श्रीमद्भगवद्गीतेचे तत्वज्ञान सांगणारी एक अप्रतिम बोधकथा
आनंदी जीवनासाठी गीतेचा अभ्यास करावा
महान नीतीज्ञ चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथात म्हणतात, भूतकाळात काय घडले याचा विचार करू नका आणि भविष्यात काय होईल याची चिंता करू नका, ज्ञानी लोक नेहमी वर्तमानात जगतात आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. वर्तमानातच जगावे. कारण श्रीकृष्ण भगवंतांनी गीतेमध्ये सांगितले आहे की आपला कर्म करणे एवढाच अधिकार आहे. कर्मफळात आपला अधिकार नाही.
आपल्या आयुष्यात येणारे दुःखद प्रसंग संकट हे येणारच आहेत. जीवाने कितीही प्रयत्न केला तरी तो आपण जोडलेल्या कर्मांना हुलकावणी देऊ शकत नाही. पण त्या जोडलेल्या कर्मांच्या दुःखाची तीव्रता मात्र कमी होऊ शकते. आणि या कलियुगात तीव्रता कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांचे नामस्मरण. किंवा कलियुगातले परमेश्वर अवतार श्रीचक्रधरप्रभूंचे नामस्मरण हेच त्या दुःखांची तीव्रता कमी करू शकते.
देवता भक्तीने दुःखाची तीव्रता तर कमी होत नाहीच. पण जोडलेले दुःख जसेच्या तसेच भोगावे लागते त्यात यत्किंचितही कमी होत नाही. जसं की लक्ष्मण. लक्ष्मण कोण होता हे सर्वांनाच माहित आहे तो रामचंद्रांचा लहान भाऊ होता. रामचंद्राचा निसिम भक्त होता. राम हे देवतेचे अवतार आहेत हे ही सगळ्यांना माहीतच आहेत. पण असा महान भक्त असूनही रामाने लक्ष्मणाचा १४ वर्षे उपवास चुकवला नाही. आणि एकदाही त्याला विचारले नाही की, “तू जेवलास का?” का तर त्याच्याकडून मेघनाथाचा वध करून घ्यावयाचा होता. पण हे व्यवहारिक कारण झाले वास्तविक पारमार्थिक कारण असे की, लक्ष्मणाने जोडलेले उपवासाचे दुःख त्याला पूर्णपणे भोगवले गेले. त्यात रामचंद्र हस्तक्षेप करू शकले नाहीत.
आणि पांडव श्रीकृष्ण भगवंतांचे भक्त होते त्यांच्या वाटेलाही पूर्वील कर्मामुळे वनवास आला. पण भगवंतांनी वेळोवेळी त्यांना सहाय्य केले. भगवंतांनी पांडवांना अरण्यात जेवणाची सोय म्हणून सूर्य थाळी दिली. ती सूर्य थाळी वाटेल तेवढे अन्न निर्माण करीत होती. त्या सूर्य थाळीमुळे अरण्यातही युधिष्ठिरचा दान धर्म मोठ्या थाटामाटात सुरू होता.
भगवंतांनी वेळोवेळी सहाय्य करून पांडवांना कुठेही कमी पडू दिले नाही. मोठ्या मोठ्या संकटातून त्यांचे रक्षण केले. फार काय महाभारत युद्ध जिंकण्यासाठीही भगवंतांनी साह्य केले. नाहीतर भीष्म द्रोण कर्ण, अश्वत्थामा, कृपाचार्य, दुर्योधन, भगदत्त, भूरीश्रवा एवढ्या सगळ्या महान योद्धांसमोर पांडवांचा निभाव लागणे कठीण होते. पण म्हणतात ना भगवंत पाठीशी असल्यावर कोणीही वाकडे करू शकत नाही. भगवंतांनी वेळोवेळी सल्ले देऊन पांडवांना महाभारताचे युद्ध जिंकून दिले.
