दुर्योधनाच्या पत्नीचे नाव काय होते? दुर्योधनाने जबरदस्तीने तिच्याशी विवाह केला होता कसा?

दुर्योधनाच्या पत्नीचे नाव काय होते? दुर्योधनाने जबरदस्तीने तिच्याशी विवाह केला होता कसा?

दुर्योधनाच्या पत्नीचे नाव काय होते? दुर्योधनाने जबरदस्तीने तिच्याशी विवाह केला होता कसा? 

महाभारतातील ही कथा आहे. द्वापार युगात , कंबोजच्या राजा चंद्रवर्माची कन्या , भानुमतीचे स्वयंवर आयोजित करण्यात आले होते. भानुमती ही स्वर्गातील अप्सरापेक्षा पण सुंदर होती. या स्वयंवरात दुर्योधन, कर्ण, जरासंध, शिशुपाल, रुक्मि, जयद्रथ सारख्या पराक्रमी राजांची भानुमतीशी लग्न करण्याची इच्छा निर्माण केली होती. सर्व स्वयंवराची तयारी झाली. रथी, महारथी, राजे, योध्ये अशा एकापेक्षा एक विभूतींनी स्वयंवर मंडप गच्च भरला होता.

भानुमती अगोदरच एखादी अप्सरा भासावी इतकं सुंदर होती , त्यात अजुनच नटून थटून सजावट करून स्वयंवर स्थळावर आली तेव्हा सर्व राजे, योध्ये तिचे सौंदर्य बघुन मोहित झाले होते. आज पर्यंत अशी रूपवान व वेगळे सौंदर्य असलेली युवती त्यांनी पाहिली नव्हती.

जेव्हा दुर्योधनने भानुमतीला प्रथम पाहिले तेव्हा तो एकदम अस्वस्थ झाला आणि काही झाले तरी भानुमती ही हस्तिनापुरची पट्टराणी झालीच पाहिजे म्हणून त्याने तिला स्वयंवरात जिंकण्याचा निर्धार केला. भानुमती हातात वरमाला घेऊन आपल्या दास्या आणि अंगरक्षकासह स्वयंवर मंडपात एक एक योद्धा पहात पुढे जात होती, व मंत्री प्रत्येक राजाची थोरवी व इतर माहिती सर्व राजांविषयी देत होते.

एक एक योद्धांची अशी ओळख चालु होती. अशीच ती दुर्योधनासमोर पोचल्यावर, त्याला वाटले, आपला पराक्रम आणि वैभव भानुमतीला  भूरळ घालेल. थोड्या वेळासाठी ती दुर्योधनासमोर थांबली आणि पुढे जाऊ लागली. दुर्योधनाला वाटले होते की, भानुमती आपल्याला वर म्हणून निवडले. परंतु तसे न झाल्याने दुर्योधनाचा अंहकार जागृत झाला, आणि दुर्योधनाने भानुमतीच्या हाताला जबरदस्तीने धरून वरमाला आपल्या गळ्यात घालून घेतली. भानुमतीला घेऊन तो स्वयंवर मंडपाच्या बाहेर गर्जना करीत पळत होता.

तेवढ्यात तेथे उपस्थित रथी महारथी यांनी लगेच आपल्या तलवारी उपसल्या, आणि स्वयंवर मंडपाचे एका युद्ध भूमीत रूपांतर झाले. दुर्योधनाचे एवढे तर कुणाच्या जीवावर होते, तर त्याला पराक्रमी जीवलग मित्र म्हणून कर्णाची साथ मिळाली होती. सर्व उपस्थित सर्व राजांनी याचा विरोध केला, बाणांचा वर्षाव होऊ लागला, तलवारी खणानू लागल्या. पण दुर्योधनाने आव्हान केले होते की अगोदर कर्णा बरोबर युद्ध करा. कर्णाने त्यानंतर झालेल्या सर्व धुमशचक्रीत सर्व राजांचा पराभव केला.

यात सर्वात कडवी झुंज जरासंधाने दिली होती. त्यात मल्ल युद्ध चालु असतांना कर्णाने अंत्यत जीवघेणा आणि मल्ल युद्धातील धोकेदायक "बाहुकंटक" डाव टाकला आणि स्वतः कम्बोज नरेश आणि वधुपिता चंद्र वर्मा यांनी मध्यस्थी करून जरासंधाचा पराभव झाला, पण प्राण वाचविले. तसे जरासंधाचे मरण सोपं नव्हतं, कारण त्याला एक वरदान होते. हे युद्ध २१ दिवस चालले होते. कर्णाच्या पराक्रम व कौशल्य पाहुन जरासंधाने कर्णाला आपला मित्र बनवले आणि त्याला आपल्या राज्याचा "मालिनी" चा काही भाग म्हणून भेट म्हणून दिली. जरासंधाचा हा पहिलाच पराभव होता.

स्वयंवरात जिंकून भानुमतीला घेऊन दुर्योधन हस्तिनापूरला गेला. त्याला विरोध करण्यात आला. त्यावेळेस दुर्योधनने सांगितले की क्षत्रियासाठी ही पराक्रमाची आणि अभिमानाची घटना आहे. भीष्म पितामह यांनी पण काशी नरेश कन्या अंबा, अंबाला आणि अंबालिकाला विचित्रवीर्यसाठी इतर राज्याबरोबर युद्ध करून पळवून आणले होते.

त्यानंतर दुर्योधन आणि भानुमतीने लग्न केले. दुर्योधन आणि भानुमतीच्या लग्नानंतर कर्णाची मैत्री अजुनच दृढ झाली. कर्णाला अगोदरच वृषाली नावाची पत्नी होती. भानुमतीबरोबर पाठराखीण म्हणून आलेली सुप्रिया पण एक अप्सरासारखी सौंदर्यवान होती. तिच्यावर कर्णाचे प्रेम जडले. नंतर भानुमतीची पाठराखीण म्हणून आलेल्या सुप्रियाचा विवाह कर्णाबरोबर झाला.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post