स्मृतीस्थळ प्रश्नावली - महानुभाव पंथिय ज्ञान सरिता - smruti sthal prashnawali mahanubhav-panth

स्मृतीस्थळ प्रश्नावली - महानुभाव पंथिय ज्ञान सरिता - smruti sthal prashnawali mahanubhav-panth

 महानुभाव पंथीय इतिहास 

स्मृती स्थळ प्रश्नावली 

सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी ऋद्धिपूरहून उत्तरापंथी गेल्यानंतर श्रीनागदेवाचार्य भानखेड्याच्या डोंगरात विस्मृति होऊन सहा महिने पडून राहिले. तरी इकडे ऋद्धिपुरला असलेल्या मंडळींना व महादाइसांना याची कल्पना नव्हती. एके दिवशी महादाइसा श्री गोविंदप्रभूंजवळ जावून म्हणाल्या. “स्वामी श्रीचक्रधर आम्हास सोडून गेले आणि नागदेवही दिसत नाही.” 

तेव्हा श्रीगोविंदप्रभू म्हणाले " मेली जाए भानखेड्याला आहेत. तेथे जा ! मग गोविंदप्रभूच्या सांगण्यावरून महादाइसा भानखेड्यास गेल्या. त्यांनी गावात शोध घेतला. परंतु तिथे त्यांना श्रीनागदेवाचार्य कोठेहि दिसले नाहीत. मग त्या गावचा शिवार शोधावा. म्हणून त्या शिवार शोधत चालल्या. तेव्हा त्यांना एक डोंगर दिसला ! तेथे गुराखी मुले होती. तेथे जाऊन त्यांना विचारले. 

“तुम्हाला येथे कोणी वेडा पिसा दिसला का?” मुलांनी उत्तर दिले "हो, आई ! येथे बरेच दिवसा पासून एक मनुष्य पडलेला आहे. आम्ही दररोज गवताचा रस काढून त्याच्या तोंडात घालत असतो. येथून तो थोड्याच अंतरावर आहे. तेथे जा” , असे सांगून त्या मुलांनी अंगुली निर्देश करून दाखविले. त्यांनी दाखविलेल्या दिशेकडे महादाइसा गेल्या. त्यांना थोड्याच अंतरावर श्रीआचार्य संभ्रम अवस्थेत पडलेले दिसले. 

त्यावेळी श्रीनागदेवाचार्यांना दहावी अवस्था प्राप्त झाली होती. अंगावर वाळ्याव्यांने मातीचे टेक केले होते. इतकी अवस्था झाली तरी त्यांना सर्वज्ञ नेण्यास आले नव्हते. कारण श्रीनागदेवाचार्यांना अधिकरण करून ज्ञानपंथ चालवावयाचा होता. त्यांच्या मुखातून परमेश्वराचे लीळाचरित्र अभागी जीवांना ऐकवायचे होते. रहस्यमय ज्ञानामृताचे डोस अधिकारी जीवाना पाजविण्यासाठी निमित्त करावयाचे होते म्हणूनच की काय ! त्यांच्या देहाची जीवनकळा मालवली नव्हती.

 त्यांच्या अंगावर मातीचे टेक चढले होते इतकेच ! महादाइसाने ते सर्व झाडून काढले. गवताचा रस काढून त्याच्या तोंडी घातला. रस पोहोचताच ते सावध झाले. तिने त्यांना पाठीवर घेवून गांवाजवळ आणले (भानखेड्याजवळ) गावातून दूध आणून पाजविले. दूध पाजविल्यानंतर त्यांना पूर्वीपेक्षा अधिक सावधपणा आला आणि शक्तीही आली. मग महादाइसा श्रीआचार्याना म्हणाली, 'चल आपण सर्वज्ञांच्या भेटीला जाऊ या ' “स्वामी कोठे आहेत?” असे श्रीनागदेवांनी महादाइसांना विचारले. 

महादाइसा म्हणाल्या, "हे नव्हे ऋद्धिपुरी श्री प्रभू सर्वज्ञ असती त्यांनी तुम्हाला बोलाविण्यासाठी मला पाठविले आहे.” “मला ते माहीत नाही श्रीप्रभू ! माझा देव श्रीचक्रधरच आहे.” असे श्रीनागदेवांनी महादाइसांना उत्तर दिले. “असे कसे म्हणत आहात. स्वामींनी मला तुमच्या सांभाळी घातले. आणि तुम्हाला श्रीप्रभूच्या सांभाळी घातलं.” अशी महदाइसांनी मागील आठवण करून दिली. महदाइसांनी दिलेल्या उत्तरामुळे श्रीनागदेवाचा संभ्रम दूर झाला. स्मृति उजळली व त्यांनी रिद्धपुरला जाण्याचा निश्चय केला. 

