समाजात वावरताना हे 9 नियम अवश्य पाळावे - samajat vavartana he 9 niyam palave

समाजात वावरताना हे 9 नियम अवश्य पाळावे - samajat vavartana he 9 niyam palave

समाजात वावरताना हे 9 नियम अवश्य पाळावे - samajat vavartana he 9 niyam palave

१) तुमचे ध्येय निश्चित करा, मला काय करायचंय, काय व्हायचंय, कुठे पोहचायचय, काय मिळवायचंय हे आज, आत्ता ठरवा.

२) त्या दृष्टीने प्रयत्न करा. यासाठी आपल्याला कुणा-कोणाची मदत होईल, कोण-कोण साथ देईल, चांगली माहिती असलेली कोणती-कोणती पुस्तके वाचावी लागतील, आपल्याला कोणा-कोणाचे सहकार्य घ्यावे लागेल, अशा प्रकारच्या अनेक गोष्टींची, बाबींची यादी करा. त्यांना सर्वांना भेटा. त्या गोष्टी मिळवा.

३) काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टामस्करी केली, अडवले काहीही होवो, चांगल्या कामात निर्लज व्हा. मानसन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठायचे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी, ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचे.

४) कोणावर सगळ्या गोष्टींसाठी अवलंबून राहू नका. स्वावलंबी बना. सोयीची बाब म्हणून अगदीच छोट्या गोष्टीसाठी दुसऱ्यांकडून मदत घेऊ शकता.

५) मी अडचणीत आहे, हे नाही ते नाही म्हणत जगासमोर गेला, तर लोक मदत करतच नाहीत; पण मजबुरीचा फायदा घेतात.

६) सर्वांशी चांगले संबंध ठेवा. कदाचित तुम्ही ज्या संघटनेत, ज्या गावात, ज्या पक्षात, ज्या जातीत, ज्या प्रदेशात, राष्ट्रात आहात तेथेच तुमचे जास्त असू शत्रू असतात. कारण हे लोक आतून गेम करतात आणि कधीकधी बाहेरचे आणि ज्यांना आपण शत्रू मानतो ते लोक अचानक मदत करतात. यामुळे शत्रू कोणाला मानू नका. जे विचार पटत नाहीत ते बाजूला ठेवून जे पटतात ते घेऊन मैत्री करा. मोठे पुढारी, नेते, संघटनेचे वरिष्ठ लोक असेच वागतात, यशस्वी होतात.

७) कोणाची जातपात, धर्म पाहू नका. कर्तृत्ववान मग तो कोणीही असेल त्याला जवळ करा. आपले माना,

८) जी व्यक्ती तुम्हाला चांगले सल्ले देते, तुमचे भले व्हावे असा विचार करते अशा सज्जन व्यक्तीला आपला गुरू मानावे, मग ती व्यक्ती वयाने लहान असो किंवा मोठी असो, स्त्री असो अथवा पुरुष असो. मी मोठा हा/ही लहान असला विचार करू नका. अशा तुमच्या हितचिंतक असलेल्या चांगल्या व्यक्तीने एखाद्या वेळेस तुमचा अपमान केला, किंवा रागावले, तुम्हाला लाथाडले तरी त्या व्यक्तीला सोडू नका. कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत; पण तुम्हाला चांगला मार्ग दाखविणारे फार कमी लोक असतात.

९) आयुष्यात कटू निर्णय घ्यावे लागतात. एकदा एका साधूंनी आपल्या आश्रमातील दोन शिष्यांना बोलवून घेतले. त्यांना सांगितले की तुम्हाला येथून डोंगरापलीकडे असलेल्या पुढच्या गावात जायचे आहे. शिष्यांनी निघण्याची तयारी केली. त्या गावाला जाताना साधूंनी एका शिष्याकडे खाद्यपदार्थ भरलेले पोते दिले आणि त्याला सांगितले की रस्त्यात यथायोग्य किंवा गरजू व्यक्ती दिसेल त्याला हे देत जा. साधूंनी दुसऱ्या शिष्याला रिकामे पोते दिले आणि सांगितले, तुला जे रस्त्याने चांगले दिसेल ते या पोत्यात भरत जा. दोघे शिष्य प्रवासाला निघाले. ज्याच्या खांद्यावर ओझे होते तो

    हळूहळू चालत होता. तर दुसरा शिष्य मात्र आरामात सहज चालत होता. कारण, त्याच्याकडे पोते रिकामे होते. बरेच अंतर चालल्यावर रिकामे पोते पाठीवर असलेल्या शिष्याला सोन्याची वीट मिळाली. त्याने ती उचलली आणि पोत्यात टाकली. नेमक्या त्याचवेळेस दुसन्या शिष्याला रस्त्यावर एक गरजू दिसला. त्याच्या पोत्यातील खाण्याचे साहित्य त्या शिष्याने गरजूला देऊन टाकले. दुसऱ्या शिष्याला काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा सोन्याची वीट मिळाली. त्याने ती उचलून पोत्यात टाकली. तोवर दुसऱ्या शिष्याला अन्नासाठीचा गरजू दिसला. त्याने पोत्यातील फळे देऊन टाकली..

