बाल कहानी - ठकास महाठक - marathi bal kahani

बाल कहानी - ठकास महाठक - marathi bal kahani

 बाल कहानी - ठकास महाठक 

एका गावात एक शेतकरी राहत असे त्याचा मुलगा थोडा मंद बुद्धीचा होता परंतु त्याची सून मात्र फार हुशार आणि शहाणी होती एक दिवस मुलगा आपल्या घराबाहेर झाडाखाली बसून कुऱ्हाडीचा दांडा करीत होता. तितक्यात कोणी तिघेजण तेथे आले व म्हणाले तुला आमच्या राजाने बोलाविले आहे. आमचा राजा म्हणजे समुद्राचा राजा समुद्राचा राजा म्हणजे देव पण ह्याला बोलविण्यास जी माणसे आली होती ती काळी कभिन्न होती. ते बहुतेक राक्षसांचे दूध होते. 

पण ही गोष्ट त्या अर्धवटाच्या लक्षात आली नाही त्याने विचारले तुमच्या राजाचे माझ्याशी काय काम आहे आमच्या राजाला एक फार महत्त्वाचे काम करून घ्यायचे आहे ते तुमच्याकडूनच होणार असल्यामुळे त्यांनी तुम्हाला बोलावून आणण्यासाठी आम्हाला पाठवले आहे असे ते काळे लोक म्हणाले.

माझे वडील शेतावर गेले आहेत आणि अंधार होण्याच्या सुमारास परत येतील त्यांना घेऊन जा असे होय मग तुम्ही दोघेही चला उद्यापर्यंत तुम्ही बंदरात आला तर ठीक आमचे नाव तेथे असेल असे सांगून ते निघून गेले.

वडील घरी आल्याबरोबर मुलाने राजाचा निरोप त्यांना कळविला व म्हणाला “बाबा आज समुद्री राजाकडून दोघे तिघेजण आले होते त्या राजाला आमच्याकडून काही काम करून घ्यावयाचे आहे जर आपण ते काम केले तर आपल्याला पुष्कळ मोठे बक्षीस मिळणार आहे” 

“राजाचे चिन्ह वगैरे काही होते का त्यांच्याजवळ?” शेतकऱ्याने विचारले.

“तसे काही त्यांनी आणले नाही ते म्हणाले आमची नाव बंदरात आहे, उद्या सकाळपर्यंत आला तर आम्ही घेऊन जाऊ” मुलगा म्हणाला.

“बंदरापर्यंत मी पायी जाऊ? शक्य नाही. जर ते अंतर कमी झाले तरच मी येऊ शकेल” असे म्हणून म्हातारा झोपला.

मुलाने ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली म्हणाला “समुद्राच्या राजाने आम्हाला बोलाविले आहे परंतु जोपर्यंत बंदरापर्यंतचे अंतर कमी होणार नाही तोपर्यंत बाबा येणार नाहीत.” 

बायको म्हणाली “एवढेच ना मग त्यात काय एवढे मोठे सारी वाट सरेपर्यंत गोष्ट सांगत रहा आपल्या वडिलांना.” 

बायकोचे म्हणणे त्याला पटले दुसऱ्या दिवशी तो पहाटे उठला वडिलांना उठविले म्हणाला, “बाबा लवकर उठा तुम्ही म्हणाला होतात ना रस्ता कमी केला तर मी येईन म्हणून चला मी वाट कमी करतो.” 

दोघे बापलेक बंदराकडे निघाले वाटेत मुलगा बापाला सारख्या गोष्टी सांगत चालला होता शेवटी सूर्योदयाच्या सुमारास पोहोचले ते दोघे बंदरावर तेथे तिघे राक्षस दूत आणि एक मोडके नाव त्यांच्या दृष्टीस पडली ते पाहून शेतकरी म्हणाला “ही कसली होडी राक्षसी होडी दिसते आहे ही.” 

“आमच्या राजाजवळ जितक्या नावा आहेत त्यात हीच जलद चालणारी आहे म्हणून आम्हीही होडी आणली आहे” ती काळी माणसे म्हणाली. 

ते दोघे बाप लेक त्या नावेत जाऊन बसले आणि होडके चालू झाले थोड्याच वेळात ती होडी एका बेटाला लागली त्या बेटावर कोठे काही झाडपाला दृष्टीस पडत नव्हता सर्व प्रदेश अगदी रूक्ष होता तेथे उतरल्यावर त्या बाप लेकांना कळले की, ते राक्षसांचे बेट आहे पण आता काय करता?

त्या राक्षसदूतांनी दोघांना आपल्या राजासमोर आणून उभे केले त्याला पाहताच दोघांची बोबडी वळल्यासारखीच झाली कारण तो राजा आपल्या दुतांपेक्षा जास्त काळा आणि कुरूपही होता. 

“तुम्ही आम्हाला इतक्या दूर कशासाठी बोलाविले आहे?” शेतकऱ्याने धीटाईने त्या राक्षस राजाला विचारले.

“काही विशेष नाही आमच्याकडे एक फार मोठे भांडे आहे, त्याच्या बुडापाशी विस्तव घालण्यासाठी तुम्हाला बोलावून आणले आहे आमच्या लोकांना काही ते जमत नाही जर का तुमच्याकडूनही हे काम झाले नाही तर जिवंतपणे तुम्ही परत जाऊ शकणार नाही.” राक्षस राजाने सांगितले. 

