शंख वाजविण्या मागचे वैज्ञानिक रहस्य
शंख पाहिल्यानंतर सर्व प्रथम आपल्या डोळ्यांसमोर भगवान श्रीकृष्णांचा पांचजन्य शंख आणि अर्जुनाचा देवदत्त शंख उभा राहतो. एकूण शंख या वस्तूकडे चा पण अध्यात्मिक दृष्टीने पाहतो. शंख वाजवणे ही योगाची एक अद्भुत प्रक्रिया आहे.
शंख वाजवणे हा आरोग्यविषयक शास्त्राचा एक भाग आहे. शंख वाजवल्यामुळे शरीर निरोगी राहते आणि मन शांत राहते.
आपल्या हिंदू संस्कृतीत होऊन गेलेले महान ऋषी मुनी हे पराकोटीचे वैज्ञानिक आणि थोर मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रत्येकच विषय मानसशास्त्राचा आणि शरीर रचनेचा अभ्यास करूनच नमुद करून ठेवला आहे. त्यांनी शंख वाजवण्याचा संबंध पूजा-आरतीशी जोडला जेणेकरून आपण रोज धार्मिक विधी करत असताना शंख वाजविण्याच्या योगाच्या प्रक्रियेतून जावून अजाणतेपणे का होईना आरोग्य प्राप्त करू शकू.
नियमितपणे शंख वाजवल्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कधीही कमी होत नाही. आणि आपल्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढू लागते आणि फुफ्फुसातून कार्बनडाय ऑक्साईड हा विषारी वायू बाहेर येऊ लागतो.
जेव्हा आपण शंख वाजवण्यासाठी श्वास मध्ये घेतो, तेव्हा श्वास पुर्ण आत ओढून काही काळ थांबतो, त्या वेळी आपण योग साधनेतल्या कुंभक या प्राणायामाच्या अवस्थेत येतो, कुंभक म्हणजे श्वास आत कोंडून ठेवणे. कुंभक हा प्राणायाम आपल्याला आपोआप घडू लागतो. कुंभक प्राणायाम करताना आपला श्वास काही क्षणांसाठी थांबवून ठेवावा लागतो. नंतर आणि हळू हळू बाहेर सोडावा लागतो, या दरम्यान आपल्या श्वासाबरोबर जाणारा सर्व ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसांद्वारे रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात प्रवेश करू लागतो.
पुर्ण श्वास मध्ये घेतल्यानंतर आपण शंखनाद करू लागतो, तेव्हा हळूहळू आपला श्वास बाहेर जाऊ लागतो, आणि पोट संकुचित होऊ लागते आणि आपण आपोआप योग साधनेतल्या रेचक प्राणायामाच्या अवस्थेत येऊ लागते. उच्छवासानंतर पोट मध्ये जाऊन फुफ्फुसाच्या छिद्रांमध्ये भरलेले कार्बन-डाय ऑक्साईड फुफ्फुसांच्या पृष्ठभागावर येते आणि उच्छवासाने बाहेर जाते, ज्यामुळे आपले फुफ्फुसं शुद्ध होतात. म्हणजेच कुंभक प्राणायाम आपल्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवतो आणि रेचक प्राणायाम आपल्या फुफ्फुसातून कार्बन डाय ऑक्साईड काढून टाकतो.
आणि जेव्हा जेव्हा आपण शंख वाजवतो तेव्हा आपला श्वास हळूहळू बाहेर जाऊ लागतो आणि श्वास बाहेर येताच आपला गुदद्वार आतल्या बाजूने आकुंचन पावते आणि आपोआपच आपण मूलबंधाच्या प्रक्रियेचा एक भाग बनू लागतो. म्हणजेच आपली मूलबंध घडु लागते. मूलबंध ही प्रक्रिया घडत असताना गुदद्वार बंद होते आणि उर्जा वरच्या दिशेने वाहू लागते.
जेव्हा आपण शंख वाजवण्यासाठी श्वास घेतो, तेव्हा आपला श्वास आपल्या पोटापर्यंत जातो आणि श्वासाबरोबर येणारा प्रणवायू नाभीवर एकत्रित होऊ लागतो. आणि जेव्हा आपण शंख वाजवतो, श्वास बाहेर जाऊ लागतो आणि आपण रेचक प्रक्रियेत प्रवेश करतो, नंतर नाभी संकुचित होऊ लागते आणि नाभी संकुचित होताच, नाभीवर गोळा झालेला आपला सर्व प्राणवायू मणक्यातून वर येऊ लागतो. तोच प्राणवायू डोक्यात येऊन मेंदूत येतो आणि मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त ठरतो. म्हणजेच मेंदूच्या निर्जीव शिरा सक्रिय होऊ लागतात, त्यामुळे आपली विचार करण्याची शक्ती विकसित होते.
मित्रांनो! अशाप्रकारे शंखनाद ही प्रक्रिया आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. घसा, हृदय, पोट आणि गुदद्वाराशी संबंधित सर्व रोगांमध्ये शंखनाद फायदेशीर आहे. आणि या संस्थांशी संबंधित सर्व रोगांपासून आपण सुरक्षित राहतो.
शंख वाजवण्याची प्रक्रिया आपल्याला आपले शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवते व आपली अध्यात्माकडे वाटचाल करण्यासही मदत करते. जर आपण रोज सकाळी सूर्योदयापूर्वी अनाशा पोटी शंखनाद केला तर आपण निरोगी आणि आनंदी जीवनात प्रवेश करू शकू.