महानुभाव-पंथिय-ज्ञान-सरिता-Mahanubhavpanth-dnyansarita
।।वंदे श्रीचक्रधरम्।।
"नवरात्र" एक "चिंतन"!
लेखक :- महंत श्री जयराज शास्त्री ! (साळवाडी )
भारतीय परंपरेत अनेक देवी देवतांचे ऊत्सव पाहाण्याला मिळतात. ते उत्सव दिवसाच संपन्न झालेले पाहावयास मिळतात, तसेच रात्रीच्या नावाने देखील "उत्सव" असलेले भारतीय संस्कृतीत पाहावयास मिळतात. हे भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे.
ते कोणते उत्सव ?
पुढिलप्रमाणे ----
१) शिवरात्र २) नवरात्रोत्सव"!
अशा "नवरात्राचा "काळखंडात" महानुभाव पंथातील साधुसंत किंवा परमेश्वर भक्त (वासनीक) आहेत, ते वेळात वेळ काढून "नवरात्राच्या "काळात नऊ दिवस एखाद्या स्थानाच्या, किंवा आश्रमांच्या ठिकाणी जाऊन परमेश्वराचे नामस्मरण करीत असतात. त्या नऊ दिवसांमधे, "खांडे महानवमीचा" दिवस महानुभाव पंथीय लोक अतिशय धार्मिकतेत गावाच्या बाहेर शेतात, किंवा रानात एवं विजनवासात जाऊन नामस्मरणात व ईश्वर चिंतनात घालवतात.
कारण खांडेमहा नवमीच्या काळात हिंसा करण्याचे प्रमाण जास्त पाहावयास मिळते, अशा -"महानवमीच्या" संदर्भात उल्लेख लीळाचरित्रात देखील पहाण्याला मिळतो. तो उल्लेख पुढिल प्रमाणे -- सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी हिवरळी (जालना) येथे असतांना, स्वामी पश्चात प्रहारी ऊठलेले आहे. स्वामी बाईसांना म्हणतात, “बाई आज आपणाला या नगरा बाहेर जावे लागेल,”
त्यावर बाईसा म्हणतात, “का बाबा?”
"बाई आज खांडे नवमी आज नगरामधे घरोघरी हिंसा होईल. हिंसा वर्ते तिये स्थानी महात्मेया असो नये की बाई" भोगसमय-(त्या काळात बळी देण्याचा एक प्रकार) संपल्यावर नगरामधे प्रवेश करावा. आम्ही जर या दिवसी नगरात राहीलो, तर देवता त्यांचा भोग घेण्यासाठी येणार नाही. बाई... रात्री देवता येथे विनंती करण्यासाठी आल्या होत्या. त्यानी आम्हाला विनंती केली, जो पर्यंत स्वामी नगरात आहे, तो पर्यंत आम्ही नगरात प्रवेश करू शकत नाही, मग आम्ही त्यांना सागींतले. तुम्ही नगरात या! आम्ही नगरा बाहेर जाऊ !
यावर हिंसेच्या संदर्भात एकांकीच्या काळातील घोडाचुडीच्या शिष्याचा घडलेला वृतांत सांगीतला,स्वामी म्हणाले !बाई अवघी मात्र घ्या, मग बाईसाने अवश्यक सामान,व विस्तव घेतला,मग बाईसांनी स्वामींच्या श्रीचरणी ऊपानहौ दिल्या .
मग स्वामी सर्व भक्तिजना सहित गावाच्या बाहेर गेले. तेथे भरपूर पाण्याने भरलेली नागाविहीर "त्या विहिरीवर वरील मोकळ्या जागेत स्वामी ऊभे राहिले. बाइसाने आतल्या भागाला स्वामींना बसण्यासाठी आसन तयार केले. मग स्वामी आसनावर विराजमान झाल्यावर, मग देवता विहीरीतून बाहेर निघाल्या,व स्वामींपासी आल्या, सर्व देवतांनी स्वामींना दंडवत केला.
