अज्ञानी मुर्ख लोकांचे म्हणणे सोडा भगवान श्रीकृष्ण यांचे ऐकून ईश्वर संग जोडा
भगिनींनो, आम्हांस अनेक भक्तजनांचे पत्र येतात की,
ईश्वरीय पुजा करणारे श्रीकृष्णभक्त आमच्या गावात एक-दोनच घर आहेत नामधारक (उपदेशी) मंडळी अगदी
कमी आहे. काही अडाणी भक्त ईश्वर कोणी पाहिला का?
असाही प्रश्न करतात. परंतु भगिनींनो आपण रस्त्यावर किंवा दुकानांच्या
गोडाऊनमध्ये लोखंड ठिकठिकाणी विखुरलेले काचाचे तुकडेही पडलेले सहजासहजी पहातो परंतु
कोंदनामध्ये खचित असा रत्नजडित हिरा मात्र उघड्यावर पाहू शकत नाही. तो ज्याच्याकडे आहे तो त्याला सुरक्षित
ठिकाणीच बंद कपाटात ठेवतो व वेळेवर काढतो, पहातो. तसेच ‘परमेश्वर’ काही पडलेल्या काचाच्या तुकड्यासारखा किंवा
लोखंडासारखा जागोजागी पडलेल्या स्थितीत सापडण्यासारखा नसून तो हिऱ्याप्रमाणेच हृदयाच्या
कोंदनात बसलेला आढळेल आपण मनोभावे आठवण करा नामस्मरण करा म्हणजे आपणांस प्रचिती येईल
व आपणांस ईश्वरीय अनुभुतीचे समाधान लाभेल.
अर्थात श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये अध्याय क्र. ७ मध्ये
म्हटले आहे की, मनुष्याणाम् सहस्रषेशु कश्चित
यतति सिद्धयेः ‘हजारो
मधून एखादास ईश्वरभक्तीस पात्र सापडतो’ असा पात्र जीव भाग्यशाली असून तोच मुक्तीच्या मार्गावर वाटचाल करीत असतो.
मग अशा भागवंतामध्ये आपला नंबर आपण लावू इच्छिता की नाही?
एवढे मार्गदर्शन आपणांस लाभत असतांन आपण दूर पळाल का?
आपण नरक योनी शोधण्याकडे धावण्याचे ठरवाल कां?
तेंव्हा विचार करा व जागे व्हा बंधु हो,
भगिनींनो !! समजून घ्या व अर्थबोध घ्या.
काही लोक असेही म्हणतील की, बाईजी, ‘‘आम्हास मुक्तीची सध्या तरी गरज वाटत नाही,
आवश्यकता नाही, कारण अद्याप आमचा संसार अपूर्ण आहे त्यातच आम्हास आनंद वाटतो
मुलाबाळांचे पालन पोषण, त्यांना कपडे अन्न आणि निवारा इत्यादिंची जरूरत आहे त्या पूर्ण करावयाच्या आहेत.’’ अशा बन्धु
भगिनींना आवर्जून सांगावेसे वाटते आहे की,
प्रापंचिक मोहापेक्षा ईश्वरीय सेवा-दास्य आपल्याल्या कितीही कठीण प्रश्न असो ते सुलभ करण्यास पात्र ठरते. आपल्या पाप कर्मातून
मुक्तिमार्ग शोधण्यास योग्य मार्ग दाखविण्याचेच कार्य त्यातून साध्य होईल. जन्म मरणाचा
फेरा त्यामुळे चुकेल तेंव्हा आपल्याला मुक्तीमार्गात येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणींना
तोंड देणे आवश्यक आहे. त्या मोहावर मात करून मुक्तीमार्ग शोधणे गरजेचे आहे त्यासाठी
भगवान आपल्या प्रिय भक्तजनांसाठी काही करत नाही का?
१) भगवान श्रीकृष्णजींनी आपला मित्र सुदामा यांस मुठभर पोह्यांच्या बदल्यात सोन्याची नगरी दान
केली नव्हती काय?
२) द्रौपदीस कौरव विवस्त्र करत असतांना साडींचा ढीग पुरविला
तो एका थोड्याशा पूर्वी केलेल्या साडीच्या फाडून
बांधलेल्या तुकड्याच्या बदल्यात नव्हे काय ?
३) एवढेच नव्हे तर खुद्द अर्जुनाचा सारथी होऊन ज्यांनी अनेक
पाप कृत्य केली अशा दुष्ट
कौरवांचा आणि त्यांच्यासारखेच अमानविय कृत्य करणाऱ्यांचा नाश
करण्यास मदत केली. नाहीतर अर्जुन अशा महान महाभारतासारख्या युद्धास जिंकू शकला असता
काय? कधीच नाही. कारण शत्रु सैन्यात देवतांनाही जिंकणारे भिष्म,
द्रोण, कर्ण, दुर्योधन असे महायोद्धे होते. म्हणून भगवंतांच्याच कृपेने ते युद्ध जिंकणे
पांडवांना शक्य झाले.
