सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते - पैशाचा सद्उपयोग करणे काळाची गरज! - चिंतन लेखसंग्रह -

सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते - पैशाचा सद्उपयोग करणे काळाची गरज! - चिंतन लेखसंग्रह -

 चिंतन लेखसंग्रह 

पैशाचा सद्उपयोग करणे काळाची गरज!

समाजाकडे पहात असतांना, समाजाच्या मनावर अर्थाने एवं धनाने आपला बराच प्रभाव जमावलेला दिसत आहे. त्यामुळे  सहाजीकच धनवान व्यक्तीकडे समाज आकर्षित झालेला पाहाण्याला मिळत आहे. कोणते क्षेत्र असे नाही की, जेथे धनाचा संबंध येत नाही. प्रत्येक क्षेत्रांत धनाचा संबंध जोडलेलाच आहे.

साधे व्यवहारातले ऊदाहरण घेतले जरी, एखादी व्यक्ती आजारी पडली आहे. आपण तिला डाँक्टर कडे नेले. तर डाँक्टर म्हणतात. प्रथम डिपाँजीट भरा, मग अँडमिट करुन घेतो. म्हणजे येथे धनाचा संबंध आलाच ना! विवाहाच्या निमित्ताने सोयरीक करण्याचा संबंध येतो. तर तेथे विचारले जाते, पुढील पार्टी कसी काय आहे. म्हणजे धनाने मजबूत आहे का? येथे देखील धनचा संबंध पाहिल्या जातो.म्हणून  धन मिळविण्याकडे समाजाचा बराच कल वळालेला आपणाला पाहाण्याला मिळतो.

चाणक्याने वर्णन करतांना म्हटले आहे..

यस्याSर्थास्तस्य मित्राणि।

 यस्याSर्थास्तस्य बांधवाः।

यस्याSर्थाः स पुमाँल्लोके ।

 यस्याSर्थाः स च जीवति ।।

एखादा मित्र आहे. त्याच्या कडे विपुल प्रमाणात धन संपदा आहे. अशा मित्राकडे मित्रांचा घोळका गोळा झालेला जास्त दिसेल. मग मित्राचा कोणताही कार्यक्रम असो! तेथे मित्रांची उपस्थिती भरगच्च स्वरुपात पाहाण्याला मिळेल. बांधवांची देखील संख्या कमी दिसणार नाही. मग तेथे तर एकमेकाची चढाओढ लागलेली पाहाण्याला मिळते.

ज्याच्या जवळ संपत्ती आहे. तोच या जगात मोठा माणूस म्हणून ओळखल्या जातो. त्यालाच पंडित देखिल म्हणतात! भर्तृहरीच्या नीतिशतकामधे देखिल धनाच्या प्रभावाची बरिच  उदाहरणे पाहाण्यस मिळतात. त्यांनी वर्णन करतांना म्हटलेले आहे.

यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः

स पण्डितः सः श्रूतवान् गुणज्ञः

स एव वक्ता स च दर्शनीयः

सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते ।।

म्हणजे ज्या ममूष्या जवळ धन आहे. तोच या संसारतला मोठा कुलवान व्यक्ती आहे. तोच विद्वान, तोच शास्त्रज्ञ, तोच गुणांचा जाणकार, तोच खरा वक्ता एवं उत्तम भाषाण करणारा आहे. तोच दर्शीनिय आहे. म्हणजे त्याचेच दर्शन घ्यावे.

सांगायचे तात्पर्य वरिल सारे गुण धनाच्या आश्रीत आहे. धन जर नसेल, मग कितीही चांगले गुण का असेना? त्याला कोणी विचारणार नाही. म्हणून गुणाला धनाची जोड आसने आवश्यक आहे. एखाद्याकडे धन असले,

पण एकही गुण नसला,तरी त्याला ही दुनिया गुणवान म्हणेल. कारण त्याच्याकडे धन आहे. एखाद्याकडे चांगले गुण आहे. मग  त्या गुणांना धनाचा जर आश्रय मिळाला तर त्या व्यक्तीची किर्ती चहुकडे पसरल्याशिवाय राहाणार नाही. तुकारामांच्या साहित्यात देखिल धनाच्या संदर्भात उल्लेख पाहाण्यास मिळतो,

धनवंतालागीं सर्व मान्यता आहे जगी । १। 

माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ।२।

जव चाले धंदा । तवं बहिण म्हणे दादा।

सदा श्रुंगारभूषणे । कांता लवे बहुमताने ।४। 

तुका म्हणे धन । भाग्य अशाश्वत जाण ।।

 ज्याच्या जवळ धन द्रव्य आहे. त्यालाच या जगात मानसन्मान व प्रतिष्ठा असते. आई, बाप, भाऊ, व इतर जन त्याचेच वचन मानतात. जो पर्यंत द्रव्याच्या साह्याने मोठा व्यापार चालतो. तेव्हां बहिण म्हणते माझा... माझा... दादा ! पत्नीच्या आगांवर सतत भारी वस्त्रे व बहुमोल सूवर्णाचे आलंकार घालायला दिले. तरच ती नम्रपणे राहाते. पण असे धनाच्या अधाराने मिळालेले भाग्य मात्र क्षणिक आहे. व ते नष्ट ही होते.

धन देखिल ऊत्तम मार्गाने कमवलेले पाहिजे. वाईट मार्गाने मिळवलेले धन जास्त दिवस राहू शकत नाही. म्हणून म्हटले आहे.,

अन्यायोपार्जितं द्रव्यं, दश वर्षाणि तिष्ठति।

प्राप्ते चैकादशे वर्षे , समूलं तद् विनश्यति ।।

अन्यायाने मिळविलेले धन दहा वर्षा पर्यंत टिकते. अकरावे वर्ष सुरु होताच, ते धन व्याजा सह व मुळ रक्कमे सह नष्ट होते. प्रामाणिकपणे कमवलेले धन पिढ्यान् पिढ्या टिकून) राहाते. परंतू अन्यायाने दुसर्याला फसवून, छळून इत्यादी गैरमार्गाने मिळवलेले धन फारच थोडा वेळ राहते.

मनुष्याने ईश्वाराची उपासना करुन योग्य मार्गाने मिळवलेले धन असेल, ते किर्ती देणारे, सर्व इच्छा पुर्या करणारे असते. ते धन निरंतर वाढतच राहाते.

।। जोडूनिया धन ऊत्तम व्यवाहारे ।।

म्हणून मिळवलेल्या धनाला समाज कार्यासाठी, त्या बरोबर परमार्थीक कार्यासाठी वळविले पाहिजे. कोठे महावाक्याची पोथी चालू आहे. त्या ठिकाणी अन्नदान व कोठे साधुसंताचा मार्ग आलेला आहे. किंवा मंदिरांचे बांधकाम चालू आहे. अशा ठिकाणी दानधर्म करणे. असे परमार्गाच्या ठिकाणी धन लावले. तर मिळविलेल्या धनाचे चीज झाल्या शिवाय राहाणार नाही. असा धनाचा सद्ऊपयोग सामाजिक व धार्मिक कार्यासाठी कराल अशी आपेक्षा व्यक्त करतो.

महंत जयराज शास्त्री तळेगावकर (साळवाडी)

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post