स्वामींचे श्रीचरण आपल्या माथ्यावरच्या केसाने स्वच्छ केले. मग देवतांनी स्वामींना आज्ञा मागितली. मग त्या देवता नगरात गेल्या. तितक्यात बराच आरडा-ओरड ऐकयला आला. मग बाईसाने विचारले! “बाबा... नगरात बराच आरडा ओरडा ऐकायला येत आहे. तो आवाज कोणाचा आहे?” स्वामी म्हणाले, “देवतांचा!” बाईसाने विचारले! “त्या दिसत तर नाही.” “बाई त्या आपणाला दिसून देत नाही..”
मग बाईसाने आग्नी पेटवला. उष्णोदक केले. स्वामींना गरम पाणी दिले. स्वामींनी गुळणा केला. श्रीमुख स्वच्छ केले. बाईसाने स्वामींचे पाय स्वच्छ केले. मग चंदन ऊगाळून स्वामींना ऊर्ध्वपौंड्र (वैष्णव पद्धतीचा) टिळा लावला. अक्षदा, कापूरासहित विडा समर्पन केला. धूप व मंगळ आरती झाली. दंडवत घातले.
तितक्यात तिकवनायक आले. स्वामींना दंडवत घातले. श्रीचरणाला स्पर्श केला. स्वामींना आरोगणे करता विनंती केली. स्वामींनी विनंती स्विकारली. तिकवनायक गेले. स्वामींना दुपार करता ऊपहार घेऊन आले. बाइसाने पुजावसराची तयारी केली. तिकवनायकाने स्वामींची पूजा, धुपार्ति, मंगळार्ति केली.
मग स्वामींना भक्तीजनांसहित आरोगणा झाली. गुळणा केला. विडा समर्पित केला. मग स्वामींनी तिकवनायकाला निरोप दिला. मग भोजनाचे सर्व भांडी घेऊन गेले. मग स्वामींनी आराम केला. मग ऊठले, स्वामींनी निश्चळ आसन स्विकारलेली. सर्व भक्तीजन स्वामींच्या मूर्तिकडे पहात बसले. सायंकाळचा समय झाला. मग स्वामी बाईसाला म्हणाले, आता सामान घ्या! देवतांचा भोग घेण्याचा समय संपला आहे. मग स्वामी पुन्हा नगरात प्रवेश करण्यासाठी निघाले. मग स्वामी वेशीपासी आले, देवतेंची भेट झाली. मग देवता स्वामींच्या श्रीचरणाला लागल्या, आपल्या माथ्यावरच्या केसांनी स्वामींचे श्री चरण स्वच्छ केले. मग त्या देवता निघून गेल्या.
स्वामींनी नगरातील राजमठात प्रवेश केला. बाईसांनी रात्रीचा पुजावसर केला. स्वामी आसनावर विराजमान झाले. मग बाईसाने सकापुरा फोडी समर्पित केल्या. मग बाईसाने पानांचा विडा दिला. त्यानंतर स्वामींनी थोडा वेळ शतपावली केली. मग स्वामी असनावर विराजमान झाले. त्यानंतर परावराचे निरोपण केले. मग स्वामींनी पहूड स्विकारला.
असा हा खांडे महानवमीचा प्रसंग लीळाचरित्रात पाहाण्याला मिळतो. या खांडेनवमीच्या दिवसी एका स्थानावर राहून जितका होईल तितका देवधर्मात काळ घालवावा.
असो दंडवत !
म. जयराज शास्त्री तळेगावकर (साळवाडी),
===============
लेख दुसरा
🍁नवरात्र महोत्सव महानुभाव सांप्रदायी महात्म्य
~~~~~~~~~~~~~~~~
अनंत ब्रह्मांड नायक परब्रम्ह सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी....
दंडवत प्रणाम....🙏🙏
................................
महानुभाव सांप्रदायात नवरात्र महोत्सवाचे विशेष महत्त्व आहे."सर्व धर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज" सर्व देवी देवताधर्माचा त्याग करून एकनिष्ठ परमेश्वर भक्ती करणारा महानुभाव सांप्रदाय पारंपारीक पध्दतीने नवरात्राचे महत्त्व आज पर्यंत पाळत आलेला आहे. महानुभाव साधकाचे हे एक भक्ती वैशिष्ठ आहे.
