श्रीदेवदेवेश्वर माहूर स्थान इतिहास
चाक्षुष मन्वन्तराच्या अंतसमयी पृथ्वीजलमय होणार आहे, अशी पूर्वसूचना विष्णूच्या मत्स्य अवताराने विवस्वान पुत्र सत्यव्रत, येवु घातलेल्या वैवस्वत मन्वन्तरात होणाऱ्या मनु यास दिली. 'सर्वभुते हिते रतः' अशा भावी मनुने - सत्यव्रताने विशाल नौका करून त्यात सर्व प्रजाजनाला, सर्व प्राण्याचे प्रतिनिधी, सर्व वृक्ष-वल्लीच्या बिया - रोपे यासह त्या नौकेत आरूढ झाला. मत्स्य अवताराने सर्वाचे रक्षण केले अशा आशयाची कथा मत्स्य पुराणात आलेली आहे.
सर्व पृथ्वीजलमय कां झाली? समुद्राने मर्यादा का सोडली? कार भूगर्भात प्रचंड खदखद झाली. समुद्र पातळीपेक्षा भूसपाटीची पातळी खाली गेली. ही खदखद - स्थित्यंतर सुरूच राहिले. त्यामुळे कोठे कोठे उंचवटे निर्माण झालेत त्याची गणना प्राचीन पुराणकारानी सप्तकुल पर्वतात केली.
“महेन्द्रो मलय सह्यः शक्तिमान ऋक्ष पर्वत
विंध्यश्व परियात्रश्व सप्ते ते कुलपर्वत"
अपवादाने माहूर येथील सप्तकोसाचा भूभाग हा या जलप्रलयात अबाधीत राहिला होता. “एकाच्या म्हणण्यानुसार या भूभागाने प्रथम सूर्यदर्शन घेतले.” हा भूभाग प्रथम जलप्रलयातून वर आला या कारणे त्याला मुळपीठ म्हणतात.. सकळ प्राणीमात्रास सुसह्य झाला, साह्यभूत झाला, आधारभूत झाला म्हणून त्यांचे 'सह्य' हे नावही मोठे अर्थपूर्ण व यथार्थ म्हणावे लागेल.
भूगर्भात अशी घडामोड सुरूच होती. हिमालयाची उत्पत्तीच व्हावयाची होती. तेथे समुद्रच होता. म्हणून प्राचीन पुराण ग्रंथात सर्वत्र दक्षिण पथाचाच सद्उल्लेख येतो. तसेच सप्तकुलपर्वतात तथा इतरही ठिकाणी त्याचा उल्लेखही आढळत नाही. पश्चिम घाटाचा सह्याद्रि अजून अस्तित्वात यायचाच होता. माहूर येथील सप्तकोसाच्या सह्य पर्वताचाच सर्वांनी प्रथम आश्रय घेतला या सप्तकोसात "आदमाळ नांवाचा प्रदेश, एक गाव आजही विद्यमान आहे. लोक बोलीत त्याचे “आनमाळ" झाले ऐवढेच. आद म्हणजे आद्य. सह 'आद्यमाळ' हा माहूर येथील सप्तकोसाचा सह्य पर्वतच आहे. या शाश्वत ले सत्याचे हे प्रत्यक्ष प्रमाणच आहे.
याच शाश्वत सत्याची पुष्टी करणारा उल्लेख स्कद पुराणांतर्गत 'कालिकाखंड' या संस्कृत महात्म्य वर्णन करणाऱ्या ग्रंथात खालीलप्रमाणे नोंदविलेला आहे.
“सर्वांच्या आधी सच्चिदानंद परमात्माच एकटा होता. तो निर्गुण असल्यामुळे वेद सुध्दा त्याचे वर्णन करू शकत नाहीत. नंतर त्याचे अनादि मायेमध्ये प्रतिबिंब पडले. तो सुगण झाला. त्याने सर्व मायेला व्यापून टाकल्यामुळे त्याला 'विष्णू' म्हणतात. विष्णूची अर्धांगी लक्ष्मी ही माया चीत आहे. नंतर विष्णूनी सृष्टी उत्पन्न करण्यास आरंभ केला. त्याने मनानेच सात कोस लांब रुंद असे क्षेत्र निर्माण केले. नंतर विष्णूनी तात. नाभीतून ब्रह्मदेवाला निर्माण केले. व त्याला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा म्हणून केली. तेव्हा सृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य यावे म्हणून, या विष्णू निर्मित सात कोसाच्या प्रात्यक्षिकाला डोळ्यासमोर ठेवून सृष्टीची निर्मिती केली.
