संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit हिंदी मराठी अनुवाद
ये पापं शमयन्ति सङ्गतिभृतां ये दानशृङ्गारिणो
येषां चित्तमतीव निर्मलतरं येषां न भग्नं व्रतम् ।
ये सर्वान्सुखयन्ति हि प्रतिदिनं ते साधवो दुर्लभा
गङ्गावद्गजगण्डवद्गगनवद्गाङ्गेयवद्गेयवत् ॥
हिंदी अर्थ :- खुद के संगति में आने वाले जनों के पाप जो सज्जन ‘गंगा की भाँति’ धोता है; जो सज्जन हाथी के गंडस्थल से झरने वाले मद जैसे ‘दान देने वाले हाथों से शोभायमान होता है’; जिन सज्जनों के चित्त ‘गगन’ के समान अत्यंत निर्मल है; जिनके व्रत का भीष्मपितामह के समान कभी भी भंग नही हुआ है; वैसे ही जो साधूजन हररोज गाए जाने वाले ‘संगीत’ की तरह सभी को आनंद प्रदान करते हैं, ऐसे सज्जन दुर्लभ है, और वह गंगा जैसे, हाथी के गंडस्थल जैसे, गगन के समान, भीष्मपितामह के समान, वैसे ही संगीत के समान शोभा देते हैं।
मराठी अर्थ :- स्वतःच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तिचे पाप जो सज्जन ‘गंगा’ प्रमाणे धुवून टाकतो, जो सज्जन हत्तीच्या गंडस्थळांतून झरणाऱ्या मदाप्रमाणे ‘दान देणाऱ्या हातांनी शोभतो’, ज्या सज्जनांचे चित्त ‘गगनाप्रमाणे’ निर्मळ आहे, ज्यांचे घेतलेले व्रत ‘भीष्मपितामह’ समान कधीही भंग होऊ दिले नाही, तसेच जे सज्जन दररोज गाईले जाणाऱ्या गाण्यांच्या ‘संगीताप्रमाणे’ सर्वांना आनंद प्रदान करित असतांत, असे सज्जन लोंक ह्या जगतांत दुर्लभ आहेत. आणि ते गंगा, हत्तीचे गंडस्थळ, गगन, भीष्मपितामह तसेच संगीता सारखे शोभायमान होत असतात.
ख्यातस्त्वं फलवृष्टिपुष्टिसुमनःस्वाधीनजाम्बूनदः
शीर्णास्ते रिपुसम्पदः प्रतिदिनं मित्रोदये मोदसे ।
पान्थानां कुरुषे विलम्बनमहो दत्तान्तरस्तेजसा
जम्बूवज्जलबिन्दुवज्जलजवज्जम्बालवज्जालवत् ॥
हिंदी अर्थ :- जैसे जांबुनद (जामुन के पेड) का प्रदेश देवों को आनंद देता है, वैसे ही हे राजन्! आप भी प्रजाजनों को फल के वृष्टि से पुष्टि प्रदान कर देवों के अधिन जांबुनद जैसे बनकर ‘जामून’ के समान प्रख्यात हो। आप के शत्रुओं की संपत्ती हररोज ‘जल के बिन्दु’ के समान क्षीण हो रही है। जैसे कमल मित्र सूर्य के उदय के वक्त खिलता है, वैसे ही आप मित्रों को खिलाने में ‘कमल’ के समान विकास पाते है। जैसे काई में पाँव फिसल जाता है इसलिये सरोवर में धीरे धीरे चलना पडता है, वैसे ही आपके यहाँ आए हुए पांथस्थों को आप जल्द बिदा नही करते, इसलिये आप ‘काई’ की तरह उनके गमन में विलम्ब करते हो, जैसे गवाक्ष के जाली से सूरज की किरणें आती है, वैसे ही आपके तेज से आप दूसरों को आनंद देने का अवकाश प्राप्त कराते हैं ।
मराठी अर्थ :- जसे जांबुनद (जांभळाचे वृक्ष) चा प्रदेश देवांना आनंददायी आहे, तसेच हे राजन्! आपण ही प्रजाजनांना फळाच्या वृष्टि ने पुष्टि प्रदान करून देवांच्या अधीन जांबूनद जसे बनून ‘जांभळासारखे’ प्रख्यात व्हा. आपल्या शत्रुंची संपत्ती दररोज ‘जलातल्या बिन्दु’ प्रमाणे क्षीण होत राहो. जसे कमळ सूर्याच्या उदयाच्या वेळीच उमलते, तसेच आपण ही आपल्या मित्रांच्या ‘कमळा’ सारखे उमलण्यात सूर्यासमान विकसनशील आहात. जसे शेवाळात पाय घसरतो त्यामुळे सरोवरात हळू हळू चालावे लागते, तसेच आपल्या देशात आलेल्या पांथस्थांना आपण लवकर विदा करित नाही, त्यामुळे आपण ‘शेवाळासमान’ त्यांच्या गमनात विलम्ब करणारे आहात, तसेच गवाक्षांतल्या जाळीतून जशी सूर्याची किरणें येतात त्याचप्रमाणे आपण ही आपल्या तेजाने दुसऱ्याला आनंद देणाची संधी प्राप्त करवून देणारे आहात.
