भाग 02 नामधारकाचा आचारधर्म (असतिपरी)

भाग 02 नामधारकाचा आचारधर्म (असतिपरी)

  भाग 02 नामधारकाचा आचारधर्म (असतिपरी)


 

१६. आपल्या जीवनात सेवाभाव असावा -

सेवादास्यामुळे अंगी नम्रता प्राप्त होते स्वयं दास्य करावे म्हणजे इतरांकडून सेवा करुन घेऊ नये.

परमार्गात (आश्रमात) साधू संतांची स्थानप्रसाद भिक्षू वासनिकांची सेवा तसेच दास्य करावे. - घरातील वडीलधारी मंडळींची सेवा करावी. - सेवादास्याने सर्व दुःखांचा नाश होतो.

आपण ज्या वेळेस बाहेरुन घरी येतो त्या त्या वेळेस हात पाय धुवून एक विशेष वंदन करुन पाणीचहाजेवण इ. घ्यावे.

घराबाहेर पडतांना सुध्दा देवपूजेवर डोके ठेवून वंदन करुनच निघावे.

एखाद्या आश्रमातमठात गेले असते तिथे आपल्या क्षमतेनुसार काहीतरी सेवा अवश्य करावी.

शक्यतो साधुसंतांनी निष्पन्न केले अन्न आपण जेवण करू नयेत्यांनीच म्हटले तर प्रसाद म्हणून थोडेसेच घ्यावे.  

काहीतरी सेवा केल्याशिवाय आश्रमातलेमठातलेमंदिरातले अन्न खाऊ नये.           

 

शंका समाधान

       महानुभाव पंथात ज्या काही धार्मिक विधी आचारल्या जातात त्यात काही नियम आहेतत्या नियमांच्या मागे निश्चित अशी कारणे असतात ती कारणे सर्वांना माहित नसतात. त्यामुळे काही वेळा विधीचे अंधानुकरण होते. ते ज्ञानपूर्वक व्हावे त्यामुळे विधी दृढपूर्वक होतात. त्यासाठी काही नियमांचे स्पष्टीकरण पुढे केले आहे. ह्या शंका/नियम ज्ञानी लोकांच्या दृष्टीने किरकोळ वाटतील पण नविन नामधारकइतर पंथीय लोकांच्या दृष्टीने त्या महत्त्वाच्या आहेत असे मला वाटते.

 

१. देवपूजा विधी :

       देवपूजा म्हणजे परमेश्वर अवतारांच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेल्या अथवा परमेश्वराच्या संबंधीत प्रसन्नतेने भक्तांना दिलेल्या वस्तूंना त्या संबंधीत लीळा आठवून अंतःकरणपूर्वक वंदन करणे म्हणजे देवपूजा.

 

१. देवपूजा करण्यापूर्वी हात धूवावे व ते विशिष्ट कापडाने कोरडे करावे. त्यानंतर आपल्या वस्त्रास हात लावू नये. कारणदेवपूजेतले विशेष हे परमेश्वर अवतार यांच्या स्पर्शाने पवित्र झालेले असतात. त्यात विशेष शक्तींचा मायाकृपा निक्षेप झालेला असतो. अशा पवित्र वस्तूंना आपल्या हातावरची घाण लागून ते अस्वच्छ होऊ नयेत. आपले कपडे स्वच्छ नसतात म्हणून स्वतंत्र कपड्याचा वापर करुनच हात कोरडे करावे लागतात.

