श्रीदत्तात्रेयमहाराजांची तीन मुखी मुर्ती काल्पनिक आहे
दिल्ली, पंजाबमध्ये २,३ वर्षापूर्वी ‘सती अनुसूया’ हा सिनेमा चित्रपट गृहामध्ये दाखविण्यात आला. त्याची कथा काही भक्तांनी आम्हास सांगितली तीचे थोडक्यात वर्णन खालील प्रमाणे.
श्रीदत्तात्रेय महाराजांची आई माता अनुसूया ही पतीव्रता धर्माचे आचरण करत होती ती अतिशय काटेकोरपणे नियमांचे पालन करून हे व्रत आचरत असे. त्यामुळे तिची सर्व संसारात खूपच स्तुती होत होती. एकदा नारदाने माता अनुसूया ही पतीव्रता धर्माच्या आचरणाची स्तुती केली. ही स्तुती ऐकून ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या धर्मपत्नी लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री यांच्या मनात द्वेषभाव निर्माण झाला. त्यांना अनुसूयाची स्तूती ऐकून खूपच कसेसे वाटत असे. तेंव्हा त्यांनी त्यांच्या यजमानांना (नवऱ्यांना) सती अनुसूयाचे पतीव्रतेचे व्रत भंग करण्याविषयी सुचविले. आपल्या लाडक्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्याच्या विचाराने तीघे जण एकत्र आले व सर्वांनी मिळून सती अनुसूयाच्या घरी भिक्षा मागण्यास जाण्याचे ठरविले. अनुसूयाच्या घरी आल्यावर अनुसूयाने आपण काय खाणार असे विचारले? त्यावर त्यांनी तांदळाच्या आकरातील छोटे छोटे कंकर (दगड) तिच्याजवळ दिले व ‘‘याची खीर करून आम्हास भोजन दे’’ असे सुचविले.
मातेच्या लगेच लक्षात आले की, हे कुणी सामान्य ब्राम्हण नाहीत. हे परिक्षा पाहण्यासाठी आले आहेत. अनुसूया मातेने त्या गारा स्वच्छ पाण्याने धुवून पातेल्यामध्ये शिजण्यासाठी चुलीवर ठेवली व परमेश्वराचे चिंतन करू लागली. थोड्या वेळाने ती खीर झाल्याचे पाहून तिने या तीनही ऋषींना जेवण्यासाठी बोलविले.
जेवणासाठी आल्यावर त्यांना खीर तयार झाल्याचे पाहून आश्चर्य वाटले व विचार करू लागले. ही तर आता आपली भोजनाची इच्छा पूर्ण करणार! मग हिचे व्रत भंगणार कसे? नष्ट कसे होणार हे लक्षात आल्यावर त्यांनी तीला, ‘‘आम्ही जेवतो परंतु तू आम्हास विवस्त्र म्हणजे अंगावर कोणताही कपडा न घालता वाढत असशीलल तर जेवतो.
अनुसूया पतिव्रता धर्म भंगण्याच्या संकटात पडली आता काय करावे. विचार करू लागली. तिने पुन्हा ईश्वराचा धावा केला व मदतीची मनातून याचना केली. थोड्याच वेळात श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्या तिन्ही साधुंना सामर्थ्याने लहान बाळ केले. ते तिघेही लहान बाळं दिसू लागली. मातेने ते पाहून त्यांना विवस्त्र होऊन जेवण खाऊ घातले व आपले व्रत पूर्ण केले. इकडे व्रतभंग करण्यास आपले पती गेलेले अद्याप का आले नाहीत याची काळजी लक्ष्मी, पार्वती व सावित्री करू लागल्या बराच वेळ झाल्याने त्या पतीशोधासाठी अनुसूयेकडे आल्या. पाहतात तर काय! आपले पती लहान बाळकांच्या रूपात पाळण्यात खेळत आहे.
