अध्यात्म कथा - वशिष्ठ आणि लवणाक्ष राजाची
एके दिवशी परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींच्या सन्निधानात असताना महादाईसा पुराण ऐकुन आल्या. मग महादाईसांनी सर्वज्ञांना विचारले,जी जी पुराणामध्ये लवणख्यान सांगतात ते खरं आहे का? " सर्वज्ञ म्हणाले, " खरं आहे बाई, लवन नावाचा राजा राजसभेत सिंहासनावर बसला होता. समोर मनोरंजनार्थ नाच-गाणे चालू होते. तेवढ्यात चमत्कार दाखवणारा एक आला. तो सभेमध्ये मोराचा पीस फिरवुन ( भवंडुन ) गेला. त्यामुळे राजाला झोप आली आणि राज स्वप्न पाहु लागला. तो शिकारीला निघाला. तेव्हा समोरून रानडुकर निघाले.
तो त्या रानडुकरांच्या मागे घोड्यावरून लागला. परिवार मागे राहिला. डुक्कर पुढे पळत होते आणि घोडा त्याच्या मागे लागलेला होता. ते रानडुकर रस्ता सोडून भयंकर दाट जंगलात घुसले. समोरील एका कड्यावरून उडी माती आणि राजाने घोडा फिरवण्याचा प्रयत्न केला. पण घोड्याचावेग फार होता घोडा थांबायला तयार नव्हता घोडा बेफाम धावत होता. म्हणून राजाने एका झाडाची फांदी धरली. घोडा सोडून दिला. खालून घोडा निघून गेला. संध्याकाळची वेळ झाली होती.
जिकडे तिकडे घनदाट जंगल होते. रात्रीचे कुठे जायचे म्हणुन तो त्या झाडाखाली थांबला. रात्र झाली अनेक प्रकारचे हिंस्त्र प्राणी ओरडु लागले. रातकिडे आवाज करु लागले. राजाला रात्रीची भिती वाटयला लागली. कशी तरी रात्र काढली सकाळी उठला पाउल रस्त्याने निघाला. तेव्हा तहान भुक लागली. असा जात होता. तेव्हा ऐक तरूण मुलगी तिच्या डोक्यावर पाण्याची लहान घागर होती. ती लाकडे आणायला निघाली होती. तेव्हा राजाने म्हटले, "मला पाणी प्यायला दे ना.'
तेव्हा तिने म्हटले, ' भी महाराची आहे. मी तुला पाणी कशी देणार. तुला विटाळ होईल ना. ' तेव्हा राजाने म्हटले, ' असे ना का महारीण. ' तेव्हा हिने म्हटले, माझा पती होशील तर तुला भाकरी पाणी देईन. ' तेव्हा त्याने म्हटले, ' हो होईन. ' मग तिने त्याला मग ती पुढे तो मागे अशी ते महारवाड्याला घेऊन आली. मग तिने आपल्या आई बापाला म्हटले, ' मी माझ्यासाठी पती आणला आहे. ' त्यांनी म्हटले, ' तु दैवाची भाग्याची तुला एवढा चांगला पती मिळाला आहे. ' मग राजा तेथेच तीच्या घरी राहीला. तेथे कामधंदा करू लागला. मग तीला तीन मुले झाली. तेथे बारा वर्षे होता. मग तेथे भयंकर दुष्काळ पडला. मग ते दोघे पती पत्नी गाव सोडून निघाले. तेव्हा रस्त्याने एक मुलं सरले. ते दफन केले. मग पुढे निघाले. तेव्हा दुसरे मुलं सरले. त्यांचेही दफन केले.
मग पुढे तीघे निघाले तेव्हा पत्नीला तहान लागली. तिने म्हटले, ‘ अहो मला तहान लागली. ' तो घागर घेऊन पाणी भरण्यासाठी गेला. घागर भरून आणली. तोपर्यंत पत्नी आणि मुलं दोघेही सरले. लाकडे जमा करून त्यांना सरणावर घातले. मग भयंकर दुःखी झाला. मग सरणामधी उडी टाकण्याकरता आंग झुकवले तेवढ्यात प्रधानाने थापडले. आणि राजाने डोळे उघडले. आणि राजाने प्रधानाला म्हटले ' ऑऽऽ मी जे पाहिले ते खरं की आता मी जे समोर पहात आहे ते खरं आहे? ' तेव्हा प्रधानाने विचारले, ' काय भानगड आहे? ' मग राजाने स्वप्नातील सगळी गोष्ट प्रधानाला सांगितली.
