८४ लाख नरकयोनी फेरा-मोठी समस्या, मोठी चिन्ता !

८४ लाख नरकयोनी फेरा-मोठी समस्या, मोठी चिन्ता !

 ८४ लाख नरकयोनी फेरा-मोठी समस्या, मोठी चिन्ता !



परब्रम्ह परमेश्वर भगवान श्रीचक्रधर स्वामींच्या वचनानुसार, ‘‘जो जीव कलियुगात जन्म घेतो त्या जीवास केवळ कलियुगाच्या कालावधीमध्येच साठ लाख वर्षे नरक योनींचा भोग भोगावा लागतात. त्याला चौकडीचे नरक असे म्हणतात.

       भगिनींनो ! मी ही गोष्ट अनेक वेळा ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये वाचली परंतु यापूर्वीच्या तिन्ही पुस्तकात उल्लेख करण्याचे राहून गेले आहे. हे वचन वाचल्यानंतर जे भक्त गृहस्थाश्रमात आहेत त्यांच्याबद्दल खुप वाईट वाटते व मन थरथरून जाते. त्यांनी अद्याप उपदेशही घेतलेला नाही आणि ईश्वर भक्तीचाही स्वीकार केलेला नाही. बरेच लोक घरात पुर्वजांपासून परंपरेने चालत आलेला मोक्षमार्ग त्याचा अनुग्रह घेणे हे टाळत असतात. देवाने कृपेनेच आपल्याला खऱ्या मोक्षमार्गाचा योग आलाय म्हणून बंधुनो! परमेश्वर भक्तीपासून लांब राहून स्वतःला फसवू नका.

       महादाईसांनी एकदा श्रीचक्रधरप्रभुंना विचारले की, ‘‘हे स्वामीराया, कलियुगातील जन्म नरक भोग आम्हासही भोगावा लागेल?’’ तेंव्हा श्री चक्रधर स्वामी म्हणाले, ‘‘नाही, कदापि नाही, जो जीव जीवनांच्या अंतिम क्षणापर्यंत आमच्या श्रीचरणी शरण असेल. तसेच कितीही संकटे येऊ शेवटपर्यंत एकनिष्ठ राहून देवी देवतांकडे शरण जाण्याचा विचार तिळमात्र सुद्धा मनी आणत नाही किंवा देवी देवतांना शरण जात नाही. त्या जीवांना हा नरक भोग भोगावा लागत नाही.’’

 

महादाईसांनी परमेश्वर श्रीचक्रधर स्वामींना पुन्हा विचारले, ‘‘हे दयालु, मायाळु कृपाळु स्वामीराया, कोणत्या पापकर्माच्या सहाय्याने जीवास इतका लांबचा नरकवास भोगावा लागतो. ?’’

त्यावर श्रीचक्रधर स्वामीजींनी उत्तर दिले की, ‘‘६० लाख वर्षांचा चार युगाचा काळ लोटल्यानंतर इथे संहार होतो. त्यानंतर कृतयुग रचले जाते. तिथे परमेश्वर अवतार घेऊन जीवास ईश्वर ज्ञान देतात. याप्रमाणे ज्ञान दिल्यानंतर सुद्धा जो जीव मला सोडून देवी देवतांना शरण जातो व इतरत्र पापकर्मास भटकतो तेंव्हा मात्र ईश्वरास खंती येते आणि याचीच परिनिती तो नरकवास वरील प्रमाणे भोगण्यास पात्र ठरतो. तोही दंड देवी देवतांमार्फतच जीवास भोगावा लागतो.

       पण जे माझे ईश्वरभक्त संपूर्ण जीवनभर ईश्वरीय सान्निध्य सोडत नाहीत. दूर जात नाहीत त्यांना चिन्ता करण्याचे कारण नाही. परंतु जो जीव ईश्वर श्रीचरणी शरण जात नाही आणि सतत देवी देवतांच्या भक्ती सान्निध्यात सातत्याने राहतो त्याला वरील नरकवास भोगावा लागतो. त्यांनी तात्काळ या मोठ्या नरक भोगातून मुक्तता होण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे व ईश्वरचरणी विनिमय सतत केला पाहिजे हाच यावर मार्ग म्हणावा लागेल.

पाप कर्माशिवायही नरक वासांत जाणे शक्य !

