आचार्य श्रीमोठेबाबाजी अंकुळनेरकर अल्प परिचय संस्थापक, संचालक श्रीदेवदत्त आश्रम जाधववाडी पुणे - shreemothebabaji devdatt ashram jadhavwadi

आचार्य श्रीमोठेबाबाजी अंकुळनेरकर अल्प परिचय संस्थापक, संचालक श्रीदेवदत्त आश्रम जाधववाडी पुणे - shreemothebabaji devdatt ashram jadhavwadi

प.पु.प.म. आचार्यप्रवर, ईश्वराधिष्ठीत अधिकरण, सर्वविद अनंत श्री विभुषित, ब्रम्हविद्येचे भांडार, प्रज्ञासूर्य, ज्ञानार्णव, गुणरत्नाकर, आचार्य श्रीमोठेबाबाजी अंकुळनेरकर संस्थापक, संचालक श्रीदेवदत्त आश्रम जाधववाडी पुणे 

श्रीगुरु अल्प परिचय--

पूर्ण परमार्गाचे आधारस्तंभ अशा परम पूज्य परमं महंत श्री बाबांचा जन्म २ जानेवारी १९४३ रोजी मार्गशीर्ष वद्य एकादशीला झाला त्यांचे जन्मगाव कुडावद हे गाव शहादा तालुक्यात येते तेव्हा धुळे जिल्ह्यात होते आता नंदुरबार जिल्ह्यात आहे तेव्हा या भागाला खानदेश म्हणायचे हा भाग दोन जिल्ह्यात विभागला होता धुळे जिल्हा म्हणजे पश्चिम खानदेश आणि जळगाव जिल्हा म्हणजे पूर्व खांदेश. 

श्रीमोठेबाबांच्या देहाच्या वडिलांचे नाव सोमजीभाई आणि आईचे नाव काशीबाई बाबांना आणखी चार भाऊ आणि दोन बहिणी तेव्हा मुलांची नावे धार्मिक ठेवण्याची पद्धत होती बाबांचे जन्म पत्रिकेत न या अक्षरावरून नाव ठेवायचे होते म्हणून नारायण नाव ठेवले होते इतर भावांची नावे भगवान, रघुनाथ, जगन्नाथ, अर्जुन आणि बहिणीची नावे लिलाबाई देवाबाई. 

श्रीमोठेबाबांचे आपल्या भावांशी स्नेह होते. श्रीमोठेबाबांचे प्राथमिक म्हणजेच चौथा वर्गापर्यंत शिक्षण कवठळ गावातच झाले रमाकांत उपासनी हे शिक्षक होते बाबा शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जाते वर्गात बहुदा एक नंबर असायचा पुढे पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण मामाच्या कुढावत या गावी झाले कुढावदला चौथा वर्गापर्यंत दुसऱ्या एका विद्यार्थ्याची हुशार म्हणून ख्याती होती पण बाबा आले आणि सर्व चित्र पालटले. 

श्रीमोठेबाबांची प्रज्ञा असाधारण काही आगळीच ते बालपणातच आपल्या हुशार व असामान्य बुद्धीमत्तेने सर्वांच्याच नजरेत भरले शिक्षण सर्व मराठीतच झाले त्यामुळे तेव्हा आणि पुढेही ब्रह्मविद्येच्या अभ्यासात मातृभाषेचा प्रश्न कधी आला नाही पाचव्या वर्गापासून संस्कृत भाषेची आवड निर्माण झाली. गणेश एकनाथ शास्त्री नावाचे संस्कृत शिक्षक होते ते संस्कृत मध्ये भाषणपण करत.  श्रीमोठेबाबांना मात्र आठव्या वर्गापासून संस्कृत शिकायला मिळाले  ते दिवस एका दृष्टीने खुपच रम्य होते. 

