सार्थ श्रीदत्तात्रेय दर्शनयाचक स्तोत्रम्
सिंहाद्रिशिखरे वास चतुर्युगे परेश्वर
बदर्यां सुस्थले जन्म देहि में दत्त दर्शनम ।।१।।
भावार्थ - सिंहाद्रीर्पवाताच्या शिखरावर ज्यांचा निवास आहे, चारही युगात वावरणारा जो परमेश्वर आहे, बद्रिकाश्रमात पवित्र ठिकाणी ज्याचा जन्म झालेला आहे, अशा हे दत्तात्रेया! मला दर्शन दे.
अत्रिमुनिः पिता यस्य माता चानसूया सती
तदुदरे प्रभुर्जातः देहि मे दत्त दर्शनम् ।।२।।
भावार्थ - अत्रिऋषी ज्यांचे पिता आहेत, आणि माता सती अनुसया आहे, त्या अनसूया मातेच्या पोटी श्रीदत्तात्रेय प्रभूनी जन्म घेतला अशा हे दत्तात्रया! मला दर्शन द्या.
आनंदाब्दे प्रभातेच मृगशीर्षे चतुर्दशाम
भृगुघस्त्रे परानंद: भवेद्वयक्तो गुणान्वितः ।।३।।
भावार्थ - आनंदनाम संवत्सरातील मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध आहेत. चतुर्दशीला शुक्रवारी सकाळी , दया मया आदी गुणात्मक आणि परम आनंद असलेला परमेश्वर व्यक्त झाला असावा.
चक्रपाणि महाराजं द्वीपिवेषेण कारणम्
बभुव पुरुषः व्याघ्रं देहि मे दत्त दर्शनम् ।।४।।
भावार्थ :- उत्तम पुरूष श्री दत्तात्रेय प्रभु! श्री चक्रपाणी नामे स्वामीला व्याघ्रवेषाने ज्ञान शक्ती देण्याला कारणीभूत झाले. हे श्री दत्तात्रेय मला ते व्याघ्रदर्शन द्या.
मदालसा स्वपुत्रस्य त्रितापं नाशकारम्
शम्बलीती त्रिवारञ्च देहि मे दत्त दर्शनम् ।।५।।
भावार्थ - व्याधी शांत व्होवो असे तिन वेळा म्हणून आपल्या पुत्राचे तिन्ही ताप (अधिदैविक, अधिभौतिक अध्यात्मिक) नष्ट करणारे तुम्ही आहात हे श्री दत्तात्रेया! मला दर्शन (भेट) द्या.
शिरसिच जटाभारं स्नानञ्च नयनाञ्चनम्
वसनं तिलकं भाले प्रालम्बिकाश्च केयूरः ।।६।।
भावार्थ - डोक्यावर जटांचा भार आहे, आणि स्नान केलेले डोळ्यात अंजन घातलेले, वस्त्र नेसलेले, कपाळावर टिळा लावलेला आहे, बेंबीपर्यंत लोंबनारी सोन्याची कंठी (माळ) आणि दंडात बाजुबंद आहे.
शशिसूर्यसहस्त्राणां सदृशी कर्णकुण्डले
मण्डितं मुकुटं मूर्ध्नि देही मे दत्त दर्शनम् ।।७।।
भावार्थ - हजारो चंद्रसूर्या सारखे तेजस्वी कानातील दोन कुंडले आहेत. मुकुट डोक्यावर आहे अशा हे दतात्रेया ! मला दर्शन (भेट) द्या.
तांबुलं रुचिरं चास्ये प्रहसन्निव लोहितम
दशन- शुभ्र-पड: क्तिश्च देही मे दत्तदर्शनम् ।।८।।
भावार्थ - रुचकर लाल विडा मुखामध्ये आहे आणि हसतांना जणु शुभ्र दातांची रांग दिसते, अशा हे दत्तात्रेया! मला भेट द्या.
दिव्यपुष्पं गले हारं काङ् कणं मुद्रिका करे
सर्वांगे लेपनं गन्धम् देहि मे दत्त दर्शनम् ।।९।।
भावार्थ - तेजस्वी फुलांचा गळ्यात हार, हातात कंगन आणि अंगठी सर्वांगावर सुवासीक उटने आहे अशा हे दत्तात्रेया! मला दर्शन द्या.
उंचवक्षस्थलं दोंदम् त्रिवलीरोम मालीका
कटी दिव्याम्बरे रेजे निकीङ्कण्युर सुत्रिका ।।१०।।
भावार्थ - उंच छाती व उन्नत पोट, त्यावर कुरळ्या केसांची रांग रेशमी वस्त्रात कंबर कमरेच्या खालील भागावर लोंबणारे छातीवरील जानवे शोभून दिसत आहे.
पादयोः पादुकाश्चारू नवरत्नझलालितम्
इति षोडशः शृङगारं श्री दत्ताय समर्पितम् ।।११।।
भावार्थ पायात सुंदर पादुका, चकाकणारे नवरत्न असे सोळा प्रकारचे शृङगार श्री दत्तात्रेयाला अर्पण केलेले आहेत.
