संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit hindi - marathi arth
समस्या पूर्ति सुभाषित
उन्नमय्य सकचग्रहमास्यं चुम्बति प्रियतमे हठवृत्त्या।
कूजितं जयति मानधनाया हूंहुहूंहुहुहुहूंहुहुहूंहूं॥
हिंदी अर्थ :- जब कोई प्रियतम मानिनी के माथे को बालों सहित मुख को पकडकर उसका जबरदस्ती चुंबन लेता है, तब उस मानिनी के ‘हूं हु हूं हु हु हु हूं हु हु हूं हूं’ ऐसे कूंजन को वह प्राप्त करता है।
मराठी अर्थ :- जेव्हा कोणी प्रियकर कोणा मानिनीच्या माथ्याचे केसांसहित चेहरा पकडून जबरदस्ती ने चुंबन घेत असतो, तेंव्हा त्या मानिनीच्या हूं हु हुंहुंहुं हुंहुंहू अशा कूंजनाला तो प्राप्त करतो.
महाभारत सुभाषित
प्रथमं संस्थिता भार्या पतिं प्रेत्य प्रतीक्षते ।
पूर्वं मृतं च भर्तारं पश्चात् साध्व्यनुगच्छति ॥
हिंदी अर्थ :- साध्वी स्त्री यदि पहले मर गयी हो तो परलोक जाकर वह पति की प्रतिक्षा करती है और यदि पहले पति मर गया हो तो सती पीछे से उसका अनुसरण करती है ।
धैर्यं यस्य पिता क्षमा च जननी शान्तिश्चिरं गेहिनी!
सत्यं सूनुरयं दया च भगिनी भ्राता मन:संयम:!
शय्या भूमितलं दिशोsपि वसनं ज्ञानामृतं भोजनम्!
एते यस्य कुटुम्बिनो वद सखे कस्मा्द्भयं योगिन:!!
श्लोकार्थ :- यस्य ( ज्याचा ) पिता (वडिल) धैर्य , क्षमा ही जननी (आई), चिरं ( अनेक काळची) शांती ही गेहिनी ( पत्नी), सत्य हा सूनु: ( मुलगा, son), दया ही भगिनी ( बहिण), मन:संयम ( मनावरचा संयम) हा भ्राता ( भाऊ) आहे; भूमितल हीच शय्या ( बिछाना), दिश: अपि (दिशा हे) वसनम् ( वस्त्र), ज्ञानामृतं ( ज्ञानरूपी अमृत ) हे भोजन . एते ( हे) ज्याचे कुटुम्बिन: ( कुटुम्बीय) आहेत अशा योग्याना कस्मात् ( कशापासून) भयं ( भीती असेल) सखे(मित्रा) वद(सांग बरं)?
योग्यामधील मानसिक गुण हेच त्याचे कुटुंबीय आहेत अशी कल्पना केली आहे. कुटुंबीय जसे सतत आजूबाजूला वावरत असतात तसेच हे गुण योग्याच्या जवळ असतात. अत्यल्प गरजा आणि हे मानसिक गुण जर असतील तर कशापासून ही भीती रहात नाही.
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी (पुणे
---****---***--****-----*****---***--
गुणं विहाय काव्येषु दोषं दुष्टो गवेषते!
वनेषु त्यक्तमाकन्द: काको निम्बमपेक्षते!!
मधुराविजयम्, गंगादेवी
दुष्टः ( वाईट व्यक्ती )
काव्येषु ( कलाकृतींमधले )
गुणं विहाय ( गुण सोडून)
दोषंं गवेषते ( शोधतो).
वनेषु ( अरण्यात)
त्यक्तमाकन्द: ( माकंद = आंबा, आंबा सोडून)
काक: ( कावळा)
निम्बमपेक्षते (कडुनिंबाची अपेक्षा करतो.)
वाईट व्यक्ती कलाकृतीमधल्या गुणांकडे न पाहता दोष शोधत बसते. अरण्यात कावळा आंबा सोडून कडुनिंबाची इच्छा धरतो.
‘गुणी गुणी वेत्ति’ (गुणी माणूसच दुसऱ्याचे गुण जाणतो.) हाच आशय इथे सोदाहरण स्पष्ट केला आहे.