पाचव्या वर्गापासून संस्कृत भाषेची आवड असल्याने  श्रीमोठेबाबा तेव्हापासूनच  श्रावण महिन्यात गावातील म्हातार्‍या बायांना शिवलीलामृत ग्रंथ पोथी सांगू लागले. बाया कर्मठ शिवभक्त त्यामुळे बाबा ती पोथी वाचून दाखवत. श्रीमोठेबाबांची सांगण्याची हातोटीही चांगली होती हे सगळे पाहिले, ऐकले म्हणजे वाटते मुलांचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण खोटी नाही. 

संस्कृतवर प्रभुत्व तीक्ष्ण प्रज्ञा,  हुशारी भरपूर सामान्य ज्ञान पाठांतर अपाट वाचन तीव्र  स्मरण ,भक्ती आणि मुख्य म्हणजे निरूपणाची उत्कृष्ट शैली आता श्रीमोठेबाबांमध्ये उपजत असणारे गुण बालवयातच प्रकट होऊ लागले होते असे म्हणावे लागेल. शाळेत बाबा मुलांबरोबर सहलीला जायचे. महानुभाव पंथाचा उपदेश नव्हता त्यामुळे अन्य ठिकाणी जायचे. पण श्रीमोठे बाबांची देवता तीर्थांवर आधीच बुद्धी नव्हती. बाबांना पुस्तके वाचण्याची प्रचंड आवड आहे. वाचनाच्या आवडीमुळे श्रीबाबांनी अन्य धार्मिक ग्रंथांचे वाचन केले. 

श्रीधर कवीचा हरिविजय शिवलीलामृत राम विजय भक्ती विजय वगैरे त्या लहानशा गावात ग्रंथालय वगैरे काही नव्हते इतरते सुशिक्षित लोक होते त्यांच्या जवळ पुस्तके असायची. ती सर्व पुस्तके बाबांनी लहानपणीच वाचून काढली होती. श्रीमोठेबाबा जुणी संस्कृत नाटकेही वाचत दयानंद सरस्वतीचा सत्तार्थ प्रकाश या बंगाली ग्रंथाचे मराठी भाषांतर बाबा वाचायचे. 

श्रीमोठेबाबांचे देहाचे वडील उपदेशी असल्याने घरात पंथीय ग्रंथ होते बाबांनी जे लीळाचरित्र वाचले ते हरिभाऊ नेणे यांनी संपादित केले होते त्यांच्या मागे पुढे काहीच मजकूर न होता एकदम प्रारंभ खडकुलिए अवस्थान असाच होता बाबांना वाटले हे काही विवेकानंदाचे पुस्तक असावे. त्यांच्यात कोणीतरी लीळा नामक होऊन गेले असेल व त्यांचे चरित्र असेल खरं काय ते पुढे कळलं बाबांच्या देहाच्या वडिलांचा परमपूज्य परमं महंत श्री लासुलकर बाबांचा उपदेश होता. 

देहाचे वडिल उपदेशी असुन  ते थोडेसे वेदांती होते पण कट्टर वेदान्ती नव्हते. नंतर मात्र महानुभाव पंथाकडे दृढ झाले आधी अन्यकिर्तन वगैरे करायचे पण नंतर श्रीमोठेबाबांचे गुरु परम पुज्य परम महंत श्रीअंकुळनेरकर बाबा गावात आले. श्रीअंकुळनेरकर बाबांना आणले टाकळीच्या दादांनी (कै. श्री. विद्याधर दादा पंजाबी)  ते पोथी करायचे वडिलांना ते पटू लागले गुरुबाबा आल्यानंतर श्रीमोठेबाबांच्या वाचनात कोलतेचे महानुभाव तत्वज्ञान पुस्तक आले त्याबरोबर त्यांनी म. दत्तलक्षराज यांचे हे  पुस्तकेही वाचली. 

