काव्य रसग्रहण
सदर काव्यात भगवान श्रीचक्रधर स्वामींच्या चरित्राचे लीळांचे थोडक्यात वर्णन केलेले आहे या काव्यात कवीच्या शब्दांपेक्षा भाव अति श्रेष्ठ ओथंबून दिसतो.
हरीपाळ देव आले, गुजरात सोडूनी ।
कर्मभूमी सत्व भूमी, महाराष्ट्र म्हणूनी ।।धृ०।।
हरीपाळ मृत झाले, प्रेत होते स्मशानी ।
चक्रपाणी प्रवेशाने, हरीपाळ उठोनी ॥
घराकडे जावू लागे, पिता मित्र वंदूनी ।
घरदार अष्टभोग, सर्व कांही त्यजूनी ॥१॥
हरीपाळ देव आले, गुजरात सोडूनी ।
भेट दिली, ऋद्धपूरी, श्री गोविंद प्रभूंनी ॥
प्रभू म्हणे तू श्रीचक्रधर, प्रसाद देवूनी ।
ज्ञानशक्ती स्विकारली, श्रीगोविंदापासूनी ॥२॥
बारा वर्षे एकांतात, मौनव्रत स्वामींचे।
लिळा केल्या उद्धराया, जडजीव भाग्याचे ॥
मुक्ताईला भेट दिली, तिचे गुंफे जाऊनी
मनोरथ पूर्ण केला, मुक्ताईचा स्वामींनी ।।३।।
ससीकास रक्षीयले, सालबर्डी वनांत ।
पारधी ते शरणहि, आले एका क्षणांत ॥
हिंसा नको हिंसेतव, पाप लागे जाणूनी ।
स्वामीजीना आठवित दूर गेले निघूनी ॥४॥
गांवाहूनी जात होते, स्वामी कांही गावाना ।
मांडीवर खेळविले, वाघीणीचे पिल्लांना ॥
गावोगावी करपात्री, भिक्षां अन्न मागूनी ।
गंगातिरी जेविले ते, सर्व जीवा चिंतुनी ॥५॥
भिक्षेसाठी स्वामी गेले, नांदियेड गांवात।
काम कर अन्न देतो, बोलला तो ग्रामस्त।
काम द्यावे करीन ते, विनविले स्वामींनी ।
गुरे ढोरे राखणीचे, काम केले देवांनी ॥६॥
प्रतिष्ठानी होते स्वामी, एक एका भेटत
बोध दिला प्रतिष्ठानी, पांडेयासी स्वप्नात ॥
प्रभू सेवा पूर्वजन्मी, केली होती बाईनी ।
म्हणूनीया प्रेमदान, दिले तिला स्वामींनी ॥७॥
सर्पदंशी मृत. माळी, उठविला स्वामीनी ।
सौभाग्याचे लेणे पुनः मिळाले ते माळीणी ॥
वामनाची मृत भार्या, जीववीली स्वामींनी ।
पेंदियास सुखी केले, सुखे शब्दे बोलूनी ॥८॥
अष्टमीला देव गेले, बोणे बाई भेटीस ।
गुंफेमध्ये माती ढिगं, आले त्यांचे दृष्टीस |
मातीचा तो कृष्ण नव्हे, बोणे बाई बोधूनी ।
गोकुळची अष्टमी ती, खरी केली स्वामींनी ॥९॥
ऋद्धपुरी गुरु ठाई, महावस्त्र अर्पुनी ।
श्री प्रभूला ओवाळीले, जय जय बोलूनी ॥
दुटी वस्त्र प्रसादाचे, स्वामीना ते देऊनी ॥
श्री प्रभूनी थाप दिली, आठवण म्हणूनी ॥१०॥
चाकवत भाजी केली, छीनस्थळी स्वामींनी
भक्तजन तृप्त झाले, अमृताते सेवूनी ॥
भक्तांच्या त्या विकल्पाचा, छेद भेद करूनी ।
