संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit
चिंतन
भारत वर्षातील महान विचारवंत भर्तृहरिने या समाजचे दिग्दर्शन करत असतांना, एवं समाजावर नजर टाकत असतांना भर्तूहरिला समाज चार प्रकारचा पाहाण्याला मिळाला.
समाजातला १) एक गट सत्पुरूष दिसला. २) दुसरा गट मध्यम म्हणजे सामान्यकोटीचा पाहाण्याला मिळाला. व
३) तिसरा मानुषराक्षस वृत्तीचा पाहाण्याला मिळाला.
४) चौथ्या प्रकाराला काय नाव द्यावे.
असा प्रश्न भर्तुहराला पडलेला दिसला. म्हणजे त्यांना काय म्हणाव!
हे भर्तुहरिने वर्णन करतांना पुढील पद्यात म्हटलेल आहे
एके सत्पुरुषा: परार्थघटिका: स्वार्थान्परित्यज्य ये ।
सामान्यास्तु परार्थमुद्यमभृतः स्वार्थाविरोधेन ये ।
तेSमी मानुषराक्षसा: परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये ।
ये निघ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे।।
१या पद्यात वर्णन करतांना म्हटलेले आहे की,जो व्यक्तीआपल्या स्वार्थाचा विचार न करता! मग तो स्वताःच्या ऊपभोगाचा असो की, किंवा कुटुंब परिवाराच्या उपजीवीकेचा विषय असो, अशा लाभ हानीचा विचार न करता,जे दुसऱ्याला लाभ पोहचवितो. किम्बहूना दुसऱ्यासाठीच संपुर्ण जीवन वाहुन घेतो. अशा पुरुषांची गणना सत्पुरूषामधे होत असते.
असे पुरूष आपले अतिशय महत्वाच काम सोडून, दुसऱ्याच्या कार्यातला धावून जात असतात. व मदत करतात. त्यांना ऊत्तम एवं सत्पुरूष म्हणतात.
२) जे सामन्य कोटीचे पुरुष असतात. ते आपल्या लाभाची हानी न करता ! दुसर्यांच्या हिताकरता प्रयत्नशील राहतात. त्यांना मध्यम कोटीचे पुरूष म्हणतात.
उदाहरणार्थ आपल्या घरी चारचाकी गाडी आहे. तुम्हाला एखाद्याने प्रयोजन विशेष गाडी मागीतली. तितक्यात तुमचे किरकोळ काम निघाले. फार महत्वाचे देखिल नाही. तरी पहिले आपले स्वतःचे काम करेल. मग दुसऱ्याच्या कामात मादत करील. यांना मध्यम कोटीचे पुरूष म्हटलेले आहे.
३ तिसरे आपल्या स्वार्थासाठी इतके आंधळे झालेले असतात. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याची हानी करायला मागेपुढे पहात नाही. सर्वकाही मलाच मिळाले पाहिजे.
एवं सर्वेसर्वा मीच आहे. मला एकट्याला सर्व काही मिळाले पाहीजे. त्यामधे श्री, धन असो किंवा वैभव असो! एखाद्याच्या कार्यक्रमात जर गेले. तर कार्यक्रमाचा अध्यक्ष मीच, ऊद्घाटक मीच्,
"असी त्याची मीच् मीच् चाललेली असते"
जे काही मानापानाचे कार्यक्रम संपन्न होणार असतील, ते सर्व माझ्याच हस्ते झाले पाहीजेे. दुसऱ्याच्या हातात एकही कार्यक्रम गेला नाही पाहिजे. असे मनोवृतीचे लोक असतात,
जे काही मलाच मिळाले पाहीजे. अशी त्याची वृत्ती बनलेली असते. सत्काराचा सर्वात मोठा हार मलाच पाहीजे. नव्हेतर स्वतःच्या लाभा करता! दुसऱ्याच्या हानी करायला मागेपुढे पहात नाही. दुसऱ्याचे चांगले चाललेल काम बिघडविणारे, अशा लोकांना मनुष्यरुपी राक्षस "म्हटलेले आहे.
४)चतुर्थ प्रकारचा जो पुरूष आहे.
काही देणघेण नसतांना विनाकारण दुसऱ्याला हानी पोहोचवितो.एवं नुकसान करतो.
त्यांना काय नाव द्याव हेच कळत नाही.
विद्वान सुद्धा! अशा नमुन्यांना नाव देण्याचा बाबातीत संभ्रमात पडलेले आहे.
यांना काय नाव द्याव म्हणुन? हा प्रश्न पडालेला आहे. यांचे कामच असे असते की, कोठे काही चांगल कार्य चाललेले असेल, त्या कार्य करणाऱ्या व्यक्तीचा यांचा काही अर्थाअर्थी संबध नाही. तरी देखील विनाकारण त्यांचा कार्याचा नाश करात असतात.
मग ते चांगले चाललेल कार्य कसे उधळून लावयचे.यात त्यांना जास्त ऊत एवं रस असतो.
अशा लोकांना काय उपमा द्यावी एवं यांना कोणत्या नावाने संबोधावे हेच कळत नाही. अशा प्रकारे समाजातील चार प्रकारच्या मनुष्यांचीओळख करुन देण्याचा प्रयत्न भर्तृहरी या विद्वानानी केलेला आहे.
म्हणुन जीवनात चालतांना उत्तम मार्गाने चालण्याचा जरुर प्रयत्न केला पाहिजे.
वाईट कर्म आपल्या हातून घडणार नाही,याची काळजी प्रत्येक माणसाने
घेतली पाहाजे.
प्रत्येकाच्या जीवनात वरील विचार निश्चितच मार्गदर्शक ठरतील !असी आशा व्यक्त करतो.
महंत श्री जयराज शास्री (बोरीखुर्दसाळवाडी़)
फो.८९९९४४२५२०
🙏🙏🙏दंडवत प्रणाम.