कुढावद या गावा काही अन्य संन्याशी देखील येत. लहानपणी श्रीमोठेबाबांना त्यांचे आकर्षण वाटेल त्यांचा वेश त्याची वीरक्त वृत्ती त्याची स्वातंत्र्य पाहून आपणही यांच्यासारखे व्हावे असे. श्रीमोठेबाबांच्या  उल्लेख होत असत असे बाबा प्राजळपणे कबूल करतात एकदा एक संन्याशी बी. ए. झालेला होता त्यांनी मौन धारण केलेले होते त्या संन्यासाची खूप ओढ वाटली पण लवकरच ते आकर्षण संपले श्रीमोठेबाबा असं काही मुले त्याच्याजवळ गेली तेव्हा त्यांनी कोळशांनी लिहून दाखवले “मौन है” बीए हे त्यावेळी फारच मोठी पदवी होती. 

श्रीमोठेबाबा पाचवी ते सातवी पर्यंत कुढावदला मामाकडे शिकले श्रीमोठे बाबांनी त्यांनी पुढे शिकावं असे घरच्यांना वाटत होते पण घरची परिस्थिती बेतास बात होती मामांनी पण आग्रह केला ते म्हणाले करू काहीतरी सोय बाबांनी पुढे शिक्षण शहाद्याला घेतले साडे सतरा वर्षाचे असताना मॅट्रिक झाले अकरावीची परीक्षा दिली पण पुढे महाविद्यालय शिक्षण घेतले नाही बाबांचा वाचन करता करता महानुभाव पंथाबद्दल जिज्ञासा जागृत झाली हे काहीतरी वेगळे आहेत महानुभाव तत्वाने पुस्तक वाचत असताना त्यातील सृष्टी रचनेचा हेतू हे प्रकरण बाबांना खूपच आवडले. 

सृष्टीरचनेविषयी असे स्पष्टीकरण यत्रात कोठेही दिलेली नव्हते इतरही पुस्तक वाचताना संदर्भ महानुभातत्व दान पहा असे उल्लेख असायचे बाबांनी वयाच्या 19व्या वर्षी उपदेश घेतला ते साल होते 1962 ऑक्टोबर महिना होता दिवस होता महानवमीचा. खांडेनवमीच्या दिवशी कवठळ गावात परमपूज्य परम महंत श्रीअंकुळनेकर बाबा होतेच त्यांचाच उपदेश घेतला. 

त्यावेळी सर्विस चालू होती पतपेढी वरची पुस्तकांची आवड मात्र फारच होते. श्रीमोठेबाबांनी टाकळीच्या दादांना गाठले व म्हणाले की मला माहानुभाव पंथ महानुभाव तत्वज्ञान हि पुस्तके पाहिजेत मुख्य म्हणजे श्रीउद्धवगीता गीता कारण कोलतेचा ग्रंथांमध्ये श्री उध्दव गीतेतील बरीच अवतराने असतात आणि ते बाबांना फार आवडत टाकळीचे दादा म्हणाले होते की हे पुस्तके आम्ही उपदेश घेतला शिव्या देत नाही उपदेश तर घ्यायचाच होता  घेणारा म्हणजे घेणारच. 

दादांनी गुरुबाबांना विचारले ते म्हणाले घेईल हा उपदेश पुस्तक घेऊन टाका त्याला माहानूभावतत्व ज्ञान या पुस्तकाची भाषा तशी सरळ असल्याने कळयला अडचण आली नाही गुरुबाबांनी विचारले केव्हा घेता उपद्देश बाबा म्हणाले आताच द्या त्या दिवशी दसऱ्याच्या  विजनाला सारे उपदेशी गावाबाहेर गेले होते तेव्हा उपदेश घेतला गुरुबाबा म्हणाले असे नुसते वाचन नाही आधी घोक (पाठांतर) सुरू करा आणि मग कितीही प्रश्न विचारा बाबांनी तेही केले. 