ते निमुटपणे ऋद्धिपूरची वाट चालू लागले. त्यांच्या अंतःकरणात एकच ध्यास होता की आपणास श्रीचक्रधर प्रभू भेटावे. आधी वाटेने भेटलेल्या लोकांना अथवा गावातुन भिक्षा मागतेवेळी  श्रीचक्रधर द्या !' असे श्रीनागदेवाचार्य म्हणत असत. त्या लोकांनी आचार्यांना ओळखले व म्हणू लागले, “ हे ते नाहीत का! जे भिक्षेत श्री चक्रधर द्या असे म्हणायचे” तेव्हा “श्रीचक्रधराविना नागदेव वेडा पिसा झाला आहे.” असे महादाइसा लोकांना सांगत असे. 

अशाप्रकारे स्वामीविना दुःखी कष्टी झालेले दोन भक्त मुक्काम करीत करीत ऋद्धिपुरास आले. त्यावेळी मठांत श्रीगोविंद प्रभु नव्हते. ती वेळ सकाळची होती. श्रीगोविंदप्रभू लीळावशे पाच पिंपळाकडे गेले होते. तेथे जावून त्या दोघांनी त्यांची भेट घेतली. भेटतांना त्यांचे दुःखाश्रु दाटलेले पाहून श्रीप्रभूंनी त्यांची समजूत घातली मग श्रीप्रभूंनी त्यांना आपल्या जवळच रहाण्यास सांगितले. तेव्हा पासून श्रीनागदेवाचार्य आपल्या भक्तजनासहित श्रीगोविंदप्रभूच्या सान्निध्यात राहू लागले.

स्मृतीस्थळ प्रश्नावली

प्रश्न १) :- श्रीनागदेवाचार्यांचे अनुसरण वयाच्या कितव्या वर्षी झाले?

उत्तर :- श्री नागदेवाचार्य हे वयाच्या ३२ व्या वर्षी सर्वसंग परित्याग करून अनन्यभावे परमेश्वराला अनुसरले.

प्रश्न २) :- श्री नागदेवाचार्यांचे अनुसरण कुठे झाले?

उत्तर :- परब्रम्ह परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम खडकुली येथे असताना श्री नागदेवाचार्य अनुसरले.

प्रश्न ३) :- आचार्यांना किती वर्षे देवाचे सन्निधान लाभले?

उत्तर :- श्रीनागदेवाचार्यांना देवाचे ४ वर्षे सन्निधान लाभले. त्यात ६ महिने देवाने त्यांना श्रीगोविंदप्रभू महाराजांच्या सान्निध्यात ऋद्धिपूरला पाठवले होते. 

प्रश्न ४) :- आचार्यांचे एकूण शिष्य किती? 

उत्तर :- ५०० 

प्रश्न ५) :- आचार्यांचे मुख्य शिष्य कोण? 

उत्तर :- श्रीबाईदेवव्यास हे आचार्यांचे मुख्य शिष्य होते. 

प्रश्न ६):-  श्रीनागदेवाचार्य श्रीगोविंदप्रभूंच्या सन्निधानात किती वर्षे होते? 

उत्तर :- १४ वर्षे 

प्रश्न ७):- श्रीचक्रधर प्रभुंच्या वियोगात आचार्य कुठे गेले

उत्तर :- श्रीचक्रधरप्रभुच्या वियोग दुःखाने आचार्य भानखेडीच्या डोंगरात गेले. 

प्रश्न ८):- भानखेडीच्या डोंगरातून आचार्यांना कुणी आणले? 

उत्तर :- भानखेडीच्या डोंगरातून आचार्यांना महदाईसांनी आणले. 

प्रश्न ९):- भानखेडीहून आल्यावर श्रीगोविंदप्रभू महाराजांची आणि आचार्यांची भेट कुठे झाली? 

उत्तर :- दाभेरी रस्त्यावरील पाचपिंपळ या स्थानावर श्रीप्रभूबाबा क्रिडा करत होते. तेथे भटोबासांची आणि महादाईसांची भेट झाली. 

अजून प्रश्नोत्तरे वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 

Click hare 👉 १) वासनिक धर्म प्रश्नोत्तरी

२) हे ७ गुण स्त्रीयांचे सात अलंकार आहेत

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post