नवरात्रात पाळावयाचे नियम - navratrat palavayche niyam - महानुभाव-पंथिय-ज्ञान-सरिता-Mahanubhavpanth-dnyansarita

नवरात्रात पाळावयाचे नियम - navratrat palavayche niyam - महानुभाव-पंथिय-ज्ञान-सरिता-Mahanubhavpanth-dnyansarita

 ॥ जय श्रीचक्रधर ॥

नवरात्रात पाळावयाचे नियम

महानुभाव-पंथिय-ज्ञान-सरिता-Mahanubhavpanth-dnyansarita

सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभुंनी जीवाच्या ऊध्दारासाठी व भल्यासाठी विधी निषेध शास्त्र वचनाचे निरोपण केलेले आहे. त्यालाच आपण पाळते व नपाळते म्हणत असतो.

आता शास्त्रातील  त्याग, विधी पालन संहिता पाहुया. निषेध कोणकोणते ते पाहुया.

आपणां सर्वांना माहिती असल्याप्रमाणे आपण नवरात्रात बाहेरचे पदार्थ नऊ दिवस कटाक्षाने टाळतो. तर यामागील नक्की कारण काय आहे.. ?

कारण नवरात्रात नऊ दिवसांसाठी देवतेंना ईश्वराने त्यांचा भोग घेण्यासाठी आज्ञा दिलेली असते. त्यामुळे सर्वच बाजारपेठा ह्या देवी देवतेंच्या उपार्जनेसाठी लागणाऱ्या वस्तुंच, खाद्यपदार्थानी, सजावटीच्या साहित्यानी गजबजलेल्या असतात. चोहीकडे, घरोघरी घटस्थापना होऊन देवता अधिष्ठित झालेल्या असतात.

आता त्याचे संघटित स्वरूप सुरू झाल्याने अधिकच जल्लोष असतो. गरबा, नृत्य डी.जे.आदी साधनांनी वातावरणातील सत्व नष्ट होऊन ते मदोन्मत्त झालेले असते. त्यातल्या त्यात ज्या निमित्ताने ही उपासना चालते तिचा शेवट बळी देऊन हिंसा झालेली असते .

लीळाचरित्रात स्पष्ट उल्लेख आहे की शेवटचा दिवस हा देवतांचा बलिग्रहन दिन असतो. अश्या हिंसास्थानी महात्म्याने असु नये.

जर प्रत्यक्ष ईश्वर अवतार किंवा ईश्वराचा साधक तेथे असेल तर तिथे देवता उन्मत्त आवेशुन त्या बळीचा भोग घेऊ शकत नाही. जालन्याची लिळा पहा. म्हणुनच देवतांनी स्वामींना नगराबाहेर येण्याची प्रार्थना केली. यावरून त्या बलिग्रहनाची भीषणता आपल्या लक्षात येईल.

त्या क्रियेचे असुरत्व किती अनिष्ट कारक आहे हे साधकांना समजावे, त्याचे पालन करावे म्हणुन प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या विनंतीस मान देऊन गावाबाहेर नागाविहिरीकडे देवतेंची भोग वेळ संपेपर्यंत थांबले. आधीच जीव भक्तिकडे वळत नाही, वळला तर निर्हेतुक क्रिया अन्नदान करीत नाही

जीव काहीतरी प्रापंचिक सुखाच्या अपेक्षेने क्रिया करतो, ती पण धड भावपुर्वक नाही करत. केलीच तर आपली किर्ती, नाव मोठे व्हावे म्हणुन करतो. त्यातही आता त्या कार्याला जे स्वरूप असते राजस गुणाने लिप्त असते. देवता भक्तीचे, देवतानीच निर्माण केलेले असते.

त्या त्या समुहाचे स्वतंत्र , स्वतंत्र नियम , कायदे कानुन आहेत. त्यानुसार आवडीपुर्वक तेव्हढाच नेमुन दिलेला कालावधी संपेपर्यंत, त्याच पदार्थांनी त्याच मंत्र उच्चाराणे त्याच मुहूर्तावर जर उपासना केली तरच ती देवता आपल्या साधकाला त्याचे फळ देते. अन्यथा ती क्रिया, तो विधी भंगल्याचे पातक म्हणुन त्यालाच प्रत्यवाय नावाचे नरक भोगवते.

याला श्री गीतेमध्ये प्रमाण आहे. चरित्रात पण आहे . नवरात्रात ज्या देवतेची उपासना केल्या जाते तिच्या त्या विक्राळ मुर्तीवरूनच लक्षात येते की, ती सात्विक आहे की तामस आहे. एकतर त्यांचे उपासनेच्या विधीत त्या ब्राम्हणाला सुद्धा पुर्ण अवगत नसतात.