श्रीमोठेबाबांनी उपदेश घेतल्यानंतर पहिले स्थान बीड पंचाळेश्वर केले उपदेश घेतल्यापासून बाबा आणि परमपूज्य परम महंत श्री भोजने बाबांकडून आचार स्थळ पण ऐकले होते भोजेने बाबांचा मार्ग पण कवठ्याला होता त्या मार्गातील एक भिक्षुक लखेराज दादा त्यांचे नाव इतर भिक्षुकापेक्षा वेगळे  होते बिन बाह्याची अंगी एक उपरणे डोक्यावर टोपी आकोट पदर असा त्यांचा वेश ते भिक्षा करायचे. 

त्यांच्याकडे पाहून श्रीमोठेबाबा टाकळीच्या बाबांना म्हणाले “हा महात्मावेश वाटतो येथे अशी भिक्षा करायची आहे असे अटनादी विधी करावले जात असतील त्या मार्गात आपल्याला जायचे आहे” बहुदा सर्वज्ञ स्वामी या जीवांची वाटच बघत असावेत एका क्षणी मनाचा निर्धार पक्का झाला घर सोडायचे ठरवले आपल्याला दीक्षा अनुसरण घ्यायचे असे श्रीमोठेबाबांनी टाकळीच्या दादांना सांगितले भोजने बाबांच्या मार्गातील त्या भिक्षुकाकडे पाहून बाबा दादांना म्हणाले होते की अशा मार्गात आपल्याला जायचे आहे. 

दादांनी सांगितले की ते भिक्षुक आजोबा जवळ राहिले आहेत मोठेबाबांनी म्हटल्यामुळे दादांनी श्रीमोठेबाबांना आजोबाच्या मार्गात पंचाळेश्वरला पाठवायचे ठरवले बाबाचा मुळातच असा चर्येवर, वैराग्यावर भर होता देवाने जशी विधी सांगितली तसे करायलाच हवेत देवाने सांगितले कशाकरता त्यानुसार आचार व्हायलास हवा. मनाची तयारी झाल्यानंतर बाबा उपदेश  घेतला पासून बरोबर एक वर्षाने म्हणजेच खांडे नवमीला घरून निघून गेले. मलवत् त्याग केला. 

ती तारीख होती 2 ऑक्टोंबर 1963 त्या दिवशी दसरा होता आणि गांधी जयंती घरून निघताना तर एकटेच निघायचे होते  श्रीमोठेबाबांच्या घरच्यांना काही वाटले नाही कारण हा नेहमी एकटाच जातो हे त्यांना माहीत होते घरून निघाले तेव्हा  गुरुबाबांनी आशीर्वाद दिले होते त्यांचे मार्गदर्शन आणि शुभचिंतनी होते त्यांनी पंचाळेश्वर जयाला सांगितले होते त्यानुसार मंजल दरमंजल करीत आपेगाव पर्यंत तर पोहोचले. 

पुढे नदी फार पलीकडे जायचे होते पण नदीला पाणी खूप होते होते पोहता येत नव्हते आता काय करायचे श्रीमोठेबाबा विचारात पडले अकरा वाजले होते तिकडे आजोबांनी परमपूज्य परम महंत श्रीऋषिराज बाबा दर्यापूरकर पहाटेच सुचिक पडले आधीच सूचना मिळाली की कोणीतरी येत आहे त्यांनी एका भिक्षुकाला  पाठवले. 

परम पुज्य परम महंत श्री राक्षस भुवनकर बाबांची बंधू ई. श्री बापू दा पंडित होते त्यांनी सांगितले की नदी काठावर जा एक वासनिक येत आहे  रस्ता सांग इकडे ये मग ते भिक्षुक आले टेकाङावर उभे राहिले त्यांनी बाबांना व दादांना अंदाजाने ओळखले व या दोघांनी त्या भिक्षुकाला ओळखले अन त्या भिक्षुकांने खून करून इकडून या असे सांगितले येथे पाण्याची पातळी कमी होते तेथून येऊन बाबा अलीकडच्या काठावर आले त्यावेळी आत्मतीर्थसुद्धा पाण्याखालीच होते अखेर बाबा पंचाळेश्वरला पोहोचले.  