या काल्पनिक पुराणात्मक कथानकाच्या अनुषंगाने देखील या क्षेत्राला 'मूळपीठ' हे अभिधान यथार्थ वाटते.
कवी मुकुंदराज कारंजेकर विरचित एका आरतीत 'चरणचारी पर्वत सप्तकोसाचे गणित' असा उल्लेख येथील सह्याद्रिचा उल्लेख आढळतो.
दैवल्य ऋषी कारणे श्री दत्तात्रेय प्रभुनी “सैहांद्री पर्वता बीजे केले: तेथ मुळपीठ नामे शिखर असे: तेथ चहूयुगी अवस्थानः श्री दत्तात्रेय नि प्रभुची नाना वेषें क्रीडा : अमोघा जीवा अमोघ दर्शनः कर्म राहटीचे जीव: दैवरहाटीचे जीव: जो जो जैसा वर मागे तैसा तैसा देती :" 'दत्त' म्हणजे द्यावे द्यावे अशीच दानशिल प्रवृत्ती त्यांची!
वर उल्लेखित "मुळपीठ नामे शिखर" म्हणजेच श्री देवदेवेश्वर संस्थानाचा परिसरच होय. कारण सर्व प्राचीन ग्रंथात देवदेवेश्वराचाच अ उल्लेख प्रामुख्याने सर्वत्र दृष्टीस पडतो.
‘श्री सह्यामलकग्रामे देवदेवशव्ययम्' असा निर्देश नरसिंह पुराणात मिळतो. प्राचीन काळी आम्लकीग्राम म्हणून माहूरक्षेत्र प्रसिध्द होते. या क्षेत्राच्या पश्चिमेला पैनगंगा नदी आहे. "ब्रह्मप्रणीताच नदी यत्र तिष्ठति पश्चिमे” असा भौगोलिक उल्लेख ही कालीकाखंडात आढळतो.
आदिकारण मुळ कारण श्रीदत्तात्रेय प्रभुचे नित्यदिनी वास्तव्याचे = स्थान (निद्रास्थान) असल्यामुळे येथेच श्रीचक्रपाणी राऊळ यांच्याबरोबर श्रीदत्तात्रेय प्रभुंनी जीवोद्धरणासाठी परावराची ज्ञानचर्चा सहा महिने केली. येथेच निद्रास्थानाच्या बाजूस श्रीचक्रपाणी राऊळाचे आसन स्थान आहे.
ज्या ठिकाणी परमेश्वर अवतार ब्रह्मविद्या निरूपण करतात, ते महास्थान असते. येथे तर उभय परमेश्वर अवतारांनी ज्ञान चर्चा केली. म्हणून या तस्थानाची महिमा अगाध आहे. हे महास्थानाचे महास्थान आहे.
संस्थान श्री देवदेवेश्वर माहूर येथील कवीश्वराचार्य यांचे शिष्य कवी मुकुंदराज यांनी एका आरतीत म्हटले आहे की,
"देवदेवेश्वरी निद्रास्थान ।। दोही वोट्यावर -
वोट्यावर न्याहाळा ।। तेथून तीर्थ झाले चे सोळा।।"
याच कवी मुकुंदराजाची पुढे कारंजगादीवर प्रतिष्ठा झाली. असे :" श्रीदेवदेवेश्वर येथील दोन्ही स्थानाचे महत्त्व असल्यामुळे 'मुळ पीठ नामे शिखर' हे दुसरे कोणतेही नसून ते श्रीदेवदेवेश्वर संस्थानांतर्गत वरील संबंधीत स्थाने होत. शिखर शब्दाचा अर्थ पर्वताचा उंचभाग असा प्रचलित आहे. तसेच प्राचीन मराठी वाङ्मयात शिखर म्हणजे प्रभावशाली केंद्र अशा अर्थाने विविध ठिकाणी योजला गेला आहे. हे भाषाशास्त्र जाणणाऱ्यांना सांगणे न लगे म्हणून 'श्री देवदेवेश्वर मूळ पीठ' असे माझे म्हणणे चूकीचे होणार नाही असा उल्लेख करतो.