तिथे सायंकाळी आरती नंतर सर्व रजप्रधान गाणे, नृत्य सुरू असते. त्यानिमित्ताने मनोरंजन असते. अत्यंत सात्विकतेने देवतेला अपेक्षित असलेली उपार्जना जर अशा प्रकारे तिचा विधी भंग करून होत असली तर ती देवता त्या ठिकाणी प्रसन्न होईल की कोपिष्ट होईल.. ?

या काळात एखादा तरी उपासक डोळ्याला अश्रुपात आणुन त्या देवतेला आळवताना दिसतो का.? एखादा सात्विक प्रकृतीचा असला तरी त्याला अशा वातावरणात सत्व गुण निर्माण होईल काय..?  एकुणच सारासार विचार जर केला तर ते स्थान देवतेच्या मनाविरुध्द क्रिया घडत असल्यामुळे तामस होते आणि अशाप्रसंगी काही लोक मुद्दाम संध्याकाळी सजावट बघण्याच्या निमित्ताने फिरायला जातात. त्यांच्या ओठावर त्या स्थळी परमेश्वराचे नामस्मरण येते का..?

मग त्या नामाचे साह्य वर्तेल काय..?

तुम्हीच सांगा .

लोक आम्हाला म्हणतात की, आम्ही पोरांसाठी जातो. अरे पण अशा ठिकाणी जर त्या राजस, तामस, नुसती तामस नाही तर ती देवता तिथे मिळणाऱ्या भोगाचा उपभोग घेण्यासाठी जर आसुसलेली असते तर तिथे आपल्या लेकरांना नेणे किती हिताचे आहे?  बरं हे वातावरण काही एका ठिकाणी आहे का ? घरोघरी, गल्लो गल्ली, गावोगावी आहे.

या सर्व बाबींचा विचार केला असता आपल्याला जे गुरुजनांनी काही निर्बंध घातलेले असतात ते कुणाच्या हिताचे असतात.? श्रीगुरुजीच्या की आपल्या परिवाराच्या?

आपण पालन केले नाही तर एखादे संकट ऊभे राहते. मग साधुंना आपण पारायण करायला सांगतो. याचा दोष कोणाला लागणार. म्हणुन सांगत आहे की आपल्याला ह्या सर्व अनिष्टापासुन जर वाचायचे असेल तर घरी काहीतरी साधना करणे क्रमप्राप्त आहे. त्या साधनेचे स्वरूप आपल्याला जाणुन घ्यायचे आहे .

ज्या ठिकाणी नामस्मरण पोथी चालते. नित्य विधी होत असतो अश्या ठिकाणी किंवा परमार्गाच्या ठिकाणी आपण  क्रिया करावी. फक्त पैसे दिले व क्रिया झाली असे नाही तर ती निर्हेतुक क्रिया स्विकारण्यासाठी आपण देवाला प्रार्थनाही करावी.

देवतेचे कोणतेच अनिष्ट होऊ नये व आपणांस व आपल्या परीवारास कोणतीही बाधा होऊ नये म्हणुन आपण सर्वांनी नऊ दिवस गुरुजनांनी सांगितल्या प्रमाणे विधी आचरावा.

🔘 *नवरात्रातील पालन करावयाचे नियम* 🔘

विजयराज हरबास बाबा महानुभाव 

नवरात्रातील या नऊ दिवसात अन्य देवता साधक देवी, देवतांचे व्रत, वैकल्प जप, तप, साधना, ऊपासना करतात, 

बाहेरील वातावरण वैकल्पिक झालेले असते, राजस, तामस गुणांचा प्रभाव वाढतो,देवी,  देवता सुद्धा स्वैर वर्तन करीत असतात 

अशा वातावरनात परमेश्वर साधकाने कोनताहि अविधी होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे

अशा वातावरनात दुप्पट चर्या, दुप्पट प्रसादसेवा, नामस्मरण व देवपुजा वंदन हा आचार करावा

▪️ नामस्मरणात, पारायणात दुप्पट वाढ करावी

(या नऊ दिवसात एक लक्ष किंवा पन्नास हजार नामस्मरणाचा विडा ठेऊन विधि पुर्ण करावा) 

▪️आपल्या जवळ असलेल्या मठ, मंदीर, मार्गात, स्थानाला दररोज प्रसादवंदन, देवपुजा वंदन करायला जावे

▪️कुणाचे मन अंतःकरण दुखवेल असे वागु नये

▪️ शक्यतो मौन धारन करुन स्मरण करावे

▪️ विकार दोष, विकल्प दोष व हिंसा दोष होणार नाहि याची दक्षता घ्यावी

▪️ शक्यतो लांबचा प्रवास टाळावा

▪️ टि. व्हि, रेडिओ, मोबाईलचा वापर शक्यतो कमी करावा

▪️ देवतांच्या मुर्ती, घट बसविलेल्या ठिकाना पासुन शकियतो लांब रहावे, त्या परिसरात जाऊ नये जाने टाळावे कारण देवतांच्या ठिकानी सुद्धा सामर्थे असते ते परमेश्वर साधकाला आपल्या कडे आकर्षित, मोहित करते व कोमल परमेश्वर साधक तिकडे आकर्षिल्या जाऊ शकतो

