बोधकथा - वैद्य की आवश्यकता
एक महात्मा अपनी दयालुता के कारण सदा दुखी और पापी कहे जाने वाले अपराधियों से हर समय घिरे रहते थे। यहाँ तक कि जब वे भोजन किया करते थे, तब भी बहुत से पतित लोग उन्हें घेरे रहते थे। एक बार वे बहुत से नीच जाति के और पापी-पतितों के साथ बैठ भोजन कर रहे थे। यह देखकर एक विरोधी ने उनके शिष्य से कहा-तेरे गुरु, जिसे तुम पवित्र आत्मा बतलाते हो, इस प्रकार नीचों और पतितों से प्रेम करता है, उनके साथ बैठा भोजन पा रहा है। फिर भला तुम लोग किस प्रकार आशा कर सकते हो कि हम लोग उसका आदर करें और उसकी बात मानें।’’
महात्मा ने विरोधी की बात सुन ली और विनम्रतापूर्वक उत्तर दिया- वैद्य राज की आवश्यकता रोगियों को होती है, निरोगों को नहीं। धर्म की आवश्यकता पापियों को होती है, उनको नहीं जो पहले से ही अपने धार्मिक समझते हैं। मैं धर्मात्माओं का नहीं पापियों का हित करना चाहता हूँ। उन्हें मेरी बहुत जरूरत है।’
=========================
संस्कृत सुभाषित रसग्रहण
त्वं नो गोत्रपतिस्तवेन्दुरधिपस्तस्यामृतं त्वत्करे
तेन व्याधशराहतां प्रणयिनीमेनां पुनर्जीवय।
इत्यूर्ध्वं गगने निशापतिमृगे कारुण्यमातन्वतः
शृङ्गाग्रादपतन्मृगस्य रुदतो बाष्पाम्बु भूमण्डले॥
हिंदी अर्थ :- पारधी के बाण से खुद की प्रियतमा मृगली का देहांत होने पर, शोकातूर बना हुआ मृग चंद्रमंडल में रहे हुए मृग को संबोधित करते हुए कहता हैं कि, ‘आप हमारे गोत्र के पति हो, आपका स्वामी चंद्र है, उस चंद्र का अमृत आपके हाथ में है; इसलिये उस अमृत से मेरी प्रियतमा को फिर से जिवंत कर दो, जो व्याध के बाण से मारी गयी है।’ इस तरह से जब वह आकाश में रहे हुए चांद के मृग के प्रति खुद की करूणा प्रकट करते हैं, तब, रोनेवाले मृग के सिंग के अग्रभाग से बहकर गरम आँसू पृथ्वी पर गिर रहे थे।
मराठी अर्थ :- पारधीच्या बाणांने स्वतःच्या प्रियतमेला मेलेली बघून शोकातूर झालेला मृग चंद्रमंडलात असलेल्या मृगाला सांगतो की, ‘आपण आपल्या गोत्राचे पति आहांत, चंद्र आपला स्वामी आहे, त्या चंद्राचे अमृत आपल्या हातांत आहे; त्यामुळे त्या अमृताच्या सहायाने माझ्या प्रियतमेला परत जिवंत करा, जी व्याधाच्या बाणाने मेली आहे.’ अशा तऱ्हेने जेंव्हा तो आकाशात असलेल्या चंद्राच्या मृगाजवळ स्वतःची करूणा प्रकट करित होता, तेंव्हा रडणाऱ्या मृगाच्या शिंगाच्या अग्रभागांतून वाहणारे गरम अश्रु जमिनीवर पडत होते.< /span>
विरूपो यावदादर्शे नात्मनः पश्यते मुखम् ।
मन्यते तावदात्मानमन्येभ्यो रूपवत्तरम् ॥
यदा स्वमुखमादर्शे विकृतं सोऽभिवीक्षते ।
तदान्तरं विजानीते आत्मानं चेतरं जनम् ॥
हिंदी अर्थ :- कुरूप मनुष्य आइने में जब तक अपना मुँह नही देख लेता, तब तक वह अपने को दूसरों से अधिक रूपवान समझता है।
मराठी अर्थ :- किन्तु जब कभी आइने में वह अपने विकृत मुख का दर्शन कर लेता है, तब अपने और दूसरों में क्या अन्तर है, यह उसकी समझ में आता है।
चित्रं नर्तनमम्बरे शिखरिणौ शीतांशुबिम्बे तमः
सञ्चारं जलजं कपोतरणितं कामागमप्रक्रियाः।
मीनौ विद्युति तारका विहरणं ज्योत्स्ना विकोशाम्बुजे
कुर्वाते कुरुते करोति कुरुतः कुर्वन्त्यलंकुर्वते ॥
हिंदी अर्थ :- आकाश में दो पर्बत विचित्र नृत्य ‘करते हैं’, चाँद के बिंब पर अंधःकार संचार ‘करता है’, पानी में पैदा होने वाला कबूतर की आवाज कामदेव के आगमन की प्रक्रिया ‘कर रहा है’, दो मछलियाँ चमक पैदा ‘कर रही है’, चांदनी विकसित (बिना कोश के) कमल को अलंकृत ‘कर रही है’।
मराठी अर्थ :- आकाशांत दोन पर्वत विचित्र नृत्य ‘करित आहेत’, चंद्रबिंबावर अंधःकार संचार ‘करित आहे’, पाण्यांत होणाऱ्या कबुतर चा आवाज कामदेव च्या आगमनाचे सूचन ‘करित आहे’, दोन मासळ्या चमक निर्माण ‘करित आहे’, चांदणी विकसित (विना कोशाच्या) कमळाला अलंकृत ‘करित आहे’.