परमेश्वराचे स्मरण करणारा अति गरीब व्यक्ती ही सुखी समाधानाचे जीवन जगत असतो हे सांगणारी एक बोधकथा आपण आज पहाणार आहोत. कुंतलदेश नावाचे राज्य उत्तरेकडे होते. तेथे नावाचा धैर्यशील नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या दरबारी अनेक नोकर, चाकर, साम्राज्य मोठे, खजिना सोन्याने भरलेला, तरीही राजा नेहमी टेन्शनमध्ये असायचा. कुठून शत्रू येईल का? सैन्यात बंड होईल का? आपला मुलगा उद्या चांगला राजा बनेल का? या विचाराने तो त्रस्त असायचा.
रोज त्याची दाढी कटिंग मालिश करायला एक न्हावी यायचा. तो मात्र एक अविवाहित मस्त हरपन मौला होता, नेहमी खुश व हसत खेळत काम करायचा. त्याला पाहताना राजाला खुप असूया वाटू लागली. राजाला वाटे हा एक नंबरचा फाटीचर हा इतका टेन्शन फ्री कसा काय राहतो? याच्या आनंदी जीवनाचे रहस्य काय आहे तपास केला पाहिजे.”
राजा रोज विचार करायचा की, "मी एवढ्या मोठ्या राज्याचा राजा आहे, इतके धन कमावतोय, तरीही मला रात्री झोप शांत लागत नाही. सतत टेन्शन आहे. मग हा इतका कसा आनंदी असतो?"
या विचारातूनच राजाची चिंता अजून वाढली. दिवसेंदिवस त्याला त्या न्हाव्याबद्दल अतिशय असुया वाटू लागली. शेवटी राजाने त्याच्या एका प्रधानाला विचारले, की, "आपण सगळे चिंतेत असतो, पण तो एकटाच खुश कसा ? त्याचा शोध घ्या. आणि मला "
दुसऱ्या दिवशी प्रधान त्या मस्त मौलाच्या घरी गेला. त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना विचारले की, "तू इतका खुश कसा ?"
त्यावर तो मस्त मौला न्हावी म्हणाला, "मी सडा फटिंग, एकटाच असतो. दिवसाला एक रुपया मिळतो. त्यात माझे उत्तम रितीने भागते. आणि माझ्या आनंदाचे सर्वात मोठे म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांची अनन्य भक्ती. भगवंत माझी काळजी घेणारच आहे अशा मला दृढ विश्वास आहे म्हणून मी उद्याची चिंता करत नाही. कारण उद्या पण एक रुपया पुन्हा मिळतोच न !! त्यामुळे मी निवांत झोपतो. "उद्याची" काळजी करत नाही."
प्रधानाने आश्चर्यचकीत होऊन विचारले अरे तुझ्याकडे पाहून वाटतच नाही की, तुला जीवन जगण्याची कला अवगत आहे. पण तुला हे जगण्याचे रहस्य समजले तरी कुठून? कोणत्या गुरूकडून तुला हे रहस्य समजले? कारण एवढे आनंदी राहणे कुणालाही शक्य नाही. आपल्या राज्यातही अनेक संन्यासी आहेत. देवता भक्त आहेत तेही तुझ्या इतके आनंदी दिसत नाहीत. आणि तू संन्यासी नसून का आनंदी कसा काय?”