    एका शिष्याला जे मिळत गेले, ते तो भरत गेला. त्याला आता चालणेही मुश्किल झाले. तेंव्हा, दुसरा मात्र अन्नपदार्थ वाटत गेल्यामुळे त्याच्या पाठीवरील ओझे कमी कमी होत गेले आणि तो आता आरामात चालू लागला, ठरलेल्या ठिकाणी वेळेत आणि सहजासहजी पोहोचणे त्याला शक्य झाले. दुसऱ्याची परस्थिती मात्र बिकट झाली. त्याला चालणे ही कठीण झाले. शेवटी तो अर्ध्या वाटेवरच दमून थांबला.

तात्पर्य :- आपण आयुष्यात काय वाटत गेलो आणि काय संग्रह करत गेलो म्हणजे निश्चित ठिकाणी कसे पोहोचू, यावर शांतपणे विचार करायला हवा. कशाचे ओझे हवे आणि काय टाळायचे, हे ठरवणे हा आयुष्यातील कठीण आणि कटू निर्णय असतो. 

प्रत्येकजण युनिकच असतो, दुसऱ्याशी तुलना करणे टाळा प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तिची आपापली बलस्थानं असतात, आपापल्या उणिवा असतात. अगदी दोन एकसारखी दिसणारी जुळी भावंडंसुद्धा वेगळी असतात. या दृष्टिकोनातून बघितलं तर दोन व्यक्तींच्या आयुष्याची तुलना करणं निराधार आणि निरर्थक आहे, तरी आपण ती करतो.

तुलनेच्या मुळाशी आंतरिक स्पर्धा, ईर्ष्या जबाबदार आहेत. साध्या साध्या गोष्टींमध्ये ही तुलना आपल्या नकळत आपण करतो. इतरांना आपल्यापेक्षा जास्त सुख मिळत नाहीये ना ही असुरक्षितता आपण बाळगून असतो. दुसऱ्याचं दुःख बघून कधी कधी आपल्या मनाचा एखादा कोपरा आपल्या नकळत सुखावतो. हेही नाकारून चालणार नाही. ही तुलना जेव्हा जास्त तीव्र होते तेंव्हा अशांतता निर्माण व्हायला वेळ लागत नाही तुलनेने माणसं दुखावली जातात. तुलना जर बोचरी असेल तर त्यामुळे नाती कायमची बिघडू शकतात. केवळ इतकेच नाही सतत तुलना करून आपणच कसे ग्रेट आहोत असं जर वाटत आलं तरी धोकाच आहे.

आपण आपला मुद्दा पटवून देण्यासाठी दोन वस्तूंची, दोन परिस्थितीची, दोन माणसांची एकमेकांशी तुलना करत असतो.. तुलना केल्यामुळे काही मर्यादित प्रमाणात विकास करण्यासाठी मदत होत असली तरी तिचा अतिरेक होता कामा नये. विशेषतः माणसांची माणसांशी तुलना टाळलीच पाहिजे. पालकांनी सतत आपल्या मुलांची तुलना त्यांच्या मित्र मैत्रिणीशी करू नये. नवरा बायकोंनी देखील आपले नाते जपताना इतरांच्या नात्याशी स्वतःच्या नात्याची तुलना करू नये. या बाजूला हिरवळीवर उभ्या असलेल्या माणसाला त्या बाजूची हिरवळ जास्त हिरवीगार दिसते.

त्या बाजूला गेल्यावर कळतं की ती तितपतच हिरवी आहे. आयुष्यात आनंदी व्हायचं असेल तर प्रत्येकाने आपापल्या हिरवळीचा आनंद घ्यावा उत्तम. करिअरचा निर्णय घेतांना ही गोष्ट राहायचं लक्षात ठेवावी. तुम्ही जर कोणाशी तर स्वतःची तुलना दुसऱ्याशी करत राहिलात तर तुमच्या हाती काहीही लागणार नाही.



Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post