श्रीकृष्ण भक्ती श्लोक 01 मराठी अर्थसहीत - shreekrishnabhakti shlok 01 marathi

श्रीकृष्ण भक्ती श्लोक 01 मराठी अर्थसहीत - shreekrishnabhakti shlok 01 marathi

 श्रीकृष्ण भक्ती श्लोक 01  मराठी अर्थसहीत - shreekrishnabhakti shlok 01 marathi

खालील श्लोकाचे रसग्रहण करा 

श्रीकृष्ण भक्ती श्लोक 

छंद :- पृथ्वी 

पदाब्जरज जें तुझें सकलपावनाधार तें; 

अघाचलहि तारिले बहु तुवांचि राधारतें; ।।

विदुरथ अघासुर, व्रजवधू, बकी, पिंगळा, 

अशां गति दिली; उरे न तृण भेटतां इंगळा ।। (मोरोपंत) 

अर्थः- हे श्रीकृष्ण भगवंता! मी तुझाच अनन्य भक्त होऊ इच्छितो. आणि तुलाच निरंतर आठवू इच्छीतो. तुलाच नमन करू इच्छितो. हे परमेश्वरा! तुलाच निरन्तर नमन करण्याचें कारण असें कीं, पापपंक म्ह. पापरूप चिखल धुऊन टाकण्यासाठी जगांतील सर्व शुद्ध वस्तुंमध्ये जर कुणी शुद्ध असेल तर ते ह्मणजे तुझ्या पायाच्या धूळीचा कण. 

हे भगवंता तुला आराधना म्हणजेच भक्ती आवडते. तु भक्तीने प्रसन्न होतोस. तु आपल्या भक्तांचे घोरातीघोर पापाचे डोंगराच्या डोंगर नासले आहेत. आणि पापी दुराचारी अघोरांचेंही तारण तूंच केलें आहेस. अतिशय दुराचारी असा तो विदुरथ, अत्याचारी अघासुर नावाचा दैत्य, कपटी पूतना, आणि वेश्या पिंगळा, कागासुर, शिशुपाल अशांसारख्या पातक्यांनाही तूं देवतांच्या मोक्षपदास चढविलेंस ; पुढे कधीतरी ते पुन्हा या संसारचक्रात येतील. आणि तुझी भक्ती करून कायमचे मोक्षप्राप्तीला जातील. आणि तुलाच पती मानणाऱ्या त्या अज्ञान  गोपींका भक्तांना आपले प्रेम दिले. आपला कायमचा मोक्ष दिला. 

आणि खरेच, तुझी संगति घडल्याबरोबर त्यांचें पाप साफ नाहींसें होऊन त्यांनीं मोक्षपदाला पात्र व्हावें, हेंच स्वाभाविक आहे. कारण अग्नीशीं गांठीभेटी झाल्यावर गवत टिकणें शक्यच नाहीं, : तें जळून खाक होणारच. तसं तुझी कृपादृष्टी पडल्यावर पाप नष्ट होणारच. असे तुझ्या कृपादृष्टीचे सामर्थ्य आहे. 

अर्थ विस्तार :- पद + अब्ज + रज ' चरण + कमल - कण अर्थात श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीचरणांनी पावन झालेला गोवर्धन पर्वत गोकुळ मथुरा इत्यादी स्थाने. हेच या मोक्षमार्गात पावन करणारी, पापाची क्षाळण करणारी जणू काही सरिता आहेत. परमेश्वराच्या तीर्थस्थानांनी पापांचे डोंगर नासतात आणि घोर पापांचे क्षाळण होते. देवतेच्या तीर्थ क्षेत्राने किंचितही पापांचे क्षाळण होत नाही.

हिंदू पौराणिक महाकाव्य 'महाभारत' मध्ये विदुरथाचा उल्लेख आहे, त्यानुसार तो यादवांचा नायक आणि दंतवक्राचा धाकटा भाऊ होता.  जेव्हा शाल्वाने द्वारकेवर हल्ला केला तेव्हा त्याचे मित्र दंतवक्र आणि विदुरथ देखील त्याला साथ देण्यासाठी युद्धात सामील झाले, परंतु श्रीकृष्णाने दोघांचाही वध केला.

अघासुर हा राक्षस व 'बकी म्हणजे पूतना ही राक्षसी, यांनीं श्रीकृष्ण भगवंतांना मारण्याचे प्रयत्न केले, परंतु भगवंतांनी ते सर्व प्रयत्न हाणून पाडून, उलट त्यांनाच ठार मारिलें, पण मोक्षपदाला नेलें. असें भागवत पुराणांत वर्णिलें आहे. 'पिंगळा ' ही वेश्या होती. पण तिनें आपलें प्रेम व सर्व मनोवृत्ति परमेश्वरास अर्पण केल्यामुळे तिला मुक्तिपद मिळालें, अशी कथा श्रीउद्धवदेवांना निरूपण करताना भगवान श्रीकृष्णांनी सांगितली आहे. २४ गुरुमध्येही त्या पिंगळेचे नाव आहे. अशा अनंत भक्तांना मुक्ती देणाऱ्या श्रीकृष्ण देवा मी आपणास नमस्कार करतो. 

भवता सारथिर्भूत्वा कौन्तेय: प्रापितो जयम् ।

जीवनस्य रथो देव भवपारञ्च नीयताम् ।।२१।। ( कवयित्री सौ. मनीषा अभ्यंकर) 

अर्थ - हे श्रीकृष्णा! आपण सारथी होऊन अर्जुनाला विजय मिळावून दिला. हे देवा! त्याप्रमाणेच माझ्या जीवनाचा रथ भवपार घेऊन चला. आपल्या सहाय्याशिवाय मी जीव यः कश्चित् अतितुच्छ आहे. आपणच मला या संसार सागरातून मुक्त करू शकता. 

हेही वाचा 👇

श्रीकृष्ण भक्ती श्लोक 02 मराठी अर्थसहीत

महानुभाव पंथ प्रश्नोत्तरी


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post