२. देवपूजा करण्यापूर्वी डोक्यावर टोपीरुमाल ठेवावा :- कारण देवपूजा ही शुभ क्रिया आहे. म्हणून बोडके असू नयेव आपल्या डोक्यावचे केस वंदन करतांना विशेषांना (देवपूजेस) लागू नये इ. कारणासाठी डोक्यावर टोपीरुमाल ठेवावे

 

३. विशेष वंदन करतांना दुरुन नमस्कार न करता कपाळावर विशेष लावून किंवा आपले कपाळ त्या पवित्र स्थानावर स्पर्श करुनच वंदन करावे. कारणसन्निधानीच्या काळात प्रत्यक्ष अवतारांचा सहवास होता पण असन्निधानी म्हणजे अवतारांचा सहवास नसलेल्या काळात त्यांचा अप्रत्यक्ष सहवास घडावा म्हणून अवतारांनी स्पर्शीत झालेल्या पवित्र वस्तूंना प्रत्यक्ष कपाळ ठेवूनच वंदन केले म्हणजे पुढे परमेश्वराचा योग येऊन सन्निधानाचा लाभ प्राप्त होईल.

४. देवपूजा वंदनानंतर पाच दंडवते घालावीतकारण साष्टांग दंडवत म्हणजे संपुर्ण शरणांगती. पूर्ण नम्रतेचे द्योतक आहे. पंचअवतार वंदन मान्यतेनुसार पाच दंडवत घालणे अधिक लाभाचे असते. दंडवते घातल्याने शरीरातील वायुंचा नाश होऊन आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. हा अनायसे होणारा लाभ असतो. म्हणून कमीत कमी पाच दंडवते घालणे आवश्यक असते.  

विडा वाहणे क्रिया: विधीपूर्वक विडा कसा अर्पण करावा?

विडा विधीपूर्वक समर्पण करावाकारण विडासमर्पण ही क्रिया अत्यंत महत्त्वाची आहेपत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।।"  म्हणजे कोणतेही पानफुलफळ अत्यंत भावपूर्वक श्रध्दने परमेश्वरास अर्पण केले तर ते परमेश्वरास प्रिय असते. काहीही नसेल तर दोन्ही हाताचे तळवे जोडून पत्र (पान) रुपानेमस्तकरुपी फळ (नारळ) परमेश्वरचरणी ठेवून मनाचा शुध्दभाव पुष्परुपाने व दुःखपूर्वक प्रार्थना करुन डोळ्यातील पाणी परमेश्वराचे चरणी अर्पण करावे. प्रार्थना म्हणावी

नागपत्र कराचे हेनारियळ परी शीर ।

प्रतिज्ञा ही सुपारीचीभावविडा तुज अर्पितो ।।

 

२. इतर लोक विडा वाहतात तेव्हा आपण त्यास हात लावून सहभागी व्हावे का?

 विडा वाहणाऱ्या व्यक्तिस विचारुन अथवा त्यांनी सांगितले असता हात लावण्यास हरकत नसावी. विनाकारण गर्दी करुन अविधी होईल असे करु नये.

 

३. तीर्थक्षेत्रास जाणाऱ्या व्यक्तिस विडा वहाण्यासाठी सांगावे का?

विडा वाहण्यास सांगणे चांगली क्रिया आहे. पणत्यासाठी पुरेसे पैसे देऊन आपल्या नावाचा विडा वाहण्यास सांगावा.

 

नामस्मरणाचे फायदे :

१. नामस्मरणाने चतुर्विध साधनांची आवड निर्माण होते.

२. नामस्मरणाने ज्ञानी पुरुषाकडून बोध व ज्ञान होते.

३. नामस्मरणाने ईश्वराला अनुसरण्याचा योग येतो.

४. नामस्मरणाने परमेश्वराशी नाते टिकून राहते.

५. नामस्मरणाने इंद्रिय दमनाचा त्रास होत नाही

६. नामस्मरणाने पंचमहाभूतेतीन ऋतूकाळाचे दुःख होत नाही.

७. नामस्मरणाने अपघातापासून संरक्षण होते.

८. नामस्मरणाने येणार संकट टळते.

९. नामस्मरणाने सांसारिक अडचणी दूर होतात.

१०. नामस्मरणाने परमेश्वर प्राप्तीचा योग निश्चित येतो.  

       एक नाम तारी बाकी सब दुकानदारी ह्या म्हणीवरुनच नामस्मरणाचे महत्त्व किती आहे ते लक्षात येते.

१. स्मरणामुळे परमेश्वराचा वेध (आवड) निर्माण होतो.