ते पाहून त्या घाबरल्या, दुःख करू लागल्या व आपल्या केलेल्या चुकीसाठी पश्चाताप करू लागल्या. त्यांनी पतिदेवांना पूर्ववत् करण्यासाठी अनसूया मातेला प्रार्थना केली. मातेने म्हटले. ‘‘तुम्ही आपापल्या पतीस हात लावा ते मोठे होतील.’’ त्या तिन्ही चिंतीत झाल्या कारण तिघेही बाळकं सारखे दिसत होते. पार्वती विचार करू लागली की, चुकून विष्णुला हात लावला तर आपला पतिव्रता धर्म भंगेल. इतरही दोघीही हाच विचार करू लागले. शेवटी त्यांना रडू कोसळले. डोळ्यात अश्रू आणून अनुसूयेकडे क्षमा याचना करू लागल्या, व आपणच यांना पूर्ववत् करा असे म्हणून प्रार्थना करू लागल्या. हे सर्व पाहून बाळरूपी श्रीदत्तात्रेय महाराजांनी पुन्हा त्यांना पूर्वरूप केले. ब्रम्हा विष्णु महादेव तिघांनी श्रीदत्तात्रेय महाराजांजी व अनसूया मातेची क्षमा मागितली.
अशा प्रकारे चित्रपटांमध्ये दाखविलेल्या धर्म कथेतूनही भक्त बोध घेऊ शकत नाही याचे खूप वाईट वाटते. भगवंताचे सामर्थ्य किती मोठे आहे. याचा बोध यावरून आपण घ्यावा असे वाटते. परमेश्वर भक्तीतून संकटाच्या वेळी ईश्वर कसे सहाय्य करतात याची कल्पना या ठिकाणी कोणी केली का? नसेल केली तर नीट कल्पना करा व आपण करत असलेल्या देवी देवतांची पुजा योग्य आहे का हे ठरवा.
या कथेचा विचार पुढे त्रिमूर्ती श्रीदत्तात्रेय मूर्तीच्या कल्पना अज्ञान मंडळींनी केलेला आहे. काहींचे मत असे आहे की सुमारे तिनशे वर्षांपूर्वी शैव आणि वैष्णवांचे भांडण मिटण्यासाठी धूर्त ब्राम्हणांकडून तीन मुखी दत्त हे काल्पनिक दैवत निर्माण करण्यात आले आहे. कारण पुराणांमध्ये किंवा प्राचिन संस्कृत ग्रंथात कुठेही तीन मुखी श्रीदत्तात्रेयांचा उल्लेख नाही. सगळीकडे श्रीदत्तात्रेयप्रभू हे एकमुखीच आहे. आणि मनुष्य देहात असल्याचेच प्रमाणं अनेक ठिकाणी आहेत हे विसरता कामा नये. त्रिमूर्ती दत्त ही वास्तविकता नाही. ही निव्वळ कल्पना आहे. हेही या ठिकाणी लक्षात ठेवावे. अर्थात हे ईश्वरभक्ती करणाऱ्यांनाच लवकर पटेल. अन्य देवतांची भक्ती करणाऱ्या अज्ञान लोकांना हे समजणे कठीणच !
विशेष किंवा प्रसाद मागणी करणे/ किंवा विकत घेणे अत्यंत चुकीचे आहे.
आजकाल आपण आपल्या तीर्थस्थानांजवळ विशेष व प्रसाद हे विक्री करतांना आढळतात. त्याबद्दल आपणांस काहीही खात्री नसतांना विकणाऱ्यांवर उगीच विश्वास ठेवून आपण देवपुजा, प्रसाद विकत घेतो. आणि त्या अमूल्य वस्तुचे मूल्य करतो. विना खात्रीचे व विना परमेश्वर चरणांकित विशेषांना किंवा प्रसादांना नमस करणे म्हणजे पूर्णपणे ‘विकल्प’ घडणे होय
आता भगवान श्रीचक्रधरप्रभुंना उत्तरापंथी गेलेले जवळ जवळ ८०० वर्षे झालेले आहेत. तेंव्हा त्यांच्या प्रत्यक्ष श्रीचरण संबंधातील पाषाण किंवा इतर वस्तु आज थोडीच सहजा सहजी मिळू शकतील. हे आपणांस सोपे वाटते का? तेंव्हा योग्य विचार करा व अशी देवपुजा, प्रसाद विकत घेऊ नका.