त्यावेळी दुपारचे बारा वाजून गेले होते नंतर उपहार होवून आजोबांचे जेवण झाले होते बाबा गेले दंडवत केला घरून निघताना गुरुबाबांनी आजोबांसाठी चिठ्ठी दिली होती गुरुबाबांचा आणि आजोबांचा चांगला स्नेह होता. सोबत आलेल्या सुखदेव दादांनी ते चिठ्ठी आजोबांनी दिली त्यांनी ती वाचली चिठ्ठीत लिहिले होते की यांना कोणत्याही प्रकारचे बंधन नाही ते म्हणतील तेव्हा त्यांना दीक्षा द्यावी. 

चिठ्ठी वाचल्यावर आजोबा म्हणाले बरे जा जेवण करा आणि गुफेंत स्मरण करीत बसा आजोबांनी जास्त काही विचारलं नाही एवढेच मात्र विचारले "अनुसरल्याने काय होईल?” श्रीमोठेबाबा उत्तरले “देव होईल” त्यावर आजोबा काही बोलले नाही पण एवढे मात्र म्हणाले की इतक्या लवकर लगेच आम्ही दीक्षा देत नसतो त्याचीही बरोबर होते पारखुन घेतल्याशिवाय दीक्षा देणे त्यांना उचित नसावे आजोबांनी सांगितल्या नुसार बाबा गुंफेत जाऊन स्मरण करीत बसले. 

केव्हा होईल दीक्षा किती काळ प्रतीक्षा करावी लागेल अशी मनात खूप उत्कंठा होती पण फार काळ प्रतीक्षा करावी लागलीच नाही तीन वाजता आजोबाने बोलावले आले आणि दीक्षा झाली सुद्धा परमपूज्य श्रीवाल्हेराजबाबांनी कात्री लावली  गुंफेत स्मरण करीत बसले होते त्यावेळी देवाचे अवस्थान होते तेथे त्यांचे प्रत्यंतर लगेच आले आजोबांना  बाबा दीक्षेयोग्य वाटले  त्याआधी आजोबांबद्दल  काही लोकांचे वेगळे मन बाबांच्या कानावर आले होते 

दिक्षा लवकर होणार नाही सहा महिने वाट पाहावी लागेल ते शास्त्र हे कोणाला लवकर सांगत नाही परीक्षा घेतात फार कडक आहे वगैरे या शास्त्र संकेत आहे या संकेताकडे दुर्लक्ष करून पटकन शास्त्र कथण करणारे अनेक असतील आजोबा त्यातील नव्हते आजोबाच्या त्या काळातील प्रभाव जाणून आचारनिष्ठा जाणून  अनेकांनी असे तर्क केले होते पण त्याच दिवशी दुपारी ३ वाजता दीक्षा झाली केवढा अपूर्व योगायोग इतक्या अल्पकाळात दीक्षा झाल्याचे उदाहरण  क्वचित सापडेल बाबांच्या आधीपासून आजोबा जवळ मोहन नावाचा मुलगा सहा महिन्यापासून जात होता पण त्यालाही आजोबांनी  दिक्षा दिली नव्हती बारा वाजता बाबा आले आणि तीन वाजता दीक्षा झाली आजोबांना बाबांमधील  तळमळ जाणवली असावी देवाने प्रार्थना लगेच ऐकली 1963 साली. 

ऑक्टोबर ते एप्रिल या महिन्याच्या काळात बाबा बहुतेक सलग पंचाळेश्वरलाच  होते तिथले दिनचर्या ठरवून घेतली होती पहाटे उठून स्मरण करायचे मग स्थान नमस्कार करायची आजोबांचे (श्रीऋषिराजबाबाजी) प्रातर्विधी मुखमार्जनादी आटपले की मार्गातून दूध येई दुध घेतले की आजोबांची पटकर गवसणी उचलायची आणि पंचाळेश्वराच्या नैऋत्येला एक कडुलिंबाचे झाड होते.  त्या झाडाखाली विजनाला जायचे तेथून आले की मग भिक्षा दुपारचे जेवण गुंफेत होई नंतर आजोबा (श्रीऋषिराजबाबाजी) अडीच ते तीन या काळात पोथी सांगत. पोथीच्या चार साडेचार पर्यंत चाले. 