संभूष्यं सदपत्यवत्परकरात् रक्ष्यं च सुक्षेत्रवत्!
संशोध्यं व्रणिताङ्गवत् प्रतिदिनं वीक्ष्यं च सन्मित्रवत्
बद्ध्यं बध्यवदश्लथं दृढगुणै: स्मर्यं हरेर्नामवत्!
नैवं सीदति पुस्तकं खलु कदाप्येतद्गुरूणां वच:!!
(पुस्तकं) पुस्तक
सत् ( चांगल्या)
अपत्यवत् (संततीप्रमाणे)
संभूष्यं ( नटवावं).
सुक्षेत्रवत् ( उत्तमशेताप्रमाणे)
परकरात् (पर= दुसरा, परका, कर= हात दुसऱ्याच्या हस्तक्षेपापासून)
रक्ष्यं ( रक्षण करावे),
प्रतिदिनं ( रोज)
व्रणिताङ्गवत् ( व्रणित ( जखमा असलेला)
अंग ( शरीर)
संशोध्यं ( सं+ शुध् = स्वच्छ करणे ) दररोज जखमी व्यक्तीच्या शरीराप्रमाणे स्वच्छ करावे) .
सन्मित्रवत् ( चांगल्या मित्राप्रमाणे)
वीक्ष्यं (पहावं) (आवडत्या मित्राप्रमाणे भेट घ्यावी).
बद्ध्यवत् ( बंदिवानाप्रमाणे)
दृढगुणै: ( दृढ = भक्कम गुणै: = दोऱ्यांनी )
अश्लथं (घट्ट)
बद्ध्यं (बांधावं).
हरे: ( हरीच्या)
नामवत् ( नावाप्रमाणे) (हरिनामाप्रमाणे स्मर्यं ( आठवावं, स्मरण करावं, सतत जप करावा).
एवं (असं केलं तर) पुस्तकं (पुस्तक)
खलु (खरोखर)
कदापि ( कधीही)
न सीदति ( शब्दशः: बसते, नष्ट होत नाही).
असं थोरामोठ्यांचं सांगणं आहे.
हस्तलिखिताची काळजी कशी घ्यावी हे सांगणारा श्लोक. साधारणतः इ.स.१० व्या शतकापासून हस्तलिखित लेखन सामान्य स्तरावर पोचलं. हस्तलिखित लिहून मंदिरात किंवा मठामध्ये अर्पण करावं असं अनेक पुराणांमध्ये वर्णन केलं आहे. अशा पुस्तकदानाला ‘ सारस्वतदान' असं म्हणत असत. हस्तलिखिताच्या अगदी शेवटच्या भागाला ‘ पुष्पिका’ म्हणतात.
