श्रीकृष्णस्मरणे सकळ पातकांचे भस्म

श्रीकृष्णस्मरणे सकळ पातकांचे भस्म

 


श्रीकृष्ण नामस्मरणे सकळ पातकांचे भस्म



छंद शिखरिणी 

अहो येता जाता, उठत बसता कार्य करिता ।

सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता ।।

घरी दारी शय्येवरि रतिसुखाचे अवसरी ।

समस्तांची लज्जा त्यजुनि भगवत् चिंतन करी ।।

अर्थ :- अहो देवाची अनन्य भक्ती करणाऱ्या साधकांनो, वासनिकांनो येताना, जाताना, उठताना, बसताना, काही कामकाज करताना, काही देताना, काही घेताना, जेवण करताना, झोपल्यावर घरात असो की घराबाहेर कुठेही असो, सकाळी, दुपारी संध्याकाळी, रात्री किंवा मध्यरात्री केव्हाही सर्व जगाची लज्जा सोडून, (लोक काय म्हणतील असा विचार न करून) श्रीकृष्ण भगवंतांचे स्मरण केल्याने मनुष्याची सर्व पापे लगेचच नष्ट होतात.

श्रीकृष्ण भगवंतांचे स्मरण इतके श्रेष्ठ आहे की त्या स्मरण करणाऱ्या साधकाला स्वर्गादि नाशिवंत सुखे अत्यंत तुच्छ वाटतात. त्याला वैकुंठपद, कैलास लोकातील सुख, प्रजापतीब्रम्हा पद इत्यादि सर्व देवतांची पदे व त्यामुळे होणारी सुखे क्षुल्लक वाटतात.


वासुदेवे मनो यस्यजपहोमार्चनादिषु ।

तस्यान्तरायो मैत्रेय देवेन्द्रत्वादिकं फलम् ॥

  (विष्णुपुराण २.६.४३ )

हे मैत्रेयी!  नाम जप, वैराग्यरूपी अग्नित दश इंद्रियांचे हवन, होम आणि पूजा अर्चनादि करताना ज्याचे मन सतत भगवान श्रीकृष्णाच्या स्मरणात गुंतलेले असते, त्याच्यासाठी इंद्रपद, सत्य कैलास, वैकुंठ इत्यादि फळे विघ्नरूप असतात. 


क्व नाकपृष्ठगमनं पुनरावृत्तिलक्षणम् ।

क्व जपो वासुदेवेति मुक्तिबीजमनुत्तमम् ॥

 (विष्णुपुराण २.६.४४ )


पुनर्जन्माच्या चक्रात पुन्हा ढकलणाऱ्या स्वर्ग, सत्य कैलास वैकुंठादि पदे कुठे! (अर्थात अत्यंत हीन) आणि  'वासुदेव श्रीकृष्णांच्या' नामाचा जप करणारे कायमस्वरूपी मोक्षाचे श्रेष्ठ बीज कुठे! (अर्थात सर्वश्रेष्ठ) 

सत्य कैलास वैकुंठ आदि मुक्ति या नित्य मुक्ती नाहीत याची अनेक उदाहरणे पुराण ग्रंथांमध्ये सापडतात. विष्णूचे द्वारपाल जय-विजय यांना सनकादिक ऋषींनी शाप दिला ही घटना तर पुराण-प्रसिद्ध आहे अर्थात विष्णू लोक ही नित्य मोक्ष देणारा नाही तिथूनही पडावे लागते.


ये पूर्वं देवा ऋषयश्च तं विदुः । ( श्वेता० उपनिषद् ५.६ )

प्राचीन काळात ज्याच्या तत्त्व विविध पुरुषांनी श्रीकृष्ण भगवंतांचे नाम जाणून घेतले ते ते या संसार बंधनापासून मुक्त होऊन त्या श्रीकृष्ण भगवंतांच्या पदी लीन झाले.

प्रायश्चित्तान्यशेषाणि तपःकर्मत्मकानि वै ।

यानि तेषाणशेषाणां कृष्णानुस्मरणम्परम् ॥

 (विष्णुपुराण २.६.३९ )

जितके ही तपरूप आणि कर्मरूप प्रायश्चित्त आहेत त्या सर्वांमध्ये श्रीकृष्ण भगवंतांचे नामस्मरण, लीळा स्मरण हे सर्व श्रेष्ठ आहे.


कृते पापेऽनुतापो वै यस्य पुंसः प्रजायते ।

प्रायश्चित्तं तु तस्यैकं हरिसंस्मरणं परम् ॥ (विष्णुपुराण २.६.४० )

कोणतेही लहान मोठे पापकर्म केल्यानंतर ज्याच्या मनात पश्चात्ताप होतो, त्याच्यासाठी प्रायश्चिताची तरतूद आहे.  पण एकट्या श्रीकृष्ण भगवंतांचे हे नामस्मरण हेच परम प्रायश्चित्त आहे.




Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post