नंतर पुन्हा विजन संध्याकाळी श्रीगुर्जर बाबांच्या मठात देवपूजा होई निद्रा मठात किंवा गुंफेत श्रीदत्तात्रेय प्रभूंचा नित्यवास असलेल्या त्या पवित्र पंचाळेश्वरला  फार फार प्रसन्न वाटत असे बाबा नवसारीच्या मार्गात सुमारे आठ वर्ष राहिले. आजोबाच्या सेवेत बाबांचा काळ  गेला. सेवेत चुकल्यामुळे शिष्य आपण याचे प्रसंगी आले श्रीमोठेबाबांना पहिल्यापासून वेरूळचे आकर्षण होते. 

एकांकी भ्रमणात काळातील बाबा वेरूळच्या गुंफामध्ये बसून अभ्यास मनन चिंतन करीत होते इतके आकर्षण वाटल्याचे  कारण म्हणजे वेरुळचे स्थाने अगदी जशीच्या तशी काहीबदल न झालेली अशी आहेत मढपिंपरी आणि वाघळीचीही अशी स्थानी आहेत बाबांनी अशा स्थानाची यादी तयार केली पण इतर स्थानि काही एक उपद्रव वेरुळला मात्र काहीच उपद्रव नव्हता. पण वेरूळची स्थाने नमस्कार करण्याची परंपर खुखुप वर्षापासून मोडली होती. स्थाने होती पण कुठे नमस्कार करावा हे ज्ञान पंथात कुणालाही नव्हते. श्रीमोठेबाबांनी वेरुळला राहून स्थानपोथीवर सुक्ष्म संशोधन करून वेरुळ लेणी मधली सगळी स्थाने शोधून काढली. ती सर्व स्थाने आता महानुभाव पंथ नमस्कार करीत आहे. 

आज जाधववाडी येथिल श्रीदेवदत्त आश्रम हजारो महानुभावचा  आकर्षण केंद्र झाला आहे या ठिकाणी बाबाचा मुक्काम फक्त मे ते ऑक्टोबर असा पाच महिन्यात असतो. बाकी सात महिने निरनिराळ्या ठिकाणी मार्गसहित चातुर्मास संपवून १५ मे रोजी  जाधववाडीला यायचे आणि पुन्हा दसऱ्याला निघायचे हा गेला अनेक वर्षापासून क्रम आहे. चातुर्मासासाठी पुढच्या तीन तीन वर्षाची आमंत्रणे आधीच आलेली असतात बाबांनी आपल्या गावी यावे म्हणून त्याच्या गावाच्या उपदेशानी आधीच दंडवत घातले असतात. 

श्रीमोठेबाबांचा मुक्काम येथे असताना संत महंत भिक्षु वासनिक गृहस्थ यांची सतत वर्दळ चालू असते भेटायला येतात अर्थात बाबा कुठलाही गावी असेल तरी असेच चित्र असते नुसती रीघ लागलेली असते गाड्यासाठी जागा पुरत नाही तथापि जाधववाडी हे मुख्यालय म्हणावे लागेल. भव्यदिव्य असा आश्रम तिथे संपूर्ण महानुभाव पंथातील भिक्षुक वासनिकांसाठी माहेरघरच म्हणावा लागेल. हजारो भिक्षु महात्मे आणि तपस्वीनि आईं देवाने निरूपिलेल्या असतिपरी प्रमाणे आचरण करीत कैवल्य मार्गावर चालत आहेत. 

   श्रीदत्तमंदिर केर्‍हाळे बु. 

 दंडवत प्रणाम

अनिल पाटील

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post