श्री भास्करभट्ट बोरीकर यांनी श्री देवदेवेश्वर पीठाचे आचार्य त्र्यंबकाचार्य दिक्षितापासून देवदेवेश्वर पाठशाळेत वेद-उपनिषद- व्याकरण छंद शास्त्र, नव्याचे संस्कृत काव्य ग्रंथाचे अध्ययन केले. सुडोल अत्यंत कुशाग्र बुध्दीचे प्रतिभाशाली भास्करभट्ट या आपल्या शिष्योत्तमाला तद्कालिन रूढीप्रमाणे कन्यादान करून त्याचा सत्कार केला. विवाहानंतर भास्करभट्टांना काशी यात्रेस जाण्याची इच्छा झाली. पत्नी समवेत श्री भास्करभट्ट काशी यात्रेस गेले. काशी क्षेत्रातील पंडित, भास्करभट्टाच्या ज्ञानाने व प्रतिभाशाली काव्य कुशलतेने प्रभावित झालेत व त्यांनी श्री भास्करभट्टांना कवीश्वर या उपाधीने सन्मानित केले. काशी वास्तव्यात त्यांची पत्नी अल्पशा आजाराने मरण पावली. तेव्हा उदास होऊन श्री भास्करभट्ट महाराष्ट्रात परत येत असतांना उज्जयनीच्या यवन अधिकाऱ्यांनी त्यांना देवगिरीच्या यादवाचे हेर समजून अटक केली. बंदीवास घडला. तेव्हा सर्वज्ञ श्रीचक्रधर महाराजांच्या मध्यस्थीने त्यांची बंदीवासातुन सुटका झाली. (प.पू.प.म. श्री पुजदेकरबाबा महानुभाव श्री गोपीराज मठ पुसदा जिल्हा अमरावती यांचे सौजन्याने प्राप्त झालेल्या शके १६५४ मध्ये लिहिल्या गेलेल्या तिन्हीस्थळ ग्रंथाच्या नंतर सदरहु ग्रंथ लेखकाच्याच हस्ताक्षरात लिहिल्या गेलेल्या 'सुधारसाहुन अधिक महिमा नामाची' या प्राचीन आरतीत 'कलींग देशी बाग उज्जेनी, दीली राऊळ : कवी भास्करासाठी आवघे बंदीवान सोडी' हा उल्लेख आढळला.
श्रीसर्वज्ञाकडून भास्करभट्टास ज्ञान प्रबोध झाला व त्यांचे आज्ञेवरून ते श्रीऋद्धिपूर येथे श्रीगोविंदप्रभुच्या सान्निध्यानात आलेत तेथेच श्रीनागदेवाचार्यांदि समस्त भक्तीजन होते. श्रीनागदेवाचार्याकडून त्यांनी ब्रह्मविद्येचे सखोल अध्ययन करून त्यांत प्राविण्य मिळविले.
इकडे माहूर येथे श्री भास्करभट्टाचे सासरे व विद्यागुरु श्री त्र्यंबकाचार्य वार्धक्यामुळे व कन्या जावई यांचा पत्ता लागत नसल्यामुळे क्षीण झालेत. त्यांना पुत्र संतान नसल्यामुळे त्यांनी आपला जावई भास्करभट्टास देवदेवेश्वर पीठाचा उत्तराधिकारी नेमला जावा व त्यालाच सर्व त्यांची या सम्पत्ती, वृत्ती मिळावी म्हणून राजा रामदेव यादवाचा उत्तर सीमेच्या रक्षणार्थ राने किल्ले माहूर येथे असलेला पुत्र बल्हाळ व महाजनाजवळ आपली अंतिम न्येत इच्छा कथन करून तसे लिखित मृत्युपत्र केले व ते नंतर मरण पावले.