हा श्लोक गंगादेवी या कवयित्रीनं लिहिलेल्या मधुराविजयम् या महाकाव्यातला आहे. संपूर्ण भारतभर यवनांचे ध्वज फडकत असतांना हरिहर आणि बुक्क या बंधुद्वयीनं कर्नाटकात हिंदूंचं स्वतंत्र साम्राज्य स्थापन केलं. विजयनगरच्या या साम्राज्यानं सायणाचार्यांच्या वेदभाष्यमालिकेबरोबरच इतर कलांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली. समाजात आदर्शवाद बिंबवण्याचा प्रयत्न केला. या आदर्शवादाचंच एक दृश्य फल म्हणजे या साम्राज्यात स्त्रीलेखकांना मिळालेलं प्रोत्साहन. इ.स. १० व्या शतकानंतर खंडित झालेली कवयित्रींची प्रतिभा या साम्राज्यात पुन्हा प्रवाहित झाली.
बुक्कराजाची सून गंगादेवी हिनं लिहिलेलं ‘ मधुराविजयम्’ हे महाकाव्य आज उपलब्ध असलेलं एका स्त्रीनं लिहिलेलं एक महाकाव्य आहे. तिला बंडखोर कवयित्री म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रामायण- महाभारतांतल्या कथांचा आधार घेऊनच महाकाव्य लिहावं हा संस्कृत साहित्यशास्त्राचा हा दंडक तिनं झुगारून दिला आणि स्वत:च्या पतीच्या मदुराईवरच्या स्वारीचं चित्र या महाकाव्यात तिनं रेखाटलं. साधी आणि सरळ भाषा हे तिच्या शैलीचं वैशिष्ट्य प्रस्तुत श्लोकातही दिसून येतं.
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी (पुणे)
दुर्जनः प्रियवादी च नैतद्विश्वासकारणम् |
मधु तिष्ठति जिव्हाग्रे हृदये तु हलाहलम् | हितोपदेश-विग्रह ३.१०१
अर्थ :- दुर्जन गोड बोलतो तरी तो विश्वासाला पात्र ठरू शकत नाही. कारण त्याच्या जिभेच्या टोकावर मध असलं तरी हृदयात मात्र विष असते.
सुभाषित कथा :- प्राचिन काळी दंडकारण्यात एक सुरिली नावाचे हरिण आणि एक सुबुद्धी नावाचा कावळा असे दोघे मित्र राहत असतात. त्या धष्टपुष्ट हरणाच्या लोभाने एक दिवस एक दुर्मन नावाचा कोल्हा तिथे आला आणि 'मी पण तुमचा मित्र आहे' असे गोड भाषेत बोलू लागला. सुबुद्धी कावळ्याने हरणाला सांगून पाहिले की हा दुर्मन कोल्हा आपला मित्र कधीच होऊ शकणार नाही कारण तो तुझ्या मासाच्या लोभाने येथे आलेला आहे.
तो तुला गोड गोड बोलून फसवत आहे. त्याच्यासारख्यांच्या जिभेवर मध आणि हृदयात विष असते. पण मित्राच्या बोलण्यावर हरणाने विश्वास ठेवला नाही. त्याचे प्रत्यंतर त्याला एक दिवस आले. पारध्याने टाकलेल्या जाळ्यात हरिण अडकले असता सुटकेसाठी हरणाने कोल्ह्याला विनंती केली तेव्हा उपासाची बतावणी करून 'दातांनी जाळे कसे तोडू' असे म्हणून कोल्हा झाडामागे लपून बसला.
कावळा तिथे आल्यावर त्याने हरणास सांगितले की मेल्याचे सोंग करून पडून राहा आणि मी आवाज दिला की पळून जा. त्यानुसार पारधी जवळ आल्यावर त्याने हरणास जाळ्यातून बाहेर काढले. हरिण मेल्याचे आढळल्यावर तो दोरी शोधू लागला. तेवढ्यात कावळ्याने आवाज केल्याबरोबर हरिण धूम पळाले व पारध्याने फेकलेल्या दण्डुक्याने कोल्हा मेला.
