भावनांची ओझी कशाला हवीत? मानसशास्त्र - Manasshastra

भावनांची ओझी कशाला हवीत? मानसशास्त्र - Manasshastra

भावनांची ओझी कशाला हवीत ?

कधीतरी काहीतरी घडलेलं. कुणीतरी काहीतरी बोललेलं किती दीर्घकाळपर्यंत आपण लक्षात ठेवतो भावनांची ही ओझी किती दूरपर्यंत आपण वाहात असतो आणि आपल्या लक्षातही येत नाही की जुन्या भावना मनात साठवून ठेवण्याच्या नादात नवीन भावनांना आपण जागाच देत नाही. मनातला बराच मोठा भाग जुन्या आठवणींनी भरलेला असतो. मग आयुष्यात येणारे नवे क्षण साठवण्यासाठी मनात जागा उरणार तरी कशी?

नव्या अनुभवाने नवीन भावना 

नवीन अनुभव नव्या भावना सहज निर्माण करून जातो. पण आपल्याला मात्र ते लक्षातही येत नाही. मग नव्या भावना तशाच विरून जातात आणि आपण जुनीच जोखड वाहात बसतो. विचारात घेण्याची बाब म्हणजे बरेचदा आपण लक्षात ठेवलेल्या ह्या भावना नकारात्मकच असतात. नकारात्मक गोष्टींबरोबरच आपल्या आयुष्यात नेहमीच सकारात्मक घटनाही घडलेल्या असतात, पण आपण त्या लक्षात ठेवायला विसरूनच जातो. 

व्यवस्थापन करा. 

बायकोने आणून दिलेल्या वाफाळत्या चहाच्या कपाऐवजी तिने केलेली मांडणं दीर्घकालपर्यंत लक्षात राहतात. आपल्या मनात उमटणाऱ्या भावनांचं व्यवस्थापन आपण करायला शिकलं पाहिजे. एखाद्या यशाच्या प्रसंगी आपल्या मनात उमटलेल्या भावना जतन करून ठेवल्या पाहिजेत म्हणजे आयुष्यात जेव्हा निराशेचे क्षण येतील तेव्हा त्या यशाच्या  भावना मनात उलगडता येतील आणि यातूनच पुन्हा नवी उमेद मिळेल. वर्षानुवर्ष भावनांची ओझी वाहात राहण्यापेक्षा त्यांचं व्यवस्थापन करण अधिक सोपं नाही का ?

पण हे व्यवस्थापन करणार कसं ?

भावना मनात उलगडता येतील आणि यातूनच पुन्हा नवी उमेद मिळेल. वर्षानुवर्ष भावनांची ओझी वाहात राहण्यापेक्षा त्यांचं व्यवस्थापन करण अधिक सोपं नाही का ?

१) 'जुने जाऊद्या मरणालागुनी' या नात्याने नकारात्मक भावना विसरण्याचा प्रयत्न करूया.

२) आयुष्यातल्या आनंदाच्या सुखाच्या क्षणांच्या वेळी मनात आलेल्या सुंदर भावना जतन करून ठेवूया.

३) नवीन अनुभव घेण्यासाठी मनाची कवाडे उघडूया.

४) विस्मरण हे एक प्रकारे वरदानच आहे. म्हणूनच आपल्या मनाला त्रास देणाऱ्या भावनांची ओझी विस्मरणात गेलेलीच बरी नाही का ?

अलीकडच्या काळात काळजी, चिंता या माणसाच्या पुजल्या आहेत. फक्त गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीयांनाच संसारातील काळज्यांनी ग्रासले असे नाही, तर श्रीमंत, अतिश्रीमंत माणसालाही चिंता, काळज्या असतातच. कदाचित त्यांचे स्वरूप थोडे वेगळे असेल. या काळज्यांनी माणसांना रात्र-रात्र झोप येत नाही, केस अकाली पिकतात.

अशा काळज्या आणि चिंता यातून बाहेर पडण्याचा एक चांगला मार्ग आपल्याजवळ उपलब्ध आहे. आपण या मार्गाची जुनाट म्हणून हेटाळणीही करतो. मात्र, हा मार्ग आपल्या काळज्या आणि चिंतांचे ओझे बरेच कमी करू शकतो. हा मार्ग आहे दररोज डायरी लिहिण्याचा. म्हणजे अगदी डायरीतच लिहिले पाहिजे असे नाही, पण कोठे ना कोठे तुमच्या मनातले विचार लिहून काढा.‍ 

तुम्हांला आजचा दिवस कसा गेला, ऑफिसमध्ये बॉसशी वाजल्यावर काय वाटले... अशा नाना प्रकारच्या गोष्टी तुम्ही घरी गेल्यावर निवांत बसून लिहून काढू शकता. मनातल्या वेगवेगळ्या भावभावनांना अशा प्रकारे वाट करून दिल्यावर तुम्हांला मोकळे मोकळे वाटायला लागेल. आपल्या मनावरचे ओझे, दडपण, काळजी, चिंता हे थोडे तरी दूर झाल्यासारखे नक्की वाटेल. जर तुम्हाला तुमच्या मनातले कोणापाशी बोलावे असा प्रश्न असेल किंवा तशी जवळची व्यक्ती कोणी नसेल तर तुम्ही आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून 'देण्याखेरीज दुसरा पर्याय नाही.


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post