महानुभाव पंथीय नियमावली - 02
महानुभाव-पंथिय-ज्ञान-सरिता-Mahanubhavpanth-dnyansarita
सर्व उपदेशी बांधवांनी या नियमाचे पालन केलेच पाहिजे ही नियम सर्वांसाठी लागू आहे.
1. स्मरण करताना पूर्ण नाम म्हटल्यावर एक मणी ओढावा
2. सकाळी 3 ते 6 वाजे दरम्यान उठून पाच ते पंधरा गाठ्या स्मरण करावे
3. स्मरण करताना लीळा आठवाव्यात
4. पाचव्या नामाच्या दहा किंवा पंधरा गाट्या स्मरण करावे
सकाळी सहा ते नऊ या दरम्यान पारायण करावे
5 रिकाम्या वेळी काम करताना तोंडाने पाचव्या नामाचे स्मरण करावे
6 एकही दिवस नाम स्मरण केल्या शिवाय रिकामा जाऊ देऊ नये
7 वर्षातून एकदा दोन-चार महा स्थानी व इतर दहा पंधरा स्थानी करावी
8 वर्षातून एक वेळा तरी अन्नदान करावे
9 यासाठी वर्षातील कमाईचा दहा टक्के भाग जमा ठेवावा
10 पवित्याच्या दिवशी गुरुला पविते करायला जावे
11 आषाढी व नवमीला प्रसाद वंदन करायला जावे
12 दररोज सकाळी दुपारी व संध्याकाळी देवाला उपहार दाखवूनच जेवण करावे
13 स्थान प्रसाद भिक्षुक वासनीक.या चार साधनावर श्रद्धा ठेवावी
14 आपल्या धर्माचा भिक्षुक भेटल्यावर त्यांना दंडवत प्रणाम करावा व जेवण चहा घेण्याबद्दल विनंती करावी
15 गावातील मंदिरात सकाळ संध्याकाळ देव दर्शनासाठी जावे
16 देवपूजेला दर शुक्रवारी अमावस्या पौर्णिमेला स्नान घालावे
17 साधू संत व इतर कोणाचीही निंदा करू नये
18 आपल्या मुला मुलींना बाराव्या वर्षी उपदेश द्यावा
19 बाहेरून आल्यावर देव नमस्कार केल्याशिवाय अन्न पाणी घेऊ नये
20 वयाच्या छप्पनव्या वर्षापर्यंत अनुसरण्याचा प्रयत्न करावा
21 उपदेशाने नऊ प्रकरणे पाठ करावे
उपदेशी बांधवांनी हे करू नये व निषेध अंगवू नये ज्यांनी उपदेश घेतला आहे त्या उपदेशी लोकांनी हे करू नये.
1. दाखवण्यासाठीही लोक लाजेनेही देवी देवतांची भक्ती करू नये
2. हिंसक व्यापार व्यवसाय करू नये
3 इतरांचे दोष पाहू नये
4 हिंसा टाळण्यासाठी पाणी शोधून प्यावे
5 देवतेचे कार्यक्रम पाहण्यास जाऊ नये
6 कोंबडी बकरी पाळू नये
7 कीटक नाशक यांची दुकान लावू नये
8 अन्य धर्मांच्या साधूंचे वंदन भजन पूजन करू नये
9 कोणत्याही व आपल्याही फोटोला अगरबत्ती दाखवू नये आरती ओवाळू नये पाया पडू नये%
10 कोणतेही उपवास करू नये
11 देवतेच्या यात्रेतील अन्न खाऊ नये सप्ताह भंडारा जेऊ.