श्रीभास्करभट्ट जवळ नसल्यामुळे श्रीत्र्यंबकाचार्याचे बंधू नारायण दिक्षित त्यांचा पुत्र विनायक उर्फ मेधाळ पंडित यांनी त्यांची अंतक्रिया केली. कुटिल विनायकाने जागृतपीठ, पाठशाळा, पीठाला वेळोवेळी विविध राज्यकर्त्यांनी दिलेल्या जहागिरी, जमिनजूमला यांची व्यवस्था भास्करभट्ट येईपर्यंत पाहणे आवश्यक आहे, हे राजपूत्र बल्हाळ व महाजनांना पटवून देवून संस्थान ताब्यात घेतले. बल्हाळाचा कुशलतेने स्नेह संपादन केला. महाजन तथा मान्यवराचा सर्वप्रकारे सत्कार करून त्यांना वश केले. श्रीभास्कर भट्टाचा पत्ता लागत नाही अर्थात ते मरण पावले असा समाचार त्यांनी कुटिलतेने प्रसारित केला व श्री देवदेवेश्वर पीठाचा निरंकुश अधिकारी झाला.
हा समाचार माहुरवरून ऋद्धिपुरास आलेल्या चाटे (फिरते व्यापारी) यांनी यांचे कडून गुरूकुळास कळला तेव्हा त्यांना आद्यकारण श्रीदत्तात्रेय प्रभु व श्रीचक्रपाणी राऊळांची स्थाने तांत्रिक -आगमिक हिंसक अशा विनायकाच्या ताब्यात गेल्यामुळे अतीव दुःख झाले. ही घटना गोविंदप्रभुंना कळली तेव्हा त्यांनी भास्करभट्टास वर देवून ही स्थाने ताब्यांत घेण्यासाठी प्रेरणा दिली.
आवो मेली खादला खळे : जावेचि म्हणे ॥२२ अ. ४॥
न जावे मेली जावेचि म्हणे:
नव्हे कार्य होईल म्हणे ।
ऐसा वरू दीधला दयाघने कवीश्वरा ॥ २४ अ. ४॥
मग श्री नागदेवाचार्याला विचारून श्री भास्करभट्ट कवीश्वर माहुरला प्रयाण करते झाले.
श्री भास्करभट्ट यांनी माहूर येथे येवून राजपुत्र बल्हाळ आणि महाजनाची भेट घेतली. पीठाचा मी उत्तराधिकारी आहे. माझ्या ताब्यांत श्री देवदेवेश्वर पीठ देण्यात यावे अशी मागणी केली. परंतु कुटिल विनायकानी श्रीभास्करभट्ट मरण पावले हा भास्करभट्टाचा तोतिया आहे. असा कांगावा करून पीठ ताब्यात देण्यास विरोध केला तेव्हा समस्त पंडितजनांनी यावर तोडगा काढला की भास्करभट्ट कुशाग्र बुध्दीचे ज्ञानीयाचे होते. म्हणून शास्त्र चर्चेत विनायकास जिंकून आपले प्रमाणत्व सिध्द करावे व श्री देवदेवेश्वर पीठ ताब्यात घ्यावे.
अशाप्रकारे विनायक भट्ट उर्फ मेधाळ पंडित व श्री भास्करभट्टाची शास्त्रचर्चा सुरू झाली. सहा महिने झाले. तेव्हा पंडित आनेराजाने आपला शिष्य राघवभट्ट यांना श्री भास्करभट्टास मदत करण्यास पाठविले. श्रीराघवभट्टाने श्रीआनेराज व श्री भास्करभट्टाच्या आशिर्वादाने श्री भास्करभट्टाचा प्रतिनिधी म्हणून शास्त्र चर्चेत विनायकाचा पराभव केला. तेव्हा महाजनानी जैतपत्र करून दिले. शके ११९७ सालाची ही घटना. श्री देवदेवेश्वर
मुळपीठाचे आचार्यपदी श्री भास्करभट्ट विराजित झाले. अर्थातच देवदेवेश्वरपीठा अंतर्गत श्रीदत्तात्रेयप्रभु व श्रीचक्रपाणी राऊळाची एकूण अशी अष्टादश (एकीवासना सोळा) वंदनीय स्थाने अशाप्रकारे महानुभाव पंथाकडे आलीत. याबाबत भानुविजय या ग्रंथात खालील उल्लेख आलेला आहे.