२. स्मरणामुळे ऐहिक व पारमार्थिक लाभ होतो.

३. स्मरणामुळे परमेश्वराशी नाते जुळते.

४. स्मरणामुळे मनाची एकाग्रता वाढून आत्मविश्वास वाढतो.

५. स्मरणामुळे दैवी गुण प्राप्त होतात योग्यता वाढते.

६. स्मरणामुळे मनाची शुध्दता होते.

७. स्मरणामुळे वेधबोध व परमेश्वर प्राप्ती होते.

       गृहस्थधर्मात असतांना सर्वांना एकदम विधीवत् स्मरण करणे जमत नसेल त्यांनी हळुहळू प्रयत्न करावा व कालांतराने विधीवत स्मरण करावेपण विधीवत स्मरण शक्य नाही म्हणून नामस्मरण करण्याचे सोडू नये. आपले नित्य कर्म आचरतांनाउठता बसता खाता पितांना व झोपतांना शक्य असेल तितके परमेश्वरास आठवावेपण रिकामा दिवस जाऊ देऊ नये. कारण जगात परमेश्वर दुर्लभ आहे त्याहिपेक्षा परमेश्वराला आठविणारा दुर्लभ आहे.

 

पारायण :

पारायण म्हणजे धार्मिक ग्रंथाचे वाचनपारायण हा विधी नित्य नियमाने व स्वतःच आचरावयाचा असतो अन्यथा इतरांना पारायण करण्यास सांगणे म्हणजे 'मोले आले रडाया। ना आसू ना माया ।।' अशी अवस्था होते.

 

पारायणाचे ग्रंथ :

श्रीमद्भगवद्गीता / सुत्रपाठसंकटहरण स्तोत्रश्रीदत्तात्रेय कवचनिर्वेद स्तोत्रइत्यादि

पारायणाची वेळ :- प्रातःकाळ.

पारायणाचे महत्त्व :- आत्मकल्याण,

पारायणाचा विधी :

१. प्रथम डोक्यावर टोपी/ रुमाल/वस्त्र ठेवावे.

२. उत्तराभिमुखी पाच दंडवते घालावीत.

३. एकाग्रतेने ग्रंथाचे पठणश्रवण करावे.

 

उपहार विधी :

१. उपहार(नैवद्य) दाखवितांना पाच दंडवते घालावीतकारण व्यवहारात सुध्दा एखाद्या व्यक्तिस जेऊ घालायचे असेल तर हात जोडून विनंती केल्याशिवाय ती व्यक्ति आमंत्रण स्वीकारीत नाही. इथे तर त्या परमपित्याला जेऊ घालायचे असते. मग त्यांना मनापासून प्रार्थना केल्याशिवाय ते आपले भोजन स्वीकारतील कांनुसते दंडवतच घालायचे नाही तर दुःखपूर्वक विनंती प्रार्थना करावी.

२. उपहार दाखवितांना हातावर पाणी घेवून संकल्प सोडावाकारण पाणी सोडणे म्हणजे त्या वस्तूवरील आपली सत्ता सोडणेपाणी सोडणे म्हणजे त्या वस्तूच्या मोबदल्यात काहीही अपेक्षा न करणेपाणी न सोडणे म्हणजे सत्ता न सोडणे म्हणून कोणतेही दान करतांना संकल्प सोडावा त्या शिवाय ते दान स्वीकारले असे होणार नाही. म्हणून उपहार अथवा दान क्रिया करतांना संकल्प सोडणे आवश्यक असते.

३. उपहार दाखवितांना पाच घास मोडावेकारण घास मोडून उपहार दाखविणे ही भावक्रिया आहे. घास मांडतांना सर्व अन्नपदार्थ एकत्र करुन उपहार दाखविला जातो.

४. सुतक काळात त्या घरचे अन्न घेऊ नयेकारण त्या काळात नामधारकानेउपदेशीभिक्षूकसाधूसंत यांनी अन्नपाणी ग्रहण केले तर ग्रहण करणाऱ्यास जाड्यत्व येते. म्हणजे योग्य विधी करण्यास कंटाळाआळस येतो व तो धर्मापासून दूर जातो.

