्वारकेचा भाव ॥१॥

चानुर कंसा सुरा मर्दुनि।

उग्रसेना पटी स्थापन करूनी॥

आंध सुतांचे खंडण करुनि।

पंडुसुता दिली ती राजधानी॥

एकनिष्ठ भक्तीचा सत्ये प्रभाव ॥२॥

गोपाल करीतो भुपाल जिवा।

पाहूनि त्यांच्या सुभक्ती भावा॥

मधुर मधुर वाजउनि पावा।

शांती सुखाचा दे नित्य मेवा।

भानुकवी म्हणे सोडी अहंभाव ॥३॥

कवि :- कै. श्री. भास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर (अंबड)

 6) 

नामाचा महिमा

(चाल : पाय तुझे गुरुराया हीच माझी देवपुजा)

नाम तुझे ते यदुराया यदुराया।

करि माझी खूप मजा ॥धृ०॥

नाम तुझे करी बहु क्रांती । जीवा सौख्य दे विश्रांती॥

जीवा सौख्य दे विश्रांती । जीवा सौख्य दे विश्रांती॥१॥

नाम तुझे केंद्रबिंदु । पार करी हा भव सिंधू ।

पार करी हा भव सिंधु । पार करी हा भव सिंधु ॥२॥

नाम तुझे जगदिश्वरा ।  दूर करी विघ्ने बारा ।

दर करी विघ्ने बारा । दर करी विघ्ने बारा ॥३॥

नाम घेई लाउनि ध्यान चुके तया जन्म मरण।

चुके तया जन्म मरण। चुके तया जन्म मरण ॥४॥

भानुकवि देतो ग्वाही । हरी विना तारक नाही।

हरी विना तारक नाही । प्रभु विना तारक नाही ॥५॥

कवि :- कै. श्री. भास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर (अंबड)

 7)

अखंड ध्यान

(चाल : सांग कसा विसरू)

नाम नका विसरू, देवाचे नाम नका विसरू ॥धृ०॥

तो जगपिता भव भय हारता।

धन्ये दया सागरू॥१॥

येउनि जन्मा स्मर घनशामा।

परब्रह्म परमेश्वरू॥२॥

अमोल काया जाईल वाया।

नका खाउनि पसरू॥३॥

सोडुनि धंदा भज गोविंदा। प्रार्थीतसे भास्करू ॥४॥

कवि :- कै. श्री. भास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर (अंबड)

 8)

सुबोध

(चाल :- घुंगटके पट खोल रे पिया तोहे मिलेंगे)

झडकरी दूर करी काम।

गड्यारे नित आठवि घनशाम ॥धृ०॥

भवसागर हा पार कराया। सोडूनि द्यावी ती मोहमाया।

लागत नाही दाम । गडया रे नीत आठवि घनःश्याम ॥१॥

धनदौलत आणि तनमन काया। समावि त्या श्रीकृष्णराया॥

भक्ती करी निष्काम । गड्या रे नित ॥२॥

विश्वविधाता तो जगपिता। तोचि स्मरा म्हणे गीतामाता।।

देई अढळ सुखधाम । गड्या रे नित ॥३॥

पति पावन करूना सिंधू। भानुकविचा तो प्रिय बंधू॥

त्यासी करावा प्रणाम । गड्या रे नित आठवि ॥४॥

कवि :- कै. श्री. भास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर (अंबड)

9)

मधुर

जात असे काळ व्यर्थ आपुला

भजन 

(मुझे क्या काम दुनियासे से)