स्वामी जालन्याला असताना नवरात्रीच्या शेवटच्या दिवसी नवमीला ग्रामांतर केले म्हणजे जालना गाव सोडून गावाबाहेर गेले होते. मग हिच परंपरा आपण आजपर्यंत चालवत आहोत.
नवरात्र संपूर्ण नऊ दिवस महानुभाव साधक अतिशय कट्टर पणे व दृढभावनेने श्रद्धापूर्वक नामस्मरण करत असतात. बाहेरील कोणतीही वस्तु ग्रहण करत नाहीत. व नवमीच्या दिवशी उपदेशी साधक मंडळी ग्रामांतर करून म्हणजे गावाबाहेर जावून नामस्मरण व प्रसाद वंदन करतात तर संत महंत भिक्षूक मंडळी स्थानावर नामस्मरण व चतुः साधनाचा लाभ घेतात एकंदरीत नवरात्र मोहत्सवाचे महत्व महानुभाव सांप्रदायात पारंपारिक पद्धतीने दिसून येते.
नवरात्र महोत्सवाच्या निमित्याने... लेख
न पाळतं म्हणने काय... ?
हा विषय प्रामुख्याने समोर येतो आणि हा विषय महानुभाव साधकासाठी खूप महत्व पुर्ण आहे. कारण साधकाचा हा एक नित्याचाच आचार धर्म आहे. नवरात्रात मात्र हा आचार धर्म अतिशय कठोर पणे पाळला जातो कारण स्वामीने या विषयी आज्ञा तसा आदेश दिलेला आहे. हे स्वामीच्या जालना लीळेवरून दिसून येते.
न पाळतं म्हणजे काय ?
नवरात्रात काय काय वर्ज करायचं असतं ?
आणि आचार विचार संचार या विषयी नवरात्रामूळे येणारे निर्बंध काय असतात ?
या प्रश्नांची उत्तरे शोधत असतांना .....
न पाळतं नवरात्रीचा पारंपारीक आचार धर्म सापडतो.
घट स्थापना...
नवरात्रात जवळपास सर्वच समाजातील लोक घट बसवत असतात. घट बसवणे म्हणने देवीची स्थापणा करणे, देवीला आव्हान करणे त्या ठिकाणी नऊ दिवसासाठी देवीची प्रतिष्ठापणा करून मनोभावे उपासना पूजाआरच्या केली जाते त्यामूळे त्या ठिकानी देवीचे सामर्थ असते.
हा घटस्थापनेचा व देवी प्रतिष्ठापणेचा प्रकार सर्व घराघरात गावोगावी, गल्लोगल्ली चालु असतो.
त्यामूळे देवीचे सामर्थ सर्वत्र असते
म्हणून महानुभाव साधकांनी....
अशा ठिकानी जावू नये.
संचार करू नये.
अशा ठिकाणी काही ग्रहण करू नये.
तसे काही केल्यास देवी विघ्न आणू शकतात.
बाधा आणू शकतात.
आलाच...👇
न पाळतं असे म्हणतात.
म्हणून महानुभाव साधकांनी नवरात्रात बाहेर कुठे जावू नये फिरू नये.
बाहेरच्या वस्तु घेवू नये.
काही ग्रहण करू नये.
पूर्व वेळ स्थानाच्या ठिकानी अथवा स्वतःच्या घरी नामस्मरणात खालावा.
यालाच...👇
नवरात्राचा पाळावयाचा पारंपारीक आचार धर्म म्हणतात.
नवरात्रात बाहेरच्या वस्तु वर्ज्य का ?
नवरात्रात लागणाऱ्या सर्व वस्तु संग्रहीत कराव्यात नऊ - दहा दिवस पुरेल येवढा किराणा, धान्य इत्यादी आगोदर घरी आणून घ्यावे.
