विचार करा, समजुन घ्या, आणि जागे व्हा, नंतर पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही
शुकदेवाने केला पुर्वजन्मांचा
रहस्यभेद
सुचना :- खालील धार्मिक कहाणी हात धुऊन,
स्वच्छ होऊन डोक्यावर
कपडा (टोपी) घालून शांतमय ठिकाणी पायातील चप्पल काढूनच वाचा!
भगवान श्रीकृष्णचंद्रजी व महर्षी शुकदेव यांची
धर्मकथा.
ही कथा ऐकून वाचून
जर कोणाचे डोळे उघडले नाही तर त्यांचे डोळे कदापिही उघडणे अशक्य होईल असे वाटते.
महर्षी व्यास ज्यांनी श्रीमद्भगवद्गीता लिहिली हे आपणांस माहितच आहे. त्यांची
पत्नी 'सुलज्जा'जीची परमेश्वरावर अटळ श्रद्धा होती. त्यासाठी ती सदैव ईश्वर
भक्तीतच तल्लीन रहात असत.
महर्षी व्यासांनी तिच्या सहवासात राहुन मनामध्ये आपणास एक सदृढ मुलगा
व्हावा अशी सतत प्रबळ इच्छा धरली. आपल्या कुळाचा त्याच्यामुळे उध्दार होईल एवढीच
मनोकामना मनी धरुन ते विचार करत असे. अनेक वर्ष गेली तरी आपली इच्छा पूर्ण होत
नाही हे पाहून ते निराश होत व तसतसी चिंता करु लागले.
शेवटी (प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर) सुलज्जाच्या ईश्वर भक्तीची प्रसन्नता तिला
मिळाली व ती गर्भवती राहिली. परंतु ती वेळ निघुन गेली तरी बाळांत झाली नाही. तीचा
तो गर्भ पोटात वाढतच चालला. हे पाहून महर्षी व्यास आणि आणखी अनेक ऋषी-मुनींनी
बाळाच्या जन्मासाठी खुप जप, तप, यज्ञकार्य इ. अनेक कर्म केले परंतु काहीही फायदा झाला नाही. माता सुलज्जाची
मात्र पोटाच्या भाराने व वेदनांनी खुप हाल होऊ लागले. ती दुःखी होत चालली.
सर्व इलाज करुन संपल्यावर सर्व ऋषीमुनींनी ‘सुलज्जा’ मातेस भगवान श्रीकृष्णांनाच तु प्रार्थना करुन यातुन सुटका
करण्याचा मार्ग शोध असे सांगितले,
कारण ‘‘त्यांनी द्रौपदीची भर सभेत विवस्त्र होत
असताना लाज राखली, अर्जुनास आणि पांडवांना पदोपदी सहकार्य केले.
त्यांच्याशिवाय यातुन मुक्ती मिळणे आम्हांसही कठीण वाटत आहे.’’
ऋषीमुनींच्या अहवानानंतर सुलज्जा मातेने भगवान श्रीकृष्ण भगवंतांची आपल्या
आर्त स्वरांनी प्रार्थना केली, हे दयाळु, मायाळु भगवंता, आता तुमच्याशिवाय मला कोणीही मदत करु शकत नाही. मी या असह्य
वेदनेनी आता खुप व्याकुळ झाले आहे. या दुःख वेदनांतुन हे दयासागरा,
अनाथाच्या नाथा मज दीन-हीन सेविकेची रक्षा करा मी पुन्हा
पुन्हा आपल्या श्रीचरणी शरण येऊन प्रार्थना करते की या दुःख पिडेतून मला वाचवा.
अत्यंत दुःखी अंतःकरणाने केलेली सुलज्जेची प्रार्थना भगवंतानी ऐकली.
त्यांनी तिला संकटातून मुक्त करण्याचे ठरविले. ऋक्मिणीमाता श्रीकृष्ण भगवंताची
शुश्रुषा म्हणजे पाय दाबत असताना, तिथून तत्काळ निघाले. ते आपल्या वायुपेक्षा वेगात चालणाऱ्या स्थावर विराजमान होऊन आकाश
मार्गाने महर्षी व्यासांच्या आश्रमात आले. आल्या आल्यास सुलज्जा मातेच्या
कक्षामध्ये ते गेले. तेजस्वी प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण भगवंतांचे अत्यंत सुंदर दैवी
रूप पाहून सुलज्जा मातेस मोठे आश्चर्य वाटले. ती विनम्र होऊन भगवान श्रीकृष्ण भगवंतांना
हात जोडून विनम्रतेने म्हणाली, ‘हे भगवान आपण प्रत्येक क्षणाक्षणाच्या घडामोडीला’
जाणता, आपली ही दासी आपणास प्रार्थना करीत आहे की दयाळू महाराजा माझ्यावर कृपा करा व
मला या सर्व वेदनांपासून सुटकारा देऊन मुक्त करा व माझा उद्धार करा.