“अकराशे सत्यान्नवे : युवा वरुखे वामान्वये कुमार मासे तिथी पूणिवे : जैत पत्र दिन्हले ॥१८५॥ अ. ४ :
ऐसे भास्करां सन्मानुनि : बैसका पूजिले उच्चासनी”
यावरि आशिर्वादु पढीनलामुनीः श्रुतीपाठे भाविका ।। १८६ ।।
याच ग्रंथात दुसरा महत्त्वाचा उल्लेख आलेला आहे तो असा की, हे. 'साताशते स्मृतीयेचा अन्वयो लाविला
नरेंद्र तदाश्रयो तथा सव्वासेया या वृधान्वयो
तोच येथ बोलीला ।। २२२।।
वरील संदर्भीय ओव्यात म्हटले आहे की श्री देवदेवेश्वर येथील शास्त्र चर्चेचा उल्लेख रुक्मिणी स्वयंवर कर्ते महाकवी श्री नरेंद्रबास यांनी ची संकलित केलेल्या ७०० स्मृति असलेल्या स्मृति स्थळात व सव्वाशे बला वृध्दाचारात आलेला आहे. तोच तेथे उद्धृत केला असे 'भानुविजय' ग्रंथाचे कर्ते कवी यक्षदेव वर्णन करतात.
नरेंद्राच्या उपरोक्त संदर्भीय स्मृति-वृध्दाचाराचा उल्लेख माझे संग्रहीच्या वृध्दाचार संकलन व इतर स्फुट रचना असलेल्या एका प्राचीन पोथीत देखील आलेला आहे.
इतर ठिकाणी न आढळणारा माहूर येथील शास्त्र चर्चेचा तपशील माळवे संग्रहाच्या वर उल्लेखित पोथीतील एका वृध्दाचाराच्या संकलनात आलेला आहे.
“मेधळ भट्टी म्हणितले तुम्ही दर्शनी कवण: ? राघवभट्टी न्याइक दर्शनात अभिधान करून म्हणितले: “परमेश्वरं द्दश्यतेतिपस्या सौदर्शनात्" मेघळ भट्टी म्हणितले सङ्दर्शनं न दृश्यते:” राघव भट्टी म्हणितले "शक्तिरूपं द्दश्यते (?)” इतुकेन समग्र उगेची राहीले मग महाजनि म्हणितले मेघळभट्ट होती म्हणौनि इतुके दिवस वादु सांघीतलाः राघवभट्टी म्हणितले मेघळ मिथ्याः म्हणौनि वादु केला: तेव्हेळी महाजनी कवीश्वरबासासि जैतपत्र दिधले” या माळवे संग्रहाच्या पोथी शिवाय स्मृति वृध्दाचाराची संवतः १७ ७५ सके १६:४० विलंबी संवत्सरे कार्तिक सुध द्वादसी सुक्रवार तन्दीनी लेखन: झा समाप्त।।
वैदर्भ देसि आंजनगांव प्रगाने टाकरखेंडे नगरी पुस्तक संपूर्न लीहिलें: हस्ताक्षर गणराज सुत मुनि कमळोचेः ॥: असा समाप्ती लेख असलेली "परमेश्वरं द्दश्यतेतिपस्या सौदर्शनात्" उल्लेख असलेली वरीलप्रमाणेच शास्त्रचर्चेचा वृत्तांत असलेली एक पोथी अध्ययनास मला नुकतीच प्राप्त झाली आहे.