अलभ्यं लब्धुकामस्य जनस्य गतिरीदृशी|
अलभ्येषु मनस्तापः संचितार्थो विनश्यति||
असाध्य गोष्टीच्या पाठीमागे लागलेल्या माणसाची अवस्था अशी होते की, असाध्य वस्तु न मिळाल्याने मनस्ताप तर होतोच आणि ती मिळवण्यासाठी जमवलेली पुंजी मात्र खलास होऊन जाते. म्हणून मृगजळाच्या मागे लागू नये.
मम करग्रहणाय पणीकृतं न यदि राघवतोऽप्यधिरोहति।
सखि तदैवमभून्मम जीविते शशकशृङ्गमयं कठिनं धनुः॥
हिंदी अर्थ :- खरगोश को सिंग नही है, फिर उससे बना हुआ धनुष्य तो असंभव है, यह भाव बताते हुए कवि सीता उसके सखी को पाणीग्रहण का प्रसंग वर्णन करते हुए कहता है, हे सखी! मेरे पाणिग्रहण के लिये मेरे पिता ने शिवधनुष्य की प्रतिज्ञा ली थी। वह धनुष्य अगर रामचंद्रजी से उँचा नही होता तो उसी वक्त मेरा जीवन तो ‘खरगोश के सिंग से बने हुए धनुष्य जैसा कठीन बन जाता.’ मतलब मेरा जीवन असंभवित बन गया होता ।
मराठी अर्थ :- सशाला शिंगे नाहीत तर त्यापासून बनणारे धनुष्य तर अशक्य आहे, हा भाव प्रकट करित कवी सीता तिच्या सखीला तिच्या पाणीग्रहण चा प्रसंग वर्णन करतांना सांगतो की, हे सखी! माझ्या पाणिग्रहण साठी माझ्या वडिलांनी शिवधनुष्याची प्रतिज्ञा केली होती, ते धनुष्य जर रामचंद्रांकडून उचलले गेले नसते तर त्या वेळी माझे जीवन तर ‘सशाच्या शिंगाने बनलेल्या धनुष्यासारखे कठीण बनले असते.’ अर्थांत माझे जीवन खूपच असंभवित बनले असते.
महाभारत सुभाषित
एतस्मात् कारणाद्राजन् पाणिग्रहणमिष्यते ।
यदाप्नोति पतिर्भार्यामिहलोके परत्र च ॥
हिंदी अर्थ :- राजन्! इसलिये सुशिला स्त्री का पाणिग्रहण करना सबके लिये अभिष्ट होता है, क्योंकि पति अपनी पतिव्रता स्त्रीको इहलोक में तो पाता ही है, परलोक में भी प्राप्त करता है । और सब तीर्थों में हाथों में हाथ डाले यात्रा कंठन करता हैं।
समस्यापूर्ती सुभाषित
कवी आणि काव्य यांचं आकर्षण अभिजन आणि लोकजन या दोघांनाही प्राचीन काळापासून आहे. त्यातूनच शीघ्रकवित्वाला प्रोत्साहन देणारे काव्याचे प्रकार निर्माण झाले- अभिजनांमध्ये समस्यापूर्ती तर लोकजनांमध्ये सवालजबाब.
समस्यापूर्तीमध्ये श्लोकाची शेवटची ओळ देत आणि त्या अनुषंगाने इतर तीन ओळी कवी रचत असत.
एकदा ‘ तक्रं शक्रस्य दुर्लभम्’ असा पादार्ध दिला. त्या अनुषंगाने एका कवीनं रचलेला श्लोक असा-
घृतं न श्रूयते कर्णे दधि स्वप्नेsपि दुर्लभम्!
मुग्धे दुग्धस्य का वार्ता तक्रं शक्रस्य दुर्लभम्!!
घृतं ( तूप हा शब्दही)
कर्णे न श्रूयते ( कानावर पडत नाही.)
दधि ( दही)
स्वप्नेsपि दुर्लभम् (स्वप्नातही दुर्मीळ.
मुग्धे ( अगं बाळ,)
दुधाबद्दल तर काय बोलावं. अगं, इंद्राला ताक मिळतच नाही. प्रत्येक कवीच्या प्रतिभेची झेप वेगळी. या श्लोकाच्या कवीनं तक्रं शक्रस्य दुर्लभम् या ओळीचा सरळसोट अर्थ घेऊन श्लोक रचला. फक्त वाच्यार्थात गुंतून पडणारे कवी अधम दर्जाचे असा सिद्धांत मम्मट नावाच्या साहित्यशास्त्रकारानं मांडला आहे. कवितेला फार मोठा दर्जा नसल्यानं हा श्लोक जनमानसात रुजला नाही.
