उत्तर भारतातील महानुभाव पंथाचा प्रचार
असा भगवान श्रीचक्रधरस्वामीं जीवोद्धरणव्यसनी अवतार महाराष्ट्र सोडून उत्तरापंथे गेले. ‘पोरे हो एने काइ तुमचेच करावे असे: अनंत जीवाच्या सातरीया पडली असती: तयाते उद्धरीता काई अनेक देवो असेः' असे निरूपण करून सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी तेथे परधर्मस्थापना, ब्रह्मविद्यानिरूपण, वेधबोध देण्यासाठी उत्तरेकडे गेले. परमेश्वराचे जीवोद्धरणाचे कार्य अहर्निश चालूच आहे. या लेखातील ही विश्वसनीय माहिती वृद्धाचार व पंथीय परंपरागत चा सर्वतोमुखी आख्यायिकेवर आधारलेली आहे.
जगातील बहुतेक धर्मपंथ व संप्रदाय राजाश्रयानेच वाढले, विस्तारले. जगात त्यांचा प्रचार व प्रसार झाला. शास्त्र व अनुकंपा यामुळे धर्मवृद्धी च्या झाल्याचे दिसून येते पण केवळ वैचारिक, बौद्धिक पातळीवर राजाश्रयाशिवाय आहे. धर्माचा प्रसार विभिन्न प्रदेशांत करण्याचे श्रेय फक्त महानुभाव पंथासच लागले. ज्या काळात दळणवळणाची साधने पुरेशी नव्हती; गावागावाला अभूंची जोडणारे रस्ते नव्हते, सभोवताली अरण्ये, नदीनाले त्यात, परकीय आक्रमणाची भीती, दरोडेखोरी, लुटालूट वेठीबिगारी इत्यादी गोष्टी सतत चालू असत, अशा काळात वैचारिक क्रांतीचे लोण घेऊन महाराष्ट्राबाहेर दूर पंजाबसारख्या प्रदेशात जाणे केवढे साहसाचे आणि चिकाटीचे असेल याची कल्पनाच केलेली बरी. मराठ्यांनी आपला झेंडा अटकेपार फडकविला पण महानुभाव पंथाचा झेंडा त्यापूर्वीच अटकेपार पेशावर, कोटसारंगसारख्या सिंधू-झेलमच्या परिसरात डौलाने मिरवत होता आणि पांथस्थास
'राघोबा दखनी डुबदी बेडी रखनी'
या आत्मविश्वासाने पैलथडीस पोहचवीत होता.
महानुभाव पंथास पंजाबमध्ये 'जयकृष्णी' पंथ या नावाने संबोधतात. ज्या महापुरुषाने महानुभाव पंथाची पताका उत्तर भारतात पंजाबमध्ये प्रथम फडकविली ते महापुरुष कृष्णराजबास हे होत. कृष्णराजबास हे कवीश्वर कुलातील श्रीदत्तात्रेयप्रभूंचे दर्शन लाभलेल्या व 'प्रतिष्ठान' काव्याचे जनक श्री नागराजबाबा यांचे पणतू होत.
श्री नागराज बास - श्री दत्तराज बास - श्री माधेराज बास - श्री कृष्णराज बास श्री नागराजबासांचा काळ इ. स. सोळाव्या शतकाचा आहे. आणि श्री कृष्णराज बास हे नागराजबासांपासून तिसरे मानोत्तर म्हणजे शके १५५० च्या आसपासचा काळ होय. रुक्मिणी स्वयंवर रचयिते संतराजबास व कृष्णराजबास हे दोघे समकालीन. धर्माचरणातील साथीदार दोघांनीही महाराष्ट्रात महानुभावपंथीय संन्यास दीक्षा घेऊन शास्त्रश्रवण केले. ब्रह्मविद्याव्युत्पन्न झाले. परमेश्वर आज्ञेनुसार एकाकी ‘असतीपर' आचरण करीत असता ईश्वरदर्शनाची उत्कंठा वाढू लागली. स्वामींचे दर्शन व्हावे, जन्माचे सार्थक करावे हे विचार वारंवार मनात घोळू लागले. यातूनच स्वामींच्या दर्शनार्थ उत्तरापंथे जावे असा विचार मनात झाला. या दोघांनी स्वामींचा शोध घेण्यासाठी उत्तरापंथे जाण्याचा निश्चय केला. स्वामींनी - 'वयस्तंभिनी' विद्या स्वीकारून १००० वर्षाचे आयुष्य स्वीकारले आहे; भक्तजनांना असन्निधान देऊन उत्तरापंथे गेल्याचे लीळाचरित्राच्या अभ्यासावरून त्यांना कळले होते. फक्त शोध घ्यायचा; तेवढे करण्यास हे सिध्द झाले आणि मजल-दरमजल करीत करीत ते उत्तरेकडे धाव घेत होते. मध्य प्रदेश तुडवून पंजाब, पेशावरपर्यंत ते पोहचले. श्रीचक्रधर स्वामींचा शोध ते प्रत्यही घेत होते. पण शोध लागत नव्हता. मन व्याकुळ झाले होते; बेचैन झाले होते; एवढ्यात चक्रबाबा या नावाचे अधिकारी सत्पुरुष याच भागात आहेत. ही गुणगुण त्यांच्या कानी आली; जिज्ञासा वाढली आणि ते शोधात निघाले. दरवाज्यातच शिष्याने अडविले.