या पुष्पिकांमध्ये हस्तलिखित कसं लिहावं, कसं सांभाळावं या विषयासंबंधी श्लोक आढळतात. आजचा श्लोकही पुष्पिकांमध्ये नेहमी आढळतो. हस्तलिखितांचं सामान्य स्वरूप तर या श्लोकात ध्वनित होतच, पण त्यांच्या जोडीला हस्तलिखिताबद्दलची आपुलकीही दिसते. हस्तलिखितावर प्रसंगानुसार चित्रं, सचित्र समास रेखाटावेत, जसं लहान मुलांना त्यांचे आई बाबा नटवतात. हस्तलिखितही तितक्याच मायेनं सजवावं.
क्षेत्र म्हणजे शेत ( जमीन) आणि स्त्री. या दोहोंचा रक्षण जसं परकीयांपासून करावं त्याप्रमाणेच पुस्तकाचंही. हस्तलिखित स्वच्छ करणं म्हणजे त्यातल्या चुका दुरुस्त करणं. किडा, मुंगी, वाळवी कुठं लागली नाही ना ते रोज बारकाईनं पहावं. लाल रंगाच्या चौकोनी रुमालात हस्तलिखितं बांधून ठेवण्याची पद्धत आहे. बंदिवान पळून जाऊ नये म्हणून जशा त्याला बेड्या घालतात त्याप्रमाणे हस्तलिखितही करकचून बांधून ठेवावं. तसंच, पुस्तकातली विद्या पुस्तकातच राहिली तर काय उपयोग? त्यातल्या आशयाचं स्मरण तर करायलाच हवं. एवढं केलं तर हस्तलिखित का बरं नष्ट होईल?
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी
(पुणे)
वृक्षांश्छित्वा पशून् हत्वा कृत्वा रुधिरकर्दमम्!
यद्येवंं गम्यते स्वर्गे नरकं केन गम्यते!!
पञ्चतन्त्र
वृक्षान् ( झाडांना)
छित्त्वा ( तोडून)
पशून् ( पशूंना)
हत्वा ( मारून)
रुधिर ( रक्त)
कर्दमम् ( चिखल)
कृत्वा ( करून)
यदि ( जर)
एवं ( अशाप्रकारे)
स्वर्गे ( स्वर्गात )
गम्यते ( जाणं होत असेल )
तर्हि ( तर )
नरकं ( नरकात)
केन मार्गेण ( कोणत्या मार्गानं)
गम्यते ( जाणं होतं)?
झाडं तोडून, पशूंना मारून, रक्ताचा चिखल करून जर स्वर्गात जातात तर मग नरकाचा मार्ग कोणता?
अग्नीमध्ये आहुती देणे ही वैदिक धर्मातील पूजापद्धती होती. सोम आणि पशू ही मुख्य आहुतिद्रव्ये. अरण्यात जाऊन एखादं झाड तोडून आणायचं, त्याच्या फांद्या छाटायच्या आणि ते यज्ञशाले जवळ रोवायचं. त्याला यूप म्हणत असत. यज्ञात बळी द्यायचा पशू या यूपाला बांधत असत. यजुर्वेद काळात यज्ञसंस्थेनं चांगलंच मूळ धरलं होतं. त्यामुळे अमाप वृक्षतोड आणि पशुहत्या होत होती. साधारण समाज गतानुगतिक असला तरी प्रत्येक समाजात काही विचारी माणसंही असतात. तत्कालीन समाजात या परंपरेला विरोध करणारे दोन प्रकारचे मतप्रवाह निर्माण झाले.
पहिला आरण्यक- उपनिषदांचा आणि दुसरा बौद्ध, जैन इ. अवैदिक दर्शनांचा. आरण्यक- उपनिषदांनी ‘जगातले अंतीम सत्य यज्ञामुळे प्राप्त होणाऱ्या स्वर्गाहून अधिक श्रेष्ठ आहे हा विचार मांडला. अवैदिक दर्शनांनीही वेदांना विरोध करत आपली स्वत:ची तात्त्विक बैठक पक्की केली. या विचारमंथनाचा परिणाम तत्कालीन वाड़्मयावरही झाला. ज्या यज्ञांमध्ये वृक्षतोड आणि पशुहत्या आहे तो स्वर्गाचा मार्ग नसून नरकाचा मार्ग आहे हा या श्लोकाचा आशय आहे. कालबाह्य रूढींना जाब विचारण्याची (questioning) मुभा या संस्कृतींमध्ये होती हे महत्त्वाचं.