       श्रीमद्भगवद्गीता या ब्रह्मविद्या शास्त्रानुसार एका वचनात सांगतात की, काही जीव अनेक पापकर्म करून नरक योनीमध्ये भोग भोगतात. तर काही पाप कर्म न करतांही नरक वास भोगण्यास तयार होतात. जर त्या जीवाने दुसऱ्या जीवाने केलेले दुष्कर्म आठवले, व त्याची निंदा केली तरी त्या पापकर्माचा आठवसुद्धा त्या जीवांस नरक वास भोगण्यास कारणीभूत ठरतो. माझ्या बन्धु भगिनींनो ! परमेश्वर सर्व गुण संपन्न आहे, मात्र जीव दोषाचे भण्डार आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात दोष असतात. एवढाच त्यात फरक सांगता येईल.

       एखाद्या साधुंचे दोष पाहुन त्याचा पुन्हा पुन्हा आठव करणे, त्या साधुचे दोष इतरत्र कथन करत बसणे, त्या साधुची निंदा करणे याचाही खुप मोठा दंड आपणांस भोगावा लागतो. वेळ प्रसंगी धर्म - कार्य व ईश्वर भक्तीपासूनही परावृत्त होऊ शकतो.

म्हणूनच भगवान श्रीचक्रधरस्वामींनी वचनानुसार सांगितले आहे की, ‘‘इतरांचे दोष पाहू नका. इतरत्र सांगू नका. उलट आपले दोष आठवून आपणच त्याचा पश्चाताप करावा आपण जर इतरांचे दोष पहात बसलो व इतरांशी कथन करत बसलो तर ज्याच्याविषयी दोष आहेत त्यास हे समजल्यावर तो दुःखी होऊन स्वतःचा नाश करेल व आपण विनाकारण त्या दोषास अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरू म्हणूनच इतरांचे दोष पहाण्यापेक्षा आपले दोष शोधा व वागा.

एका कवीने याबद्दल म्हणले आहे.

जिंदगीभर युहीं गलतिया करता रहा गालिब ।

धुल चेहरें पें थी और मैं आइना साफ करता रहा ।।

आपण जन्मभर हेच अपराध करत आलो आहोते. इतरांना दोषी ठरवत आलो आहोत. पण सर्वात मोठे दोषज तर आपण आहोत. हे आपण विसरून जातो. आणि नरक योनी जोडून घेतो.

पू.. रूपाबाई जी. गीताबाई जी पंजाबी

--------------------

       सज्जन हो ! आजकाल साधु संतांची निंदा करणारे बहुशाल लोक पाहण्यात येतात. पण आपणा सर्वांना हे सांगावेसे वाटते की, हे खुप चुकीची गोष्ट आहे. मान्य आहे की काही साधुंनी गैरवर्तन करून या समाजाचा विश्वासघात केला आहे. पण सर्वच साधु तसे असतात असे समजणे चुकीचे आहे. जसे गृहस्थाश्रमात सर्वच शराब पितात, सर्वच मांस खाताच अनाचार करतात असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण बहुसंख्य लोकांचे आचरण चांगले आहे. त्याचप्रमाणे अनेक साधुसंत देवाचे भक्त आहेत. त्यांना या भौतिक सुखांशी काही घेणे-देणे नाही. ते फक्त परमेश्वरभक्तीत लीन असतात. अशा साधु महात्मांनाही पाहून जर एखादा त्यांची निंदा करील तर फार मोठे पाप लागते. कारण त्यामुळे साक्षात परमेश्वराला खंती येते. म्हणून सावध व्हा. सगळेच गृहस्थ जसे अनाचारी नाहीत. तसेच सर्वच साधु अनाचारी नाही. हे लक्षात घ्या.

मित्रांनो! आजकाल पावलापावलावर पाहण्यात येते की, लोकं खुप क्रोधाने भरलेले असतात. थोडे काही चुकले की लगेच घाणेरड्या शिव्या देतात. आपण हे टाळावे.