‘आपण कोण? कोणाची भेट? भेटीचे कारण काय?
इ. सर्व माहिती आत पोहचती झाली पण भेटीस नकार मिळाला! 'ज्यांची भेट घेऊ इच्छिता त्यांनी आपणास असा आदेश दिला काय?' 'नाही'
'मग येथपर्यंत का आलात? त्यांच्या आदेशावर विश्वास नाही ने. काय?' कृष्णराजबास आणि संतराजबास खिन्न झाले. येथपर्यंत येऊन स्वामी येथे आहेत ही खात्री होऊनही दर्शन नाही. ते परत फिरणार पण वे, मनात काही उद्भवले तेवढेच निरोप्याच्या हाती आत पोहचविले, आतून उत्तर मिळाले, 'तथास्तु'.
रात्री मुक्काम करून पहाटेच परतीचा प्रवास सुरू करणार होते. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नव्हता. खिन्न मनःस्थितीत सारी रात्र जात होती. अचानक पहाटे-पहाटे निद्रावश झाले. संतराजबास उठून पाहतात तर आपल्या गोदावरीच्या काठी कुंकुमठाण येथे तर कृष्णराजबास कोटसारंग येथे झेलम नदीच्या किनाऱ्यावर. कृष्णराजबास काय समजावयाचे ते समजले.
स्वामींचा हेतू कळला आणि आपल्या 'असती परी' जीवनास तेथेही त्यांनी आरंभ केला. भिक्षा-भोजन करून ते विजनार्थी रानात जात. ईश्वरचिंतन, ब्रह्मविद्याचे मनन यात झाडाखाली दिवस व्यतीत करून गावाच्या आश्रयाने निद्रा करीत. त्यांचा हा नित्यक्रम चालू होता. विजनवासापासून रस्त्याने देवीचा दर्शनार्थ एक गृहस्थ दररोज जातो, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांची धर्मश्रध्दा व नियमितता पाहून त्यालाच धर्म-निरूपण करून ईश्वरधर्मी लावावे असे त्यांना वाटले. तो भागू भगत होता.
भागू भगत देवीचा निस्सीम भक्त होता. तो देवीची आराधना करी, पूजाअर्चा करी, आवाहन करी. देवीही त्याला प्रगट होऊन साक्षात दर्शन देत असे, त्याच्याबरोबर सारीपाठ खेळे, त्याची मनोकामना पुरी करी. भागू भगतालाही देवीचा उणेपणा सहन होत नसे. ऊन-पाऊस थंडी याची तमा न बाळगता काटेकोरपणे तो देवीची भक्ती करीत देऊ होता. एकेदिवशी नित्याप्रमाणे तो देवीच्या दर्शनास निघाला, हे कृष्णराजबासांच्या लक्षात येताच तेही त्याच्यामागे चालू लागले. भागूच्या ते लक्षात आले नाही. तो शूचिर्भूत होऊन देवळात गेला आणि देवीच्या भक्तीत मग्न झाला.