आता पंचतंत्र याविषयी थोडेसे-
इ.स. ३०० मध्ये लिहिल्या गेलेल्या पंचतंत्र या कथासंग्रहातला हा श्लोक आहे. पंचतंत्र हा संस्कृत भाषेतला एक नैतिक कथाग्रंथ. भारतात तर हा प्रसिद्ध आहेच पण प्राचीन काळचा इतर देशांच्याही आवडीचा ग्रंथ होता. आतापर्यंत त्याची सुमारे दोनशे संस्करणे झाली असून पन्नास भाषांमध्ये भाषांतरं झाली आहेत. सर्वाच प्राचीन भाषांतर इ्स. ५५० मध्ये पहलवी या पार्शी बोलीमध्ये झाले. सर्व स्वभावाच्या आणि वृत्तींच्या माणसांना रुचेल अशा शब्दात जीवनोपयोगी तत्त्वज्ञान मार्मिक कथांद्वारे देण्याचा उत्तम प्रयत्न या ग्रंथात केला आहे. या सर्व कथा धर्म आणि अर्थ या दोन पुरुषार्थांभोवती फिरतात.
अमरशक्ती राजाच्या तीन अशिक्षित मुलांना शहाणं करण्याची जबाबदारी विष्णुशर्मा नावाच्या विद्वानानं उचलली आणि त्यांना एकांत एक गुंफलेल्या कथांच्या माध्यमातून विचारी आणि सन्मार्गी बनवलं. इतर अनेक संस्कृत लेखकांप्रमाणेच हा ग्रंथ विष्णुशर्म्यानंच लिहिला का ? हा विष्णुशर्मा कोण होता? इ. प्रश्न अनुत्तरितच रहातात. भारतातल्या दक्षिण भागातल्या हस्तलिखितांमध्ये ग्रंथकाराचं नाव ' वसुभाग' असं दिलेलं आढळतं.
तन्त्राख्यायिका, पञ्चाख्यानक, पञ्चाख्यान, तन्त्रोपाख्यान अशा विविध नावांनी हा ग्रंथ भारताच्या वेगवेगळ्या भागात प्रसिद्ध होता. पंचतंत्र हे नाव आता सर्वत्र रूढ झालं आहे.
यातली पाच तंत्रं पुढीलप्रमाणे आहेत
१) मित्रभेद
२) मित्रलाभ
३) काकोलूकीयम् ( कावळा आणि घुबड यांची गोष्ट)
४) लब्धप्रणाश ( मिळालेलं गमावणे)
५) अपरीक्षितकारकम् ( विचार न करता केलेली कृती)
महाभारतादि ग्रंथांमधल्या सुभाषितांचा समर्पक उपयोग हा पंचतंत्राचा अविभाज्य भाग आहे.
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी (पुणे)
==============
रुपवांश्चापि मूर्खोsपि गत्वा च विपुलां सभाम् ।
संरक्षेच्च स्वकां जिव्हं भार्यां दुश्चारिणीं यथा ।।
हिंदी अर्थ :- रुपवान होते हुए भी जो मूर्ख हो , उसे विशाल सभा में जाकर दुराचारिणी पत्नी के समान अपनी जीभ की भली भाँती रक्षा करनी चाहिये ( अर्थात मौन रहना चाहिये । )
मराठी अर्थ :- रुपवान असूनसुद्धा जो मूर्ख असेल , त्याने विशाल सभेत जावून दुराचारिणी पत्नीसमान आपल्या जीभेची रक्षा करावयास हवी ( अर्थात मौन रहावे .).