यस्य द्वारि सदा समीरवरुणौ सम्मार्जनं हव्यवाट्
पाकं शीतगुरातपत्रकरणं दस्रौ प्रतीहारताम् ।
देवा लास्यविधिं च दास्यममरा वर्ण्यो दशास्यः कथं
कुर्वाते कुरुते करोति कुरुतः कुर्वत्यलंकुर्वते ॥
हिंदी अर्थ :- जिसके दरवाजे पर वायु और वरूण दोनों साफ-सफाई ‘करते हैं’, अग्नि जिसके घर रसोई ‘करता है’, शीतकिरण चाँद छत्र धारण ‘करता है’, दो अश्विनीकुमार द्वारपाल का कार्य ‘करते हैं’, दश दिक्पाल देव नृत्य ‘करते हैं’, अन्य देव भी संपूर्ण दास्यत्व ‘करते हैं’ ऐसे रावण का वर्णन कैसे हो सकता है?
मराठी अर्थ :- ज्यांच्या दारावर वायु आणि वरूण साफ-सफाई ‘करित आहे’, अग्नि ज्याच्या घरी स्वयंपाक ‘करित आहे’, शीतकिरण चंद्र छत्र धारण ‘करित आहे’, दोन अश्विनीकुमार द्वारपाल चे कार्य ‘’करित आहेत, दश दिक्पाल देव नृत्य ‘करित आहेत’, आणि अन्य सर्व देव दास्यत्व ‘करित आहेत’ अशा रावणाचे वर्णन कसे होणार?
कश्चित्पान्थस्तृषार्तः पथि तपनऋतौ गम्यमानोऽन्यपान्थं
पप्रच्छानन्दलीनो वद पथिक कुतो जह्नुकन्याप्रवाहः।
तेनासौ शीघ्रवाचा प्रचलितमनसा विप्रवर्येण चोचे
सूच्यग्रे कूपषट्कं तदुपरि नगरी तत्र गङ्गाप्रवाहः॥
हिंदी अर्थ :- गरमी की धूप से त्रस्त कोई पांथस्थ किसी मार्ग पर जा रहा था, इतने में अन्य मुसाफिर को देखकर आनंदी होकर उसके पास जाकर पुछता है कि, ‘हे मुसाफिर! बताओ, गंगा नदी का प्रवाह कहाँपर है?’ वह सुनकर कार्य के लिये जल्दबाजी में जाते जाते तेजी से जबाब देता है, ‘थोडी दूर जाकर काँटे का वृक्ष लगेगा, उसके आगे जाकर छः कुँवे आएंगे, उसके आगे शहर आएगा और उसके आगे गंगा का प्रवाह है ।’
मराठी अर्थ :- उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेने त्रस्त कोणी यात्री रस्त्याने जात होता, इतक्यांत त्याला दुसरा प्रवासी भेटतो, आनंदी होऊन तो त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारतो की, ‘हे पांथस्था! नदीचा प्रवाह कोठे आहे ते सांग.’ हे ऐकुन काही कामासाठी त्वरेने निघालेल्या प्रवाशाने घाईघाईने उत्तर दिले, ‘थोडे दूर गेल्यावर काट्याचे झाड लागेल, त्याच्या पुढे सहा बावड्या लागतील, त्याच्या थोडे पुढे गेल्यावर नगर लागेल आणि त्याच्या पुढे गंगेचा प्रवाह आहे.’
पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि काव्यं नवमित्यवद्यम्।
संतः परीक्ष्यान्यतरद् भजन्ते मूढः परप्रत्ययनेयबुद्धिः।।
मालविकाग्निमित्रम् अंक १
अर्थ:- एखादी गोष्ट फक्त प्राचीन आहे म्हणून चांगली असते असे नाही आणि एखादी गोष्ट नवीन आहे म्हणून वाईट असते असेही नाही. शहाणे लोक त्या गोष्टीची परीक्षा करूनच चांगली की वाईट ठरवतात. मूर्ख लोक मात्र दुसर्यांच्या बुद्धिवर विसंबून असतात.
कथा:- 'मालविकाग्निमित्रम्' या नाटकाच्या सुरुवातीस कविकुलगुरु कालिदास यांचे हे उद्गार आहेत. कालिदासाची ही पहिली नाट्यकृती. त्यापूर्वी होऊन गेलेल्या भास कविपुत्र, सौमिल्लक इत्यादी नाटककारांचे नाट्यप्रयोग हे रंगभूमीवर होत होते. आपल्या सारख्या नवीन आणि अप्रसिद्ध कविच्या कलाकृतीस प्रेक्षक कितपत स्वीकारतील अशी शंका कालिदासाच्या मनांत आली. पण त्याला स्वतःच्या काव्याबद्दल आत्मविश्वास होता. जुने ते सर्व चांगलेच असले पाहिजे असे नाही आणि नवीन ते सर्वच टाकाऊ म्हणावे असेही नाही. खरे रसिक हे स्वबुद्धिवर विश्वासून परीक्षा करतात. मूर्ख लोक मात्र दुसर्यांच्या बुद्धीने चालतात. माझ्या नाटकाची परीक्षा रसिकच स्वानुभावाने करतील असा आत्मविश्वास कालिदासाने व्यक्त केला आहे.
स्रोत :- कथा सुभाषितांच्या - डाॅ. मंगला मिरासदार
उद्दामार्कांशुदीप्यद्दिनमणिमणिभिर्भस्मितान्ते
समन्ताद्वायुव्याधूयमानज्वलनकणगणाकीर्णधूलिप्रकीर्णे।
कान्तारेऽस्मिन्तृषार्ते पथि पथिकभवे कापि पाथोदसेना
सूच्यग्रे कूपषट्कं तदुपरि नगरी तत्र गङ्गाप्रवाहः॥
हिंदी अर्थ :- जंगल का जो अग्रभाग प्रचंड सूरज के किरणोंसे तप्त सूर्यकांत मणी के ज्वालाओं से जल गया है, वैसे ही मुसाफिर के चलने का मार्ग चारों ओर वायु के बवंडर से उडते हुए अग्नि के कणों से व्याप्त रहे हुए रजःकण के गोलों से भरा हुआ हैं, ऐसे मार्ग से जानेवाले मुसाफिर जब प्यास से पीडित होता है, तब कोई जल का प्रवाह आसपास है? इसके जबाब में कहा है कि, इस काँटे के पेड के आगे छः कूवे हैं, उसके पास नगरी है और उसके आगे गंगा का प्रवाह है।
मराठी अर्थ :- जंगल चा जो अग्रभाग प्रचंड सूर्याच्या किरणांनी तप्त सूर्यकांत मणीच्या ज्वाळांनी जळून खाक झालेला आहे, तसेच पांथस्थाचा चालण्याचा मार्ग चारही बाजूंनी वादळवाऱ्याने उडणाऱ्या अग्निच्या कणांनी व्याप्त अशा रजःकणांच्या गोळ्यांने भरलेला आहे, अशा मार्गावर चालणारा यात्री जेंव्हा तहानेने व्याकुळ झालेला आहे, तेंव्हा एखादा जलप्रवाह जवळपास आहे का? ह्याचे उत्तर देतांना सांगतात की, ह्या काट्याच्या वृक्षाच्या पुढे सहा विहिरी आहेत, त्याच्या पुढे गेल्यावर नगरी लागेल आणि त्याच्या पुढे गंगेचा प्रवाह आहे.