भगवान श्रीकृष्ण महाराज सुलज्जा मातेची प्रार्थना ऐकून
म्हणाले,
आता काही घाबरण्याचे कारण नाही व काळजीही करण्याचे कारण
नाही. यानंतर गर्भामधील बाळकास विचारले, ‘हे बाळका, तू कोण आहेस? इतक्या दिवसापासून गर्भातून बाहेर का आला नाहीस. इतके दिवस थांबण्याचे काय
कारण?’’
भगवंतांचा तो मधुर शब्द ऐकून गर्भामधील व्यासपुत्राने उत्तर
दिले,
‘‘हे भगवान आपण तर सर्वव्यापी
सर्वज्ञ आहात. तरीही मला तुम्ही असे का विचारता. की मी कोण आहे म्हणून?’’
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ‘‘ हो मी सर्वज्ञपणे सर्व जाणतो. पण तुझे माता पिता हे जाणत नाही. आता तरी तू गर्भातून बाहेर ये. तुझी आई त्यामुळे खुप दुःखी
आहे.’’
आणि श्रीकृष्णभगवंतांनी त्या गर्भातल्या बाळकाला म्हणजेच शुकदेवाला
सर्वात मोठ्या देवतेची स्थीती दिली.
त्या नंतर बालक मोठ्या नम्रतेने विनंतीपूर्वक म्हणाला,
‘‘आपण सर्वश्रेष्ठ आहात. दयाळु आहात
मायाळू आहात आपण माझीही एक विनंती ऐका, मी या संसारात अनंत सृष्टीत अनेक वेळा, अनेक जन्म घेतले व त्या प्रत्येक नरक योनीत
खुप खुप कष्ट नरक यातना भोग, भोगविले आहेत. तरी याचा मला आता कंटाळा आला आहे. मी गर्भातून
बाहेर येण्यास उत्सुक नाही.
हे दीनानाथ ! संसारी मनुष्य जीवनात अनेक भोग भोगत
असताना काम, क्रोध, लोभ
यांच्या आधिन होऊन अनेक पापकर्म जोडले जातात. एका जन्मात घडलेले पाप कर्म अनेक नरक
योनीत जन्मून आपले भोग भोगावे लागतात. आपल्या प्रसन्नतेने दिलेल्या चैतन्यविद्येच्या
सहाय्याने मला सर्व गोष्टींची आठवण आहे की, कोण-कोणत्या योनीत कोणकोणते दुःख भोगले आहेत. या सर्वाची
आठवण करुन वर्णन करावयाचे म्हटले की, भीतीने माझ्या अंगावर काटा उभा रहातो. माझे शरीर थरथरायला
लागते.
हे सर्वज्ञा ! काही शुभ कर्माच्या व यज्ञ योगाने मला
अनेक वेळा 'स्वर्ग' प्राप्ती
झाली. परंतु त्याचा भोग कालावधी समाप्त झाल्यावर मला या संसारात मृत्यु लोकात खाली
ढकलुन दिले गेले. धर्माच्या विपरित आचरणामुळे मला अनेक वेळा राक्षस होऊन मानवांवर
अत्याचार करण्याचे पाप करावे लागले. किती वेळा मला किडा मुंगीसारख्या शुद्र
जीवांचाही जन्म भोगावा लागला. या योनीत तर अक्षरशः लोकांनी
पायाखाली रगडून मारले. कित्येक वेळा मला साप-विंचुसारख्या
जन्माच्या योनीतही घेऊन लोकांच्या लाठीचा मार खाऊन मरावे लागले किंवा
पळकुट्यासारखे पळून जीव वाचवावा लागला.