कृष्णराजबासांनी दरवाजातच उभे राहून म्हटले:
“भागू, अरे देवी देवी म्हणतो पण देवीला विचार देव कोण आहे?” व त्याला पाहण्याची उसंतही न देता कृष्णराजबास परत फिरले. उठून देवीच्या भक्तीत मग्न असलेला भागू देवीला आवाहन करू लागला. नित्याप्रमामे देवी प्रगट झाली. क्षणापूर्वीच कानी आलेले शब्द त्याच्या याचे कानात घोळत होते. भागूने देवीस नम्र अभिवादन केले आणि “देवी! आप देवी हैं, तो देव कौन?” असा सवाल केला. देवीने त्याला उत्तर दिले
“ज्याने तुला प्रश्न केला त्यालाच विचार." होता. असे म्हणून ती अंतर्धान पावली.
नित्यक्रम आटोपून भागू खिन्न हे मनाने देवळातून बाहेर आला आणि शोधत शोधत तो कृष्णराजबासाच्या विजनस्थानी आला. नमस्कार करून देवीला केलेला प्रश्न त्याने भागू कृष्णराजबासाला विचारला. आपण टाकलेला खड़ा अचूक लागला हे हेरून आणि हा ईश्वरी संकेतच आहे हे जाणून कृष्णराजबासांनी भागू भगताच्या शंकेचे निरसन केले, ब्रह्मविद्येचे निरूपण केले. शक्ती व ईश्वर दोघांच्या भक्तीतील फरक लक्षात आला.
भागूने कृष्णराजबासांचे पाय धरून धर्म-अनुग्रह देण्याची विनंती केली. कृष्णराजबासांनी त्यास अनुग्रह करीत देऊन 'जयकृष्णी' प्रचाराची मुहूर्तमेढ कोटसारंग या गावी रोवली. त्यानंतर ब्ला, हे थोड्याच अवधीत भागूच्या सहाही मुलांनी व भावाने धर्म-अनुग्रह घेतला. भागूच्या भागू ज्या क्षत्रिय घराण्यातील होता ते घराणे व सुखराने आदि सात घराणे देवीच्या या क्षत्रिय घराण्यांचे पौरोहित्य 'विधिचंद शर्मा' नावाच्या पुरोहिताकडे होते. इटले: सुखरेन हे घराणे आठ जातींत विभागलेले होते.
१) सहानी २) सेठी ३) आनंद ४) कोहली ५) चड्ढा ६) सुरी ७) सभरवाल ८) भसीन
खुरासान घाटीत वास्तव्य करून असलेले घराणे खुखरान या नावाने पंजाब सरहद्द प्रांतात वसाहत करून राहिले होते. पण पुढे परकीयांच्या स्वाऱ्यांमुळे हे संबंध पंजाब भर फैलले होते. भागू भगताच्या घरचे पौरोहित्य विधिचंद शर्मा आस्थेने करीत होता. भागूची देवीवरील निस्सीम भक्तीची कल्पना त्याला होती आणि एक धर्मवान क्षत्रिय भक्त भागू याबद्दल त्याला आपुलकीही वाटत होती.
कृष्णराजबासांच्या अनुग्रहामुळे भागूच्या जीवनात झालेला फरक विधिचंद शर्माच्या चटकन लक्षात आला. त्याने कृष्णराजबासांचे दर्शन घेण्याचे ठरविले. कृष्णराजबासांच्या विद्वत्तापूर्ण निरुपणाच्या प्रभावाने विधिचंदाचे अंतःकरण वेधले. महानुभाव पंथाचा अनुग्रह घेऊन तोही 'जयकृष्णी' झाला. क्षत्रिय कुळाचे पौरोहित्य करणाऱ्या विधिचंदाच्या मागोमाग अनेक लोकांनी जयकृष्णी पंथाचा अनुग्रह घेतला. महानुभाव पंथ कृष्णराजबासांच्या देखतच फुलू-फळू लागला आणि श्रीकृष्णराजबासांची प्रतिमा विस्तारू लागली, वाढू लागली आणि त्यांनी
१) अवतार-महिमा,
२) गौरस्वामीस्तोत्र,
३) रुक्मिणी स्वयंवर (७२ छंद),
४) श्रीकृष्ण जन्माष्टमी कथा (१२ छंद),
५) सुदामचरित्रकथा (चौपाइयाँ),
६) गुल्लरनामा,
७) अंडास्तोत्र,
८) श्रीदत्तात्रेय स्तोत्र,
९) दर्शनप्रकाश,
१०) षडदर्शनसार,
११) श्रीकृष्णस्तोत्र आदींची रचना केली. तपोबलाने प्राप्त झालेल्या दिव्य शक्तीच्या कृष्णराजबासांच्या काही चमत्कारिक आख्यायिकाही त्या भागात मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत.