▪️बाहेर देवता मुर्ती बसविलेल्या परिसरात थुंकि, बाथरुम करणे टाळावे व खाणे,  पिणे टाळावे

▪️ या नऊ दिवसात बाहेरील कोणतेही खाण्याचे पदार्थ घेऊ नये ( दवाखाना अर्जंट आला तर जायाला हरकत नाहि) 

▪️ हिंसा करणारी मनुष्य त्यांच्या पासुन सुद्धा घेणे टाळावे 

▪️ या नऊ दिवसात चहा, दुध, घेणे शक्य झाले तर वर्ज करावे

( शक्य तेव्हढे नियम पाळलात तर चांगलेच आहे प्रयत्न करायला हरकत नाहि) 

मी महानुभाव -माझा महानुभाव

उद्यापासून नवरात्र सुरु होत आहे तरी सर्व सदभक्तांनी आपला जास्तीत जास्त वेळ नामस्मरणामध्ये व्यतीत करावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्याजवळ असलेल्या मार्गामध्ये, तथा स्थानाचा ठिकाणी जावे. व तेथे जाउन नामस्मरणाबरोबर तेथील अधीकरणाच्या मार्गदर्शनाखाली ते सांगतील त्याप्रमाणे धर्मरुप सेवा दास्य असा व्यापारही करावा. तेथेही जो जो निषेध प्राप्त होईल तो निषेधही चुकवून पुर्वोत्तर क्षण दुर्लभ बनवावा. 

व ज्यांना ज्यांना  कौटुंबिक, शारीरे अनधिकार या किंवा काही अन्य कारणामुळे परमार्गामध्ये तथा स्थानाच्या ठिकाणी जायला जमणर नाही त्यांनी आपल्या स्वस्थळीच कोणतेही विघ्न न येता नामस्मरण सिध्दीस जाण्यासाठी परमेश्वर संबंधीत विशेष, देवपुजेजवळ निर्हेतुक स्मरण निमीत्त विडा समर्पित करुन आपला सर्व वेळ नामस्मरण, शास्त्र वाचन, चरीत्र वाचन यामध्ये व्यतीत करावा. 

अन सर्वात महत्वाचे म्हणजे या वेगळे जे साधनवंत असतील ज्यांना नोकरी निमित्त, व काही अत्यावशक कामामुळे नित्यदिनी बाहेर जावे लागते त्या साधनवंतांनी देवता अधीष्ठीत ठिकाणी जाउ नये. आपण श्रेष्ठ अशा परमेश्वराचे साधक आहे असा अंतःकरण अभिमान बाळगुण कोण्याही व्यक्तीची, पात्राची, देवता प्रतिमेची अवहेलना करु नये. आपल्या स्वभावाला नियम घालुन बाहेरील कोनतेही पदार्थ खाउ नये तसेच घरी आनुनही खाउ नये. वाचेने नाम सतत उच्चारत असावे. जर वाचेने नाम उच्चारता येत नसेल तर अंतःकरणी नाम जप सतत करीत असावे. व येता जाता जस जसा प्रसंग प्राप्त होईल तस तसे चरीत्र आठवावे. असा आपला वेळ परमेश्वर स्मरणात व्यतीत करावा. 

आतापर्यंत आपण सर्वांनी नवरात्रीविषयी  वेगवेगळ्या प्रकारच्या अटी, नियम काही योग्य व काही आपणास अयोग्यही वाटल्या असतील परंतु त्यामागील सर्वांचा एकच उद्देश की, माझ्या देवाच्या साधनवंताला या काळामध्ये कोनतेही विघ्न होउ नये. हे तर त्या साधनवंतांचे आपल्याविषयीची आपुलकीच प्रतीत होते. म्हणुन कोनीही सारंगपंडीताप्रमाणे, दादोसाप्रमाणे साधनावर विपरीत न होउन, अंतःकरण कोणतेही वाहकत्व न ठेउन आपला धर्म सिध्दीस न्यावा. का तर सर्वज्ञांनीही आपल्याला सांगितले आहे की, ज्ञान जाने तो जानता नव्हे. : ज्ञान जाणुन ज्ञानानुसार क्रिया करी तो जाणता: 

असो.. 

अशा प्रकारे जर आपण आपला वेळ व्यतीत केला  साक्षात साधनदाता आपल्या पाठीशी असेल. 

 "या विघ्नरुप काळामध्ये आपण सर्वाचा सर्व वेळ नामस्मरण, शास्त्र निरोपण, शास्त्र वाचन, चिंतन यामध्येच साधनदात्याच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडो हीच साधनदात्याजवळ विनंती. 

दंडवत  प्रणाम

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post