महानुभाव पंथिय ज्ञान सरिता
पविते पर्व - महानुभावपंथ सण - pavite parv mahanubhavpanth
पविते
पर्वाची विधी स्वामींच्या काळापासून महानुभाव
पंथात रूढ झाली परब्रम्ह परमेश्वर अवतार श्रीचक्रधर स्वामी बीड येथे असताना श्रावण
शुक्ल 14 या दिवशी महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य
श्रीनागदेवाचार्य
यांनी पान विडा जाणिवे वस्त्र अर्पण
केले. करंजखेड येथे तेराव्या
शतकात याच दिवशी इंद्रभटांनी
स्वामींना जाणवे समर्पण करून
पविते पर्वाची
विधी संपन्नता केली. त्यानंतर मेहकर,
पैठण, सिन्नर, डोमेग्राम व वृद्धासंगम
या गावी हा पविते पर्वाचा
विधी देवास अर्पण केला.
सारांश :- सुत म्हणजे धागा होय.
सुती धागा हा भारतीय
संस्कृतीत स्नेहवर्धक व स्नेहदर्शक
मांडलेला आहे. स्नेहाची पुढील
अवस्था म्हणजे प्रेम आपुलकी
होय.
हे स्नेह व प्रेम
व्यक्त करण्यास आधाराची नितांत
गरज आहे. त्याशिवाय ते
प्रेम परिपूर्ण नाही होऊ
शकत.
म्हणून आपण एखाद्याला प्रिय
व्यक्तीला फक्त भेटच नाही
तर एखादी वस्तू भेट
देऊन आपण ते प्रेम
व्यक्त करीत असतो सारांश
एवढाच की, आपणही देवाला
पविते अर्पण करीत
असताना त्या पवित्याला जो धागा म्हणजे सूत
बांधतो, तो जणूकाही देवाला आपण
त्या क्रियेतून जाणवून
देतो की, हे परमेश्वरा
! देवा
भक्ताचे हे नाते असेच अखंडितपणे
चिरकाल असुदे. रक्षाबंधनाच्या दिवशी
बहीण सुद्धा भावाला धागा
राखी बांधते ते तिच्या
रक्षणासाठीच अगदी तसेच भक्त
सुद्धा परमेश्वराला पवितेरूप धागा अर्पण
करून स्वतःच्या रक्षणाची अपेक्षा
परमेश्वराकडून तो करीत असतो.
महानुभावपंथांतील भक्तगण श्रावण शुद्ध चतुर्दशीला
देवाला पविते समर्पण करतात. श्रावण
शुध्द चतुर्दशीला देवाला
पविते समर्पित का करतात? तर याचे कारण
म्हणजे पूर्वीच्या काळी
पवित म्हणजे
जाणवे (जाणवे याला संस्कृत
मध्ये पवीत असे म्हणतात).
पूर्वीचे काळी श्रावण शुध्द चतुर्दशीला जन लोक ब्राम्हण मंडळीपविते पर्व साजरे करत असत. हे पविते परिधान करत असत. व सहा महिनेतून एकदा ते पविते बदलत असत आणि ते पवित बदलण्याचा सण म्हणजे पवितेपर्व असे म्हणतात. म्हणजे जुने पविते बदलून त्या ठिकाणी नवीन पविते परिधान करणे. पविते बदलण्याचा सण म्हणजे त्याला म्हणतात. पवितेपर्व मग ते पूजन आपल्या गुरूच्या ठिकाणी किंवा आपले जे आराध्य आहेत त्यांचे पूजन करत असत.
त्याकाळची बरीच ब्राह्मण मंडळी
सर्व प्रपंचाचा, संसाराचा त्याग
करून स्वामींच्या ठिकाणी
समर्पित झालेली होती. परंतु पवीत म्हणजे कर्म
कांडाचे सूत्र याआहे, बंधन आहे. पूर्वीचे
काळी मुंजीबंधन हा संस्कार
झाल्यानंतर कर्मकांडाचे जाणवे
गळ्यात घातले जात असे. म्हणजे
तो कर्मकांडाचा अधिकारी
बनला. आणि तिथून मग वेदांमध्ये सांगितलेल्या कर्माप्रमाणे त्याने
सर्व कर्म प्रणाली आचरण
करायची.
परंतु देवाने आपल्याला कर्मकांडाच्या
वेगळे व्हायला सांगितले आहे. म्हणून
आपण ते धारण करत
नाही. देवाने जीवाला कर्म
पराङ्गमुख व्हायला सांगितलं
म्हणजे कर्माच्या बंधनांमध्ये तुम्ही
बांधले जाऊ नका. कर्मकांड हे
जीवासाठी बंधनकारक आहे. इथे परमेश्वर
मार्गात सर्व निष्काम क्रिया
आहे.