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी (पुणे)
नीलाब्जद्युतिनयनं नितान्तवृत्तमास्यश्रीपरिचितचन्द्रिकाविलासम्।
स्नातायाः सरसि विलोक्य वक्त्रचन्द्रं मध्याह्ने मुकुलितमम्बुजं वनान्ते॥
हिंदी अर्थ :- जिसके नेत्र नीलकमल के समान कान्तिमान है, वैसे ही जिसका मुख सुंदर गोलाकार है, ऐसी सुन्दर स्त्री सरोवर से स्नान करके बाहर निकलती है, तब उसके मुख की शोभा परिचित चांदनी के विलास समान लगती है। तब उसके मुखरूपी चाँद को देखकर ‘वन के अन्दर रहा हुआ असली कमल दिन में ही मुरझा जाता है।’
मराठी अर्थ :- जिचे नेत्र नीलकमल समान चमकणारे आहेत, त्याच प्रमाणे जिचे मुख सुंदर गोलाकार आहे, अशी सुंदर ललना जेंव्हा सरोवरामधून स्नान करून बाहेर येते तेंव्हा तिच्या मुखाचे सौंदर्य परिचित चंद्रप्रकाशा समान विलसत असते. तिचा हा मुखरूपी चंद्र बघून जंगलात असलेले खरे कमळ दिवसाच कोमेजून जाते.
आत्माऽत्मनैव जनितः पुत्र इत्युच्यते बुधैः ।
तस्माद् भार्यां नरः पश्येन्मातृवत् पुत्रमातरम् ॥
हिंदी अर्थ :- पत्नि के गर्भ से अपने द्वारा उत्पन्न किये हुए आत्मा को ही विद्वान् पुरुष पुत्र कहते है, इसलिये मनुष्यको चाहिये कि, वह अपनी उस धर्मपत्नि को जो पुत्र की माता बन चुकी है, माता के समान ही समान देखे । (मराठी में कहावत हे की, स्त्री यह क्षणभर की पत्नि और अनंत समय के लिये माता होती है।)
काञ्चिद्दिनार्धसमये रविरश्मितप्तां
नीलांशुकाञ्चलनिलीनमुखेन्दुबिम्बाम्।
तां तादृशीं समनुवीक्ष्य कविर्जगाद
राहुर्दिवा ग्रसति पर्व विना किलेन्दुम्॥
हिंदी अर्थ :- भरी दोपहर में सूरज के किरणों से तप्त खुद के मुखरूपी चाँद को कोई सुंदरी काले वस्त्र के पल्लु से ढक देती है, उसे देखकर कवि कहता है, यह तो राहू पुर्णिमा के पर्व बिना ही साफ दोपहर में चाँद को निगल गया है। इसमें काला वस्त्र राहू है और मुख यह चाँद है।
मराठी अर्थ :- भर दुपारी सूर्याच्या किरणांनी तप्त असा स्वतःचा चेहरा कोणी सुंदरी काळ्या वस्त्राने झाकून घेते, हे बघून कवी म्हणतो की, हे तर राहू ने पोर्णिमे शिवायच विना पर्वाचे भर दुपारी चंद्राला गिळंकृत केले आहे. येथे काळे वस्त्र राहू आहे तर चेहरा हा चंद्र आहे.