मग अश्वशाळेमध्ये घोडा बांधलेल्या जागेवर पहायला गेले तर घोडा जाग्यावर नाही. मग राजाने म्हटले, चला मी तुम्हाला त्या कुठल्या कुठल्या जागा आहेत ते दाखवतो. मग घोड्यावर बसुन राजा प्रधान पहायला गेले. राजाने म्हटले, 'मी ह्या रस्त्याने शिकारीसाठी चाललो होतो. मी ह्या रस्त्याने गेलो. इथे रानडुकर निघाले, ह्या बारीक झाडीत दाट जाळीत काट्यात डुक्कर घुसले. म्हणून इथून घोडा वळविण्याचा प्रयत्न केला. पण बेफान झालेला घोडा लगामालाही आकळेना म्हणुन मी ह्या झाडाची फांदी धरली. इथे महाराची मुलगी भेटली. इथे बारावर्षे होतो. म्हणून राजा महारवाड्यात घेऊन गेला. तेव्हा तो म्हातारा बाहेर निघाला. त्या म्हाताऱ्याने म्हटले आमचे जावई होते. ते दुष्काळाच्या वर्षी गेले. ते यांच्यासारखे (राजासारखे) होते. '
मग राजा प्रधान दोघे तेथुन निघाले. मग एका मुलाला दफन केले म्हणून ती जागा ते थडगे दाखवले. तेथे वर माती वैगरे होती ते दाखवुन दिले. मग पूढे निघाले. पूढे गेल्यावर मग दाखविले इथे एकाला दफन केले. आणखी पूढे गेल्यावर दाखविले इथे दोघाना चितेवर ठेवले. त्यांचा अंतविधी केला. मग मीही सरणामध्ये उडी घालावी तर तू मला जागे केले. " मग सर्वज्ञ म्हणाले, " हा दृष्टरुप संसार फार मोठ्या स्वप्नाप्रमाणे आहे. सत्य आहे म्हणुन याला घेता येत नाही. आणि खोटा आहे म्हणून सोडून पण देता येत नाही. " यावर सर्वज्ञांनी स्वप्नाचा आणि खारानीएचा दृष्टांत सांगितला.
भगवान सर्वज्ञ म्हणाले, "कोणी एक झोपलेला असतो. झोपेत स्वप्न पहातो आणि स्वप्नात म्हणतो, ' माझ्या पाठीमागे वाघ लागला. त्याने मला पकडले फाडले खाल्ले असे दुःख भोगतो. दुसर स्वप्न पडलं कि मी राजा झालो. माझी हत्तीच्या अंबारीत बसुन मिरवणुक निघाली आहे. असे सुख भोगत होता. जेव्हा जाग येते तेव्हा पहातो तर वाघही नाही आणि हत्तीची अंबारीही नाही. परंतु स्वप्ना जे सुख दुःख भोगले ते खोटे म्हणावे काय? ' नाही सुख दुःख भोगले ते खरे आहे. तरी वाघाने खाल्ले खोटे. हत्तीच्या अंबारीत बसला हेही खोटे. परंतु सुख दुःख भोगले ते खरे होते.
सर्वज्ञ म्हणाले ‘‘बाई कोणी एक झोपलेला असतो. तो अंथुरणात लघवी करतो त्याला वाटते, ' मी पाण्याचा तांब्या घेऊन दाराबाहेर गेलो. लघवी केली. ' जाग आली तर तांब्या घेतला बाहेर गेला. हे सर्व खोट आंथुरणात लघवी केली ते मात्र खरं. ते धुतल्याशिवाय त्याची घाण जाणार नाही. ” मग सर्वज्ञ " मुळातच जीवस्वरुप अज्ञान आहे या अज्ञानामुळे अन्यथा ज्ञान निर्माण होते. आणि अन्य जीव ठाम निश्चयात्मक देवतेला परमेश्वर समजतो. हे अन्याथाज्ञांनी ज्ञान होय. अज्ञान हे अन्यथाज्ञान स्वप्नाप्रमाणे. तर तथाकथित ज्ञान स्वप्नातील आत्मज्ञानप्रमाणे म्हणायचे.