अगोदर ते भांडे तरी पाहू द्या मग पाहू काय करायचे ते. शेतकरी म्हणाला. 

राक्षस त्यांना एका खोलीत घेऊन गेला. तेथे मध्यभागी एक मोठे तांब्याचे भांडे ठेवलेले होते शेतकऱ्यांनी ते दुरून पाहिले नंतर राक्षसांना बाहेरून पाठवून देऊन खोलीला आतून कडी लावून घेतली. मग सावकाश त्या दोघांनी चारी बाजूस हिंडून फिरून ते भांडे पाहिले ते त्या शेतकऱ्याला ओळखीचे वाटले. 

तो मुलाला म्हणाला, “तुला ह्या हंड्याविषयी काही माहित आहे का हे अक्षय पात्र आहे हे पूर्वी आपल्या राजाकडे होते. सध्याचा जो राजा आहे ना, त्याचे पंजोबा. ह्यात भात शिजवून जे कोणी येतील त्यांना जेवण देत असत तोच हा हंडा या राक्षसांनी चोरून आणला आहे इथे.” 

मुलगा म्हणाला “पण बाबा आपण येथून सुटणार कसे?” 

“ते सर्व मी पाहतो काढतो काहीतरी मार्ग” 

शेतकऱ्याने दार उघडले राक्षसांना बोलाविले ते मोठ्या घाईने आले त्यांनी विचारले, “विस्तव घातला का?” 

शेतकरी म्हणाला, “विस्तव घालायला काही लाकडे सरपंच पाहिजे की नाही याला आंब्याची जांभळाची चिंचेची वडाची पिंपळाची लिंबाची आणि बाभळीची लाकडे अशी नऊ तरी ची लाकडे पाहिजेत त्याशिवाय गारगोट्या कापूस वाळलेल्या काटक्या हे सर्व सामान आणून द्या म्हणजे पेटवतो चूल.” 

राक्षस दूत शेतकऱ्याचा निरोप घेऊन राजाकडे गेले व त्याला तो निरोप सांगितला राजा एकदम मोठ्याने ओरडून म्हणाला, “तुम्हाला माहित नाही काय आमच्या बेटावर साधे गवत सुद्धा नाही मग कोठून असणार एवढी लाकडे.” 

ते ऐकून शेतकरी राक्षस राजाला म्हणाला, “तरीपण आमच्या देशात आहेत ना आपल्या दोन दुतांना पाठवा आणि मागवा आमच्या सुनेकडून बरोबर आपल्या दोन मुलांना पाठवून द्या नाहीतर तिच्या विश्वास बसणार नाही.” 

“जोपर्यंत लाकडे येणार नाही तोपर्यंत तुम्ही दोघे ह्याच खोलीत बसून रहा” असे सांगून राक्षसांच्या राजाने त्या दोघांना हंड्याच्या खोलीत बसून ठेवून खोली बंद करून घेतली. शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्याने आपल्या दोन मुलांना नावाड्यांबरोबर शेतकऱ्याच्या गावी पाठवून दिले तेथे पोहोचल्यावर राक्षसाचे मुलगे शेतकऱ्याच्या सुनेला म्हणाले “आम्ही राक्षस राजाचे मुलगी आहोत तुझा सासरा व पती आमच्या देशात आहेत त्यांनी जांभळाची आंब्याची चिंचेची वडाची पिंपळाची बेलाची वगैरे नऊ लाकडे तुझ्याकडून मागून आणावयास सांगितली आहेत.” राक्षसाचे म्हणणे ऐकल्याबरोबर सुनेला कळले यात काहीतरी घोटाळा आहे. 

ती राक्षस पुत्रांना म्हणाली “तुम्हाला पाहिजे असलेल्या सर्व वस्तू त्या खोलीत आहेत तेथून काय काय ते घेऊन जा” असे सांगून तिने एका अंधार कोठडीकडे बोट दाखवले दोघे राक्षस पुत्र आत शिरताच तिने बाहेरून दार बंद करून घेतले व कुलूप लावून घेतले बाहेर उभे असलेल्या राक्षसांना ती म्हणाली “तुमचे राजकुमार त्या खोलीत आहेत परंतु त्या खोलीची किल्ली काही केल्या सापडत नाही आमच्या घरवाल्यांनी किल्ली दिली म्हणजे ते दार उघडेल तोपर्यंत काही करणे शक्य नाही जा आपल्या राजाला जाऊन सांगा.” 

राक्षस होडी घेऊन आपल्या राजाकडे गेले व सुनबाई ने सांगितल्याप्रमाणे सांगितले राक्षस राजा कावरा बावरा झाला त्याचे आपल्या आपल्या मुलांवर अतिशय प्रेम होते त्याने शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला सोडून दिले व घरी जाण्यास सांगितले. 

“असे कसे आम्ही काम करून बक्षीस घेऊनच जाणार आम्हाला घरी जायची काही घाई नाही” शेतकरी म्हणाला. 

राक्षस राजाने त्यांना बक्षीस म्हणून दोन सोन्याच्या विटा दिल्या आणि एका नावेत बसून घरी पाठवून दिले व त्याच्या नावेतून आपल्या मुलांना परत येण्यास सांगितले घरी आल्यावर त्यांनी राक्षस पुत्रांना त्यांच्या घरी पाठवून दिले. 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post