यावर तो परमेश्वर भक्त म्हणाला, “ अहो प्रधानजी हेच तर तुम्हाला सांगत आहे. मी आपल्या राज्यात येण्याच्या आधी एका श्रीकृष्ण आश्रमात राहत होतो. तेथील सर्वात मोठे गुरु आपल्या शिष्यांना अनन्य भक्ती शिकवतात. श्रीमद्भगवद्गीतेप्रमाणे आचरण करायला लावतात. तेथेच मी त्यांच्या सान्निध्यात राहून श्रीमद्भगवद्गीतेचा थोडाफार अभ्यास केला. गुरुवर मला संन्यास घेण्यासाठी सांगत होते पण मी त्यांचे ऐकले नाही. आणि प्रपंचात पडायचे म्हणून इकडे आलो. येताना गुरुवर म्हणाले तुला संन्यास घ्यायचा नसेल तर नको घेऊस पण किमान श्रीकृष्ण भगवंतांची अनन्यभक्ती आणि श्रीमद्भगवद्गीते नुसार आचरण कर. मी गुरूंना वचन दिले की मी कधीही विवाह करणार नाही, उदरनिर्वाहापुरता निर्हिंसक व्यवसाय करेन. हेच माझ्या आनंदी जीवनाचे रहस्य आहे. मलाही काही दिवसांनी परमेश्वर मार्गात संन्यास घ्यावयाचाच आहे पण मी अजून संन्यासासाठी मानसिके परिपक्व झालेलो नाही.”
त्याचे बोलणे ऐकून प्रधान त्याच्या समोर नतमस्तक झाला व तत्काळ राजाकडे जाऊन त्याचे सर्व बोलणे सांगितले. राजालाही आश्चर्य वाटले की या नावाच्या वेशात एवढा मोठा परमेश्वर भक्त आपली सेवा करत आहे आणि आपल्याला माहीतही नाही म्हणून राजाला पश्चाताप झाला. दुसऱ्या दिवशी भक्त न्हावी नेहमीप्रमाणे राजाच्या सेवेसाठी हजर झाला.
राजाने न्हाव्याला नमस्कार केला व प्रधानाने मला सर्व काही सांगितली याची कल्पना दिली. व नम्रतेने न्हाव्याला म्हणाला की मला तुझ्या गुरुचे दर्शन करो मलाही अनन्य भक्तीचा मार्ग स्वीकारायचा आहे मलाही तुझ्यासारखे आनंदी जीवन जगायचे आहे आणि वयाच्या पन्नाशीनंतर संन्यास घ्यावयाचा आहे. भक्ताने ते म्हणणे मान्य केले व आपल्या गुरु जवळ घेऊन गेला.
गुरूंनी राजाला श्रीमद्भगवद्गीतेचा उपदेश केला श्रीकृष्ण भगवंतांची अनन्य भक्ती शिकवली व जनक राजासारखे राज्य कसे चालवावे याचेही निरूपण केले. द्वापार युगातला जनक राजाही श्रीकृष्ण भगवंतांचा अनन्य भक्त होता. त्यानेही आपल्या उत्तरकाळात संन्यास घेऊन भगवंताची प्राप्ती करून घेतली हे गीतेतच भगवंतांनी चौथ्या अध्यायात सांगितलेले आहे.
विषय भोगाची नावड आणि संसाराविषयी अनास्था संस्कृत भाषेप्रमाणे राग शब्दाचा अर्थ आसक्ती असा होतो. आणि अलिप्तता म्हणजे या जगात मी आहे पण हे जग माझे नाही, काहीही माझे नाही हे सर्व काही जाणून घेणे. आणि त्यानुसार आचरण करणे याला म्हणावे अलिप्तता. जोपर्यंत माणसाच्या मनात आसक्ति आहे. तोपर्यंत सुखी जीवन होत नाही. आसक्ती धरायचीच तर परमेश्वराची धरावी. जीवांची आसक्ती नरकाला नेणारी आहे.
पैसा असो, घर असो, संसार असो, मुलगा, पत्नी, पती, जमीन, मालमत्ता, वाडा, भोग वासनेच्या वस्तू, वाहने इत्यादी असो या सर्वांविषयी मनात असती असणे हे नरकाचे साधन आहे. म्हणून संसारात राहूनही परमेश्वर भक्तीकडे मनाचा ओढा असावा. कारण हा जन्म मुक्त होण्यासाठी मिळालेला आहे पुन्हा बंधनात पडण्यासाठी नाही असा हा विचार जो करतो तोच या संसारापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतो.
हेही वाचा 👇
बोधकथा - आपला मृत्यू चुकविण्याचा ब्राम्हणाचा असफल प्रयत्न