आपल्यासारखा सत्संग सोडून अज्ञानपणाने जंतर-मंतरामध्ये मग्न होवून भुत
प्रेतयोनीत अनेक वेळा दुःख भोगित कंठीत रहावे लागले. तेंव्हा हे सर्वशक्तीयुक्त
प्रभुराया संसार सर्व दुःखमय भोगाचे माहेरघर आहे. नरक प्राप्तीचा मार्ग दाखविणारे
स्थान आहे. अशा अनेक जन्मांच्या दुःखाना कंटाळुन मी या गर्भाश्रमात निश्चिंत होऊन
बसलेलो आहे. यापूर्वीच्या अनंत सृष्टी माझ्या व्यर्थ गेल्या आहेत. तेंव्हा हे
श्रीकृष्णमहाराज मी ज्या ज्या योनित अनेक दुःख भोग-भोगले आहेत त्याचाच मी आपणांस
वर्णन करुन सांगत आहे.
हे भगवान ! ज्या ज्या योनीत जे जे दुःख मी भोगले आहेत त्या सर्वांचे विवरण आपल्या
समोरच मी करत आहे.
संपत्तीच्या जोरावर मी दोन विवाह केले. त्या दोन्ही पत्नींना सोडुन मी
पैशाच्या धुंदीत इतर स्त्रीयांच्या नादी लागलो. व विषयभोगामध्ये मग्न राहिलो. त्याचे
फळ म्हणून लोहयुक्त स्त्रीला लालबुंद होईपर्यंत तापवुन तिला कवटाळायला लावले
त्यावेळी त्या अग्नितील वेदनांचे वर्णनही मला करता येणार नाही अशी माझी स्थिती
झाली होती. अनेक वेळा मला यमदुतांनी उखळामध्ये बीयांमध्ये टाकुन कोंडून (कुटुन)
काढले. १२-१२ मैलभर धगधगता विस्तवावरून चालण्यास लावले. अनेक पापकर्माने
तलवारीसारखे धारदार पाने असलेल्या झाडावर यमदुतांनी मला उंच उचलून फेकले. करवतीने
कापून माझ्या शरीराचे असंख्य तुकडे केले. त्या वेदना सहन करत उरले सुरले धड होते
तेही भाल्याच्या सहाय्याने यमदुतांनी टोचून टोचून चाळण केली. परस्त्रीकडे वाईट
नजरेचे वाईट हेतुने पाहिल्यानेच निंदात्मक गोष्टी ऐकल्याने माझ्या डोळ्यांत व
कानांत गरम लोखंडी सळ्या फिरवल्या. माझ्या अंगावर आगीने तळपणारा लोखंडीरस माझ्या
डोळ्यांवर व कानांवर फेकला जात असे या सर्व दुःख यातना मी कशा सहन केल्या माझ्या
मलाच माहित. याचे वर्णन सुद्धा करणे मला अशक्य वाटत आहे.
मी उच-नीच भाव धरणे स्पृश्य-अस्पृश्य भाव,
तिरस्कार करणे या सारख्याही गोष्टी अनेक केल्या. त्यामुळे
मला प्रेतदेह मिळाला. असा प्रेतदेह की ज्याचा गळा सुईच्या छिद्रा एवढा आणि पोट भले
मोठे हत्तीच्या पोटाएवढे, हात बांबुसारखे नुसतेच सडपातळ लांब. अशा देहात मला निट जेवता येत नसे भुक तर
खुपच लागत असे अशा विचित्र योगही मला सहन करावा लागला खाण्यासाठी माझ्यापुढे
पक्वान्न भरपूर जरी असले तरी सुईसारख्या गळ्याच्या छिद्रातुन ते जाणार कसे व पोट
भरणार कसे? याचा
विचार करा व ठरवा की मी कशा भुक यातना सहन केल्या असतील?
मनातून दुसऱ्यांचे सतत वाईट चिंतने,
इतरांना कटु शब्दाने बोलून अंतःकरण दुःखविणे. लहान लहान
किटकांची पशु, पक्ष्यांची
हिंसा केल्याने मला त्या त्या योनीत जन्माला घालून त्या त्या वेदना सहन कराव्या
लागल्या अनेक दंडात्मक शिक्षेचे दंड सहन करावे लागले. काही वेळा मला सशाच्या तसेच
हरणाच्या योनीत जन्म घ्यावा लागला. त्यामध्ये माझ्या मागे शिकारी त्यांच्या
कुत्र्यांसह पाठीमागे धावत व माझ्यावर घाला घालून माझ्या शरीराच्या चिंधड्या
चिंधड्या करत व माझे रक्त पिऊन मांस खात. याही असहाय्य वेदना मला कशा सहन कराव्या
लागल्या याची आठवण काढली तरी माझ्या अंगावर शहारे येतात. माझ्याजवळ
धनदौलत असुन सुद्धा भिक्षुक ब्राह्मणांना मी योग्य दान केले नाही. दान करताना
त्यांना तुच्छतेने वागणूक देऊन फाटके जुने घाण कपडे दान म्हणून दिले. त्यामुळे मला
वीणकर (कोळी) जन्म मिळाला. तेथे केलेल्या कर्माच्या फळांमुळे मला गवळ्याचा जन्म मिळाला
जेथे मला सर्व गाई-म्हशी चारण्यात सर्वजन्म गेला.