विप्रवासकृशा दीना नरा मलिनवाससः ।
तेऽपि स्वदारांस्तुष्यन्ति दरिद्रा धनलाभवत् ॥
हिंदी अर्थ :- जो परदेस में रहकर अत्यंत दुर्बल हो गये है, जो दीन और मलिन वस्त्र धारण करनेवाले है, वें दरिद्री मनुष्य भी अपनी पत्नीको पाकर ऐसे संतुष्ट होते है मानों उन्हें कोई धन मिल गया हो ।
सुसंरब्धोऽपि रामाणां न कुर्यादप्रियं नराः।
रतिं प्रीतिं च धर्मं च तास्वायत्तमवेक्ष्य हि ॥23॥
हिंदी अर्थ :- रति, प्रीति तथा धर्म पत्नि के ही अधीन है, ऐसा सोचकर पुरुष को चाहिये कि, वह कुपित होनेपर भी पत्नी को कोई अप्रिय वचन न बोले।
—————
आत्मनोऽर्धमिति श्रौतं सा रक्षति धनं प्रजाः।
शरीरं लोकयात्रां वै धर्मं स्वर्गमृषीन् पितॄन् ॥24॥
हिंदी अर्थ :- पत्नी अपना आधा अङ्ग है, यह श्रृति का वचन है। वह धन, प्रजा, शरीर, लोकयात्रा, धर्म, स्वर्ग, ऋषी तथा पितर इन सबकी रक्षा करती है।
आत्मनो जन्मनः क्षेत्रं पुण्यं रामाः सनातनम्
ऋषीणामपि का शक्ति स्रष्टुं रामामृते प्रजाम् ॥25॥
हिंदी अर्थ :- स्त्रियाँ पति के आत्मा का जन्म लेने का सनातन पुण्य क्षेत्र है । ऋषियों में भी क्या शक्ति है कि, बिना स्त्री के संतान उत्पन्न कर सके। फिर आप की तो बात ही क्या है?
प्रतिपद्य यदा सूनुर्धरणीरेणुगुण्ठितः।
पितुराष्लिष्यतेऽङ्गानि किमस्त्यभ्यधिकं ततः ॥26॥
हिंदी अर्थ :- जब पुत्र धरती की धूल से सना हुआ पास आता और पिता के अंग से लिपट जाता है, उस समय जो सुख मिलता है, उससे बढकर और क्या हो सकता है? ॥26॥
ममाण्डानीति वर्धन्ते कोकिलानपि वायसाः ।
पुनस्त्वं न मन्येथाः सर्वज्ञः पुत्रमीदृशम् ॥27॥
मलयाच्चन्दनं जातमतिशीतं वदन्ति वै ।
शिशोरालिङ्ग्यमानस्य चन्दनादधिकं भवेत् ॥28॥
हिंदी अर्थ :- यह मेरे अपने ही अण्डे है ऐसा समझकर कौए कोयल के अण्डों का भी पालन-पोषण करते हैं; फिर आप सर्वज्ञ होकर अपने से ही उत्पन्न हुए ऐसे सुयोग्य पुत्र का सम्मान क्यों नहीं करते? लोग मलयगिरिके चन्दन को अत्यन्त शीतल बताते हैं, परंतु गोदमें सटाए हुए शिशु का स्पर्श चन्दनसे भी अधिक शीतल एवं सुखद होता है ।
न वाससां न रामाणां नापां स्पर्शस्तथाविधः ।
शिशोरालिङ्ग्यमानस्य स्पर्शः सूनोर्यथा सुखः ॥29॥
हिंदी अर्थ :- अभी दंतावली प्रकट नही हुई है ऐसे अपने शिशु पुत्र को हृदय से लगा लेने पर उसका स्पर्श जितना सुखदायक जान पड़ता है, वैसा सुखद स्पर्श न तो कोमल वस्त्रों का है, न रमणीय सुन्दरियोंका है और न ही शीतल जल का है ।
विद्धि श्रीहृदयं सदान्तमलिनं भीमं भवाम्भोनिधिं
विज्ञाने सुरतं महीशभवनं गूढं दृढं कण्टकैः।