विधिचंद शर्मा यांनी पंथप्रचाराचे कार्य हाती घेतल्यानंतर त्यांनीही
१) ब्रह्मविद्याप्रकाश,
२) परेशावतारचरित्र,
३) प्रसंगविधान,
४) हंस अवतारस्तोत्र,
५) चौबीस गुरू आख्यान,
६) रुक्मिणी स्वयंवर,
७) भगवद्गीता टीका या (हिंदी) वृत्तखंड आदींची रचना केली. 'सवंत सोरह सौ छिहत्तरा कृष्ण पक्ष त्य वैशाख' या उल्लेखावरून विधिचंदाचा काळ निश्चित होतो.
‘जयकृष्णी' पंथाचा याप्रमाणे पंजाबमध्ये प्रवेश आणि प्रसार झाला इल आणि तो बौद्धिक विचारसरणीवर पसरत केला. तत्कालीक काही रूढीचाही च्या अवलंब धर्मप्रचारकांनी केला. हिंदू लोकांत हा नियम होता की, प्रत्येक माने कुटुंबातील एक मुलगा शीख होत असे. तसेच जयकृष्णी पंथानुयायी सूर्ण आपल्या मुलांपैकी एक मुलगा धर्मगुरुंच्या स्वाधीन करीत. तो पुढे महाराष्ट्रात चा येऊन संन्यास-दीक्षा घेऊन, साहित्याचा अभ्यास करून धर्मप्रचार करी.
आठ वर्षानंतर सर्वांना शुभाशुभ कर्माची फळे मिळतात म्हणून तो धर्मानुग्रहासही आठव्या वर्षीच अधिकारी आहे, असे महानुभावीय तत्त्वज्ञान मानते; आणि आणि त्याप्रमाणे जयकृष्णी पंथात मुले जेव्हा आठ वर्षाची होतात तेव्हाच त्यांना १) जयकृष्णी पंथाचा अनुग्रह देण्यात येत असतो. ज्या जयकृष्णी मुलींनी उंद), धर्मानुग्रह घेतला त्या लग्नानंतर स्वगृही गेल्यावर हे लोण तेथेही घेऊन याँ), जात याप्रमाणे 'जयकृष्णी' धर्माचा विस्तार त्या घरी व त्या गावी होत असे.
धर्मप्रसाराबरोबरच धर्म टिकविणे आवश्यक होते; आणि त्यासाठी बलाने ठिकठिकाणी मंदिरे बांधण्याची व्यवस्थाही होत होती. धर्मप्रचारक हा धर्माचा कारिक प्रसार करतो पण पुढे धर्माचा आधार मंदिर हेच असते. पंजाबमध्ये पेशावर, रावळपिंडी, गुजरावाला, भांडेवाल, मुलतान, लाहोर, अमृतसर, जालंधर या प्रसिद्ध शहरी तर मंदिरे बांधली गेलीच पण साधारण गावीही मंदिरे उभारली होती.
महाराणा रणजितसिंहाच्या काळी लाहोर ही पंजाबची राजधानी होती. या प्रसिध्द राजधानीत जयकृष्णीयांचे हिरामंडी, सुतरमंडी, मच्छीहटी (या प्रसिध्द भागात जयकृष्णी मठ होते. महानुभाव साधू आणि साध्वी यांचा प्रभाव महाराणा रणजितसिंहावर सुध्दा होता. महाराणा रणजितसिंह अ मोहिमेवर वा अन्य महत्त्वाच्या कामी बाहेरगावी जात असे तेव्हा 'बाईसाहेब' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साध्वीचा आशीर्वाद घेऊनच जात असे.
इतकेच नव्हे तर मंदिरातील पूजा आरती या धार्मिक विधीत अडथळा न यावा याकरता त्यावेळी तो मंदिरात दर्शनात येत नसे. रणजितसिंहाकडून के या मंदिरास वर्षासनेही देण्यात येत असे. त्यातून जन्माष्टमी, पविते यासारखे ज उत्सवही साजरे होत असत. हिरामंडीच्या मठात हिंदोळ्याचा उत्सवही प्रच साजरा होत असे. मठातील धार्मिक पठण, पारायण, आरत्या हे कार्यक्रम मराठी भाषेतून होत असत.