जातसे काळ व्यर्थ आपुला । खातसे काळ आयुष्याला ॥धृ०॥

बाळपणी छंद चेंडूचा । विटी दांडू व गोट्याचा॥

अशाखेळात काळ गेला । बारा वर्षाची मुदत बोला ॥ जातसे काळ व्यर्थ ॥१॥

पुढे वय तरूण दशा फार । दिसेना नेत्री अंधार ।

ओळख कोणाचीन त्याला । लोभ अती विषयाचा जडला । जातसे काळ ।।२।।

आली साठ वर्षाची भरती । झाली मग शक्ती बहु कमती ॥

पुसेना कोणीच मग त्याला । खोकलूनी कंठीप्राण आला । जातसे काळ ॥३॥

म्हणे हा दास भास्कर । दोन दिवसाचा बाजार ॥

लागली कीड आयुष्याला ॥ विसरू नये प्रभुच्या नामाला । जातसे ॥४॥

कवि :- कै. श्री. भास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर (अंबड)

 10)

सोयरा परमेश्वर जोडा

भजन 

(चाल- मुझे क्या काम दुनिया से)

सोयरा परमेश्वर जोडा । नाहितर घालील यमखोडा ॥धृ०॥

सर्व धर्माचा कर त्याग । साधुसंताचा धर संग ।

मनाचा सोडून दे हावडा । नाहीतर॥१॥

असावीशांतता मोठी । नसावी कल्पना खोटी॥

करावा षड्रिपुचा रगडा । नाहीतर ॥२॥

नको वा गर्व अभिमान । म्हणे पार्थासी भगवान ।

नको करू पाखंडी झगडा । नाहीतर॥३॥

दयाळू परमेश्वर थोर । म्हणे हा दास भास्कर ।

झापडी नेत्राची उघडा ॥४॥

कवि :- कै. श्री. भास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर (अंबड)

 11) 

हरीनामाची माळ फिरवा

भजन ( चाल- जीव हा झाला केविलवाणा)

हरीनामाची माळ फिरवा । करा आळसाची बेपरवा ॥धृ॥

थोर सामर्थ्य नामाचे । नासती डोंगर पापाचे ॥

मनाची एक वृत्ती ठरवा । करा आळसाची बेपरवा बेपरवा ॥१॥

नाम विघ्नाच्या लागे पाठी । कळीकाळासी धरून आपटी ॥

शांतीचा झेंडा जगी मिरवा, करा आळसाची बेपरवा ॥२॥

जया मुखी नाम बसे प्रभुचे । तया भय नाही यमपुरिचे ॥

सदा तो प्रभुराज आठवा, करा आळसाची बेपरवा ॥३॥

सुदामा मुखी यदुराव । जाहला रंकाचा राव ।

सदा तो प्रभुराज आठवा, करा आळसाची बेपरवा ॥

कवि :- कै. श्री. भास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर (अंबड)

 12)

स्तुती स्तवन

(चाल : यशोमती मैय्यासे)

गोपाल कृष्ण माझा गोकुळीचा राजा ।

अगणीत त्यांसी प्रणीपात माझा ॥धृ०॥

मथुरेत बंदिखानी आले चक्रपाणी ।

अवतार धारण करूनी गेले नंदभुवनी।

चमत्कार दावी दुरूनी होऽऽ करी खुप मौजा । अगणीत त्यांसी ॥१॥

गोपगोपीच्या मेळ्यात खेळे कृष्ण गवळ्यात ।

सर्व स्त्रीयांच्या डोळ्यात नाही माया जाळ्यात॥

हरिकडे राक्षसांच्या होऽऽ येती चढून फौजा । अगणीत त्यांसी ॥ २॥

सर्व दैत्य निर्दाळीले करून बहू क्रांती ।

संत भक्त सांभाळीले देऊनी सुख शांती।

संव्हारूनी कौरव सारे होऽऽ राज्य धर्म राजा । अगणीत त्यांसी॥३॥

धन्यकृष्ण अवतार तिन्ही लोकी मान्य थोर ।

करी जीवांचा उद्धार परब्रह्म तो ईश्वर।

वेळोवेळी धावूनी येई होऽऽ भानुचीया काजा । अगणीत त्यांसी ॥४॥

 कवि :- कै. श्री. भास्कर बाबाजी जामोदकर कवीश्वर (अंबड)

महानुभाव पंथ कविता रसग्रहण


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post