वैद्यकीय संस्कृत सुभाषित साहित्य
Vaidya Sanskrit subhashit sahitya aayurved
आयुर्वेद ऋग्वेदाचा उपवेद आहे. आयुर्वेद ही निसर्गाची आणि मनुष्याच्या निरामय जीवनाची अतिशय पुरातन भारतीय पद्धति आहे । आयुर्वेद हा संस्कृतच्या दोन धातुंनी बनलेला आहे. आयुः + वेद "आयु " अर्थात दिर्घायुष्य (निरामय जीवन) आणि "वेद" अर्थात त्याविषयीचे ज्ञान ज्या शास्त्रात आहे त्याला आयुर्वेद असे म्हणावे.
आयुर्वेद वैद्यकीय सुभाषित
समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः ।
प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थ इत्यभिधीयते ॥
मराठी भावार्थ :- ज्या मनुष्याचे दोष वात, पित्त आणि कफ, अग्नि (जठराग्नि), रस आदि सात धातू, समस्थितीत स्थिर राहतात, मलमूत्र आदि क्रिया योग्य वेळेत होतात आणि शरीराची सर्व क्रिया समान आणि योग्यस्थीतीत आहे. आणि ते मन इन्द्रिये तुष्ट आहेत आणि आत्मा प्रसन्न आहे तो मनुष्य स्वस्थ आहे.
आयुर्वेदाचा उद्देशच हा आहे की, मनुष्याच्या
स्वास्थ्य आणि आरोग्याचे रक्षण करणे आणि रोग दूर करणे
प्रयोजनं चास्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणं आतुरस्यविकारप्रशमनं च ॥
–(चरकसंहिता, सूत्रस्थान ३०/२६)
आयुर्वेदाचे दोन उद्देश आहेत
(१) निरोगी व्यक्तींच्या आरोग्याचे रक्षण करणे
(२) आजारी (अतुर) व्यक्तींचे विकार दूर करून त्यांना निरोगी बनवणे.
आयुर्वेद कशाला म्हणावे?
हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम् ।
मानं च तच्च यत्रोक्तमायुर्वेदः स उच्यते ।।१।। (चरक)
मनुष्याचे आयुष्य हे चार प्रकारचे असते.
१) हितकर, २) अहितकर, ३) सुखकर, ४) दु:खकर. निरामय आयुष्यासाठी सुखकर आणि दुःख कर हितकर अहितकर याचा नेमका अर्थ काय? हे सर्व सुस्थितीत असल्यावर आयुष्य किती असते? याचे सर्व विवरण ज्या शास्त्रात सांगितलेले आहे त्या शास्त्राला आयुर्वेद असे म्हणतात.
२) कायवाग्बुद्धिविषया ये मलाः समुपस्थिताः ।
चिकित्सालक्षणाध्यात्मशास्त्रैस्तेषां विशुद्धयः ।। (वाक्यपदीय) चिकित्साशास्त्र-
शरीर, भाषा आणि बुद्धि या संदर्भात जे दोष उत्पन्न होतात, ते दोष निवारण्यासाठी चिकित्साशास्त्र, व्याकरणशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र उपयुक्त ठरते. चिकित्सा शास्त्राने शरीर निरोगी बनते व्याकरण शास्त्राने भाषा शुद्ध होते आणि अध्यात्म शास्त्राने बुद्धी चित्त शुद्धी होते.
(३) सद्यः फलति गांधर्व, मासमेकं पुराणकम् ।
वेदाः फलन्ति कालेषु, ज्योतिर्वैद्यो निरन्तरम् ।।
वैद्यकशास्त्र हे सर्वकाळ फळ देणारे आहे. गायन कलेचे फळ तत्काळ मिळते पुराण वाचण्याचे फळ एका महिन्यात मिळते वेदांचे फळ दीर्घकाळ असते परंतु ज्योतिष आणि वैद्यक हे सर्व काळ फळ देतात.
(४) अन्यानि शास्त्राणि विनोदमात्रं
प्राप्तेषु वा तेषु न तैश्च किञ्चित् ।
चिकित्सितज्यौतिषमन्त्रवादाः
पदे पदे प्रत्ययमावहन्ति ।।
(कल्पतरु)
वैद्यक शास्त्र हे अति उपयुक्त आहे हे इतर शास्त्रे मनोरंजनासाठी अभ्यासले जातात ते शास्त्र अभ्यासले किंवा न अभ्यासले तरी काही विशेष फरक पडत नाही परंतु वैद्यकशास्त्र अभ्यास असल्याने खूप फायदा होतो.
(५) एक शास्त्र वैद्यमध्यात्मकं वा
सौख्यं चैकं यत्सुखं वा तपं वा ।
वन्द्यश्चैको भूपतिर्वा यतिर्वा
ह्येकं कर्म श्रेयसं वा यशो वा ।।
(हारीतसंहिता)
वैद्यक की एकमेवाद्वितीयता-
एकच शास्त्र आहे, वैद्यक किंवा त्यात अध्यात्मिक ज्ञान सांगितलेली आहे अशी श्रीमद्भगवद्गीता ; सौख्य एकच आहे, आरोग्य किंवा तपस्या; वंद्य एकच आहे, राजा किंवा यती आणि कर्म एकच आहे, श्रेय (परमेश्वराने सांगितलेला आचार, कर्म) किंवा यश - सद्गुणांमुळे झालेली कीर्ती हे कर्म).
(६) यस्मिन् ज्ञाते सर्वमिदं ज्ञातं भवति निश्चितम् ।
तस्मिन् परिश्रमः कार्यः, किमन्यच्छास्त्रभाषितम् ।।
(शिवसंहिता)
जे जाणून घेतल्याने निश्चित रूप फळ मिळते तेच शास्त्र अभ्यासावे. इतर शास्त्रे अभ्यास असण्याचे काय कारण? इतर शास्त्र अभ्यासण्याची काही गरज नाही. म्हणून निरामय आयुष्यासाठी वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास अवश्य केलाच पाहिजे.