पुढे लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनाला गेलेले कड लोकमान्य टिळक, वासूकाका जोशी, श्री प्रभाते यांनी जेव्हा मठांना भेटी दिल्यात तेव्हा मराठीतून पारायण व इतर विधी पाहून त्यांनी त्याचे कौतुक या केले. लाहोर येथील मंदिरात पूजासाहित्याबरोबरच बरीचशी धार्मिक ग्रंथसंपत्तीही स्था असे. मोचीदरवाजा (लाहोर) येथील मंदिरास काही धर्मविध्वंसकांनी दुष्ट हेतूने आग लावली व त्याची बरीच नासधूसही केली. तेव्हा आगीच्या भक्ष्यस्थानी बरीच ग्रंथसंपत्ती नष्ट झाली. ही घटना साधारणत १९ व्या शतकातील असावी. पुढे या मंदिराचा जीर्णोद्धार महंत श्री आराध्यबाबा यांनी केला.
पंजाबमधील ठिकठिकाणच्या मंदिरात श्रीकृष्णमूर्तीची स्थापना केली आहे. या मूर्ती गोवर्धन, छिन्नस्थळी (श्रीचक्रधर स्वामी चरणांकित) कुटडी (मसाला व संबंधित काष्ट वा पाषाण यांच्या बारीक तुकड्यांपासून बनविलेली मूर्ती) भोगराम वा संगमरवरच्या नमस्कारिक 'विशेष' बसविलेल्या अत्यंत ह आकर्षणपणे सजविलेल्या असत. त्याबरोबर संबंधित 'विशेष' व 'प्रसाद', व' हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह बहुतेक मंदिरातून असे. संबंधित मूर्ती, पाषाण से. व पोथ्या हा ठेवा महाराष्ट्रातून पंजाबच्या मंदिरामंदिरात विभागला होता.
मंदिराचे बांधकाम एक वा अनेक भक्तांनी संपत्ती व श्रम यांचे दान करून केलेले होते. चकवाल येथील मंदिर फक्त एक एक आणा वर्गणी करूनच खे जमलेल्या निधीने बांधले होते. धर्मप्रचारार्थ मंदिरे बांधण्याचा उपक्रम ज्या वही प्रचारकांनी हाती घेतला त्यांनी मंदिर पूर्ण होईपर्यंत पायात वहाणा घालणार क्रम नाही, क्षौर करणार नाही, अथवा गोड पदार्थ सेवन करणार नाही, अशी कडक व्रते स्वीकारली होती. धर्मप्रसारासाठी अवलंबलेला हा ओघ सुरवातीच्या भेटी काळात फार मोठ्या प्रमाणात होता.
२० व्या शतकाच्या आरंभापासूनच या कार्याला थोडीशी ओहोटी लागली असे म्हणावे लागेल. पूर्वजांनी मत्तीही स्थापन केलेल्या मंदिराची देखभाल, समाजाचे संघटन या गोष्टींची आवश्यकता भासू लागली. दयानंद सरस्वती सारख्या नवीन धर्मप्रचारकाने केलेल्या आर्य समाजाच्या धर्मप्रचारामुळे काही पंथीय मंडळी भारावली गेली. इ. स. १९०६ मध्ये परमपूज्य श्री विद्वांसबाबा यांनी संपूर्ण पंजाबमध्ये प्रवास करून पंथसंघटनेला नवीन दिशा दिली. प्रचाराचे नवे तंत्र अवलंबिले. महंत श्री माहूरकरबुवा यांनी लाहोर येथे श्रीदत्त प्रकाशन यंत्रालय नावाचा छापखाना सुरू करून त्यात 'गोपाळदासी' ही भगवद्गीतेवरील प्राचीन महानुभावीय टीका प्रसिध्द केली होती.