नये देवतेचा प्रसाद खाऊ नये
12 श्राद्धाचे तेरवीचे हेतू धातूचे नवसाचे. वाम वेदाचे सुखाचे. अन्न खाऊ नये. तसेच माणूस मेल्यावर दहा दिवस त्यांच्या घरचे अन्न खाऊ नये.कारण त्याना सुतक असते आपण जर अन्न खाल्ले तर तो जीव आपल्याला उपद्रव करू शकतो म्हणून खाऊ नये
13 हात कोणालाही दाखवू नये व आपले भविष्य पाहू नये अन्य संन्याशी किंवा ज्योतिष यांना
14 मनी मंत्र धागे दोरे गंडे सर्पमंत्र विंचू मंत्र अंगठ्या मंत्रून घेऊ नये देऊ नये
15 हे केल्यामुळे देवता भक्तीची चाल चालू होते. आणि पुरुष विकल्पाला शरण जातो म्हणून विकल्प रूप क्रिया कोणतीही करू नये उपदेशी बांधवांनी
16, कितीही कठीण प्रसंग आला कितीही दुःख संकट आले तरी आत्महत्येचा विचार करू नये. यामुळे भूत योनीला जावे लागते आणि त्याला या सृष्टी कोठेच ठाव मिळत नाही म्हणून आत्महत्येचा विचार मनामध्ये आणू नये आणला तर अनारब्ध आणि पुरुष नेहमी असे उल्लेख करतो मग प्रारब्ध होते
17 मुंग्या माशा गवत गोगलगायी पाल उंदीर इत्यादी सूक्ष्मजीव जंतूंची प्राण्यांची हिंसा करू नये त्यामुळे स्थावर योनीला जावे लागते.
18 अन्यवार्ता करू नये अन्य वार्ता केल्यामुळे परमेश्वराला खंती येते आणि परमेश्वर उदास होता म्हणून अन्य वार्ता करू नये
1 आपला परमेश्वर व शास्त्र यांच्या वेगळे बोलणे ते अन्य वार्ता आहे
2 ज्योतिष वैद्यक, गायन संगीत याबद्दल बोलू नये अन्य लोकांचे देवतांचे गीत म्हणू नये.
3 मनुष्य बोललेले मनुष्याने केलेले याबद्दल वर्णन करू नये स्तुती कोणत्याही मनुष्याची करू नये परमेश्वराची स्तुती करावी इतरांची करू नये
4 दुसरे निंदा बोलत असतील ते ऐकू नये व त्यांना प्रोत्साहन देऊ नये कारण आपण त्याला निमित्य होऊ म्हणून
5. देवतांची निंदा, अनादर करू नये.
6 जीव जे परमेश्वर भक्त नाहीत परमेश्वराचे ज्ञान नाही वेधवंत बोधवंत नाहीत उपदेशी नाहीत त्यांच्याबद्दल चर्चा करू नये त्यांच्या सह कौतुका गोष्टी करू नये
7 देवता... देवतांच्या कथा चमत्कार मंदिरे यांच्या बद्दल चर्चा करू नये. अन्य देवालय मंदिरे देवता अन्य महात्मे यांची प्रशंसा करू नये.
8. प्रपंच... जगातील चमत्काराबद्दल चर्चा करू नये. देवतेच्या साधकांनी दाखवलेल्या चमत्काराची प्रशंशा करू नये त्यामुळे विकल्प दोष लागतो.
9. सूत्रपाठ लीळाचरित्र श्रीमूर्ती वर्णन यांचे पारायण नेहमी करत राहावे त्यामुळे परमेश्वर प्रसन्न होतील आणि आपल्यावर येणारे विघ्न टळतील
10. सकाळी तीन ते सहा या दरम्यान जास्ती स जास्त स्मरण करावे यावेळेस परमेश्वर सर्व जीवांचे चिंतन करतात म्हणून सकाळी तीन ते सहा या वेळेस जास्त स्मरण करावे
11. पारायण सकाळी सहा ते नऊ या सात्विक काळामध्ये करावे
12 दंतकथा ऐकू नये इतर देवी देवतांच्या किंवा एखाद्या पुरुषाच्या किंवा गोष्टी व इतर या अन्यवार्ता करू नये स्मरण पारायण शास्त्र वाचन श्रवण हेच करावे.
उपदेशी बांधवांनी ही व्यसने करूच नये
1. मद्यपान गुटखा तंबाखू बिडी सिगारेट यांचे सेवन करू नये
2 जुगार सट्टा पत्ता रेष खेळू नये
3 मासभक्षण करू नये
4 चोरी करू नये
5 शिकार करू नये
6. परस्त्री गमन करू नये. स्त्रियांनी परपुरुष गमन करू नये
7. वेश्यागमन करू नये. उपदेशी स्त्रियांनी व्यभीचार करू नये.