दोहा :-

गाली कभी न बोलना गाली सुनना आप

क्षमाशील रहना सदा, जिन उत्तम चुपचाप ।।

जिन उत्तम अद्य नष्ट हो, क्षमा शस्त्र कर धार

रागादिक दुश्मन हनन, मर्मकथन स्वीकार ।।

 

       इतरांना अप्रिय बोलताना आपल्या शब्दांना दारिद्र्य येते. आणि आपल्या शब्दांना काहीच किंमत राहत नाही. आणि जे कधीही अप्रिय बोलत नाहीत. त्यांच्या शब्दांना वैभव येते. सर्वांशी प्रिय मधुर बोलणे हेच ज्यांचे धन आहे, प्रियवचन बोलण्याचाचा ज्यांना अभिमान आहे. परनिंदेपासून जे पराङ्गमुख आहेत. जे कुणाचीही निंदा करत नाहीत. असे सज्जन क्वचितच आढळणारे आहेत तेच या पृथ्वीचे खरे हिरे आहेत. त्यांच्यामुळेच ही पृथ्वी आलंकृत, सुशोभित झालेली आहे.

       शत्रुच्या बाणाने झालेला शरीराचा घाव भरला जातो ; कुर्‍हाडीने तोडलेला वृक्षसुद्धा पुन्हा पानाफळाफुलांनी बहरु शकतो ; परंतु जिव्हारूपी तिक्ष्ण कठोर शब्दांनी झालेले घाव कधीही भरत नाहीत. जिभेवरची जखम लवकर भरते. पण जिभेने झालेली जखम कधीच भरत नाही.

 

ज्याची आपण निंदा करतो त्याची पापे आपल्याला चिकटतात.

       फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे पद्मावती नगर नावाचे राज्य होते त्या राज्यात एक सुशिलानावाची पतिव्रता राहात असे त्या पतिव्रतेच्या घरासमोर एक मधुमति वेश्या ही राहत असे ती पत्ती प्रथा वेश्येच्या दिनचर्येला, व तिच्या भोगविलासाला लपून-छपून पाहत असे व तिची निंदा करीत असे. तिला कुलटा, कर्मदरिद्री, पापी स्त्री इत्यादी अपशब्द लावून तिची भरपूर निंदा करीत असे.

       आणि ती मधुमति वेश्या मात्र मनाने खुप चांगली होती. ती पतिव्रतेकडे सादर अंतःकरणाने पाहत असे. तिचे पतीबद्दलचे स्नेह, पतिबद्दलचा एकनिष्ठ भाव, सुशिलेने पतीची केलेली सेवा पाहून तिचे अंतःकरण गदगद होत असे. व तिला तिच्या वर्तनाचा देहविक्रय करून पैसे कमविण्याचा पश्चाताप होत असे. ती त्या पतिव्रतेला साक्षात देवीचे रूप मानत असे.

       एक दिवस संसाराच्या नियमाप्रमाणे दोघांना एकाच दिवशी मृत्यू आला. पतिव्रता अगोदर स्वर्गात पोहोचली आणि त्याच्या मागोमाग त्या वेश्येचा  आत्माही स्वर्गात आला आणि त्या वेश्येला स्वर्गात उच्चस्थानी जागा मिळाली आणि पतिव्रतेला तिच्यापेक्षा खालच्या स्थानात जागा मिळाली हे पाहून पतिव्रतेला क्रोध आला व ती यमराजाला म्हणाली, ‘‘हे यमराज ही स्त्री एक वेश्या असून तिने जन्मभर पापंच केली आहेत, तरी तिला माझ्यापेक्षा श्रेष्ठ स्थान का मिळाले?’’

       यावर यमराज गंभीर झाले व म्हणाले, ‘‘तुझा पतिव्रता धर्म तुझ्या शरीर मर्यादेपर्यंतच सीमित होता. ही स्त्री शरीराने जरी वेश्या असली तरी तिचे मन निरहंकार झाले होते. तिला ते तिच्या पापांचा पूर्ण पश्चाताप होता. तिने तुझ्याबद्दल कधीही वाईट बोलणे केले नाही, उलट तुला पूज्य मानले. म्हणून तुझ्या शारीरिक पतिव्रता जितके पुण्य प्राप्त झाले तेवढेच पुण्य या वेश्येही ही कमावले आहे. किंबहुना त्यापेक्षा तिचे पुण्य अधिक आहे. कारण तू तिची निंदा करून करून तुझेच पुण्य बरेचसे नष्ट केले आहे. म्हणून तिला तुझ्यापेक्षा उच्चस्थानी बसविण्यात आले आहे.’’

पतिव्रतेला आपल्या निदांनालस्तीचे खुप वाईट वाटले. व तिने त्या वेश्येजवळ क्षमा मागितली. पण आता त्याचा काहीही उपयोग नव्हता. श्रेष्ठ स्थान तिने गमावले होते.

म्हणून कधीही इतरांची निंदा करू नका.

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post