त्याचप्रमाणे इतर मराठी व संस्कृत काव्येही प्रकाशित केली. श्री मुकुंदराजजी आराध्य यांनी आर्यसमाजांच्या विद्वानांशी जाहीर चर्चा करुन जयकृष्णी पंथाचे तत्त्व प्रस्थापित केले. महंत सारंगधरजींनी १९२२ मध्ये 'जयकृष्णी प्रतिनिधी सभा' हा पंथ संघटक व प्रचार-संस्थेची स्थापना हरिपूर हजारा येथे केली. या सभेस महाराष्ट्रातून महानुभाव वाङ्मय संशोधक श्री य. खु देशपांडे, महंत दत्तलक्षराजबाबा माहूरकर आदि महंत मंडळी हजर राहिली होती. हरिपूर हजारा येथेच जयकृष्णी विद्यार्थ्यांसाठी संस्कृत पाठशाळाही याच काळात स्थापन झाली. पाठशालेला जोडूनच वसतिगृह व ग्रंथालय होते. ही सर्वव्यवस्था हरिपूर हजारा येथील भक्तांच्याकडे होती.
जयकृष्णी पंथाचे हे ऋण केवळ पंजाबपुरतेच मर्यादित न राहाता ऋणानुबंधाने काश्मीरातील राजघराण्यातही १७ व्या शतकात पोहचले होते. अफगाणिस्थानच्या मंत्रिमंडळावर जेव्हा हिंदू मंत्र्यांची नेमणूक झाली तेव्हा जयकृष्णी पंथाचे लोण काश्मीरहून काबूल येथे रोवले गेले व काबूल येथील श्रीकृष्ण मंदिरावर जयकृष्णी पंथाची पताका फडकू लागली. याप्रमाणे इ.स. च्या १३ व्या शतकात महानुभाव पंथ महाराष्ट्रात स्थापन झाला. पुढे १७ व्या शतकापासून आपले प्रचारकार्य धडाडीने ( चालवून काबूल-कंदाहारपर्यंत जयकृष्णी पंथाचे मठ, मंदिरे, ग्रंथालये व ( पाठशाळा स्थापन केल्या. अनभिज्ञ जनतेला मराठी भाषा शिकवून पंथीय तत्त्वज्ञानाची जाणीव करून दिली. मर्द मराठ्यांच्या १८ व्या शतकातील राजकीय मुलुखगिरीप्रमाणेच महानुभाव महात्म्यांची ही एक धार्मिक, साहित्यिक व सांस्कृतिक मुलुखगिरीच होती, असे म्हणावयास काहीच प्रत्यवाय नाही.
जयकृष्णी पंथाची मंदिरे असलेली उत्तर भारतातील व पाकिस्तानमधील काही प्रसिध्द गावे:
१) अकवाल (पाकिस्तान) २) अमृतसर ३) अंबाला ४) कर्ताल(पाकिस्तान) ५) कोटसारंग (पाकिस्तान) ६) खतौली ७) गाजियाबाद
८) गुजराल (पाकिस्तान) ९) गुजरांवाला (पाकिस्तान) १०) गढी(पाकिस्तान) ११) चकवाल (पाकिस्तान) १२) चावली (पाकिस्तान)
१३) जलालपूर (पाकिस्तान) १४) जम्मू १५) जालंधर १६) दिल्ली
१७) देहरादून १८) ढेरमोड (पाकिस्तान) १९) तलागंग (पाकिस्तान)
२०) धोलर (पाकिस्तान) २१) नाडा (पाकिस्तान) २२) नवाशहर(पाकिस्तान) २३) पब्बी (पाकिस्तान) २४) पिंडीघेनि (पाकिस्तान) २५) पठाणकोट पेशावर (पाकिस्तान) २६) फगवाडा २७) फुल्लाडा (पाकिस्तान)
२८) बसाल (पाकिस्तान) २९) वजीराबाद (पाकिस्तान) ३०) मानसेरा (पाकिस्तान) ३१) मुलतान (पाकिस्तान) ३२) मेरठ ३३) मोगला
व (पाकिस्तान) ३४) रावळपिंडी (पाकिस्तान) ३५) रूपाली (पाकिस्तान)
३६) लालामुरा (पाकिस्तान) ३७) लुधियाना ३८) शादीवाला (पाकिस्तान)
३९) शेरपूर ४०) शाहबार ४१) सध्घर (पाकिस्तान) ४२) सरायेअलमगीर श्री (पाकिस्तान) ४३) हवेलीया (पाकिस्तान) ४४) होती मर्दान (पाकिस्तान) ४५) हरीपूर (पाकिस्तान)