कुठलीही अपेक्षा न ठेवता
निष्काम क्रिया परमेश्वराचे ठिकाण
करा साधनवंताचे ठिकाणी
करा.चतुर्वीध
साधकाच्या साधनाच्या ठिकाणी करा.
पविते पर्व आणि श्रीगुरु पुजन सोहळा 🥥
आध्यात्म परंपरेने समृध्द असणाऱ्या भारतीय संस्कृतीतनारळी पौर्णिमेला (पविते पर्व) हा सण
साजरा केला जात. परमेश्वर आणि श्रीगुरुवर यांना पविते आर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे. नारळ वृक्षाला कल्पवृक्ष असे संबोधले जाते. नारळ हे
जीव स्वरुपाचे प्रतिक आहे. आतून शुभ्र खोबरे
व बाहेरुन कठिण कवच. तसेच जीव स्वरुप हि शुभ्र स्पटीकाकार आहे. नारळातील पाणी म्हणजे अंतःकरणातील श्रध्दा आणि भावाचे
प्रतीक आहे.
नारळाच्या तीन शिरा या जीवाच्या ठिकाणी असलेल्या मतीत्रयाची
जाणीव करुण देतात.
तर नरळावरील तीन डोळे म्हणजे जीवाच्या ठायी असलेल्या ज्ञान. भक्ती. वैराग्य या
गुणांची ओळख दर्शवतात. एकुणच नारळ म्हणजे आपलं जीवन स्वरुप दोन्हि
बाजुला दोन सुपार्या म्हणजे गुरु व परमेश्वर यांच्या कुपकाटीचे आशिर्वादाचे रुपक दर्शवितात. त्यावर असणार सुत म्हणजे ईश्वर, गुरु, आणि जीव, यांच्यातील
स्नेहाची प्रेम रुपी गुंफण होय.
समर्पणाच्या भावनेने ओथंबलेला...... अतुट श्रद्धेने भीजलेला............
भक्तजनांनी स्वामींच्या ठिकाणी साजरे केलेले पविते पर्व
१) मेहकर
२) पैठण
३) सिन्नर
४) बीड
५) करंजखेड
६) डोमेग्राम
७) वृद्धासंगम
८) पैठण
पविते पर्व विशेष प्रश्नौत्तरे
पविते पर्व यावर प्रश्नावली
प्रश्न :- १) स्वामिंच्या सन्नीधानी भक्तजनांनी पविते पर्वकाळ कोण्या कोण्या गावी साजरा केला?
उत्तर :- बीड, मेहकर, पैठण, सिन्नर, करंजखेड, छिन्नस्थळी, पैठण वृद्धासंगम
येथे
प्रश्न :- २) लिळाचरीत्रात एकुन किती पर्वकाळाचा ऊल्लेख आलेला
आहे?
उत्तर :- तीन पर्व
१) पविते पर्व
२) दवना पर्व
३) सोमपर्व
प्रश्न :- ३) स्वामिंना पविते समर्पण करताना बीड या
स्थानी कोण कोण भक्तजन होते?
उत्तर :- बाइसा, चांगदेवभट, परसनायक,
उपाध्येबास, पद्मनाभीदेव.
प्रश्न :- ४) पविते पर्वाच्या काळात स्वामिंनी कोण्या भक्ताला मुख्य करुण
कोणता दृष्टांत सांगीतला?
उत्तर :- परसनायकाला
चांदोव्याचा दृष्टांत निरूपण केला.
प्रश्न :- ५) बीडला कोण्या देवतेच्या मंदिरात स्वामिंना भक्तजनांनी पविते
वाहिले?
उत्तर :- महालक्ष्मीच्या
देवळात
प्रश्न :- ६) पविते करायला लागणारे मुख्य साहित्य कोणते ते लिहा? व पविते पर्वाचे महत्व सांगा?
उत्तर :- सुत, नारळ, सुपारी
पविते पर्वाचा सोहळा बाराव्या शतकात आमच्या सर्वज्ञांना भक्तीजनांनी समर्पण केलेला आहे या पर्वाने स्वामिंच्या लिळांचे चिंतन, स्मरण, आठवण केल्या जातेगुरुविषयी आपुली भावना या पर्वाने व्यक्त करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न.
चला तर पविते पर्व साजरा करू या... पविते पर्वाच्या सर्व अच्युतगोत्रीयांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा... व सर्व अच्युतगोत्रीयांना प्रातःकालीन दंडवत प्रणाम...
आणखी महानुभाव पंथासंबंधित माहिती, इतिहास, कविता, ज्ञान इत्यादि संबंधीत पोस्ट पाहण्यासाठी https://knowledgepanditji.blogspot.com या संकेतस्थळावर क्लिक करा.
भक्तजनांनी केलेली रंगबीरंगी पविते