कदाचित आपणाजवळ देवपुजा नसेल किंवा जास्तीत जास्त विशेष आपणांकडे असावेत असा हेतु आपल्या मनी असेल. तेंव्हा अशी खुळचट कल्पना मनी ठेवू नका व उगीचच खोटी देवपूजा विकत घेऊ नका विकल्प घडू देऊ नका. आपणास देवपूजा नसेल तर ज्या मंदीरामध्ये अनेक वर्षापासूनची देवपूजा आहे अशा मंदीरातील महात्म्यांना प्रसन्न करून घ्यावे व विनंतीपूर्वक अडचण सांगावी व विशेष प्रसन्नता असल्यासच मिळवावा. बळजबरीने मागणी करून विशेष मिळवू नये. प्रत्यक्ष श्रीचरण संबंधाचा विशेष जरी आपण त्या महात्म्यांच्या इच्छेविरूद्ध घेतला तर त्याचा अर्थ नाही. त्यापासून गोमटे मिळत नाही. आपणांकडे जर पूर्वीची देवपूजा असे तर नव्याने पुन्हा अशी देवपुजा विकत घेण्याचे काहीच कारण नाही. आहे त्याच विशेषांना व्यवस्थित नित्यनेमाने विधीवत पुजा अर्चा करून भजावे. तेंव्हा विचार पूर्वकच देवपुजा प्रसन्नतेने मिळवा.
जास्त विशेष असले म्हणजे देवधर्म चांगला होतो असे अजिबात नाहीये. एकच विशेष चांगला भावपूर्वक केला तरी थोर गोमटे होते. आपले लाखो पूर्वज गळ्यात एक विशेष घेऊन देशाच्या सेवटी गेले. व त्यांनी तो एकच विशेष नमस्कार करीत देह क्षेपले. व मुक्त झाले. दंते गोपाळबास, नाती नागाइसा, कोथळोबा, असे लाखो महानुभावांजवळ एकच विशेष होता. म्हणून पैशाने विकत घेऊ नका. विकल्पाला शरण जाऊ नका. वायफळ लाभ धरू नका.
स्थान नमस - तीर्थयात्रा - विधी कसा करावा
अती वेगात चारचाकी गाडी, कार इतर वहानांनी जाऊन स्थान नमस करणे व तेही एका दिवसांत जास्तीत
जास्त स्थान नमस करणे असा हेतु घेऊन तीर्थस्थानास जाणे उचित नाही. त्यापासून आपणास
गोमटे, लाभ मिळतो परंतु ते अतिशय कमी प्रमाणात मिळतो. त्यामुळे आपणांस भगवंताकडून किंवा
श्रीचक्रधर स्वामींकडून विशेष प्रसन्नता मिळेल की नाही. याकडे लक्ष न देता स्थान नमस
कसे होईल या हेतूने आज सर्व यात्रेकरू घाई
गडबड करून तिर्थयात्रा करतात. पण त्यामुळे विशेष लाभ होत नाही.
तिर्थस्थान करण्यास आपण कसे जावे याविषयी खालील विचार मांडत आहे. सर्वांनी त्याकडे लक्ष द्यावे व त्यापद्धतीने आचरण करून तीर्थस्थानाचे अधिक गोमटे मिळवावे.