दारागारसमागमं सुविषमं मोहं परं दुस्तरं
जम्बूवज्जलबिन्दुवज्जलजवज्जम्बालवज्जालवत् ॥
हिंदी अर्थ :- हे जीव! आत्मज्ञान प्राप्त कर तू इस जगत को देखकर लक्ष्मी का हृदय ‘जामून’ जैसा सदा मलिन मान, भयंकर लगने वाले भवसागर को ‘जलबिन्दु’ के समान क्षणिक जान, स्त्री के रतिक्रीडा को ‘कमल’ के समान भ्रमर को ठगने वाली मान, दुष्टजनरुपी दृढ काँटों से लपेटे हुए राजभवन को ‘काई (सेवाल)’ के समान गूढ जान वैसे ही जिसमें स्त्री, घर जैसों का समागम होता है, उस संसाररूपी मोह को बंधन से न छूटने वाले ‘जाल’ के समान जान।
मराठी अनुवाद :- हे जीव! आत्मज्ञान प्राप्त करून ह्या जगताला बघून लक्ष्मीचे हृदय तू ‘जांभळा’ सारखे मलिन मान, भयंकर वाटणाऱ्या भवसागराला तू ‘जलबिन्दु’ समान क्षणिक जाण, स्त्री सोबत रतिक्रिडेला तू ‘कमळासमान’ भ्रमराला ठगणारी जाण, दुष्टजनरूपी कठोर काट्यांनी वेढलेले राजभवन तू ‘शेवाळासारखे’ गूढ मान तसेच ज्या घरांत स्त्री, घर इ. सह समागम होतो, त्या संसार रूपी मोहाला बंधनांतून सुटणाऱ्या ‘जाळ्यासमान’ तू जाण.
ब्राह्मणो द्विपदां श्रेष्ठो गौर्वरिष्ठा चतुष्पदाम् ।
गुरुर्गरीयतां श्रेष्ठः पुत्रः स्पर्शवतां वरः ॥
हिंदी अर्थ :- द्विपाद मनुष्य में ब्राह्मण श्रेष्ठ है, चतुष्पदों में गौमाता श्रेष्ठ है, गौरवशाली व्यक्तियों में गुरु श्रेष्ठ है, और स्पर्श करने योग्य वस्तुओं में पुत्रस्पर्श ही सबसे श्रेष्ठ है।
परस्परविरोधे तु वयं पंचश्चते शतम् ।
परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पंचाधिकं शतम् ।।
अर्थ:- एकमेकांच्या विरोधात आपण पाच आणि ते शंभर असतील, पण बाह्यशत्रूशी लढण्याची वेळ आली तर आपण शंभर अधिक पांच असू.
कथा:- पांडव वनवासात असताना त्यांना आपले वैभव दाखवून खिजवण्यासाठी दुर्योधन द्वैतवनात विहार करण्यासाठी गेला. आपला सर्व लवाजमा त्याने बरोबर घेतला. तेथील सरोवराच्या रक्षणासाठी नेमलेल्या गन्धर्वांनी त्यांना सरोवराजवळ येऊ दिले नाही. हट्टाने दुर्योधन सरोवराकडे जायला निघताच गन्धर्वांनी त्याला पकडले. ही वार्ता जेव्हा धर्मराजाला समजली तेव्हा दुर्योधनास सोडवण्यासाठी त्याने भीम व अर्जुन यांना जाण्याची आज्ञा दिली. कौरवांची खोड परस्पर मोडत आहे हे पाहून भीम व अर्जुन यांना मदतीस जाण्याची इच्छा नव्हती पण धर्मराजाने त्यांची समजूत वरील प्रमाणे घातली.
राष्ट्रीय ऐक्याचा सन्देश देणारी ही कथा आहे. आपसातील वैराने सर्व राष्ट्रालाच हानी पोचते. परकीयांचे आक्रमण झाले तर आपसातील वैर विसरून एक होण्याची आवश्यकता असते.
