महानुभाव पंथ प्रश्नोत्तरी
प्रश्न :- अनुसरल्याशिवाय घरी राहूनच जर देवधर्म केला तर मोक्ष मिळतो का?
उत्तर :- नाही. नश्वर पती प्राप्त करण्यासाठी स्त्रीला आपले मात्यापित्याचे घर सोडावे लागते. मग विश्वाचा पती परमेश्वर तो घरी राहून कसा मिळेल! घर टाकल्याशिवाय देवाने सांगितलेले आचरण जीव करू शकत नाही. आणि देवाने सांगितले ते केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. गृहस्थाश्रमी मनुष्य भीक्षा करणार नाही. आणि भिक्षेचे अन्न खाल्ल्याशिवाय असतिपरीचे आचरण होऊच शकत नाही. आणि असतिपरी आचरल्याशिवाय देव होत नाही. म्हणून घरी राहून मोक्ष मिळणर नाही.
1) या कलियुगात परमेश्वर धर्मासी मुळ आदिकारण कोण आहे?
उत्तर :- श्रीदत्तात्रेय प्रभु महाराज
प्रश्न 2) कलियुगात महानुभाव पंथाची म्हणजेच परमेश्वर मोक्षधर्माची संस्थापणा कोणी केली?
➡ परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्रीचक्रधर स्वामीजी
प्रश्न 3) महानुभाव पंथाची स्थापणा कितव्या शतकात झाली?
➡ ११ व्या शतकात परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामींनी जीवांचे उद्धरण करण्यासाठी महानुभाव पंथाची स्थापना केली.
प्रश्न 4) महानुभाव पंथाचे भक्ती आचरण्याचे नियम लीहा
➡ एकनिष्ठ अनन्य अव्यचारिणी परमेश्वर भक्ती, सप्त व्यसनांचा त्याग, चतुर्विध साधनांची सेवा, परमेश्वराचे नामस्मरण
प्रश्न 5) महानुभाव पंथाचे प्रमुख ठिकाणे, तीर्थक्षेत्र कोणती?
➡ श्रीक्षेत्र पांचाळेश्वर (बीड) श्रीक्षेत्रफलटण(सातारा, श्रीक्षेत्र ऋद्धिपुर (अमरावती), श्रीक्षेत्र पैठण श्रीक्षेत्र डोमग्राम, (औरंगाबाद) श्रीक्षेत्रजाइचा देव (बुलढाणा) माहूर(यवतमाळ) इ. अनेक तीर्थस्थान आहेत.
6) महानुभाव पंथाला पुर्वी कोण्या नावाने ओळखले जात होते
➡ भटमार्ग, परमार्ग, महात्मपंथ
प्रश्न 7) महानुभाव पंथाला उत्तर भारतात कोण्या नावाने ओळखिले जाते?
➡ जयकृष्णीया पंथ,
प्रश्न 8) महानुभाव पंथाचे प्रमुख ग्रंथ कोणते?
➡ लीळाचरित्र, श्रीमद्भगवतगीता, सूत्रपाठ, स्थळपोथी,
प्रश्न 9) महानुभाव पंथाचे प्रमुख काव्य ग्रंथ कोणते?
१) ऋक्मिणी स्वयंवर - आद्य मराठी कवि श्रीनरेन्द्रव्यास
२) श्रीउद्धवगीता - श्रीभास्करभट्ट उर्फ कवीश्वरबास
३) शिशुपाल वध - श्रीभास्करभट्ट उर्फ कवीश्वरबास
४) वत्साहरण - श्री दामोदर पंडित
५) सैंह्याद्री वर्णन - श्रीरवळोव्यास
६) ऋद्धिपुर वर्णन - (श्रीनारोबास बाहाळिये)
७) ज्ञान प्रबोध - श्रीविश्वनाथबास बाळापूरकर
८) मूर्तिप्रकाश :- श्रीकेशिराजव्यास
प्रश्न महानुभाव पंथातील संस्कृत काव्य कोणते?
१) ज्ञानकलानिधी स्तोत्र - श्रीकेशिराजव्यास
२) दृष्टांत स्तोत्र - श्रीकेशिराजव्यास
३) ज्ञानभास्कर स्तोत्र - श्रीलक्ष्मिंधर भट देउळवाडेकर
४) नरविलाप स्तोत्र - श्रीभास्करभट्ट उर्फ कवीश्वरबास
५) चालिसाख्य स्तोत्र - श्रीभास्करभट्ट उर्फ कवीश्वरबास
६) रत्नमाळा स्तोत्र - श्रीकेशिराजव्यास
७) संस्कृत पूजावसर - श्रीभास्करभट्ट उर्फ कवीश्वरबास
८) श्रीयाष्टक - श्रीभास्करभट्ट उर्फ कवीश्वरबास
९) जयाष्टक - श्रीभास्करभट्ट उर्फ कवीश्वरबास
१०) ध्यानचंद्र स्तोत्र - श्रीभीष्माचार्य
इत्यादी बरेच संस्कृत काव्य ग्रंथ महानुभाव विद्वान पंडित कवींनी केलेली आहेत. महानुभाव पंथात आतापर्यंत एकूण साडेसहा हजार ग्रंथसंपदा निर्माण झालेली आहे. एवढे विपुल साहित्य संपूर्ण पृथ्वीवर कोणत्याच संप्रदायाचे नाही.
१०) महानुभाव पंथाची दक्षिण काशी कोणती ? व उत्तर काशी कोणती आहे
➡ श्रीक्षेत्र फलटण
प्रश्न :- महानुभाव पंथाची उत्तर काशी कोणती?
उत्तर :- श्रीक्षेत्र ऋद्धिपुर (अमरावती)
11) महानुभाव पंथाचे पहिले आचार्य कोण आहेत?
उत्तर :- श्रीनागदेवाचार्य
12) महानुभाव पंथातील तीर्थस्थानांची एकुण संख्या किती?
उत्तर :- महानुभाव पंथात एकूण साडे सोळाशे तीर्थस्थान आहेत. पण काळाच्या ओघात बरीचशी तीर्थस्थाने अनुपलब्ध आहेत. काही महत्वाची स्थाने जसे की खडकुली, संगमेश्वर, सेवता नागनाथ, जोगेश्वरी ही अति महत्वाची तीर्थस्थाने जायकवाडी धरणात गेली आहेत.
१३) पंजाब प्रांतात महानुभाव पंथाचा प्रचार प्रसार कुणी केला?
उत्तर :- कृष्णराजबास यांनी पंजाब प्रांतात महानुभाव पंथाच्या प्रचारास सुरुवात केली. आणि हळूहळू काबूल पर्यंत महानुभाव पंथाचा प्रसार झाला होता.
अधिक माहिती वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇
Click here:-👉 पंजाब प्रांतात महानुभाव पंथाचा प्रचार कसा झाला?