।। श्रीकृष्ण वंदे ।।
एक महानुभाव आचार विचार --
उपदेशी गावा गावातून विश्वकल्याण महानुभाव संस्कार केंद्र स्थापन व्हाव. अध्यक्ष व कार्यकारीणी स्थापन करणे कायमस्वरूपी संस्कार केंद्र बांधने घरातील सर्व सदस्य संस्कार केंद्रात उपस्थित रहावी
प्रमुख उद्देश =
(1) पंचकृष्णाची ओळख करुन घेणे.
(2) सायंकाळ देवपूजा पुजावसर आरती नियमित करणे
(३) गीता पारायण करणे पारायण
शिकणे
(४) लीळाचरित्र वाचन करणे.
(५) योगा प्राणायाम शिबीर घेणे
(६) प्रसाद वंदन करणे .
(७) पंचकृष्ण कथामृत लावणे.
(८) भजन संध्या आयोजित करणे ऐकणे
(९) महिन्याला किर्तनाचे आयोजन करणे
(१०) महिन्याला व्याख्यान ठेवणे.
(११) वर्षातून एकदा साधूसंताचा सत्संग मेळावा आयोजित करणे
(१२) श्रीपंचकृष्ण जन्मोत्सव साजरा करणे.
(१३) श्रीपंचकृष्ण (पंचावतार) उपहार आयोजित करणे
(१४) आपसात आपुलकीची भावना निर्माण करणे.
(१५) स्थान दर्शनासाठी कुटुंबाचाबारी प्रमाणे नंबर लावणे. अर्थ सहाय्य करणे.
(१६) पोथी कार्यक्रमास उपस्थितराहणे.
(१७) गावातून एकसंघता निर्माण करणे .
(१८) महानुभाव तत्वज्ञान समजावून घेणे .
(१९) सप्तग्रंथ मधील ज्ञान समजावून घेणे .
(२०) सुत्रपाठ पाठांतर करणे .
(२१) महानुभाव पंथीय नियमाने चालणे .
(२२) नाम स्मरणाची सवय लावणे .
(२३ ) धर्माचणासाठी संस्कार घेणे .
(२४) चतुर्विध साधनाची सर्वप्रकारे सेवा करण्याची सवय लावणे.
(२५) दानधर्म करणे . (द्रव्य, वस्त्र,
संस्कार केंद्रातून खालील गुण अंगी निर्माण करणे .
(१) जिज्ञासू वृत्ती वाढविणे .
(२) एकात्मता ठेवणे .
(३) सकारात्मक वृत्ती वाढविणे .
(४) धर्मासाठी जागृती निर्माण करणे .
(५) व्यसनमुक्ती समाज घडविणे .
(६) सहकार्य वृत्ती वाढविणे .
(७) सेवाधर्म वाढविणे .
(८) संघवृत्ती वाढविणे .
(९) सर्व पंथियांविषयी परमप्रीती वाढविणे.
(१०)लहान थोरांना घेऊन चालविण्याची व्रुत्ती वाढविणे.
(११) महानुभाव पंथाची बांधिलकी अंगिकारणे.
(१२) शास्त्र निरूपण करून देवावरची श्रद्धा दृढ करणे.
(१३) कार्यक्रमात सहभाग घेण्याची व्रुत्ती वाढविणे .
(१४) नामस्मरणाची सवय लावणे.
(१५) स्थान दर्शनाची आवड निर्माण करणे.
(१६) अन्नदान, सेवादास्य, श्रमदान, रक्तदान , आरोग्य सेवा दा
(१७) स्वच्छता अभियान राबविणे, सवय लावणे.
(१८) नीतीने वागण्याची सवय लावणे .
(१९) आचार करून धर्म प्रचार करणे.
(२०) पारायण भजन करण्याची सवय लावणे.
(२१) ईश्वर भक्तीशी एकनिष्ठ राहणे.
(२२) महानुभाव पंथीय विचार आचाराचे सर्व ज्ञान करून घेणे.
गावागावातून संस्कार केंद्रातर्फे विविध उपक्रम राबविले जावेत. वासनिक बंधू भगीनीनी स्वतःहून सहभाग घेतला जावा. वरील विचार आपणास कसा वाटला मी फार मोठा विव्दान नाही तज्ञ नाही.
सर्व प.पू.प. म. साधू संताना वासनिक बंधू भगीनिना आणि सर्वांना माझा दंडवत प्रणाम
भगीरथाची अभंगवाणी
अभंग
तरुणांनी एक व्हावे । सर्वोच्च ध्येय ठेवावे ।।१।।
जिज्ञासेने ज्ञान घ्यावे । जीवनात उतरावे ।।२।।
कष्टाची हिमंत धरा । लाज सारीनष्ट करा ।।३।।
कष्टाने पैसा मिळवा । कष्टाची भाकरी खावा ।।४।।
धैर्याने चालत जावे । ध्येय आपुले गाठावे ।।५।।
भगीरथ म्हणे करा । कर्तव्याची पुर्ती करा ।।६।।
कवी भगीरथ अंधानेरकर