केवळ आठ वर्षे वय असताना गोवर्धन सारखा पर्वत आपल्या करंगळीवर उचलून अनेक लोकांना ‘वरूण वृष्टी’ पासून वाचविले. १२
वर्ष वय असतांना कंसासुराचा वध करून मथुरेतील सर्वांना दिलासा
दिला. भक्तांसाठी देवाने आपली प्रतिज्ञाही भंग केली.
अर्जुनास पूर्ण विश्वास येण्यासाठी ८१ कोटी सव्वा लाख दहा देवता
सह स्वतःचे विराटरूप किती सामर्थ्यशाली आहे दाखविले.
आपल्या यशोदेमातेस माती खाल्ल्याच्या कारणाने तोंड उघडून ‘विश्वरूपदर्शन’ दाखविले हे सर्वसाधारण लोकांचे काम आहे काय?
हे सर्व स्वरूप ईश्वराशिवाय कोण दाखवू शकतो काय?
या सर्व गोष्टीवर आपणांस विश्वास नाही का?
म्हणून सारासार पूर्ण विचार करा व श्रीकृष्ण भगवंतांच्या अनन्यभक्तीचे आचरण सुरू करा.
मनुष्यजन्म फक्त सुखोपभोगांसाठी मिळालेला नाही. सुखोपभोगांमुळे रवरव नावाचे नरक भोगावे
लागतात. म्हणून भावांनो!
आपणास भगवान श्रीकृष्ण भगवंतांच्याच आज्ञेनुसार त्यांची (परमेश्वराची) अनन्य भक्ती मनोभावे करण्याची सदिच्छा असावी.
त्या शिवाय हे जन्म मरणाचे चक्रातून आपण सुटणार नाही.
पाप कर्मावरील दंड चुकविण्यास "प्रायश्चित
" हा सर्वश्रेष्ठ उपाय !
भगवान श्रीकृष्ण महाराजांनी अध्याय क्रमांक १८ श्लोक क्र. ६६
मध्ये सरळ व सोप्या शब्दात आपणांस उपदेश केला आहे की,
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं वज्र ।
सर्व
धर्मांचा त्याग करून मला एकट्याला शरण ये. मी तुझ्या सर्व पापांचा नाश करून तुला नित्य
मुक्ती म्हणजेच मोक्ष देईन. जो जीव
सर्व देवी देवतांना सोडून माझ्या चरणी शरण येईल, आणि जर त्या जीवाने माझ्याकडे दया याचना केली तसेच त्यासाठी आपली चूक
मानुन जर स्वयं प्रायश्चित केले तर मी त्या जीवास क्षमा करून मोक्ष मार्गाची वाट मोकळी
करतो. अशी गॅरन्टी (विश्वास) फक्त श्रीकृष्ण भगवंतांनीच दिलेला आहे. इतर कोणत्याही देवी,
देवतांनी असे म्हटलेले नाही.
कारण देवता स्वतः कर्माने बांधलेल्या आहे. त्या जीवाला काय मुक्त करणार! तुम्ही सर्व
शास्त्रे शोधून पहा कोण्याही देवतेने असे म्हटलेले नाही.
ईश्वरभक्ती ही मुक्तिमार्गाचे आरक्षण (Reservation) तिकिट होय !
आम्ही तर आपणास समजून सांगून आमचे कर्तव्य पार केले. आपण समजून
घ्याल तर सुखी व्हाल. सरळ आणि सोप्या भाषेतच आम्ही आपणांस सांगितले. स्वतः भगवतांनी
१८ व्या अध्यायामध्ये ६३ व्या श्लोकात याच प्रकारे अर्जुनाला सांगितले की,
‘माझे समजावण्याचे कर्तव्य पार पाडून
तुला न उकलणाऱ्या गुप्त ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. तू चांगल्या प्रकारे विचार कर व तुला काय करायचे
ते कर !’’ म्हणूनच आम्हीही आपणांस जाणीवपूर्वक हट्टाने या गोष्टी
आपणावर बळजबरीने लादू इच्छित नाही. आपणच शांत चित्ताने विचार करा व योग्य निर्णय घ्या.
आमच्या सदिच्छा आपल्याबरोबर सदैव राहतील. भगवंत आपल्या मनास शांती देवो,
ज्ञान देवो व प्रेमदान देवो हीच श्रीचरणी नम्र प्रार्थना.
सुचना - मनातील संशय दूर करण्यासाठी गीतेतील अध्याय व श्लोकांचा
अर्थ जरूर वाचा.
मुलांना
धार्मिक शिक्षणाचे धडे द्या.
माता शत्रुः, पिता
वैरी येन बालो न पाठितः ।
न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा ।
ते माता-पिता अज्ञानी आहेत, जे आपल्या मुलांना धार्मिक शिक्षण देत नाहीत. आणि ज्या मुला
मुलींनी नैतिक, धार्मिक
शिक्षण घेतलेले नाही, त्यांच्यावर सांस्कृतिक संस्कार होत नाहीत. म्हणून ते समाजात प्रतिष्ठा पावत नाहीत.
भौतिक सुखांच्या लालसेत व्यसनाधीन होऊन आयुष्याचे वाटोळे करून घेतात. मग जसं हंसांच्या
थव्या मध्ये बगळा राहतो त्याचप्रमाणे अज्ञानी राहतात.