अजो नित्यः पुरानोऽपि शाश्वतो गुणसंभवः
परावरेण युक्तस्य देहि मे दत्त दर्शनम् ।। १२ ।।
भावार्थ - परा आणि अवर शक्तीने युक्त अशा श्रीदत्तात्रेयाच्या ठिकाणी ज्याला जन्म नाही असा, सातत्याचा भाव असलेला, सर्वात आगोदरचा, चिरकाल तसाच राहणारा जो दया मयादि गुणांचे उत्पती स्थान आहे हे श्री दत्तात्रेया! मला दर्शन द्या.
त्रयोदशः परवाण्यां स्वरूपोक्तं परेण च
दत्तात्रेय परा पञ्च शक्तय खुल सन्निधौ ।।१३।।
भावार्थ - परमेश्वराने आपल्या परावाणीत तेरा प्रकारचे (१३ वचनाचा स्वरुप गाभा) स्वरूप सांगितले खरोखरच सन्निधानात श्रेष्ठ पाच शक्ती डी असलेले असे हे श्री दत्तात्रेय आहेत.
दिव्यासने परं ब्रह्म उपाविषत् ऋषीश्वर
धुप- दिपं फलं पुष्पं तुभ्यं नमः समर्पणम् ।।१४।।
भावार्थ - तेजस्वी आसनावर बसलेले पर ब्रह्म असलेले हे ऋषीवर्य श्री दत्तात्रेया! तुम्हाला धूपदीप फल फुल अर्पण असो तुम्हाला नमस्कार वे (दंडवत प्रणाम) असो.
द्वेषः क्रोधः कृतघ्नश्च अहंता-मद-मत्सराः
मुख्यत्रयं प्रमादाश्च देहि मे दत्त दर्शनम् ।।१५।।
भावार्थ - द्वेष, क्रोध आणि उपकारघातकी, अहंकार, उन्माद, दुसऱ्याचा छळ हे दोष आणि मुख्य तीन प्रकारचे विकार, विकल्प आणि हिंसा हे प्रमाद माझ्या ठिकाणी आहेत म्हणून हे श्रीदत्तात्रेया मला दर्शन द्या.
अपराधसहश्राणां क्षामयेत्त्वं प्रसीद मे
दर्शय ते स्वरूपं मे भूयो भूयो नमोस्तुते ।।१६।।
भावार्थ :- माझ्या हजारो अपराधांची तू क्षमा करावी, माझ्यावरति ती प्रसन्न हो. मला तुझे स्वरुप दाखव. तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो.
दिव्यमुर्तिरनुपम्यः मार्गमूलाय ते नमः
स्तवनं भजनं दास्यं देहि मे दत्त दर्शनम् ।।१७।।
भावार्थ - श्रीमूर्त तेजस्वी आहे, उपमातीत आहे. महानुभाव पंथाचे मूळ असलेल्या तुम्हाला नमस्कार असो. हे श्री दत्तात्रेया! मला (तुमचे) स्तुती, भजन, दास्य घडवून दर्शन द्या
इच्छापूर्तिः भवेच्छिघ्रं तत्र किञ्जिन्न संशयम् । स्तोत्रपठनमात्रेण दर्शनं याति प्रत्यक्षम् ।।१८।।
भावार्थ :- आपल्या मनातील इच्छेची पूर्णता लवकर होते. केवळ स्तोत्राचे वाचन केल्यामुळे प्रत्यक्ष भेट होते. त्या बाबतीत थोडा देखील संशय नाही.
दत्तात्रेयः समर्थोऽस्ति नमो नमः पुनस्तमै ।।१९।।
भावार्थ - पुत्रसंतती मिळविण्यासाठी, धन, धान्य वगैरे प्राप्त करण्यासाठी श्री दत्तात्रेय प्रभू समर्थ आहे. म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार.
एकमुखं बाहुर्द्वयं सर्वदा वरदायकम् ।
अत्र्यनसूयानन्दनं दत्तात्रेय नमोस्तुते ।।२०।।
भावार्थ - एक मुख असलेले ज्यांना दोन भुजा आहेत असे ते नेहमी वर देणारे आहेत. अत्रिऋषी आणि अनसूयेचे पुत्र आहेत. हे श्री दत्तात्रेया तुम्हाला नमस्कार असो.
वासुदेवस्य वै पाण्या सुस्वरी पूर्व राजिता ।
साख्यातं शेवलीवेली देहि मे दत्त दर्शनम् ।।२१।।
भावार्थ - श्रीकृष्णाला स्तुत्य असणारी मधूर स्वर असलेली सुशोभित अशी बासरी तिच्या नावाचा (सांगणारा) कवी आहे. त्यांची गादीपरंपरा 'शेवलीकर' आहे. हे श्रीदत्तात्रेया! मला दर्शन द्या.
इति परधर्ममहामोक्षैकसाधक - शेवलीकराख्येन विरचितं दर्शनयाचकस्तोत्रं सम्पूर्ण शुभं भवतु ।।
रचयिता :- प. पू. प. म. कै. श्रीशेवलीकर बाबाजी (जालना)
अर्थ :- प. पू. प. म. श्री जालनापुरकर बाबा.