तीर्थस्थानास निघतांना श्रध्देने, पुर्ण स्नेहभावाने तीर्थयात्रेस जाण्याचे मनोमनी निश्चित करावे. निघतांना आपल्या युक्ती प्रमाणे
प्रेमपूर्वक वहाण्यासाठी फुले,
श्रीफळ, विडाअवसर, पान इ. अर्पण करण्यास घ्यावे. प्रत्यक्षांत प्रवास सुरू करतांना
कोणत्या स्थानास नमस
करावयाचे आहे त्या स्थानांच्या लीळा वाचून त्या प्रवासात स्थानापर्यंत व स्थान नमस करतांनाही सातत्याने आठवाव्यात.
‘‘स्थानाच्या मंदिरात गेल्याबरोबर स्थान पाहिल्याबरोबर आधी
दंडवत घालावे. मग हात सोवळे करून स्थान नमस्कार करावे. फळ फुले विडा अवसर स्थानास अर्पण करतांना विडा अर्पणांची आरती करावी. शांततेने स्थान
नमस करावे. लिळा माहिती नसल्यावर तेथील पुजाऱ्याकडून लीळा काय आहेत त्या विचारून घेण्याचे करावे. त्या
लीळा आठवून स्मरण करावे व नंतर त्या लीळा आपल्या जवळ डायरीमध्ये लिहून ठेवाव्यात.
आणि नंतर कमीत कमी १ गाठी ५व्या नामाचे स्मरण करावी. आणि नंतर पुन्हा
साष्टांग दंडवत घालावे. ’’
हा स्थान नमस्कार करण्याचा शास्त्रोक्त विधी श्रीनागदेवाचार्यांनी
शास्त्रात निरूपण केलेला आहे. त्या विधी प्रमाणे एक स्थान जरी झाले. तरी पुष्कळ झाले.
व घाईघाईत, अश्रद्धेने, लीळा न आठवता १०० स्थाने जरी केली तरी काही फायदा नाही. म्हणून
वरिल विधीप्रमाणेच स्थान नमस्कार करावे.
प्रवासातही गप्पा मारण्याऐवजी शक्यतो स्थानाविषयी चर्चा करावी. किंवा लीळा आठवून नामस्मरण करावे.
स्थान नमस करून जातांना नमस केलेल्या स्थानाच्या लिळा पुन्हा एकदा आठवाव्यात व नंतर पुढील स्थानाच्या लिळा आठवण्यास सुरूवात करावी, स्थानाचे ठिकाण येईपर्यंत त्या लीळा आठवल्यास स्थानाचे वंदन होऊन अधिक गोमटे आपल्या पदरी पडते याची नोंद आपण भक्त मंडळींनी घ्यावी.
कर्तव्य म्हणून आम्ही आमची भूमिका बजावली. आपण याकडे लक्ष द्याल व पुर्ण शास्त्रोक्त स्थान नमस्कार कराल अशी आशा आहे.
विडा अर्पण करतांना हात का लावतात?
श्रीचक्रधरस्वामी प्रभुजींच्या स्थानावर विडा अर्पण करते वेळी पळत जाऊन हात
लावणे म्हणजे पूर्ण अज्ञान होय. विड्यास हात लावतांना
आपण फक्त हात लावतो व बाजुला होतो तर हात लावतांना आपण आपणासमोर
असणाऱ्या साधुंना किंवा गुरू असल्यास त्यांना मनातून अशी प्रार्थना करावयाची आहे की,
‘‘मी अत्यंत पापी दोषी आहे
अनेक जन्मांतरात अनेक पापकर्म माझ्याकडून घडले गेले असल्याने भगवान श्री चक्रधर स्वामींच्या सतसंगापासून मी खुप दूर आहे.
आपण भगवंताचे राजहंस आहात. भगवान आपणांवर प्रसन्न आहेत आपणमाझ्यासाठी त्यांच्याजवळ
प्रार्थना करावी की, माझी तुच्छ भेट किंवा फळ फुल आवडीने स्वीकार करा !’’ न बोलता विड्यास हात लावण्यास घाई गडबड करणे काहीही
अर्थाचे किंवा लाभाचे नाही.