श्री नागदेवाचार्याच्या तेरा प्रमुख शिष्यांच्या नावाची तेरा आम्नाय पीठे निर्माण व्हावयाचीच होती. तेव्हा "मेली जावेचि म्हणे: नव्हे होईल म्हणे ऐसा वरू दीधला दयाघने: कवीश्वरा ||२४|| अ. ४
श्रीगोविंदप्रभुच्या वर प्रसादामुळे श्री नागदेवाचार्याच्या शुभेच्छात्मक आदेशाने कवीश्वर श्रीभास्करभट्ट माहूर येथे जाऊन विनायक तांत्रिकाने बळकावलेले श्रीदेवदेवेश्वर पीठ तद्अंतर्गत येणारी अष्टादश (एकी वासना सोळा) वंदनीय स्थाने शास्त्रचर्चा करून शके ११९७ मध्ये जिंकून घेतली, जैतपत्र घेतले आणि श्री देवदेवेश्वर मूळ पीठाच्या भद्रासनी विराजित झालेत. वरील सर्व संदर्भावरून असे निश्चित म्हणता येते की, महानुभाव आचार्य श्रीपरसरामबासाच्या काळात शके १२४५ च्या आसपास निर्माण झालेल्या १३ आम्नायाच्या प्रचलित प्रतिष्ठित असलेल्या सर्वच महान प्रतिष्ठेपेक्षा, गाद्यापेक्षा श्री गोविंदप्रभुच्या प्रसन्नतारूपी वरदानाने शके ११९७ ला श्री भास्करभट्ट कवीश्वराला प्राप्त झालेली श्री क्षेत्र माहूर येथील देवदेवेश्वर मुळपीठाचार्याची श्री भास्करभट्ट कवीश्वरांना प्राप्त झालेली कवीश्वराचार्यांची प्रतिष्ठा महानुभाव पंथात जेष्ठ १३ आम्नाय निर्मितीपूर्वीची म्हणून स्वतंत्र स्वयंसिध्द आहे.
उज्जैनि सह्याद्रि द्वारावती ठाव ।
भर्वसासी देव ओरंगळ ।।१०१।।
भोगराम स्थान विंझु गोंड वाडा ।
आणि द्युतक्रिडा आठ स्थाने ।।१०२।।
इतुकीया स्थाना जाय अनुसरला ।
त्याचा बोध गेला सत्य जाणा ॥१०३ ॥
वर उल्लेखित आठ स्थानाला जावू नये अशा श्रध्दा असल्यामुळे "परमेश्वर अवताराची चरणांकित संबंधीत तेथील बरीच स्थाने गर्दळल्या गेलीत. स्थानपोथीत उल्लेखित आहेत पण प्रत्यक्षात नाहीत अशी शोचनिय दुरावस्था झालेली आहे.
क्रांतदर्शी कवीश्वरबासानी व त्यांच्या माहूर येथील शिष्यांनी तसेच पारिमांडिल्य आम्नायातील तळेगांवकर संत श्रेष्ठानी श्रीदत्त दर्शनाच्या हेतुने सह्याद्रीस जावयास हरकत नाही, येथील स्थानाचे दर्शन घेतल्याशिवाय राहूच नये असा प्रघात सुरू करून माहूर येथील बऱ्याच स्थानाचे रक्षण केले. अनुसरणास पात्र कवीश्वरबासाचे पूर्वाश्रमीचे चुलत सासरे नारायण दिक्षित यांच्याकडे श्री देवदेवेश्वर पीठाची व्यवस्था लावून श्रीकवीश्वर बास अटनास निघून गेलेत.
देवदेवेश्वर पीठाची परंपरा श्री भास्करभट्ट कवीश्वर अनुसरलेले (नारायण दिक्षित) कवीश्वर याचे पासून सुरू झाली व आजता गायत कायम आहे. माझे वडिल सांगत असत महंत श्री दत्तलक्षराज यांचे चांदूर बाजार येथील मठात माहूरचा वृध्दान्वय होता. तेथील मठातील ग्रंथसंपदा सध्या कोठे आहे, याची माहिती मिळत नाही. महंत श्रीदत्तलक्षराज कवीश्वर यांनी संग्रहित केलेल्या श्री देवदेवेश्वर पीठातील पोथ्यातही या बाबत शोध घेणे आवश्यक आहे.
देवदेवेश्वर संस्थान शास्त्र चर्चेत जिंकल्यानंतर कवीश्वरबासानी ज्या काव्यसुमनांनी श्री दत्तात्रेय प्रभुंना अभिवंदन केले ते उद्धृत त्याद्वारेच श्रीदत्तात्रेय प्रभुंना वंदन करून नंतर लेखन विराम.
"सैह्याचळाचिये चुळकें : जयांचे प्रभामंडळ फांके ।
तो श्रीदत्त लल्लाट फळके : नमस्कारितुऽसे ।।
प्रज्ञा भास्कर दि. कों. माळवे