कारण ही व्यसने केल्यामुळे आर्थिक नुकसान होते दरिद्री येते बुद्धी भ्रष्ट होते समाजात मान राहत नाही आजार होतात घात होऊ शकतो घरातील वातावरण दूषित होते ही व्यसने केल्यामुळे नरकाला जावे लागते म्हणून उपदेशी बांधवांनी ही व्यसने करू नये
20. उपदेशाला एवढी तरी ज्ञान असावे
आपुले कर्तव्य काय आहे तरच उपदेश घेतल्याचा फायदा होईल गोमटं होईल.
1. नर्क चुकावे व परमेश्वराचा मोक्ष व्हावा
2 परमेश्वर व्हावा एवढे तरी ज्ञान मिळवावे
3 हिंसा होऊ नये असा प्रयत्न करावा
4 स्मरणाला जास्त वेळ द्यावा निरर्थक बोलणे टाळावे
5. राजस तामस अन्य मनोरथमाळा करू नये
6 धर्मावेगळी कुणाचीही ममता नसावी
7 कोणाचेही अहित चिंतू नये
8 कोणाचाही द्वेष मत्सर करू नये
9 स्मरणामुळे परमेश्वराची आठवण राहते
10 परमेश्वर प्राप्तीसाठी दुःख करावे
11 क्रोधावर ताबा.सयम..ठेवावा
12 आपले दोष पाहून सुधारणा करावी
13 दुसऱ्याचे दोष पाहू नये त्यांचे गुण घ्यावे
14 दुसऱ्याच्या देवी देवतांची निंदा करू नये
15 परस्परात परमप्रीती व्हावी
16 प्रिय भाषण करावे सत्यतेने वागावे
17 मरेपर्यंत आपला धर्म सांभाळावा
18 अहंकाराने वागू नये
19 जातीभेद करू नये त्यामुळे विकल्प होतो
20 जीव कर्म करतो त्यानुसार देवता फळे.भोगवतात
21 संसारात पाप रूप कर्म अधिक घडतात त्यासाठी स्मरण जास्त करावे
22 देवता फळे अनित्य आहे परमेश्वराची प्राप्ती नित्य आहे
23 स्मरणामुळे परमेश्वर नरकापासून सोडवितात
2. स्मरण करण्यासाठी कष्ट करावे लागत नाही
25. नामस्मरण केल्याने देवता विघ्न करत नाही
26. नामस्मरणामुळे अपघात टळतो
27. जड चेतन वस्तूमध्ये ममता नसावी त्यामुळे भूत योनीला जावे लागते म्हणून घरदार मुलं बाळ घरातील कोणतीही वस्तू यांच्यामध्ये ममता ठेवू नये त्यामुळे भूत योनी प्राप्त होते.
28. स्मरण करून जीवाने आपला उद्धार करून घ्यावा नाही स्मरण केले तर आपले काही खरे नाही म्हणून परमेश्वराने स्मरण विधी लिहिला एक नाम तरी बाकी सब दुकानदारी या म्हणीप्रमाणे जीवाने स्मरण करून आपुला उद्धार करून घ्यावा
वरील सर्व नियमाचे पालन करून नामधारक उपदेशी मंडळींनी पालन करून आपला धर्म शेवटास नेऊन आपला उद्धार करून घ्याव
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज आपल्या सर्वांना या नियमाचे पालन करण्यासाठी सुबुद्धी देव ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो
1.श्री गोपाल कृष्ण महाराज की जय
2 श्री दत्तात्रेय महाराज की जय
3 श्री चक्रपाणी महाराज की जय
4 श्री गोविंद प्रभू महाराज की जय
5 सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज की जय
6 साळे.सोळाशे तीर्थ स्थान की जय
7 सत्य सनातन महात्म.धर्म की जय
8 चतुर्विध साधन की जय
9 मुरली मनोहर की जय
दंडवत प्रणाम
सुजान मुनी अंकुळनेरकर
श्री दत्तकृपा ग्रुप.