महाभारत सुभाषित
अन्तरात्मैव सर्वस्य पुत्रनाम्नोच्यते सदा
गती रूपं च चेष्टा च आवर्ता लक्षणानि च ॥
पितॄणां यानि दृश्यन्ते पुत्राणां सन्ति तानि च ।
तेषां शीलाचारगुणास्तत्सम्पर्काच्छुभाशुभाः ॥॥
हिंदी अर्थ :- सब का अन्तरात्मा ही सदा पुत्र नाम से प्रतिपादित होता है। पिताकी जैसी चाल होती जैसे रूप, चेष्टा आवर्त (भँवर) लक्षण आदि होते हैं, पुत्र में भी वैसी ही चाल और वैसे ही रूप-लक्षण आदि देखे जाते हैं। पिता के संपर्क से पुत्रों में शुभ-अशुभ शील, गुण एवम् आचार आदि आते हैं।
जो मनुष्य के नियंत्रण में पूर्ण रुप से कभी आता नही , या आंशिक रुप से ही आता है ! आते आते बहुत तबाही मचाता है या कई जीवों के प्राण हर लेता है उसे हम सनातनी "भूत" कहते है ।
बहलबलसमर्था मेघनादादयो मे
सपदि युधि विशन्तः कीटहस्ते निपेतुः।
इति वदति दशास्यो हस्ततालं वितस्य
मशकगलकरन्ध्रे हस्तियूथं प्रविष्टम् ॥
हिंदी अर्थ :- रावण के मेघनाद इ. पुत्र जब वानर की सेना के बीच घुस गए तब वानरों ने उनका संहार कर दिया। उस बात को रावण ने असंभव जैसा माना, उस प्रसंग का वर्णन करते हुए कवि कहता है कि, मेरे बहुत अतुलनीय बलशाली मेघनाद इ. पुत्रोंने युद्धभूमी पर प्रवेश किया, उसके साथ ही वानरों के हाथों वह मारे गए, ऐसा कहते हुए खुदकी हथेलियों को मलते मलते उसने ऐसा जाना कि, ‘यह तो मच्छर के गले के छिद्र में हाथियों की टोली ने प्रवेश कर लिया।’ इसके जैसी असंभव बात बन गयी है।
मराठी अर्थ :- रावणाचे मेघनाथ इ. पुत्र जेंव्हा वानर सेनेच्या मध्ये घुसले, तेंव्हा त्या वानरांनी त्यांचा संहार केला. ह्या गोष्टीला रावणाने अशक्य मानले. त्या प्रसंगाचे वर्णन करतांना कवि म्हणतो की, माझे अत्यंत अतुलनीय पराक्रमी मेघनाथ इ. पुत्रांनी युद्धभूमीमध्ये प्रवेश केला आणि त्याच सोबत ते वानरांकडून पराजित होऊन मारले गेले, असे म्हणत स्वतःच्या हाताचे तळवे घासत त्याने असे जाणले की, ‘हे तर मच्छराच्या गळ्यांतल्या छिद्रांत हत्तींच्या टोळीने प्रवेश केला आहे.’ या सारखी अशक्य गोष्ट बनली आहे.
महाभारत सुभाषित
भार्यायां जनितं पुत्रमादर्शेष्विव चाननम्
ह्लादते जनिता प्रेक्ष्य स्वर्गं प्राप्येव पुण्यकृत् ॥
हिंदी अर्थ :- जैसे दर्पण में अपना मुँह देखा जाता है, उसी प्रकार पत्नी के गर्भ से उत्पन्न हुए अपने आत्मा को ही पुत्ररूप में देखकर पिता को वैसा ही आनन्द होता है, जैसे पुण्यात्मा पुरुष को स्वर्गलोक की प्राप्ति हो जाने पर होता है।
मृगशिशुनयनाया अक्षिपक्ष्मप्रकोणे
विलसति तरला या तारका तारकेव ।
प्रतिफलित इहोष्ट्रे भ्रान्तिरास्ते जनानां
तिलतुषपुटकोणे मक्षिकोष्ट्रं प्रसूता ॥
हिंदी अर्थ :- जिसके नेत्र मृग बालक के समान चंचल है, ऐसे सुंदरी के आँखों की पलकों के कोने में रही हुई पुतली आकाश के तारों जैसी लगती है; उसमें जब कोई उँट का प्रतिबिम्ब गिरता है, तब इन्सान को ऐसी भ्रांती होती है कि, ‘तिल्ली के छिल्लक के अंदर रही हुई मक्खी ने उँट को जन्म दिया है।’
मराठी अर्थ :- जिचे नेत्र मृग शावका समान चंचल आहेत, अशा सुंदरीच्या नेत्रांतल्या पापण्यांच्या कोपऱ्यांत असलेली बाहुली आकाशातल्या ताऱ्यासमान दिसते, त्यांत एखाद्या उंटाचे प्रतिबिम्ब पडल्यावर मानवाला भ्रम होतो की, ‘तिळाच्या सालीत असलेल्या माशी ने उंटाला जन्म दिला आहे.’