स्रोत :- कथा सुभाषितांच्या - डाॅ. मंगला मिरासदार
माध्वीके विधुमण्डले वरवधूवक्त्रे च गीतान्तरे
सक्ते वक्त्रचतुष्टये दशमुखो विज्ञापितस्तच्चरैः।
बद्धोऽसाविति चेतरैर्भयवशादूचे वचःसम्भ्रमात्
पाथोधिर्जलधिः पयोधिरुदधिर्वारांनिधिर्वारिधिः॥
हिंदी अर्थ :- रावण को दस मुख थे, उनमें एक मुख सुरापान में, दुसरा चंद्रमंडल देखने में, तिसरा सुंदर स्त्री देखने में और चौथा संगीत में अटका हुआ था, इतने में दूत ने आकर रावण को जताया कि, ‘यह बँध गया।’ तब एकदम भयशंकित होकर रावण के छः मुख ने एकसाथ पुछ लिया की, ‘पाथोधि, जलधि, पयोधि, उदधि, वारांनिधि और वारिधि’ बांध लिये?
मराठी अर्थ :- रावणाला दहा मुखे होती, त्यातले एक सुरापानांत, दुसरे चंद्रमंडल बघण्यांत, तिसरे सुंदर स्त्रियांना बघण्यांत आणि चौथे संगितात अडकलेले होते, तितक्यांत दूत येऊन सांगतो की, ‘हे बांधले गेले.’ तेंव्हा भयशंकित होऊन रावणाच्या उरलेल्या सहा मुखांनी एकदम विचारले की, ‘पाथोधि, जलधि, पयोधि, उदधि, वारांनिधि और वारिधि’ बांधले गेले का?
अङ्गादङ्गात् सम्भवसि हृदयादधिजायसे ।
आत्मा वै पुत्रनामासि स जीव शरदः शतम् ॥33॥
जीवितं त्वदधीनं मे संतानमपि चाक्षयम् ।
तस्मात् त्वं जीव मे पुत्र सुसुखी शरदां शतम् ॥34॥
हिंदी अर्थ :- (उस मन्त्रसमुदायका भाव इस प्रकार है-) हे बालक! तुम मेरे अङ्ग-अङ्गसे प्रकट हुए हो। हृदय से उत्पन्न हुए हो; तुम पुत्र नाम से प्रसिद्ध मेरे आत्मा ही हो, अतः वत्स! तुम सौ वर्षों तक जीवित रहो । - 33
मराठी अर्थ :- मेरा जीवन तथा अक्षय संतान-परम्परा भी तुम्हारे ही अधीन है। अतः पुत्र! तुम अत्यन्त सुखी होकर सौ वर्षों तक जीवन धारण करो ।
पीतस्त्वं कलशोद्भवेन मुनिना ध्वस्तोऽपि देवासुरैः
आबद्धोऽसि च राघवेन मृदुना शाखामृगैर्लङ्घितः।
नाम्नामारभटी वृथैव भवतो लोकैरियं घुष्यते
पाथोधिर्जलधिः पयोधिरुदधिर्वारांनिधिर्वारिधिः॥
हिंदी अर्थ :- समुद्र को उद्देश कर कवि कहता है कि, आपको कुंभजन्म अगस्ति पी गये, देव और दैत्योंने आपका मंथन किया, रामचंद्र ने आपको बांध दिया और वानरोंने आपका उल्लंघन किया; तब लोग जो आपके नामकी प्रसिद्धि गाया करते हैं, और पथोथि, जलधि, पयोधि, उदधि, वारांनिधि, वारिधि कहते हैं यह व्यर्थ ही है।
मराठी अर्थ :- समुद्राला उद्देशुन कवि म्हणतो की, आपणांस कुंभजन्म अगस्ति पिऊन गेला, देव आणि दैत्यांनी आपले मंथन केले, रामचंद्रांनी आपणांस बांधले आणि वानरांनी तर आपले उल्लंघन केले; तर लोक जी आपल्या नावांची प्रसिद्धि गातांत आणि ‘पाथोधि, जलधि, पयोधि, उदधि, वारांनिधि और वारिधि’ म्हणतांत ते व्यर्थच आहे.
राजन् सर्षपमात्राणि परच्छिद्राणि पश्यसि ।
आत्मनो बिल्वमात्राणि पश्यन्नपि न पश्यसि ॥
हिंदी अर्थ :- राजन्! आप दूसरों के सरसों के बराबर दोषों को तो देखते रहते हैं, किंतु अपने बेल के समान बड़े-बड़े दोष को देखकर भी नहीं देखते ।