महापूजा स्विकारली, छीनस्थळी स्वामींनी ।।११।।
श्रीचक्रधर जीवहेतू, महाराष्ट्र भ्रमले ।
वाडोवाडी आर्त जीव, शोधीतच राहिले ॥
ठाई ठाई ब्रह्मविद्या, निरोपिली स्वामीनी ।
भट्टोबास योग्य केले, ज्ञान बोध देवूनी ॥१२॥
चराचर विश्व केले, भट्टोबास वेधूनी
गोसावियाचे गुढ प्रश्न, उत्तरीले भट्टांनी ॥
म्हाइंभट विस्मीत जाले, अद्भूत ऐकूनी ।
अमोलती ज्ञान रत्ने, भक्ता दिली स्वामींनी ॥ १३॥
स्वामीजींच्या संबंधाने, ओटे गोटे पुनीत ।
भजायला पुजायला, वंद्य झाले सृष्टीत ॥
कलीयुगी महाराष्ट्र, तिर्थक्षेत्र करुनी
उत्तरेला गेले स्वामी, सांगूनी ॥१४॥
चतुर्विध साधनें ती, जीवाप्रति देऊनीं ।
ईश्वरासी नाते जोडा, स्वामी गेले सांगूनी ॥
स्थान प्रसाद भिक्षुक, वासनिक वंदूनी ।
वाहतो हे गीतपुष्प, प्रभू तव चरणी ॥१५॥
जय श्री कृष्णा
===========
श्रीकृष्ण स्तवन
जय नमो मुरारी करूणेंद्रा, तव अर्पित भावे कुकुनेंद्रा ॥ध्रु.॥
पुर्ण पर ब्रह्म व्यक्त अवनी, प्रगटला भोज नंदभुवनी ।
क्रीडा करी रविजा तट जीवनी, झळकती कुंडल द्वय श्रवणी
गर्जता मुरली नाद अधरी, अमर अंबरी,
सुमनधन शीरी वर्षतीवरी स्तवन उत्तरी ।
योगीये सांडुनी दृढमुद्रा, वेध संचरला विधी रुद्रा ।।२।।
चरण युग आरक्त शुभ दिसती, नखे उडूगणे साम्य असती ।
पोटऱ्या कंजाकृती विलसती, जाणु वर्तुळा सधन असती ।
लक्षीता मध्ये देश नयनी मृगेश्वर मनी-चकीत होऊनी
वदन फीरवुनी फीरे काननी ।
सेवुनी नित्य राहे मुनीवृंदा विरंची इच्छा नाभिरंध्रा
।।२।।
सप्त जावुन दपित वसणा, अधर लोहीत मुक्तीकरसना ।
दिव्य रातोत्पल सम रसणा, सर्व भुषणी लसन इशना ।
युग्मळे मुगुट सजवुनी, दीर्घ लोचनी कृपासद्गुणी बाण विंधुनी दुरीत खंडुनी ।
पाडीले भव दुर्धर भद्रा । स्थापीले मुनीजन पट भद्रा ।।३।।
रीठा सूर मर्दुनी पुतनेसी करुनी मातुल कुल कदनासी ।
क्षीराब्धीपती लज्जीत वदनासी तुच्छीले नंत मदनासी ।
गळ्यामध्ये कौस्तुभ वनमाळा, करीत परिमळा मुदीरा सावळा, कृर्ष लाभला - चपळ चंचळा ।
विलोळीत अमल वदन चंद्रा
विसरला सुख मंचळी निद्रा ॥४॥
मिरवला हरी चंदन भावी, मुगुट जडीतोत्तम शर्शहेळी ।
कनकपुरी अमरासहमेळी, बैसले यदु पालक जवळी।
नाही तव दास विदुस गोविंद, पुरविजे छंद ।।५।।
प्रेम अरविंद देई मकरंद छेदी भवकुंदा । मेळवी पर सुखे साद्रा, करुनी मम दोषांचल मुद्रा ॥५॥
कवी-गोविंदराज सुकेणेकर