कारण नऊ दिवस त्या सर्व वस्तुवर देवतेची सत्ता अधिकार असतो म्हणून उपदेशी महानुभाव साधकांना नवरात्रात बाहेरच्या सर्व वस्तु वर्ज म्हणजेच न पाळत्या असतात मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण बाहेरच्या वस्तु ग्रहण केल्या तर निश्चितच देवता विघ्न करतात बाधा आणतात.
देवता विघ्न करतात बाधा आणतात म्हणजे नेमकं काय करतात.... त्याचा आपणावर काय परिणाम होतो.
न पाळतं विधि आपणा कडून घडली गेली तर धर्मभावनेवर, धर्म आचरणावर परिणाम होतो. आपली जी धार्मिक उजळता आहे. विधिप्रती आपली जी सजकता आहे. ती कमी कमी होत जावून आपल्या धर्म भावना धर्मनिष्ठा मलीन होत असते. धर्मविधीवर खंड पडत जातो. वेळच्या वेळी करावयाच्या विधीत सातत्ये नसते. अर्थात दुर्लक्ष होत असते. एका मागोमाग एक अविधी आचरल्या जातात परिणामे धर्मनिष्ठ आचरणनिष्ठ साधक धर्मावरून जातो अर्थात कटी याचा दृष्टांत आपणास माहित आहे. त्याच आशयाला अनुसरून एक बोधकथा दृष्टांत कथा मांडतो...
एक परम ईश्वर भक्त साधू संन्याशी ईश्वरभक्ती पूजा आरच्या नामस्मरण करण्यासाठी गाव सोडून जंगलात वनात एकांतात जातात. एका वृक्षाच्या छायेत ईश्वर नामस्मरण जप चालू असते. अगदी शांतता पूर्णवेळ ईश्वर भक्तित नामस्मरणात जाऊ लागला.
कालांतरांने पावसाळा सुरु झाला. पाण्यापावसाच्या व्यत्ययाने ईश्वर भक्तीत अडथळा येऊन खंड पडू लागला. हे पाहून जंगलात येणारे चार चौघ गुराखी साधूला झोपडी बांधून देण्याला सल्ला दिला. चारचौघांच्या सल्यानुसार साधुसाठी झोपडी तयार झाली. हवा पाणी उन वारा या पासून संरक्षण झाले. साधू संन्यासाची ईश्वरभक्ती चांगल्या प्रकारे होऊ लागली ....
कालांतरांनी त्या झोपडीत दोन उंदीर आले. आणि त्या उंदराने साधू संन्याशाची लंगोट कतरली. साधूनी जंगलात येणारी चार चौघं मंडळीस आपली कैफियत मांडली....
लगेच त्या चार चौघ मंडळीने साधूला सल्ला दिला कि साधू महाराज या उंदराचा नायनाट करनं खूप सोप आहे. त्यासाठी तुम्हाला एक मांजर पोसावं लागेल. त्यामूळे निश्चितच उंदराचा नायनाट होईल. त्या मंडळीने गावातून लगेच एक मांजर आनले आणि साधूच्या झोपडीत ठेवले. झोपडीतील दोन उंदराचा एका दिवसात मांजराचा फडसा पाडला.
दुसऱ्या दिवसापासून भूकेने मांजर ओरडू लागले साधूच्या नामस्मरणात व्येतेय येऊ लागला मांजराची व्याकूळता वाढू लागली साधूला स्वतःचे पोट भरण्याचे वांदे मग मांजराचे काय ?.....
पून्हा साधूंची चार चौघांकडे कैफियत.....
मांजरासाठी काय करावे ?....
चारचौघा मंडळीने त्यावर उपाय सांगीतला महाराज सोप आहे.....
आमच्याकडे येवढ्या गाई आहेत एक गाय तुमच्याकडे असू द्या....
म्हणजे गाईच्या दूधाने मांजराचा प्रश्न सुटेल आणि तुमच्यासाठी दूध दुभतं होईल .....