मोठमोठ्या साधु-संताचा मान न ठेवता त्यांच्यासमोर माझ्या चप्पला सहित मी
उंच आसनावर बसलो त्यामुळे मला चांभाराचा जन्म मिळाला तेथे मला जन्मभर लोकांचे
बुट-चप्पल दुरुस्ती करण्यात जन्म घालवावा लागला.
हे भगवान !
पशु-पक्ष्यांच्या हत्येच्या बदल्यात मला ढेकुण योनीत जन्म मिळाला. तेथे माझ्या
अंगावर गरम पाणी टाकून वांग्यासारखे भरीत बनविले.
अनेक स्त्रीयांना काम वासनेसाठी त्रास देत राहिलो. त्यामुळे माशीचा जन्मात
जावे लागले. सर्व जन्म घाणीमध्ये मला घालवावा लागला. काही पापकर्माचे फळाच्या
बदल्यात मला बैलाचा योनीत जन्म मिळाला. या जन्माचा मला दिवसभर कडकडीत तळपत्या
उन्हामध्ये शेतामध्ये नांगर ओढावा लागला. दोन/चार चार मणाचे पोत्यांचे ओझे ओढावे
लागले. वरुन आसुडाचे फटके खावे लागले. त्यामुळे माझ्या अंगावर त्वच फाटून जखमा
झाल्या. या जखमावर कावळे चोचीने मारुन आणखी मोठ्या जखमा झाल्या. त्यावेळेस खूप खूप
वेदना होत असे. त्या वेदना पीडाचे वर्णन करणेस मी असमर्थ आहे.
भर तारुण्याचे नशेमध्ये पाप-पुण्याचा विचार न करता अनेक वाईट कामे केली.
त्यामुळे मला कोड(कुष्टरोग) सारख्या
रोगामध्ये जखडून बसावे लागले. (बनिया) व्यापारी असतांना वजनात माप कमी दिल्याच्या
कर्मामुळे मला पशु- पक्ष्यांच्या योनीत अनेक दुःख भोगावे लागले.
हे भगवान ! शेतीमधील अनेक वाईट कर्मानुसार तसेच घरी अनेक धनदौलत असतांना दान धर्म न
केल्याने मला नंतर दारिद्र्य पत्करावे लागले. दारूसारख्या व मांसासारख्या
पदार्थाच्या सेवनाने मला लुळा लंगड्याचा देह प्राप्त झाला. त्यामुळे मला लोकांसमोर
भीक मागून जीवन जगावे लागले.
अनेक जीवांना त्रास देणे, हाल आपेष्टा देणे व विश्वास घात करण्यात मी वेळ घातला
त्याची परिणिती मला हत्तीसारखा जड देह मिळाला व अनेक दुःख भोगावे लागले.
अनेक प्रकारच्या पापकर्मात मला डुक्कर योनीसुद्धा मिळाली होती त्यामध्ये
सर्व जीवन नाली, संडास या सारख्या घाणीतच घालावे लागले. काही पापकर्मानी मला कावळा,
चिमणी, पोपट यासारखे जीव होऊन पिंजऱ्यांमध्ये अनेक वर्ष कोंडून
जगावे लागले.
हे दयाळु, मायाळु परमेश्वरा ! मी आपणास अति लीन होऊन नम्रतापूर्वक विनंती करीत आहेकी,
अशा भयावह संकटात मी जीवन जगण्यास स्वस्थता ठेवू इच्छित
नाही. या संसाररूपी जगात जीवन जगणे पसंत करत नाही.