मुलांचे १५-२० वर्षे शाळा, कॉलेजच्या शिक्षणात घालवतात, परंतु धर्माच्या अभ्यासासाठी १ वर्षसुद्धा लावणे जरूरीचे समजत
नाही. हेच सर्व दुःखाचे कारण आहे. आमच्या वडिलांनी धार्मिक अभ्यासासाठी. मुलांवर पूर्ण
लक्ष दिलं, ज्याचा
परिणाम आहे की, आम्ही
तीघी बहिणी स्वामींच्या आनंदाला पात्र झालो.
धोका, बेईमानी भेसळी ने धन कमविणाऱ्यांची दुर्दशा
आमच्या गावात एक व्यक्ती लहान मुलांच्या गोड गोळ्या व रेवड्या
बनवायचा. त्याचा नोकर उपदेशी होता जो आमच्या मंदिरात पूजा करण्यासाठी दररोज यायचा.
त्यानी सांगितले की, ‘‘बाईजी आमच्या दुकानाचा मालक मुलांच्या ४० किलो गोळ्यामध्ये १०
किलो दगडाची पावडर मिसळतो त्याला सोपस्टोन (Soap Stone) म्हणतात. जो कित्येक साबण तयार करणारे साबण स्वस्त करण्यासाठी
त्यात टाकतात.’’ हे ऐकून मला खूप
वाईट वाटले. परंतु कोण कोणाचं ऐकतं का? माझ्या भगिनींनो भगवंताच्या दरबारात कोणतेच पाप क्षम्य नाही.
बघता बघता दोन - तीन वर्षानंतर त्या दुकानदाराचा अपघात (Accident)
झाला. त्यामुळे त्याचे खूपच हाल झाले,
आठ-दहा ठिकाणी हाड मोडली, ४ वर्ष हॉस्पिटलमध्ये धक्के खाल्ले,
संडास - लघवी सुद्धा (चारपाई) पंलगावरच करावी लागत. झोपून -झोपून
पाठीवर कडेवर कित्येक जखमा झाल्या. कोणीही सेवेसाठी
जवळ येत नव्हतं. शरीराचा घाण वास यायला लागला. शेवटी ४ वर्षे
खूप यातना सहन केल्यानंतर घर-दार, संपत्ती सर्व काही सोडुन नरकात जाऊन पडला. म्हणूनच कोण्या महापुरूषाने
म्हटलेलेच आहे की, ‘‘बेईमानीने कमवलेलं धन आतडे फाडून बाहेर पडते’’ लहान
मुलांच्या खाण्यात भेसळ करणारे व धोका देणारे शेवटी माफ केले जातील.
थोडसं हसत पण जा!
तुम्ही म्हणणार ‘बाईजी एखादी हास्य विनोदांची घटना नाही लिहित.’ माझ्या भगिनींनो जसे भारत देशात प्रत्येक गल्ली - बोळीत डॉक्टर केमिस्ट यांचे
दुकाने आहेत, तसे परदेशात नाहीत. कारण विदेशातील लोक आपल्यासारखे जीभेचे चोचले नाही करत आणि
जास्त आजारीही पडत नाही.
महिन्या पंधरा दिवसाला डॉक्टर एकदा आपल्या कॉलनीतील लोकांना
चेक करून घेतो. तेथे खूप कमी लोक आजारी पडतात. आता दोन तीन वर्ष झाले,
भारत देशाचा एक हलवाई परदेशात गेला तेथे त्याने दररोज संध्याकाळी
जीलेबी बनविणे सुरू दिवसांतच तेथे लोक पोटाच्या आजाराने जखडले गेले. जेंव्हा त्या डॉक्टरनी बघितले की,
माझ्या कॉलनीत पोटदुखीचे इतके रोगी का झाले. तर तेंव्हा एका
व्यक्तीने सांगितले की, येथे एक भारतीय जिलेबी
बनवतो, जी सर्व
लोक मोठ्या चवीने खातात. डॉक्टरांच्या रिपोर्टनंतर सरकारने त्या हलवाईला २४ तासात विदेश
सोडून जाण्याची सुचना दिली. त्याला लगेच विदेश सोडून भारतात यावं लागलं. मोठ्या दुःखाची
गोष्ट आहे कि, पूर्ण
दिवस रस्त्यावर उघडी पडलेली मिठाई, वडे, समोसे, कचोरी,
पानपुरी कि ज्याच्यावर पूर्ण दिवस रस्त्यावरची धूळ किटाणू पडतात,
बसतात. आपण मोठ्या चवीने ते खातो,
मुलांना पण खायला देतो. प्रत्येक गल्ली-बोळीत डॉक्टर,
औषधाचे दुकान असण्याचं हेच कारण आहे. परंतु आपण मुर्ख,
अज्ञानी, भारतीय जीभेचे चोचले काही सोडत नाही.
परमार्ग सेविका- रूपाबाई, गीताबाई पंजाबी, महानुभाव आश्रम, श्रीरामपूर, जिल्हा - अहमदनगर (महाराष्ट्र ) ४१३७०९