मांजरांचा प्रश्न सुटला पण भरपूर दूधामूळे दूध उरू लागतं त्याचा वास सुटला गाईचे दूध काढणे, गाय चारणे, वांदे होऊ लागले. साधू महाराजांचा ईश्वर भक्तीचा वेळ या कामातच जाऊ लागला ....
पून्हा साधू महाराजांची चारचौघाकडे कैफियत....
आता काय करावे....
निवाऱ्यासाठी झोपडी बांधली... झोपडीतल्या उंदराच्या बंदोबस्तासाठी मांजर आणले.....
मांजरासाठी गाय आणली......
गायचे काय करावे पुर्ण वेळ गाईतच जातो ....
ईश्वरभक्ती साठी वेळ मिळत नाही...
काय करायचे ?....
"महाराज त्यात काय," ... !
समस्या तिथ मार्ग असतो... तुमचा आता खूप व्याप वाढला
दूबत्या जनावराचे व दुधाच्या देखभाली साठी आपण गावातून एखादी बाई आणु म्हणजे दूध काढणे, तापवणे, रई लावणे, गाय चारवणे इत्यादी कामे बाई केली तर ....
तुमची या कामातून सुटका होईल आणि मिळालेला वेळ ईश्वर भक्तीत जाईल......
साधू महाराजाला गोष्ट पटली...
सुचवल्या प्रमाणे चार चौघांनी एक बाई साधू महाराजांच्या झोपडीत आणून ठेवती ....
बिचारी बाई.... !
झोपडीतील सर्व कामे करू लागली महाराजांना पूर्ण वेळ मिळू लागता ईश्वर नामस्मरणात पूजा अर्चेत साधू रमू लागले..
सर्व काही हातावर येऊ लागलं ...
बाई बद्द्लची कृतज्ञता जानवू लागती. एकमेकांच्या संगतीने दोघात आकर्षण वाढले.
मग काय....
रूपांतर प्रेमात झालं...
नामस्मरण पूर्णविराम....!
अशा प्रकारे ईश्वर भक्तीसाठी एकांतात येणारा साधूसंन्यासी शेवटी ईश्वर भक्तीवरून जातो. धर्मावरून जातो. यालाच धार्मिक अविधीची मलीनता म्हणतात.
एक अविधी दुसऱ्या अविधीला दुसरी अविधी तिसऱ्या अविधीला निमंत्रित करत असते आणि मग आपण विधीपासून धर्मापासून दूर जातो साधनापासूनची आवड नाहीसी होते. धार्मिक मळिनता येते. धर्मभावना धर्मविधी संपुष्टात येतात. एवढे अनर्थ न पाळतं विधि पाळल्यामूळे होतात. म्हणून महानुभाव उपदेशी साधकांनी नवरात्रात बाहेरची कोनतीही वस्तु ग्रहन करू नये
हे आजच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्याने सांगणे उचीत वाटते.
नवरात्रात उपदेशी साधकाचा आचार धर्म
नवरात्रात उपदेशी साधकाने जास्ती जास्त नामस्मरण केले पाहिजे नोकरीवर, कामावर असाल तर गाठी करत बसणं संयूक्तीक वाटणार नाही अप्रदर्शित भाग म्हणून केवळ नामस्मरण करत राहणे योग्य राहील.
नवरात्रातील नऊ दिवस बाहेरच्या सर्व वस्तु ग्रहण करू नये दिवटीवर कामावर जातांना सोबत स्वतःच्या घरचा डब्बा पाणी बॉटल नेणे योग्य राहील. एकांद्या वेळेस जर स्वतःचा डब्बा उपलब्ध नसेल तर अशा वेळी उपलब्ध केलेला उब्बा जेवण स्वतः जवळच्या विशेष नमन करून दोन घास विशेषास अर्पण करून पून्हा जेवन करावे प्रत्येक वेळच्या पाणी अन्न ग्रहन करतेवेळेस विशेषास नमन करावे धर्मो रक्षती रक्षिता आपल्या धर्माच रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करीन शेवटी आचरे तयाचा धर्म
क्रमशः
~~~~~~~~~~~~~~~~~~~
....