५. सुतक काळात सर्वच भिक्षुक ग्रासग्रहण करीत नाहीकारण सुतक काळात अन्नपाणी ग्रहण केल्याने जाड्यत्व येते. त्यासाठी भिक्षुक ज्ञानी व जरठ असेल तर तो जाड्यत्वावर मात करु शकतो. शिवाय आपल्या शिष्याचे भले व्हावे! ह्या हेतूने ते ग्रास घेण्यास तयार होतात.

६. स्वतः न जाता फोन करुन इतर ठिकाणी ग्रास देता येतातकारण आपणास प्रत्यक्ष प्रत्येक ठिकाणी जाता येत नसेल तेव्हा फोनवर कळवून आश्रमात ग्रास देण्यास हरकत नसावी.

७. एकाच नैवद्यास अनेकांनी संकल्प सोडू नये. कारण एकदा दिलेले दान पुन्हा पुन्हा देता येत नाही. करीता स्थानावर किंवा कुठेही एकदा एका व्यक्तिने संकल्प सोडल्यावर इतर व्यक्तींनी संकल्प सोडू नये.

 

उपहार / नैवद्य विधी :

       दररोज स्वयंपाक झाल्यावर आपल्या घरातील देवपूजेसमोर उपहार नैवेद्य दाखवावा. त्यासाठी स्वच्छ व नियमीत ताटात एका व्यक्तिच्या आहाराइतके अन्न वाढावे. उपहाराचे ताट वेगळेच ठेवावेत्यात आपण जेऊ नयेसोबत एक ग्लासात शोधलेले स्वच्छ पाणी घ्यावे व उजव्या हाताने संकल्प सोडावा व प्रार्थना म्हणावी.

"मज अपवित्रताते पवित्र करुनमाझी क्रिया स्विकारात घ्यावीराजस तामस तथा अन्न याते अवलोकन करुन पवित्र करावे जी !” “हेसकळही देवाचे ! देव देईल ते माझे! हे सर्व कर्मधर्म श्रीकृष्णार्पण ! श्रीचक्रधरार्पण!" त्यानंतर पाच घास मोडावे व दंडवते घालून प्रार्थना करावी -

१. 'हेश्रीकृष्ण महाराजा ! ज्या प्रमाणे सुदाम देवाच्या पोह्यांचा स्वीकार केला. विदुराच्या कण्या स्वीकारल्या त्याप्रमाणे मज गरीबाची भाजी भाकरीचा स्वीकार करावाजी !'

२. 'हेश्रीदत्तात्रेय प्रभू महाराज ! ज्या प्रमाणे पांचाळेश्वर येथे भक्तांचा भोजनाचा स्विकार केला!तसे माझ्या गरीबाचा उपहार स्वीकार करावाजी !'

३. 'हे द्वारावतीच्या चांगदेव राऊळ महाराजा! जसे द्वारावतीला भक्तांचा भोजनाचा स्वीकार केला ब्राम्हणाचे सहस्र भोजन स्वीकारले तसा माझ्या गरीबाचा उपहार स्वीकार करावा जी!'

४. 'हे ऋध्दपूरीच्या श्रीगोविंदप्रभू बाबा! जसा महादाईसाच्या मांडे पुरीयाचा भोजनाचा स्वीकार केला. तसा माझ्या भाजी भाकरीचा स्वीकार करावा !'

५. 'हे श्रीचक्रधर स्वामी महाराजा ! जसा बाईसाच्या पाणी भाताचा स्वीकार केलासाधेच्या लाडूंचा स्वीकार केलाश्रीनागदेवाचार्यांचा भोजनाचा नित्य स्वीकार केला तसा माझ्या भोजनाचा स्वीकार करावा जी !'

पुढील नियमावली भाग तीन मध्ये वाचा

 भाग 003👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/12/03.html


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post