हे स्वामीराया! आपण मला ज्ञानशक्ति देऊन उध्दार करून घ्या. कारण ईश्वरी ज्ञानाशिवाय व
कृपाप्रसादाशिवाय कोणताही जीव उध्दरला जात नाही. ब्रह्मविद्याशिवायही जीवन जगणे
व्यर्थ आहे. त्याच्याविना नरक योनीपासून मुक्तता नाही. म्हणूनच भगवंता मला
सद्बुद्धी देऊन आपल्या श्रीचरणांजवळ सेवा करण्यास मला स्थान देण्याचे करावे. मी आपणांस
आपल्या प्रेमाची भिक्षा मागत आहे. मला आपण आपल्या स्मरणासाठी प्रोत्साहन मिळेल अशी
शक्ती द्या. मी केलेल्या पापकर्मापासून मी कसा मुक्त होईल याचे गुढ रहस्य मला
सांगून मला कृतार्थ करावे.
शुकदेवाची ही दुःखयुक्त वाणी ऐकून भगवान श्रीकृष्ण शुकदेवाला
म्हणाले ‘‘हे बाळा! आता तु खरा
तपस्वी व मनाने स्वच्छ झाला आहेस. आता तुला घाबरण्याचे कारण नाही,
आता तू सुलज्जा मातेच्या गर्भातून बाहेर ये.’’
‘‘तसेच हे बाळा तुझा दृढ निश्चय आता मला समजला आहे. तेंव्हा ईश्वरीय ज्ञान
देवता ज्ञानापेक्षा भिन्न आहे. देवता ज्ञानापासून मुक्ती नसून,
त्यांनी जन्ममरणाचे चक्र चुकत नाही. ते चुकवायचे असेल
तर माझेच ज्ञान प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.
हे शुकदेवा ! माझ्या ज्ञान- भक्ती आणि वैराग्यनुसारच नियमित आचरण
केल्याने माझ्या परमानंदासच प्राप्त होता येते तेंव्हा ब्रह्मविद्येच्या
शास्त्रानुसार एकान्त वासांत जाऊन माझे नित्याने स्मरण,
चिंतन करून आपले मन एकांतपणे लावावे. मी सर्व जीवांचे कर्म
बन्धने,
काटण्यासाठी मनुष्य देह घेऊनच या पृथ्वीवर येतो तेंव्हा तू
त्याप्रमाणे आठव कर म्हणजे मी माझा वरदहस्त देऊन तुझी सतत रक्षण करीन.’’
तदनंतर शुकदेवाने मातेच्या गर्भातून बाहेर येऊन भगवान
श्रीकृष्ण भगवंतांना नमन केले. त्यांच्या श्रीचरणाची धुळ स्पर्श करून त्यांची भक्ती करण्यांस
वनांमध्ये एकांतात गेले.
शुकदेवांना वनांत गेलेले पाहून महर्षी व्यास व माता सुलज्जा खुप दुःखी
झाले. त्यांना शुकदेवांना परत येण्याविषयी अनेक उपाय शोधले. त्यांची तपस्या भंग
करण्यास अनेक वितुष्ट संकटे आणली. याचे विवरण करण्यास ही कथा आणखी खूपच लांबेल
त्यामुळे न लिहिता येथेच त्यास पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करीत आहे.
शुकदेव मुनींनी सर्व विघ्न वितुष्टांकडे काहीही लक्ष दिले नाही आणि आपल्या
आई वडीलांकडेही त्याने अजिबात लक्ष दिले नाही. ईश्वरभक्तीत मग्न राहून दुःखी
संसारातून मुक्त रहाण्याकरिता ईश्वर भक्तीमध्ये तल्लीन झाले व ईश्वरापासून परमानंद
प्राप्त करण्याच्या भूमिकेशी एकाग्र राहिले. अशा या शुकदेव -
श्रीकृष्णमहाराजांच्या १०० टक्के खऱ्या धर्म वार्तेची कथा ऐकूण (वाचुन) आपण आपल्या
मनात योग्य विचार करा व संसारातील दु:ख, चिन्ता व नरकातील योनी व ८४ लक्ष योनीतून मुक्तता
मिळविण्याविषयी लवकर तयार व्हा. हाच मनुष्य जन्म हे करू शकतो. आणि आता जर का यातून
हुकलात तर अनेक हजारो लाखो वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हा जन्म आपणांस मिळेल.
तेंव्हा सावध व्हा.
(दंडवत
प्रणाम)
पू. त.
रूपाबाई, गीताबाई पंजाबी
खूप छान
ReplyDeleteअप्रतीम लेख वाचून खूप आनंद झाला.
दंडवत प्रणाम....